Marathi News Updates : गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्रवीर सावरकरांचा अवमान, गौतम अदानी प्रकरणााची जेपीसी चौकशी, ईव्हीएमचा मुद्दा आणि पंतप्रधान मोदींच्या पदवीचा विषय यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या परस्पर विरोधी भूमिकेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्यांवर जवळपास सव्वा तास चर्चा झाली. दरम्यान, या बैठकीनंतर आता शिंदे गट-भाजपाकडून उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर टीका करण्यात आले. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई, शीतल म्हात्रे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. हा मुद्दा आज दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याबरोबरच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं आरोपपत्र दाखल केले आहे. अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांशी संबंधित कंपनीविरोधात हे आरोपपत्र आहे. मात्र, या आरोपपत्रात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नसल्याने या प्रकरणी अजित पवारांनी क्लीनचीट मिळाली की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे. हा विषयसुद्धा दिवसभर गाजण्याची शक्यता आहे.

Live Updates

Mumbai News  Update : “काका मला वाचवा म्हणायला, तर…”; शरद पवार-उद्धव ठाकरे भेटीवरून शंभूराज देसाईंची खोचक टीका!

18:06 (IST) 12 Apr 2023
ठाणे शहराचे तापमान सलग तिसऱ्या दिवशी चाळीशी पार

ठाणे : शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होऊ लागली असतानाच, गेल्या तीन दिवसांपासून शहराचे तापमान चाळीशी पार गेले आहे.

सविस्तर वाचा…

18:05 (IST) 12 Apr 2023
नागपुरात लाखांची सभा घ्यायचीय, पण घेणार कुठे? राजकीय पक्षांच्या सभांसाठी शहरात मोठे मैदानच नाही! 

लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकासह अन्य निवडणुका आल्या की राजकीय पक्षांच्या सभा शहरातील कस्तुरचंद पार्क, यशवंत स्टेडियम किंवा अन्य काही ठराविक मोठ्या मैदानावर घेतल्या जात होत्या. आता मात्र ही मोठी मैदाने राजकीय सभांना देणे बंद केले आहे.

सविस्तर वाचा

17:56 (IST) 12 Apr 2023
नागपूरः खोपडेजी, सभेला या, आमच्या सोफ्यावर बसा अन तिथून खुर्च्या मोजा!

महाविकास आघाडीच्या नागपुरातील सभेसाठी मिळालेल्या मैदानाला विरोध दर्शवत भाजपचे आमदार कृष्णा खोपडे सातत्याने आंदोलन करत आहे. त्यांनी सभेतील गर्दीबाबतही शाशंकता व्यक्त केली होती. त्यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी सभेत बसण्यासाठी आमदार कृष्णा खोपडेंना सोफा देण्याचा प्रस्ताव दिला आहे.

सविस्तर वाचा

17:29 (IST) 12 Apr 2023
२३ एप्रिल रोजी उद्धव ठाकरेंची जळगावतील पाचोऱ्यात सभा, संजय राऊतांची माहिती

२३ एप्रिल रोजी उद्धव ठाकरेंची जळगावतील पाचोरा येथे भव्य सभा होईल, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

16:44 (IST) 12 Apr 2023
मुंबई: पोलिसांच्या गणवेशात फिरणाऱ्या तोतयाला अटक

सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या गणवेशात फिरणाऱ्या तोतया पोलिसाला अंधेरी येथील एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सविस्तर वाचा

16:44 (IST) 12 Apr 2023
चंद्रपूर: कुस्तीपटुंना जंगलाच्या राजाचे दर्शन; पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने मोफत ताडोबा सफारी

कुस्तीचे मैदान गाजवणाऱ्या तरणेबांड पहेलवानांना जंगलाच्या राजाचे दर्शन झाले. निमित्त होते ताडोबा अंधारी व्याघ्र संरक्षण प्रकल्पात मोफत टाइगर सफारीचे. राज्यभरातून आलेल्या पहेलवानांना राज्याचे वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही मोफत सफारी घडवून आणली.

