Maharashtra Political News Today : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून शरद पवार यांनी मंगळवारी ( २ मे ) निवृत्त होण्याची केली होती. उत्तराधिकारी निवडण्यासाठी पक्षांच्या नेत्यांची आज ( ५ मे ) बैठक होणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदी शरद पवार राहणार की अन्य कोण होणार हे ठरणार आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Update Today : राज्यातील प्रत्येक घडामोड एका क्लिकवर…

19:12 (IST) 5 May 2023
बुलढाणा: ‘बोलेरो’ पुलावरून कोसळली; वृद्धा ठार

बुलढाणा: प्रवाशांना घेऊन जाणारी ‘बोलेरो’ पुलावरून कोसळल्याने एक वृद्ध महिला ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले. तसेच तिघे किरकोळ जखमी झाले.

सविस्तर वाचा…

19:02 (IST) 5 May 2023
खरगे जी, पवारांचा आदर्श घ्या…. राजीनामा द्या!; कॉंग्रेसमधून निलंबित आमदाराची मागणी

नागपूर: मल्लिकार्जुन खरगे यांनी शरद पवारांचा आदर्श घेऊन राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षातून निलंबित माजी आमदार आशीष देशमुख यांनी केली आहे.

सविस्तर वाचा…

18:47 (IST) 5 May 2023
तुमचा उत्तराधिकारी कोण असणार? पत्रकाराच्या प्रश्नावर शरद पवार स्पष्टच म्हणाले, “माझ्या मनात जरूर…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. अशातच शरद पवारांनी कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहानुसार आपला राजीनाम्याचा निर्णय रद्द केला. यानंतर शुक्रवारी (५ मे) घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी तुम्ही उत्तराधिकारी निर्माण करण्याची गरज आहे आणि त्यासाठी काम करेन, असं म्हटलं. त्यादृष्टीने काही पदांची निर्मिती होईल का? असा प्रश्न विचारला. यावर शरद पवारांनी त्यांची भूमिका मांडली.

सविस्तर वाचा…

18:47 (IST) 5 May 2023
“…म्हणून मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे”, शरद पवारांची मोठी घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहानंतर शरद पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

सविस्तर वाचा…

18:27 (IST) 5 May 2023
शरद पवारांचा राजीनामा फेटाळल्यानंतर ठाण्यात राष्ट्रवादीचा जल्लोष

ठाणे : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा समितीने फेटाळल्यानंतर ठाण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर फटाके फोडून, ढोल ताशाचा गजरात आनंदोत्सव साजरा केला.

सविस्तर वाचा..

18:22 (IST) 5 May 2023
पुणे: नवले पूल पोलीस चौकीचे अपघातांनी ‘उद्घाटन’; उद्घाटनाच्या दिवशीच झाले दोन अपघात

पुणे: मुंबई – बंगळुरू महामार्गावरील नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी स्वतंत्र वाहतूक पोलीस चौकी शुक्रवारी सुरू करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

18:14 (IST) 5 May 2023
“कुणाला पक्ष सोडून जायचं असेल, तर…”, शरद पवारांचं विधान

“कुणाला सोडून जायचं असेल, तर मग कोणत्याही पक्षाचा असो कोणी थांबवू शकत नाही. अशी परिस्थिती असेल तर पुढाकार घेत, यात बदल कसं घडवू शकतो, याकडं लक्ष दिलं पाहिजे. हे मला समजतं,” असं शरद पवारांनी सांगितलं.

17:57 (IST) 5 May 2023
यवतमाळ : देवकार्यासाठी नदीत उतरले पण..

यवतमाळ : देवकार्यासाठी वर्धा नदीत अंघोळीसाठी उतरलेले दोन तरुण नदीच्या प्रवाहात वाहून गेले. यातील एकाला बाहेर काढण्यात यश आले, मात्र दुसरा वाहून गेल्याने त्याचा शोध सुरू आहे. ही घटना यवतमाळ-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमवेर सांवगी येथील नदीच्या संगमावर आज शुक्रवारी सकाळी घडली. विकास अमर येडमे (२०), रा. कोसारा, ता. मारेगाव असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वाचा..

