Pune-Mumbai News Today : भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महाराष्ट्रासह देशभरात साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित झाले आहेत. यासह राजकीय, क्रिडा, मनोरंजन, क्राइम या सर्व घडामोडी जाणून घेणार आहोत.

Live Updates

Today News Update : देशातील प्रत्येक घडामोड एका क्लिकवर….

19:07 (IST) 14 Apr 2023
“विरोधकांनी महाविकास आघाडीच्या नागपुरातील ‘वज्रमूठ’ सभेला विरोध केला, पण…”

विरोधकांनी महाविकास आघाडीच्या नागपुरातील 'वज्रमूठ' सभेला विरोध दर्शवला. पण, न्यायालयाने 'वज्रमूठ' सभेला परवानगी दिली आहे. आता भाजपाला सभा बघूनच कळे की महाविकास आघाडीची वज्रमूठ किती मजबूत आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते गोंदियात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

18:35 (IST) 14 Apr 2023
भंडारा अर्बन बँकेच्या सहा संचालकांचे अचानक राजीनामे; सहकार क्षेत्रात वादळ

भंडारा : सातत्याने चर्चेत राहत असलेल्या दि भंडारा अर्बन बँक भंडाऱ्याच्या ६ संचालकांनी गुरुवार, १३ एप्रिल रोजी राजीनामा देत सहकार क्षेत्रात वादळ निर्माण केले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी दोन संचालकांनी राजीनामा दिला होता तर चार संचालक अपात्र घोषित करण्यात आले होते. राजीनाम्यामुळे १९ पैकी १२ संचालकांनी बँकेवर तात्काळ प्रशासक नियुक्त करावा अशी मागणी विभागीय उपनिबंधकांकडे केली आहे.

सविस्तर वाचा..

18:28 (IST) 14 Apr 2023
ठाण्यात संस्थांना नाले दत्तक देण्याची योजना राबवा; भाजपा आमदार संजय केळकर यांची मागणी

ठाणे : महापालिका क्षेत्रात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कोट्यावधी रुपये खर्चून केल्या जाणाऱ्या नालेसफाईच्या कामांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच, याच मुद्द्यावरून भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी गंभीर आरोप केले आहेत.

सविस्तर वाचा..

18:28 (IST) 14 Apr 2023
देशातील ओबीसींसह सर्व जातींची जनगणना होणे गरजेचे; प्रख्यात वक्ते डॉ. लक्ष्मण यादव यांचे मत

चंद्रपूर : देशातील ९० टक्के ओबीसी आणि मागासवर्गीय लोकसंख्येला खरोखरच न्याय द्यायचा असेल, तर देशातील ओबीसींसह सर्व जातींची जनगणना होणे गरजेचे आहे, असे मत प्रख्यात वक्ते व दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. लक्ष्मण यादव यांनी येथे व्यक्त केले.

सविस्तर वाचा..

18:27 (IST) 14 Apr 2023
कल्याण-डोंबिवलीत केंद्र चालकांकडून आधार यंत्र भाड्याने देण्याचे प्रकार, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

डोंबिवली – डोंबिवली, कल्याणमधील काही आधार केंद्र चालकांकडे तीन ते चार आधार यंत्रे आहेत. ही यंत्रे आधार केंद्र चालक अन्य व्यक्तिला २५ हजार रुपये अनामत रक्कम घेऊन भाड्याने देत आहेत. या यंत्रांच्या बदल्यात चालविणाऱ्या व्यक्तीने केंद्र चालकाला दरमहा सुमारे तीन ते चार हजार रुपये भाडे द्यायचे आहे. हा प्रकार डोंबिवली, कल्याण शहरात वाढत असल्याने काही नागरिकांनी याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहेत.

सविस्तर वाचा..

18:27 (IST) 14 Apr 2023
आधारकार्ड बँकखात्यासोबत लिंक करण्याच्या बहाण्याने एकाची ४० हजार रुपयांना फसवणूक

ठाणे : आधारकार्ड बँक खात्यासोबत लिंक करण्याच्या बहाण्याने एका भामट्याने ३५ वर्षीय व्यक्तीच्या खात्यातून ४० हजार रुपये कर्ज घेऊन त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस भामट्याचा शोध घेत आहेत.

सविस्तर वाचा..