सविस्तर वाचा

16:27 (IST) 12 Apr 2023
कल्याण-डोंबिवलीत विजेच्या लपंडावाने रहिवासी हैराण

कल्याण-डोंबिवली शहराच्या विविध भागात मागील तीन ते चार दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने घरून काम करणारे नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, आजारी वृध्द, लहान बालके यांना त्रास होत आहे.

हेही वाचा…

16:26 (IST) 12 Apr 2023
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर अजित पवारांची मुख्यमंत्र्यांबरोबर ५० मिनिटं चर्चा; मदत जाहीर होणार?

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. यावेळी तिघांमध्ये तब्बल ५० मिनिटं चर्चा झाली. दरम्यान, या बैठकीनंतर आता सरकार शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करणार का? सर्वांचं लक्ष लागलं आहे.

16:06 (IST) 12 Apr 2023
पुण्याच्या रिंगणात आम आदमी पार्टीही पोटनिवडणूक लढण्याची तयारी

पुणे लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी भाजपबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच, आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही (आप) निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागला आहे.

सविस्तर वाचा

16:06 (IST) 12 Apr 2023
बुलढाणा: नात्याला काळिमा! वासनांध मामाचा भाचीवर अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बहिणीकडे आलेल्या नराधमाने तिच्याच घरी भाचीवर शारीरिक अत्याचार केले. नात्याला काळिमा फासणारी व सर्वसामान्यांना चीड आणणारी ही घटना खामगाव शहरात घडली.पुणे येथील रहिवासी असलेला हा चाळीस वर्षीय नराधम खामगाव येथे राहत असलेल्या बहिणीला भेटावयास आला होता.

सविस्तर वाचा

15:02 (IST) 12 Apr 2023
मुंबई: पोलिसांची वैद्यकीय तपासणी करणार; पोलीस रुग्णालय विशेष मोहीम राबविणार

मुंबई आणि मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी २४ तास कर्तव्यावर असलेल्या मुंबई पोलीस दलातील वयाची ४० वर्षे ओलांडलेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी नागपाडा पोलीस रुग्णालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

सविस्तर वाचा

14:52 (IST) 12 Apr 2023
मविआच्या नागपूरमध्ये होण-या सभेला फडणवीस- बावनकुळे घाबरले, म्हणून विरोध, खासदार विनायक राऊत यांचा टोला

महाविकास आघाडीच्या नागपुरातील १६ एप्रिलला होणा-या वज्रमुठ सभेला लक्षावधी नागरिकांची गर्दी जमणार आहे. हा अंदाज बघता भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे घाबरले आहे. त्यातूनच भाजप वेगवेगळ्या पद्धतीने सभेला विरोध करत आहे, असा टोला उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी लगावला.

सविस्तर वाचा

14:26 (IST) 12 Apr 2023
अकोला: सत्यपाल महाराजांकडून ‘त्या’ बाबाची पोलखोल, गरम तव्यावर बसण्याचे प्रात्यक्षिक; म्हणाले, “दैवी शक्ती, चमत्कार…”

सप्तखंजेरीवादक, कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी अमरावती जिल्ह्यातील त्या बाबाची पोलखोल करण्यासाठी गरम तव्यावर बसण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्याची चित्रफित त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केली.

सविस्तर वाचा

14:07 (IST) 12 Apr 2023
पुणे: पीएमआरडीएमधील मोठ्या गृहसंकुलांना ‘यूडीसीपीआर’ लागू

पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) संपूर्ण क्षेत्राला ‘एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’ (यूडीसीपीआर) लागू करण्याऐवजी केवळ मोठ्या गृहसंकुलांना (टाऊनशिप) ती लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या बांधकाम नियमावलीचा सर्व नागरिकांना फायदा होण्याऐवजी काही मोजक्या जणांचा फायदा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाचा सविस्तर…

14:07 (IST) 12 Apr 2023
बुलढाणा: अर्ध्यावरती डाव मोडलेल्यांचे पुनर्वसन; घटस्फोटित, विधवा-विधुर परिचय संमेलनाने सामाजिक क्रांतीचे बीजारोपण