17:50 (IST) 5 May 2023
पुणे: ‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने व्यावसायिकाला ९६ लाखांचा गंडा

पुणे: शहरात ऑनलाइन टास्कच्या आमिषाने नफा मिळवून देण्याचे प्रकार वाढीस लागले असून सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाला ९६ लाख ५७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सविस्तर वाचा…

17:48 (IST) 5 May 2023
अध्यक्षपदावरून निवृत्तीच्या निर्णयावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“माझ्या निर्णयाच्या तीव्र भावना उमटल्या. मी निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी माझे हिंतचिंतक, प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते यांनी संघटीत होऊन एकमुखाने तर काहींनी प्रत्यक्ष भेटून आवाहन केलं. त्यांच्याबरोबर देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घेण्याची विनंती केली. 'लोक माझे सांगाती' हे माझ्या जीवनाचं गमक आहे. माझ्याकडून या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घेतलेला निर्णय माझ्यापर्यंत पोहचवण्यात आला. मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा मान राखून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

17:43 (IST) 5 May 2023
मुंबई : ऑनलाइन विनगेम हा संधीचा नव्हे, तर गणितीय कौशल्याचा खेळ, दोघांवरील गुन्हा रद्द करताना उच्च न्यायालयाचा निर्वाळा

मुंबई : ऑनलाईन विनगेम खेळात गणितीय कौशल्याचा समावेश आहे, संधीचा नाही, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने हा ऑनलाइन विनगेम विकसित करणाऱ्यासहा दोघांना दिलासा दिला. तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांच्यावर दाखल केलेला गुन्हा रद्द केला.

सविस्तर वाचा..

17:31 (IST) 5 May 2023
रायगड : ..आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला; माणसं नव्हे श्वान असल्याचे उघड

उरण : शुक्रवारी अकरा साडेअकरा वाजताच्या सुमारास उरणच्या पिरवाडी परिसरातील समुद्रात दोन पर्यटक अडकल्याचे वृत्त आले. याची माहिती मिळताच नागाव – पिरवाडीमधील सागरी रक्षा दलाच्या तरुणांनी मिळेल त्या साधनाने त्यांना वाचविण्याची तयारी केली. यांत्रिक बोटीच्या सहाय्याने दोन जीवरक्षकांनी खडकात जात शहानिशा केली तर माणसं नव्हती तर ती कुत्री असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

सविस्तर वाचा..

17:12 (IST) 5 May 2023
कळंबोली मार्बल मार्केटमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा फरशी पडून मृत्यू, कामगारांचे काम बंद आंदोलन

नवी मुंबई : पनवेल नजीक असलेल्या कळंबोली  मार्बल मार्केटमध्ये काम करणाऱ्या २७ वर्षीय कामगाराचा फरशी पडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे काम करताना कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, सुरक्षा साधने आणि सोयी उपलब्ध करून द्याव्यात म्हणून कामगारांनी काम बंद आंदोलन केले होते. 

सविस्तर वाचा..

17:04 (IST) 5 May 2023
पुणे: वनाज सहकारी गृह रचना संस्थेच्या माजी अध्यक्षांसह पाच जणांवर गुन्हा

पुणे: वनाज सहकारी गृह रचना संस्थेच्या माजी अध्यक्षांसह पदाधिकारी आणि दोन लेखा परिक्षकांनी अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सविस्तर वाचा…

16:41 (IST) 5 May 2023
पेव्हर ब्लॉकचे मंजूर काम विश्राम गृह प्रांगणात; सुरू केले विश्राम भवन परिसरात? आमदार मलिक यांची तक्रार

वाशीम: येथील बस स्थानकाजवळील विश्रामगृहासाठी आदेशित असलेले पेव्हर ब्लॉकचे काम विश्राम भवनात सुरू आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत आहे.

सविस्तर वाचा…

16:21 (IST) 5 May 2023
कळव्यात बेकायदा बांधकामांना सहाय्यक आयुक्तांचे प्रोत्साहन ?

