Maharashtra Political News Today : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून शरद पवार यांनी मंगळवारी ( २ मे ) निवृत्त होण्याची केली होती. उत्तराधिकारी निवडण्यासाठी पक्षांच्या नेत्यांची आज ( ५ मे ) बैठक होणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदी शरद पवार राहणार की अन्य कोण होणार हे ठरणार आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेणार आहोत.
Maharashtra News Update Today : राज्यातील प्रत्येक घडामोड एका क्लिकवर…
राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी केली असली तरी महाविकास आघाडीला तडा जाईल अशी कोणतीही कृती करणार नाही, अशी संयमी भूमिका ठाकरे यांनी घेतली आहे.
वर्धा : अवकाळी पावसात भाजीपाला व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, भाजीपाल्याचे भाव वाढण्याऐवजी स्वस्त झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.
समितीच्या निर्णयाला काहीजणांची विरोध केला? असा प्रश्न जयंत पाटील यांना बैठकीनंतर प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विचारला. त्यावर जयंत पाटील म्हणाले, “समितीच्या निर्णयाला कोणीही विरोध केला नाही. एकमताने राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. काश्मीर ते कन्याकुमारीतील प्रतिनिधी आणि पक्षातील नेत्यांनी शरद पवारांना लोकसभा, विधानसभेपर्यंत असा निर्णय उचित नसल्याचं सांगितलं. त्यानंतर शरद पवारच अध्यक्ष राहावेत असा ठराव मंजूर केला आहे,” अशी माहिती जयंत पाटील यांनी बैठकीनंतर दिली.
मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४,६५४ (१४ भूखंडांसह) घरांच्या सोडतीच्या स्वीकृत अर्जांची अंतिम यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली असून एकूण ४९ हजार १७४ अर्ज पात्र ठरले आहेत.
डोंबिवली: कल्याण-ठाकु्र्ली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे रुळांजवळ रेल्वेच्या खांबाला लावण्यात आलेला एक दिशादर्शक लोकल मधील प्रवाशांना इजा करण्याच्या स्थितीत होता.
नागपूर : पेट्रोलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. नागपूरकर आता नवी वाहने खरेदी करताना ई-वाहनांना (इलेक्ट्रिक वाहने) प्राधान्य देत असल्याचे या वाहनांच्या नोंदणी संख्येवरून स्पष्ट होते.
नागपूर : कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांमधील सुप्त कला-गुणांना वाव दिल्यामुळे कैद्यांकडून दैनंदिन वापरापासून ते शोभिवंत वस्तूंची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जात जाते. कैदी निर्मित वस्तूंना आता कारागृहातून विक्री करण्यासह ‘ऑनलाईन’ विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे कारागृहातील उत्पादनांना देशभरातून मागणी वाढणार आहे.
“राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये दु:ख आणि वेदना आहेत. शरद पवारांनी जी जबाबदारी समितीवर दिली होती, त्याची बैठक पार पडली. समितीने बैठकीत एक ठराव मंजूर करण्यात आला आहे. शरद पवारांचा राजीनामा एकमतानं नामंजूर करण्यात येत आहे. त्यांची सर्वानुमते पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहावे, अशी विनंती करण्यात येत आहे,” अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
पुणे : जागतिक व्यंगचित्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव २०२३ चे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राज ठाकरे यांनी सर्व व्यंगचित्र पाहून कलाकार मंडळींचे कौतुक केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यंगचित्र काढण्याचा आग्रह केला.
चंद्रपूर : दुचाकी व चारचाकी वाहनावर नंबर प्लेटच्या जागी नाव लिहिण्यावर निर्बंध आले आहेत. तरीही चंद्रपूर जिल्ह्यात फॅन्सी नंबर घेण्याची क्रेझ कायम आहे. मागील चार महिन्यांत आवडीच्या नंबरसाठी चंद्रपूरकरांनी तब्बल ४२ लाख ८५ हजार रुपयांचा भरणा आरटीओ कार्यालयात केला आहे. त्यामुळे चंद्रपुरात आवडती नावाची नंबर प्लेट घेण्यासाठी नागरिक परिवहन कार्यालयात गर्दी करीत आहे.
पुणे : व्यंगचित्र चितारण्यासाठी माझा हात दररोज शिवशिवतो खरा. पण, ती बैठक आणि शांतता मिळत नसल्याने व्यंगचित्र काढण्यासाठी वेळ होत नाही. माझी व्यंगचित्रे बऱ्याचदा भाषणातूनच बाहेर पडतात, अशी मार्मिक टिप्पणी व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी केली.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत नियुक्त केलेल्या समितीची आज ( ५ मे ) पक्षाच्या कार्यालयात बैठक सुरू आहे. या बैठकीला अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, प्रफूल्ल पटेल आणि अन्य नेते उपस्थित आहेत. कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत. अशातच एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.
नागपूर : वाडी परीसरातील ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिला दगडाने ठेचून ठार मारणाऱ्या नराधम वसंता दुपारे याची फाशीची शिक्षा अटळ असून राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी त्याची फाशीच्या शिक्षेबाबतची दया याचिका फेटाळली आहे. राष्ट्रपती भवनाकडून यासंदर्भात माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत नियुक्त केलेल्या समितीची आज ( ५ मे ) पक्षाच्या कार्यालयात बैठक सुरू आहे. या बैठकीला अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, प्रफूल्ल पटेल आणि अन्य नेते उपस्थित आहेत. या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा प्रस्ताव समितीने फेटाळल्याची माहिती मिळत आहे.