18:26 (IST) 14 Apr 2023
खासदार अरविंद सावंत यांच्या समोरच ठाकरे गटाचे दोन गट उघड; एका गटासोबत बैठक तर दुसरा बाहेर

वाशीम : एकीकडे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे पक्ष वाढीसाठी जिवाचे रान करीत आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यातील आयोजित सभेतून एकीचे आवाहन करीत आहेत. तर दुसरीकडे मात्र, जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटामध्ये जिल्हा प्रमुख पदावरून अंतर्गत धुसफूस शिगेला पोहोचली आहे.

सविस्तर वाचा..

18:25 (IST) 14 Apr 2023
चंद्रपूर : पोलीस बॅरीकेटला भरधाव दुचाकीची धडक; अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

चंद्रपूर : भद्रावती शहराजवळील मानोरा फाटा येथे पोलीस दलाच्या वाहतूक शाखेच्या वतीने लावलेल्या बॅरीकेटला भरधाव वेगातील दुचाकीने धडक दिली असता झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा..

18:23 (IST) 14 Apr 2023
नवी मुंबई : महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी महामार्गांवर अवजड वाहनांना बंदी

अलिबाग : सलग सुट्ट्या आणि खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भुषण सोहळ्यासाठी मुंबई गोवा महामार्गासह, मुंबई पुणे दृतगती मार्ग आणि मुंबई पुणे जुना महामार्ग यावर तीन दिवस अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

18:11 (IST) 14 Apr 2023
“आदित्य ठाकरेंचा ‘पप्पू’ होऊ नये”, विखे-पाटलांच्या टीकेला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले…

आदित्य ठाकरेंचा पप्पू होऊ नये, एवढी काळजी त्यांनी घेतली पाहिजे, असं विधान मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील केले होते. याला शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “राधाकृष्ण विखे-पाटील म्हणजे रोज रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे आहेत. आज या पक्षातून उद्या त्या पक्षात उड्या मारतात. शिवसेनेतही होते. कोणता पक्ष शिल्लक राहिल का विचारा,” असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे.

17:30 (IST) 14 Apr 2023
परिवहन विभागाकडून वर्षभरात सात कोटींपेक्षा अधिक दंड वसूल

जळगाव : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकाद्वारे २०२२-२३ या वर्षात करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईअंतर्गत कार्यालयाच्या इतिहासात प्रथमच सात कोटींपेक्षा अधिक दंड वसुली झाली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली.

सविस्तर वाचा…

17:20 (IST) 14 Apr 2023
“माझ्या भीतीने भाजपावाले…”, संजय राऊत यांचं नागपुरात विधान

सकाळचा भोंगा बंद झाला पाहिजे, अशी मागणी भाजपाच्या सर्व नेत्यांनी केली आहे. याबद्दल शिवसेना ( खासदार ) संजय राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर संजय राऊत म्हणाले, “ही भीती असली पाहिजे. माझ्या भीतीने हे लोक झोपत नाहीत,” असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिले आहे.

16:31 (IST) 14 Apr 2023
कल्याणमध्ये डाॅ. आंबेडकरांच्या जीवनावरील पुस्तकांचे मुलांकडून सामुदायिक वाचन

कल्याण : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांचे विचार, कार्य, त्यांची देशाला असलेली देणगी याविषयी शालेय जीवनापासून मुलांना माहिती मिळावी. या विचारातून येथील वाचन कट्ट्यातर्फे शालेय मुलांसाठी राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तकांच्या सामुदायिक वाचनाचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित केला होता.

सविस्तर वाचा…

16:29 (IST) 14 Apr 2023
तरुण मुलाच्या आजारपणामुळे पित्याकडून खून; पिता अटकेत

पुणे: तरुण मुलगा सतत आजारी पडत असल्याने पित्याने त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी पित्याला पोलिसांनी अटक केली.

वाचा सविस्तर…

16:13 (IST) 14 Apr 2023
चंद्रपूर : जिल्हाधिकाऱ्यांचा दारूची दुकाने बंदचा आदेश न्यायालयाकडून रद्द; आंबेडकर जयंतीदिनी जिल्ह्यात दारूची दुकाने सुरू

चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिलला जिल्ह्यातील सर्व दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले होते. या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती देत आदेश रद्द ठरविला आहे. त्यामुळे शुक्रवारी जिल्ह्यात दारूची दुकाने सुरू होती.

