Mumbai Monsoon Weather Live Updates in Marathi : राज्यात पुढील ४-५ दिवस सर्वदूर पसरलेल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व इतर काही भागात अती मुसळधार पावसाचा इशारा आहे. कोकणात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती उद्धवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. पावसासह राज्यातील इतर सर्व राजकीय घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…

Live Updates

Maharashtra Live Updates 06 July 2022 : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट

17:43 (IST) 6 Jul 2022
ठाणे : मुख्यमंत्र्यानी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी, खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीव गेल्यास कारवाई करणार

घोडबंदर येथील काजूपाडा भागात खड्ड्याचा पहिला बळी गेला असून याच मुद्द्यावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्यांची कानउघडणी केली. अशी घटना यापुढे घडल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देत रस्त्यावरील खड्डे तात्काळ भरण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सविस्तर वाचा

16:59 (IST) 6 Jul 2022
जनतेतून थेट सरपंच निवडीचा निर्णय पुन्हा लागू करावा, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

राज्यात नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतमधील नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतून निवडून येण्याबाबतचा महाविकास आघाडीने रद्द केलेला निर्णय पुन्हा लागू करावा, अशी मागणी माजी मंत्री व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

सविस्तर वाचा

16:17 (IST) 6 Jul 2022
उद्धव ठाकरेंनी पुन्हा सोबत येण्यास सांगितलं तर जाणार का? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परत या म्हणाले होते असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी बंडामागचं कारणदेखील सांगितलं. तसंच सरकारचा रिमोट कंट्रोल नेमका कोणाच्या हाती आहे याचं उत्तरही दिलं. हा बंड देशभरातील मोठी घटना आहे सांगताना सभागृहातील माझं भाषण उत्स्फूर्तपणे होतं. लोकांच्या मनातील भावना आणि जे काही माझ्या मनात साचलं होतं ते सगळं बोलून मन मोकळं केलं असंही त्यांनी सांगितलं.

सविस्तर बातमी

15:54 (IST) 6 Jul 2022
मासेमारांच्या जाळ्यात अडकले तब्बल १६ साप

तलावात मासे पकडण्यासाठी मासेमारांनी टाकलेले जाळे आता सापांसाठी कर्दनकाळ ठरत चालले आहेत. नागपूरच्या अंबाझरी तलावाच्या काठावर मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात एक-दोन नाही तर तब्बल १६ साप अडकले. सेमिनरी हिल्सवरील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्राच्या चमूसह सर्पमित्रांनी या जाळ्यातून त्यांची सुटका केली.

सविस्तर वाचा

15:43 (IST) 6 Jul 2022
भाजपच्या कोट्यातून मनसे आमदार प्रमोद पाटील यांना मंत्रिपद?

कल्याण लोकसभा मतदार संघात काल परवा पर्यंत खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीकेची एकही संधी न सोडणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीण मतदार संघाचे आमदार राजू पाटील यांनी शिंदे सरकारचां विश्वासदर्शक ठराव मंजुरीच्या बाजूने केलेले मतदान ठाणे जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरण ना जन्म देणारे ठरेल अशी शक्यता आहे.

सविस्तर वाचा

15:41 (IST) 6 Jul 2022
बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकरांविरुद्ध शिवसैनिकांची घोषणाबाजी

शिवसेनेचे बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि अंबरनाथ शहरातील शिवसेनेची महिला आघाडी बुधवारी अंबरनाथ नगरपालिकेच्या मुख्यालयात आमने-सामने आले. यावेळी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आमदार डॉ. किणीकर यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. अंबरनाथ नगरपालिका मुख्यालयात एकच गोंधळ उडाला.

सविस्तर वाचा

15:39 (IST) 6 Jul 2022
लोणावळ्यात २४ तासात १६६ मिमी पाऊस, डोंगर दऱ्यातून धबधबे वाहू लागलेत

लोणावळ्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून नागरिकांना अक्षरशः झोडपून काढले आहे. गेल्या २४ तासात लोणावळा शहरात तब्बल १६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलै महिना सुरू होताच जोरदार आगमन केले आहे. लोणावळ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमीच आहे. यावर्षी एकूण ५८१ मिमी पाऊस झाला आहे तर गेल्या वर्षी आजच्या दिवशी तब्बल १ हजार १०५ मिमी पाऊस झाला होता. 

सविस्तर वाचा

15:37 (IST) 6 Jul 2022
लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो, पर्यटकांमध्ये उत्साह

लोणावळ्यातील पर्यटकांचं आकर्षण असलेलं भुशी धरण ओव्हर फ्लो झालं आहे. यामुळे भुशी धरणावर काही प्रमाणात गर्दी झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. २४ तासात तब्बल १६६ मिमी पाऊस झाल्याने धरण ओव्हर फ्लो झालं असून धरणाच्या पायऱ्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे.

सविस्तर वाचा

15:35 (IST) 6 Jul 2022
मुंबई : चुनाभट्टी येथे दरड कोसळून तीन जखमी

चुनाभट्टी येथील नागोबा चौक परिसरातील एका चाळीतील दोन घरांवर बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास दोन घरांवर दरड कोसळली. या दुर्घटनेत एका महिलेसह तीन जण जखमी झाले.

