Pune-Mumbai News Today : भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महाराष्ट्रासह देशभरात साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित झाले आहेत. यासह राजकीय, क्रिडा, मनोरंजन, क्राइम या सर्व घडामोडी जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Today News Update : देशातील प्रत्येक घडामोड एका क्लिकवर….

13:32 (IST) 14 Apr 2023
उद्धव ठाकरे २३ एप्रिलला जळगाव जिल्हा दौऱ्यावर; पाचोरा येथे कार्यक्रमांच्या नियोजनासाठी उद्या जिल्हास्तरीय बैठक

जळगाव – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २३ एप्रिलला जिल्हा दौर्‍यावर येणार असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येणार आहे. ठाकरे यांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर पाचोरा येथे शनिवारी (१५ एप्रिल) लोकसभेच्या जळगाव व रावेर मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जिल्हास्तरीय बैठक होणार आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिली.

सविस्तर वाचा ..

13:30 (IST) 14 Apr 2023
भारताच्या चित्रपटसृष्टीची ओळख म्हणजेच मराठी चित्रपट – सुबोध भावे

मुंबई : “भारताची चित्रपटसृष्टी ही मराठी चित्रपटसृष्टीतून उभी राहिली. आम्हा सर्व कलाकारांची इच्छा आहे की चित्रपटसृष्टीची ओळख ही मराठी चित्रपटच असली पाहिजे”, असे मत प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी व्यक्त केले.

सविस्तर वाचा…

13:24 (IST) 14 Apr 2023
“…म्हणून आदित्य ठाकरेंचा ‘पप्पू’ होऊन नये, एवढी काळजी त्यांनी घ्यावी”, भाजपा नेत्यांचा टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंडापूर्वी 'मातोश्री' निवासस्थानी आले होते. तिथे ते येऊन रडले होते, असा दावा शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यावरून मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाष्य केले आहे. “आदित्य ठाकरेंचा पोरखेळ संपलेला दिसत नाही. सत्ता गेल्यावर त्यांना शहाणपण येईल असे वाटत होते. एकनाथ शिंदे हे रडणारे नाहीत, तर लढणारे नेते आहेत. त्याची प्रचिती महाराष्ट्राने अनुभवली आहे. सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरे एवढे वैफल्यग्रस्त झालेत की, त्यांना रडू आवरत नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंचा पप्पू होऊ नये, एवढी काळजी त्यांनी घेतली पाहिजे,” असा टोला मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लगावला आहे.

13:16 (IST) 14 Apr 2023
वर्धा : भटक्या श्वानांच्या टोळीचा गोठ्यावर हल्ला; कालवडीचा पाडला फडशा

वर्धा : शहरातील भटक्या श्वानांच्या त्रासाची चर्चा होते. पण ग्रामीण भाग या कुत्र्यांनी किती त्रस्त आहे याची दखलही घेतल्या जात नाही. अशी एक चटका लावणारी घटना पुढे आली आहे.

सविस्तर वाचा..

12:38 (IST) 14 Apr 2023
कल्याणमध्ये उच्चशिक्षित तरुणांचा दारु पिऊन रस्त्यावर धिंगाणा

कल्याण : येथील रेतीबंदर भागात ध्वनीवर्धकावर कर्णकर्कश गाणी लावून गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास उच्चशिक्षित चार तरुण दारू पिऊन धिंगाणा घालत होते. त्यांच्या ताब्यात मोटार कार होती. कारवर त्यांचे नियंत्रण नव्हते.

सविस्तर वाचा…

12:21 (IST) 14 Apr 2023
नागपुरात डिजिटल डिलिव्हरी सेंटर, काय म्हणाले फडणवीस?

नागपूर : आजचे युग हे डिजिटल तंत्रज्ञानाचे आहे. डिजिटल हा परवलीचा शब्द झाला आहे. जग ज्या वेगाने पुढे जात आहे त्यात डिजिटल तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका असून डिजिटल तंत्रज्ञान सेवा पुरवठ्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सविस्तर वाचा..

11:48 (IST) 14 Apr 2023
अकोल्यात ठिपकेदार ‘सुरमा’चा सुखावणारा वावर; पाणवठ्यांवर दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन

अकोला : जिल्ह्यातील पाणवठ्यांवर दुर्मिळ ठिपकेदार सुरमा पक्ष्यांचा वावर सुखावणारा ठरत आहे. विविध पाणवठ्यांवर पक्षीमित्रांना सुरमा पक्ष्यांच्या थव्यांनी दर्शन दिले.

सविस्तर वाचा..

11:47 (IST) 14 Apr 2023
ठाणे : सिगारेट दिली नाही म्हणून एकावर जीवघेणा हल्ला

ठाणे : सिगारेट दिली नाही म्हणून एकाच्या डोक्यात दगड मारून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अब्दुल हुसेन असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी विशाल विश्वकर्मा याच्याविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा..

11:22 (IST) 14 Apr 2023
राज्यपाल, मुख्यंमत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमी येथे अभिवादन

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादन केलं आहे. यावेळी मंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगलप्रभाक लोढा, आमदार आशिष शेलार उपस्थित होते.