ठाणे : कळवा परिसरात बेकायदा इमारतींच्या उभारणीची कामे सुरु असल्याच्या तक्रारी पालिकेकडे प्राप्त होऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सविस्तर वाचा

16:06 (IST) 5 May 2023
मुंबई: ‘एमएमएस’ची परीक्षा पुढे ढकलण्याचा मुंबई विद्यापीठामधील आयडॉलचा निर्णय

मुंबई : मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना रखडलेले निकाल व जाहीर झालेल्या निकालांमधील असंख्य त्रुटी, विस्कळीत वेळापत्रक, प्रवेशपत्रासंबंधित गोंधळाला सातत्याने सामोरे जावे लागत आहे.

सविस्तर वाचा

15:57 (IST) 5 May 2023
अकोला : रस्त्यांवरील बालकांचे सर्वेक्षणातून पुनर्वसन होणार

अकोला : महिला व बालविकास विभागाच्यावतीने रस्त्यांवरील बालकांचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे.

सविस्तर वाचा..

15:44 (IST) 5 May 2023
धुळ्यात नितेश राणे यांच्या विरोधात युवा सेनेचे आंदोलन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या नेत्यांविषयी शिवराळ भाषा वापरल्याबद्दल युवासेने तर्फे येथे नितेश राणे यांच्या पुतळ्यास जोडे मारून निषेध करण्यात आला.काही दिवसापासून नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र हे ठाकरे गटाच्या नेत्यांविरुध्द अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करीत असल्याचे युवा सेनेने म्हटले आहे.

सविस्तर वाचा

15:34 (IST) 5 May 2023
“अजित पवार हे काहीच न बोलता निघून गेले, याचाच अर्थ…”, अंजली दमानियांचं ट्वीट चर्चेत

“अजित पवार हे माध्यमांशी काहीच न बोलता निघून गेले. याचाच अर्थ हा की त्यांच्या मनासारखं झालं नाही. जितेंद्र आव्हाड यांना कार्यकर्त्यांनी पेढे भरवले? अजित पवारांना नाही?,” असं ट्वीट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं आहे.

14:33 (IST) 5 May 2023
पुणे: महसूलसह अन्य विभागातील अधिकाऱ्यांची शिक्षण विभागात पहिल्यांदाच प्रतिनियुक्ती

पुणे : शालेय शिक्षण विभागातील रिक्त पदांची सूत्रे महसूल आणि अन्य विभागातील अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहेत. रिक्त असलेल्या संचालक, सहसंचालक, विभागीय मंडळ अध्यक्ष आदी पदांवर प्रतिनियुक्ती करण्यात आली असून पहिल्यांदाच महसूल आणि अन्य विभागातील अधिकाऱ्यांकडे शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

14:32 (IST) 5 May 2023
कल्याणमध्ये आधारवाडीत सफाई कामगारांच्या हजेरी निवाऱ्यात भाजीपाल्याचे बेकायदा दुकान

कल्याण- प्रशासनावर वरिष्ठांचा वचक राहिला नसल्याने प्रशासनाचा प्रभाग स्तरावरील कारभार पूर्णपणे ढेपाळला असल्याची चर्चा आता कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. प्रशासनात ताळमेळ राहिला नसल्याने त्याचा गैरफायदा काही समाजंकटक घेत आहेत.

सविस्तर वाचा

14:24 (IST) 5 May 2023
आदिवासीबहुल भागात कोतवाल भरती, मात्र आदिवासींनाच ‘आरक्षण’ नाही

वर्धा : जिल्हा प्रशासनाने वर्धा तालुक्यातील अठरा सांझात व आर्वी तालुक्यातील पंधरा महसुली सांझ्यात कोतवाल भरती करण्याचा निर्णय घेतला. तेवीस मे रोजी परीक्षा व पंचवीस मे ला निवड होणार आहे. या भरतीत आदिवासी वगळता उर्वरित सर्व आरक्षित घटकांना आरक्षण मिळाले. मात्र एसटी म्हणजेच आदिवासी समाजास आरक्षित जागा मिळाल्या नाहीत.