ठाणे – घोडबंदर येथील मानपाडा चौकात दोन दुकानांना शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली आहे. घटनास्थळापासून अवघ्या काही मीटर अंतरावर टायटन रुग्णालय आहे. आगीवर नियंत्रण आणण्याचे कार्य अग्निशमन दलाकडून सुरू आहे. या आगीमुळे घोडबंदर मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
कांजूरमार्ग पोलिसांनी अंमलीपदार्थ सेवनप्रकरणात अटक केलेल्या १९ वर्षीय आरोपीने टेलिफोनच्या वायरने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर आरोपीला फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत समितीची आज ( ५ मे ) पक्षाच्या कार्यालयात बैठक होणार आहे. त्यासाठी सर्व नेते पक्षाच्या कार्यालयात हजर झाले आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. 'देश का नेता कैसा हो… शरद पवार जैसा हो…', अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे परिसर दणाणून गेला आहे.
पुणे : देशातील एकूण वाहन विक्रीत एप्रिल महिन्यात ४ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. दुचाकींच्या विक्रीत सर्वाधिक ७ टक्के तर प्रवासी वाहनांच्या विक्रीत १ टक्का घट झाली आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनने (एफएडीए) दिली आहे.
पिंपरी : भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येईल असे वाटत नाही. एकत्र आले तर आमच्या शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. भाजप-शिंदे गट-राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले तर, आनंद होईल, असे मत शिंदे गटाचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी गुरुवारी व्यक्त केले.
पुणे : शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारतासाठी आणि वैशाख वणव्यापासून सर्वांचे रक्षण व्हावे, याकरिता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात ११ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य शुक्रवारी दाखविण्यात आला.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकनांतील स्थान उंचावणे, संशोधन, बौद्धिक स्वामित्व हक्क आणि नवोपक्रम, विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीयकरण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योगांशी परस्पर सहकार्याद्वारे संशोधन अनुदान, तसेच विद्यापीठ अमृत महोत्सव आणि जी २० परिषदेच्या माध्यमातून विद्यापीठाचा नावलौकिक उंचावणे अशी उद्दिष्ट्ये विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेने निश्चित केली आहेत.
पुणे : नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शिरुर -खेड- कर्जत असा नवीन महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) प्रस्तावित केला आहे. या प्रस्तावित मार्गामुळे मराठवाडा येथून मुंबईकडे जाणारी वाहतूक शिरुर -खेडमार्गे थेट कर्जतला जाणार आहे.
पुणे :महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी खास यंत्रणा तैनात करण्यात येणार आहे. याबाबत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण आरोग्य यंत्रणेची खास पथके तैनात करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी दिले.
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीच्या विस्तारीत प्रकल्पासाठी गुरुवारी जिल्हा प्रशासन व प्रदूषण मंडळाने जनसुनावणी घेतली. यात १२ गावांतील प्रकल्पग्रस्तांनी ‘अंबुजा गो-बॅक, अदानी गो-बॅक’चे नारे देत सिमेंट कंपनीविरोधात घोषणाबाजी केली.
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील पांढरवानी येथील शालू शामराव घरत या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औद्योगिक निरीक्षक परिक्षेत यश संपादन केले आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातून महिलांमध्ये राज्यात पहिली येण्याचा मान पटकाविला आहे.
गडचिरोली : सूरजागड खाणीचे कंत्राट मिळविणाऱ्या ‘लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने शासानासोबत केलेल्या कराराचा भंग केला आहे. त्यामुळे खाणीत सुरू असलेले उत्खनन पूर्णपणे अवैध असून याची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका प्रकृती फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे.
नागपूर : मागील दहा दिवसांत पावसामुळे जीर्ण घर पडून शहरात तिघांचे बळी गेले. त्यामुळे या घरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या शहरात अशी ४०० हून अधिक घरे आहेत.
अलिबाग – राज्यसरकारने सुधारीत रेती धोरण अंमलात आणले आहे, यानुसार शासनामार्फत रेतीचे उत्खनन, साठवणूक आणि ऑनलाइन विक्री केली जाणार आहे. ६५० रुपये ब्रास दराने रेती विक्री केली जाणार आहे. मात्र उत्खनन आणि वाहतूक खर्च लक्षात घेतला घरपोच रेती मिळवण्यासाठी ग्राहकांना दिड ते दोन हजार रुपयांचा अधिकचा खर्च सोसावा लागण्याची शक्यता आहे.
मैतई समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याच्या निर्णयावरून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर मणिपूरमध्ये आसाम रायफल्स आणि लष्कराच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच दंगलखोर दिसले की त्यांच्यावर जागीच गोळीबार करा, असे आदेशही येथील राज्यपालांनी दिले आहेत. दरम्यान, यावरून ठाकरे गटाने मोदी सरकारला लक्ष्य केलं असून मणिपुरातील हिंसाचार हे केंद्रीय गृह मंत्रालयाचे अपयश आहे, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे. अमोल कोल्हेंनी या चर्चा फेटाळल्या आहेत. त्यातच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंबद्दल सूचक विधान केलं आहे. अमोल कोल्हे भाजपात आले, तर चांगलीच गोष्ट आहे, असं आढळराव पाटलांनी म्हटलं. यावर आता अमोल कोल्हे यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.