स्थानिय 'शिवसाई' परिवाराचे सर्वेसर्वा दत्तात्रय लहाने यांनी 'अर्ध्या वरती संसाराचा डाव मोडल्या जाणाऱ्या' दुर्देवी एकल जीवांचे पुनवर्सन करण्याचा धाडसी प्रयत्न केला अन तो यशस्वी देखील झाला आहे. त्यांचा हा प्रयोग जिल्ह्यात एका सामाजिक क्रांतीचे बीजारोपण करणारा ठरला.

सविस्तर वाचा

13:36 (IST) 12 Apr 2023
चंद्रपूर: तीन महिन्यांपासून १०२ उद्योग निरीक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत; अस्थायी नियुक्ती देण्याची आ. जोरगेवारांची मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या उद्याेग निरीक्षक परीक्षेत राज्यातून १०२ उमेदवार उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही या उमेदवारांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही.

सविस्तर वाचा

13:35 (IST) 12 Apr 2023
मुंबई: केईएम रुग्णालयात आठवडाभरात सुरू होणार स्वतंत्र करोना बाह्यरुग्ण विभाग

करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सर्व रुग्णालयांतील सज्जतेचा आढावा घेतला असून आता केईएम रुग्णालयामध्ये करोना बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आठवड्याच्या अखेरीस हा बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

13:21 (IST) 12 Apr 2023
नगर भाजप संघटनेच्या कारभारात सुधारणा होणार का ?

नगरःभाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे नगर जिल्ह्यातील पक्ष संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यासाठी प्रथमच जिल्ह्यात आले होते. त्यांनी यापूर्वी नगरचे धावते दौरे केले मात्र जिल्ह्याचा संघटनात्मक आढावा प्रथमच घेतला.

सविस्तर वाचा

13:20 (IST) 12 Apr 2023
नागपूर:पक्षीमित्रांसाठी नवे मोबाईल ऍप , विद्यार्थ्यांसह संशोधकांना उपयुक्त

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) ने पक्षीमित्रांसाठी एक महत्वपूर्ण मोबाइल ऍप तयार केले असून महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच पक्षी विषयक संशोधन करणाऱ्या संशोधकांना ते उपयुक्त होणार आहे.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी भारतातील १४० वर्षे जुनी संस्था असून पक्षी अभ्यास व पक्षी शास्त्रातील महत्वपूर्ण संशोधन कार्यासाठी संपूर्ण जगात सुपरिचित आहे.

सविस्तर वाचा

13:14 (IST) 12 Apr 2023
Maharashtra News Live : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या, अजित पवारांची मागणी

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

13:04 (IST) 12 Apr 2023
उन्हाळी सुट्टीसाठी नाशिकहून जादा बस फेऱ्यांचे नियोजन

लवकरच शाळा-महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी सुरू होणार आहे. त्यामुळे गावी जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी नाशिक विभागाच्या वतीने वेगवेगळ्या मार्गांवर जादा बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी दिली.

सविस्तर वाचा…

13:01 (IST) 12 Apr 2023
चंद्रकांत पाटलांनी बाळासाहेबांबाबत केलेल्या ‘त्या’ विधानानंतर ठाकरे गट आक्रमक; कोल्हापुरात जोरदार घोषणाबाजी

चंद्रकांत पाटलांनी बाळासाहेबांबाबत केलेल्या विधानानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापुरात जोरदार निदर्शनं करण्यात येत आहेत.

