Marathi News Updates : गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्रवीर सावरकरांचा अवमान, गौतम अदानी प्रकरणााची जेपीसी चौकशी, ईव्हीएमचा मुद्दा आणि पंतप्रधान मोदींच्या पदवीचा विषय यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या परस्पर विरोधी भूमिकेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्यांवर जवळपास सव्वा तास चर्चा झाली. दरम्यान, या बैठकीनंतर आता शिंदे गट-भाजपाकडून उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर टीका करण्यात आले. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई, शीतल म्हात्रे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. हा मुद्दा आज दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
याबरोबरच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं आरोपपत्र दाखल केले आहे. अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांशी संबंधित कंपनीविरोधात हे आरोपपत्र आहे. मात्र, या आरोपपत्रात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नसल्याने या प्रकरणी अजित पवारांनी क्लीनचीट मिळाली की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे. हा विषयसुद्धा दिवसभर गाजण्याची शक्यता आहे.
Mumbai News Update : “काका मला वाचवा म्हणायला, तर…”; शरद पवार-उद्धव ठाकरे भेटीवरून शंभूराज देसाईंची खोचक टीका!
आज महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये काही मुद्द्यांवर मतभिन्नता असली, तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकना विचाराने पुढे जावं, याबाबत कालच्या भेटीत चर्चा झाली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. आगामी महाविकास आघाडीच्या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, ही आमची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.
मध्य रेल्वेने आगामी दोन महिन्याच्या कालावधीसाठी दोन सुपर एक्सप्रेस गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.साप्ताहिक सुपर फास्ट एक्सप्रेस गाडी सहा मे ते तीन जून दरम्यान प्रत्येक शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस ते नागपूर दरम्यान धावेल.
पुणे: पुणे मेट्रोच्या काही स्थानकांच्या बांधकामामध्ये असलेल्या त्रुटी महामेट्रोने दुरुस्त केल्या आहेत. या कामाचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून (सीओईपी) परीक्षण करण्यात आले आहे. त्याचा अहवालही मेट्रोला मिळालेला आहे, अशी माहिती महामेट्रोने दिली आहे.
पुणे: महाराष्ट्रात भूजल उपशाचे प्रमाण जास्त आहे. भूजल उपशामुळे फळ बागायत, तसेच कृषी क्षेत्रांकरिता होणारा उपसादेखील जास्त आहे. त्यामुळे या क्षेत्रातील भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून संपूर्ण देशासाठीचा वास्तविक भूजल स्रोत मूल्यांकन अहवाल जाहीर केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेबांबाबत केलेल्या विधानावर स्पष्टीकरण देताना त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचा आरोप केला होता. त्यावरून आता संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर पुन्हा टीकास्र सोडलं आहे. चंद्रकांत पाटील हे टोपी फिरवतात, असं ते म्हणाले. तसेच चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेबांचा अपमान केला असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच हिंमत असेल तर चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा किंवा स्वत: राजीनामा द्यावा, असे आव्हानही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
पुणे: देशात ई-वाहनांच्या विक्रीतील वाढ कायम आहे. यंदाही ई-वाहनांच्या विक्रीचा वेग वाढला आहे. चालू वर्षातील पहिल्या तीन महिन्यांत ई-वाहनांच्या विक्रीने दरमहा एक लाखांचा टप्पा पार केला आहे. ई-वाहनांमध्ये सर्वाधिक मागणी दुचाकी आणि तीन चाकीला आहे.
पुणे प्रतिनिधी: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी राज्यासह देशातील अनेक मोठे नेते मातोश्रीवर आल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. परंतु आज उद्धव ठाकरे काका मला वाचवा म्हणत सिल्व्हर ओक वर लोटांगण घालत. शरद पवार यांची भेट घेण्यास गेल्याचे पाहून राज्यातील जनतेला खेद वाटत आहे. अशा शब्दात शिवसेनेचे नेते राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
करोनापूर्वी ‘सिझेरियन’च्या तुलनेत सामान्य प्रसूती जास्त होत होत्या. परंतु, करोनानंतर ‘सिझेरियन’ प्रसूती वाढल्या आहेत. नागपुरातील डागा स्मृती स्त्री शासकीय रुग्णालयाच्या निरिक्षणातून ही आकडेवारीतून समोर आली आहे.
आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, १५ आमदार बाद होणार आणि अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहेत, तेही लवकरच. बघू….. आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची, असं ट्वीट अंजली दमानिया यांनी केले.
आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 11, 2023
बघू…..
आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची
वर्षभर प्रेमसंबंध ठेवल्यानंतर अचानक ‘ब्रेक अप’ करणाऱ्या तरुणीच्या घरात प्रियकर चाकू घेऊन घुसला. प्रेमसंबंध कायम न ठेवल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. प्रतापनगर पोलिस तत्काळ घटनास्थळावर पोहोचले आणि त्याला अटक केली.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं आरोपपत्र दाखल केले आहे. अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांशी संबंधित कंपनीविरोधात हे आरोपपत्र आहे. मात्र, या आरोपपत्रात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नसल्याने या प्रकरणी अजित पवारांनी क्लीनचीट मिळाली की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे.
MSC bank scam case | Enforcement Directorate has submitted a chargesheet in the case, in which it has named a company linked to former Maharashtra Deputy CM & NCP leader Ajit Pawar and his wife, while Pawar and his wife have not been named in the chargesheet. The ED had attached…
— ANI (@ANI) April 12, 2023
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योजक गौतम अदाणी यांचं एकप्रकारे समर्थन केलं होतं. तर अजित पवार यांनीही ईव्हीएमचं समर्थन करत विरोधी भूमिका घेतली होती. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या असून शिंदे गटाने या भेटीवरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. सविस्तर वाचा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी राज्यासह देशातील अनेक मोठे नेते मातोश्रीवर आल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. परंतु आज उद्धव ठाकरे काका मला वाचवा म्हणत सिल्व्हर ओक वर लोटांगण घालत. शरद पवार यांची भेट घेण्यास गेल्याचे पाहून राज्यातील जनतेला खेद वाटत आहे. अशा शब्दात शिवसेनेचे नेते राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.