सविस्तर वाचा..

14:14 (IST) 5 May 2023
मुंबईः व्हीडीओ लाईक करा आणि कमवा; वास्तुविशारद महिलेची लाखोंची फसवणूक

मुंबईः ‘व्हीडीओ लाइक करा आणि कमवा’ असे आमिष दाखवून मालाडमधील २९ वर्षीय महिलेची सात लाख १६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

14:05 (IST) 5 May 2023
डोंबिवलीत तरुणावर चाकूने हल्ला

डोंबिवली: येथील पूर्व भागातील पाथर्ली नाका येथे गुरुवारी रात्री चार जणांनी एका तरुणावर पूर्ववैमनस्यातून धारदार चाकुने हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले.

सविस्तर वाचा…

13:52 (IST) 5 May 2023
गडचिरोली : सावरकरांचा जन्मदिन ‘गौरव दिवस’ म्हणून साजरा करणे हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान; नक्षलवाद्यांच्या पत्रकाने खळबळ

गडचिरोली : स्वातंत्र्य संग्रामातून पळ काढत इंग्रजांची पाचवेळा माफी मागणाऱ्या सावरकरांचा जन्मदिन ‘गौरव दिवस’ म्हणून साजरा करणे, हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान असल्याची टीका नक्षल्यांनी पत्रकाच्या माध्यमातून केली आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या (माओवादी) दंडकारण्य पश्चिम सब झोनल ब्यूरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने हे पत्रक काढले आहे.

सविस्तर वाचा..

13:30 (IST) 5 May 2023
मुंबई: पत्नीला पेटवून पतीची आत्महत्या; पतीचाही उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई: धारावी येथे घरगुती वादातून पत्नीवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याचा आणि त्यानंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती.

सविस्तर वाचा…

13:11 (IST) 5 May 2023
मुंबई: जे.जे. रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया कक्ष होणार अद्ययावत

मुंबई : हृदय शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांना उत्तम सुविधा मिळाव्या यासाठी जे. जे. रुग्णालयात अद्ययावत हृदय शस्त्रक्रिया कक्ष उभारण्यात येत आहे. ५६ खाटांच्या या अद्ययावत सुविधा कक्षामध्ये स्वतंत्र अतिदक्षता विभाग आणि डॉक्टरांसाठी खोलीही असणार आहे.

सविस्तर वाचा

13:03 (IST) 5 May 2023
अकोला : उत्तर व दक्षिण भारताला जोडणारी विशेष रेल्वे धावणार

अकोला : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता दक्षिण-मध्य रेल्वेने काचीगुडा ते बिकानेर दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. वाशीम, अकोलामार्गे धावणारी ही गाडी ६ मे पासून सुरू होणार आहे. २७ जूनपर्यंत ही गाडी धावणार आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

सविस्तर वाचा..

12:57 (IST) 5 May 2023
गोंदिया: ऐनवेळी २० ट्रेन रद्द झाल्यामुळे एस. टी.बस स्थानके ‘हाऊसफुल्ल’

गोंदिया: गुरुवार ४ मे पासून अनेक रेल्वेगाड्यांची चाके थांबविण्यात आलेली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे रायपूर रेल्वे विभागाच्या रायपूर-रायपूर आरव्ही ब्लॉक हट दरम्यान दुसरा रेल्वे मार्ग आणि रायपूर यार्डच्या आधुनिकीकरणाचे काम ४ ते १० मे दरम्यान प्रस्तावित आहे.

सविस्तर वाचा…

अजित पवार घोटाळेबाज असून काही गुन्ह्यामध्ये अडकले आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेल असा ज्येष्ठतेचा सल्ला शालिनीताईं पाटील यांनी शरद पवार यांना दिला आहे. शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडल्यानंतर अध्यक्षपदी अजित पवार की सुप्रिया सुळे, अशी चर्चा रंगली असतानाच माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत मोठं वक्तव्य केलं आहे.