12:55 (IST) 12 Apr 2023
डोंबिवलीतील खासगी सावकाराचे काटई गावातील हॉटेलमधून अपहरण

डोंबिवली: डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद भागातील स्वामी समर्थ मठ भागात राहणाऱ्या एका खासगी सावकाराचे शीळ रस्त्यावरील काटई गावातील विजय सागर हॉटेलच्या तळ मजल्यावरुन तीन इसमांनी अपहरण केले आहे. देवाणघेवाणीच्या व्यवहारातून हा प्रकार घडला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

वाचा सविस्तर…

12:45 (IST) 12 Apr 2023
आर्थिक अडचणीमुळे अल्पभूधारक शेतकर्‍याची आत्महत्या

जळगाव : सततच्या नापिकीमुळे वाढत असलेल्या कर्जामुळे पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील अल्पभूधारक शेतकर्‍याने विषारी औषध सेवन करीत आत्महत्या केली. रवींद्र ओंकार चव्हाण (वय ४४, रा. तारखेडा पाचोरा) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

वाचा सविस्तर…

12:37 (IST) 12 Apr 2023
नागपूर: ‘लेफ्टनंट कर्नल’ पतीद्वारे सैन्यात अधिकारी असलेल्या पत्नीचा छळ

सैन्यात मोठ्या पदावर असलेल्या संबंधित महिलेचा छळ करणारा पतीदेखील सैन्यातच ‘लेफ्टनंट कर्नल’ पदावर कार्यरत आहे. अनेक वर्ष छळ सहन केल्यानंतर अखेर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली व पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वाचा

12:24 (IST) 12 Apr 2023
मुंबईः कॉपी करताना पकडल्यानंतर विद्यार्थिनीने केली आत्महत्या

परीक्षा सुरू असताना शिक्षकांनी कॉपी करताना पकडल्यानंतर नैराश्य आलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा गंभीर प्रकार चेंबूर परिसरात घडला. मुलीला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

सविस्तर वाचा

12:00 (IST) 12 Apr 2023
वर्धा: वरिष्ठ अधिकाऱ्याचा खबरी असल्याची बतावणी करून पोलिसांनाच गंडवले

टीप देणारा खबरी हा पोलीसांसाठी महत्त्वाचे काम करीत असतो. त्यावर विसंबून पोलीस अनेक गुन्हे उघडकीस आणतात. मात्र, या घटनेत चक्क पोलीसच सावज ठरले.पोलीस अधीक्षक यांचा खबरी असल्याची बतावणी करीत एका भामट्याने अन्य एका पोलीस अधिकाऱ्यास फोन लावत ऑनलाईन पैसे मागितले.

सविस्तर वाचा

11:47 (IST) 12 Apr 2023
पंकजा मुंडे पाथर्डीतून विधानसभा निवडणूक लढवणार? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “यासंदर्भात मी…”

मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यातील भारजवाडी गावात नारळी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजपा नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पंकजा मुंडे यांनी टीव्ही वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना पक्षाने जबाबदारी दिली तर आगामी विधानसभा निवडणूक पाथर्डीतून लढवणार, अशा आशयाचं विधान त्यांनी केलं. दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर आता पंकजा मुंडे परळीतून लढणार की पाथर्डींतून अशी चर्चा रंगू लागली आहे. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वाचा

11:30 (IST) 12 Apr 2023
नागपूर: नेत्यांना सत्तेवर येताच मोफत विजेची घोषणा, मागण्यांचा पडतो विसर ! कोणत्या पक्षाच्या नेत्यांकडून कोणती घोषणा?

सर्वच राजकीय पक्षाचे नेते नागरिकांना आकृष्ट करण्यासाठी कधी मोफत विजेची घोषणा करतात तर कधी नागरिकांना मोफत वीज देण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरतात. परंतु, सत्तेवर आल्यावर सगळ्यांनाच या घोषणा वा मागणीचा विसर पडतो.

सविस्तर वाचा

11:26 (IST) 12 Apr 2023
अजित पवार आज घेणार मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट; नेमकं कारण काय?

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट होणार असल्याची माहिती आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी राज्यासह देशातील अनेक मोठे नेते मातोश्रीवर आल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. परंतु आज उद्धव ठाकरे काका मला वाचवा म्हणत सिल्व्हर ओक वर लोटांगण घालत. शरद पवार यांची भेट घेण्यास गेल्याचे पाहून राज्यातील जनतेला खेद वाटत आहे. अशा शब्दात शिवसेनेचे नेते राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.