सविस्तर वाचा..

16:12 (IST) 14 Apr 2023
जळगाव : पाचोरा बाजार समितीत स्वबळावर लढण्याचा भाजपाचा निर्णय

जळगाव – राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक भाजपा-शिवसेनेने एकत्रित लढविण्याचे ठरविले असले तरी पाचोरा-भडगाव बाजार समितीत भाजपा स्वबळावरच लढणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपातर्फे बहुसंख्य उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

सविस्तर वाचा..

16:11 (IST) 14 Apr 2023
सांगली : औदुंबरच्या डोहात बैल बचावचा थरार

सांगली : नवखी जागा, नवखी माणसं पाहून भुजलेला बैल उधळला, भिलवडीजवळ कृष्णेच्या पात्रात पडला. मगरीने घेरले. तरीही धाडसी तरुणांच्या बचावपथकाने बैलाला वाचविले. हा थरार औदुंबरच्या डोहात तब्बल चार तास चालला होता.

सविस्तर वाचा..

16:11 (IST) 14 Apr 2023
नवी मुंबईतील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी कडोंमपाचे साहाय्य

कल्याण – नवी मुंबई येथे येत्या रविवारी राज्य शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून २० लाख अनुयायी (सद्गुरू) उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामुळे या कार्यक्रमाला साहाय्य म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेने मनुष्यबळासह कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा..

16:10 (IST) 14 Apr 2023
मनुवादी विचारांमुळे देश गुलामगिरीच्या वाटेवर; क्रांतीभूमी चिमूरमध्ये माजी मंत्री वडेट्टीवार आक्रमक

चंद्रपूर : देशात हुकूमशाहीची मूहुर्तमेढ रोवण्यासाठी धर्मा-धर्मात, जाती- जातींमध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतूने विषारी बीज पेरले जात आहे. “मुह मे राम बगल मे छुरी’ अशी दुटप्पी भूमिका ठेवणाऱ्या मनुवादी विचारांमुळे देश गुलामगिरीच्या वाटेवर लोटल्या जात आहे. संविधानातील लोकशाहीची नीतिमूल्य जर टिकवायची असेल तर बहुजन नायक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन पेटून उठा, अन्यथा देश खड्ड्यात लोटला जाईल, असे सूचक विधान माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

सविस्तर वाचा..

15:45 (IST) 14 Apr 2023
“बंटी पाटील ९६ कुळी पाटील नव्हे, तर…”, धनंजय महाडिकांची घणाघाती टीका

श्री छत्रपती राजाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अलीकडेच काँग्रेस नेते सतेज ( बंटी ) पाटील यांच्या गटातील २७ उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आलं होते. त्यानंतर कुस्ती लढायची असेल, तर मर्दासारखे लढा, बावड्याचा पाटील कधी मागे पडणार नाही, असं आव्हान बंटी पाटील यांनी महाडिक गटाला दिलं होतं. याला आता धनंजय महाडिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

वाचा सविस्तर…

15:43 (IST) 14 Apr 2023
“संदीपान भुमरेंनी दोन कोटींची गाडी, १२ दारूचे दुकानं घेतली, त्यामुळे…”, चंद्रकांत खैरेंची टीका

शिवसेना ( ठाकरे गट ) चंद्रकांत खैरे यांनी मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. “संदीपान भुमरे ८ दिवसच औरंगाबादचे पालकमंत्री राहतील. संदीपान भुमरे यांच्यापाठीमागे ईडीची चौकशी नाही आहे. पण, आता कधीही लागू शकते. कारण, २ कोटी रुपयांची गाडी घेतली. १२ दारूचे दुकाने घेतली,” अशी टीका चंद्रकांत खैरेंनी केली आहे.

15:30 (IST) 14 Apr 2023
मुंबई : मध्य, हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक

मुंबई : मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा यांची देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकवेळी माटुंगा आणि मुलुंड दरम्यानची जलद मार्गावरील लोकलसेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.

सविस्तर वाचा…

15:00 (IST) 14 Apr 2023
“मी गंगा-भागिरथी नाही”, यशोमती ठाकूर कडाडल्या, म्हणाल्या, “महिलांना पुन्हा गुलामगिरीच्या जोखडात..”