सविस्तर वाचा

14:07 (IST) 6 Jul 2022
“…तर मातोश्रीवर परत जाऊ,” बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या विधानाने खळबळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ४० आमदारांनी घेतलेली भूमिका बंड नव्हे तर उठाव होता. ‘मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने आमच्यासाठी उघडले तर आम्ही सर्वजण परत जाऊ, असे खळबळजनक विधान शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर प्रथमच यवतमाळला आलेल्या आमदार संजय राठोड यांनी केले.

सविस्तर बातमी

13:35 (IST) 6 Jul 2022
शंभूराजे देसाई संजय राऊतांवर संतापले; पवारांवरही टीका करत म्हणाले, “ते बोलले म्हणून…”

संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेवर ही वेळ आली आहे. संजय राऊतांमुळेच पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले ४० आमदार बाहेर पडले आहेत. त्यांना जास्त महत्व देण्याची गरज नाही अशा शब्दात शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी टीका केली आहे. गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडींनंतर शंभूराजे देसाई आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शरद पवार बोलतात ते कधीच खरं ठरत नाही असंही ते म्हणाले.

सविस्तर बातमी

13:07 (IST) 6 Jul 2022
आम्ही विनंती करू. झालं तर ठीक आहे. नाहीतर जय राम कृष्ण हरी - मंत्रिपदावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

शिंदेंच्या गटातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये मंत्रिपदं कशी दिली जातील आणि भाजपाकडे कोणती मंत्रिपदं राहतील? यावर तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंसोबत गेलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिपदाबाबत असलेल्या अपेक्षेवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली अपेक्षा व्यक्त केली आहे.

वाचा सविस्तर

12:20 (IST) 6 Jul 2022
राज्यात NDRF च्या एकूण १७ टीम्स तैनात

https://twitter.com/MahaGovtMic/status/1544565299516948481

"राज्यात NDRF च्या एकूण १७ टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. ५ टीम्स मुंबईत, तर कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे, रायगड या जिल्ह्यांत प्रत्येकी २ टीम्स आहेत. पालघर, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांत प्रत्येकी १ टीम आहे," अशी माहिती कमांडंट, कमांडिंग ऑफिसर अनुपम श्रीवास्तव यांनी दिली.

12:12 (IST) 6 Jul 2022
“मी भाजपाला इशारा देतो, घोडेबाजारात…”, शिवसेना नेत्याचं टीकास्त्र!

शिवसेना नेते विनायक राऊत यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाला इशारा दिला आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत देखील काही दावे केले आहेत.

वाचा सविस्तर

12:11 (IST) 6 Jul 2022
‘ब्रेक फेल गेलेला रिक्षाचालक’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले “रिक्षाने मर्सिडीजला…”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचा रिक्षाचालक म्हणून उल्लेख केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, “खूप वेगाने धावत असल्याने त्यांचे ब्रेक फेल गेले आहेत”. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं असून हे सामान्य माणसाचं सरकार असल्याचं म्हटलं आहे. तसंच रिक्षाच्या वेगाना मर्सिडीजला मागे टाकलं आहे असं प्रत्युत्तरही दिलं.

सविस्तर बातमी

12:11 (IST) 6 Jul 2022
पक्षाने ‘कालीमाता’संबंधी वक्तव्यावर आक्षेप घेतल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांचा मोठा निर्णय

Kaali Poster Controversy: देशात सध्या ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवरुन वाद रंगला आहे. लीना मणीमेकलई यांनी या पोस्टरमधून हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्याची टीका होत आहे. यादरम्यान तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी या वादावर केलेल्या विधानाची चर्चा आहे. मात्र पक्षाने आपल्या विधानापासून फारकत घेतल्याने महुआ मोईत्रा यांनी पक्षाचं ट्विटर अकाऊंट अनफॉलो केलं आहे. इंडिया टुडेच्या कार्यक्रमात बोलताना महुआ मोईत्रा यांनी माझ्यासाठी कालीमाता मांसाहार आणि मद्याचा स्वीकार करणारी आहे असं म्हटलं होतं.

सविस्तर बातमी

12:09 (IST) 6 Jul 2022
राज्यात पुढील ४-५ दिवस सर्वदूर पसरलेल्या पावसाची शक्यता : हवामान विभाग

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1544252287521935360

हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर म्हणाले, "राज्यात पुढील ४-५ दिवस सर्वदूर पसरलेल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व इतर काही भागात अती मुसळधार पावसाचा इशारा आहे. कोकणात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती उद्धवण्याची शक्यता आहे."

12:07 (IST) 6 Jul 2022
देवेंद्र फडणवीस यांच्या वेशांतराबाबत अमृता फडणवीस यांचं मोठं विधान, म्हणाल्या, "कधीकधी ते रात्री..."

राज्यात मागील काही काळात प्रचंड वेगाने राजकीय घडामोडी घडल्या आणि थेट सत्तातरण होऊन महाविकासआघाडीच्या जागेवर शिंदे-फडणवीस सरकार आलं. नेमकं पडद्याआड काय घडामोडी झाल्या याचे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यातील काही भाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात सांगत रात्रीच्या गुप्त भेटींचा उल्लेख केला. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी फडणवीसांच्या वेशांतराबाबत वक्तव्य केलंय. त्या एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

सविस्तर बातमी...

[caption id="attachment_3005555" align="alignnone" width="670"]Maharashtra News Live Updates Todayराज्यात पुढील ४-५ दिवस सर्वदूर पसरलेल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.