11:12 (IST) 14 Apr 2023
चंद्रपूर : कामतगुड्यात ६५० दशलक्ष वर्षांपूर्वीच्या शिला व बेसाल्ट दगड आढळले; तेलंगणाने घेतली दखल, महाराष्ट्रातील भूगर्भ वैज्ञानिकांना माहितीच नाही

चंद्रपूर : महाराष्ट्र -तेलंगणा सीमावादात असलेल्या जिवती तालुक्यातील कामतगुडा या गावाच्या पूर्व दिशेला दोन कि.मी. अंतरावर बेसाल्ट दगड व शिला आढळून आल्या आहेत. महाराष्ट्र भूगर्भ वैज्ञानिकांना याची खबरही मिळाली नाही. मात्र, तेलंगणा शासनाला याची माहिती मिळताच भूगर्भ वैज्ञानिक टीम पाठवून या स्थळाचा अभ्यास करित आहे. येथील दगड तपासणी करिता पाठविले जात आहे.

सविस्तर वाचा..

11:08 (IST) 14 Apr 2023
काळजीत वाढ! गेल्या २४ तासांत ११ हजार १०९ करोनाचे नवे रुग्ण

देशातील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत ११ हजार १०९ करोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर सक्रिय रुग्णांच्या संख्येतही भर पडली आहे. सध्या देशात ४९ हजार ६२२ सक्रिय रुग्ण आहेत.

10:42 (IST) 14 Apr 2023
ग्रंथालये होणार सक्षम; अर्धवेळ ग्रंथपाल आता पूर्णवेळ

वर्धा : अर्धवेळ पद असल्याने ग्रंथालये पूर्णपणे सक्षमतेने चालत नसल्याची तक्रार होती. नव्या निर्णयाने ती दूर होणार आहे. नव्या आकृतीबंधनुसार राज्यातील सहावी ते बारावीपर्यंत एक हजारावर विद्यार्थी असणाऱ्या शाळांमध्ये पूर्णवेळ एक ग्रंथपालाचे पद मान्य करण्यात आले आहे. त्यानुसार २११८ पदे मंजूर होतात. तसेच अर्धवेळ ग्रंथपाल पद व्यपगत म्हणजे मृत संवर्गात गेले आहे.

सविस्तर वाचा..

10:29 (IST) 14 Apr 2023
धक्कादायक! मेडिकलच्या आवारातच कचऱ्यासोबत जैववैद्यकीय कचऱ्याची ‘होळी’; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नागपूर : शहरातील प्रत्येक रुग्णालयातून जैववैद्यकीय कचरा जमा करण्याची महापालिकेची विशेष यंत्रणा आहे. मात्र, मेडिकलच्या आवारातच कचऱ्यासोबत जैववैद्यकीय कचरादेखील जाळण्यात येत असल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. यावर महापालिका प्रशासनाने मेडिकल प्रशासनाला नोटीस बजावली आहे.

सविस्तर वाचा..

10:00 (IST) 14 Apr 2023
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘हे’ ९ प्रेरणादायी विचार शेअर करून द्या भीमजयंतीच्या शुभेच्छा!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या जयंतीला आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती म्हणून ओळखले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांता जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी भारतातील महू येथील एका दलित महार कुटुंबात झाला. त्यांना भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर यांना बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकर म्हणून ओळखले जाते. ते भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानुसार ते जागतिक दर्जाचे वकील, समाजसुधारक आणि प्रथम क्रमांकाचे जागतिक दर्जाचे विद्वान होते.

वाचा सविस्तर….

10:00 (IST) 14 Apr 2023
”…आणि झोपी गेलेला आमदार मनसेमुळे जागा झाला”; बीडीडी चाळ पुनर्विकासावरून मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

वरळीतल्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जाणार आहे. परंतु पुनर्विकास करत असताना रहिवाशांना ३ वर्षांपेक्षा जास्त काळ संक्रमण शिबीरात किंवा बाहेर भाड्याने घर घेऊन राहावं लागेल अशी भिती व्यक्त केली जात होती. याबाबत अलिकडेच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी येथील रहिवाशांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले होते. तसेच या पुनर्विकासावर अनेक सवाल उपस्थित केले होते. यानंतर आता स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी एक निवदेन जारी केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, केवळ ३ वर्षामध्ये नागरिकांना घरं मिळतील.

वाचा सविस्तर…

09:59 (IST) 14 Apr 2023
नोकरी देण्याच्या नावाखाली १९ वर्षीय तरुणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, सोशल मीडियावरील मित्रानेच फसवलं

भारताची राजधानी दिल्ली दिवसेंदिवस महिलांसााठी असुरक्षित होऊ लागली आहे. दिल्लीतून सतत बलात्काराच्या बातम्या समोर येत आहेत. गुरुवारी दिल्लीतून सामूहिक बलात्कारांचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. नोकरी देण्याच्या बहाण्याने सोशल मीडियावरील मित्रानेच एका तरुणीची फसवणूक केली. तरुणीने यासंदर्भात मालवीय नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

वाचा सविस्तर…

09:58 (IST) 14 Apr 2023
अख्खा काँग्रेस पक्ष आपल्या पाठिशी येतोय, देवेंद्र फडणवीस यांचे विधान

राहुल गांधी यांची स्थिती न सांगितलेली बरी. त्यामुळे काँग्रेसमध्ये कोणी राहण्यास तयार नाहीत. अख्खा काँग्रेस पक्ष हळूहळू आपल्या पाठिशी येत आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही आहे, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे. भाजपाविरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्याबाबत रणनीती आखण्यासाठी ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. विरोधकांना एकत्र आणण्याची सुरुवात झाली आहे, असं विधान शरद पवारांनी केलं.