अमरावती : राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्रातील विधवा महिलांना ‘गंगा भागिरथी’ शब्द वापरण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश प्रधान सचिवांना दिले. त्‍यावर तीव्र प्रतिक्रया उमटल्‍या असून माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी याविषयी तीव्र निषेध व्‍यक्‍त केला आहे.

सविस्तर वाचा..

15:00 (IST) 14 Apr 2023
कर्नाटकमध्ये निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षविस्तार

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमिताने महाराष्ट्राशेजारील राज्यामध्ये उमेदवार उभे करून पुन्हा पक्षविस्तार केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून किती उमेदवार रिंगणात उभे केले जातील हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या बैठकीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

सविस्तर वाचा..

14:59 (IST) 14 Apr 2023
टिटवाळ्यात रस्त्यावरील बेवारस वाहनांवर जप्तीची कारवाई

कल्याण – टिटवाळा, बल्याणी, वासुंद्री रस्ता, गणेश मंदिर परिसरातील वर्दळीच्या रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा अनेक महिने उभी करून ठेवण्यात आलेली दुचाकी, चारचाकी, भंगार वाहने उचलण्याची मोहीम अ प्रभाग कार्यालयाने सुरू केली आहे.

सविस्तर वाचा..

14:59 (IST) 14 Apr 2023
पालघर : विरार येथे ट्रक कलंडला, तीनजणांचा मृत्यू

वसई : विरार येथे विजेच्या धक्क्याने दोनजणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी विरारच्या नारंगी बायपास रस्त्यावर एक ट्रक उलटल्याने भीषण अपघात घडला आहे. सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. ट्रक उलटून खाली दाबल्या गेलेल्या तीनजणांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर वाचा..

14:09 (IST) 14 Apr 2023
मुंबई : सागरी किनारा मार्गालगतच्या भराव जमिनीवरील नियोजनासाठी नगररचनाकारांकडून सूचना

मुंबई : सागरी किनारा मार्गालगत भराव टाकून तयार करण्यात आलेल्या जमिनीवर हिरवळ तयार करण्यात येणार असून विविध नागरी सुविधा देण्यात येणार आहेत. या कामासाठी पालिकेने नगर रचनाकार आणि तज्ज्ञांकडून सूचना मागवल्या आहेत.

सविस्तर वाचा…

13:37 (IST) 14 Apr 2023
पुणे: एनसीसी छात्राच्या मृत्यू प्रकरणी प्रशिक्षकला सात वर्ष सक्तमजुरी

पुणे: राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) सरावादरम्यान गोळीबार करताना १३ वर्षीय विद्यार्थ्यांच्या डोक्यास गोळी लागून त्याचा मृत्यूस जबाबदार ठरलेल्या प्रशिक्षकास न्यायालयाने सात वर्ष सक्तमजुरी आणि पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी सदोष मनुष्यवध प्रकरणी याबाबतचा निकाल दिला.

वाचा सविस्तर…

13:35 (IST) 14 Apr 2023
पुणे: भाजप नेत्यांना वेळ मिळेना आणि गदिमा नाट्यगृहाचा पडदा उघडेना!

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात प्रचारासाठी येणाऱ्या सत्ताधारी भाजप नेत्यांना उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्याने ६६ कोटी रुपये खर्च करून उभारलेले निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर (गदिमा) नाट्यगृह आठ महिन्यांपासून कुलूपबंद आहे. नाट्यगृहाचे कामकाज जुलै महिन्यातच पूर्ण झाले असून, उद्घाटनासाठी नेत्यांची दोन वेळा मिळालेली वेळ अचानक रद्द झाली.

वाचा सविस्तर…

13:33 (IST) 14 Apr 2023
पुणे : IPL क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारे CID च्या जाळ्यात; पाचजणांना बेड्या

पुणे : सध्या अवघ्या देशभर आयपीएलचा फीवर आहे. गल्लोगल्ली, मैदानांवर क्रिकेट खेळण्यात तरुण मग्न आहेत. दुसरीकडे आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन सट्टा जोरात सुरू आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनने अशाच ऑनलाइन सट्ट्याचे बुकिंग घेणाऱ्या पाचजणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सविस्तर वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे. भाजपाविरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्याबाबत रणनीती आखण्यासाठी ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. विरोधकांना एकत्र आणण्याची सुरुवात झाली आहे, असं विधान शरद पवारांनी केलं.