Mumbai Maharashtra News Updates, 10 September 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दिवाळीआधी होणार की दिवाळीनंतर याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, त्यामुळे राजकीय घडामोडी अजिबात थांबल्या नसून नेत्यांच्या भेटीगाठी, जागावाटपासाठीच्या बैठका आणि मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची चर्चा यासंदर्भात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. निवडणुकांच्या आधी पक्षांतराच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यातच अजित पवारांनी बारामतीमधून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Live Updates

Maharashtra News Live Today, 10 September 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या

19:25 (IST) 10 Sep 2024
नागपूर : लाडक्या बहिणींच्या समितीवर सर्वच भाऊ

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेतून पात्र महिला लार्भार्थीला दर महिन्याला १५०० रुपये शासन देणार आहे.

सविस्तर वाचा...

18:54 (IST) 10 Sep 2024
बुलढाणा : छळाची हद्द! अघोरी विद्या, अश्लील चित्रफीत, पाण्यात ‘करंट’ अन्…

बुलढाणा : आधुनिक युगातील माणूस देखील किती खालच्या थराला जाऊ शकतो, गृह लक्ष्मीचा छळ करताना किती विकृतपणे वागू शकतो याचा भीषण प्रत्यय आणणारा हा घटनाक्रम धाड (ता. जि. बुलढाणा) येथे घडला आहे.

सविस्तर वाचा...

18:43 (IST) 10 Sep 2024
आमच्यामध्ये कोणताही श्रेयवाद नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : राज्य सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी ठाण्याच्या किसननगर भागातून लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी वागळे इस्टेट भागातील १५ कुटुंबाची भेट घेऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री घरी आल्याने अनेकजण भारावून गेले होते.

सविस्तर वाचा

18:09 (IST) 10 Sep 2024
नागपूर हिट अँन्ड रन प्रकरणावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ” पोलिसांकडे…”

नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळेच्या कारने रविवारी मध्यरात्री नागपुरात दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिली. या प्रकरणावर प्रथमच उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रतिक्रिया दिली.

.सविस्तर वाचा...

17:50 (IST) 10 Sep 2024
नागपूर ‘हिट अँड रन’ : रात्री १२.३० ते १ या वेळेत संकेत बावनकुळेचे लोकेशन काय होते? काँग्रेसचा सवाल

नागपूर : भारतीय जनता पक्ष युती सरकारच्या काळात सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार व त्यांच्या नातेवाईकांना कायद्याचा धाकच नाही. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सत्ताधारी पक्षाच्या दावणीला बांधली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळेच्या ऑडी कारने नागपुरात मद्यधुंद अवस्थेत अनेक गाड्यांना धडक दिली.

वाचा सविस्तर...

17:50 (IST) 10 Sep 2024
पुणे : लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरची सव्वा कोटींची फसवणूक

पुणे : सायबर चोरट्यानी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयातील (एएफएमसी) एका डॉक्टरची एक कोटी २२ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

वाचा सविस्तर...

17:49 (IST) 10 Sep 2024
गणेशोत्सवात चोरट्यांचा उच्छाद; कर्वेनगर, खडकीत महिलांचे दागिने चोरी

पुणे : गणेशोत्सवात शहरात चोख बंदोबस्त ठेवलेला असताना खडकी भागात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरुन नेल्याच्या घटना उघडकीस आल्या.

वाचा सविस्तर...

17:37 (IST) 10 Sep 2024
VIDEO : नागपूर ‘हिट अँड रन’चा थरार : सीसीटीव्ही आले समोर

नागपूर : नागपूर ‘हिट अँड रन’ रन प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमधून अपघाताची भीषणता लक्षात येते. गेल्या दोन दिवसांपासून या अपघाताची शहरभर चर्चा होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज अधिकृतरित्या जारी केले नसले तरी समाजमाध्यमांवर या अपघाताच्या थराराची चित्रफित प्रसारित झाली आहे.

सविस्तर वाचा....

17:33 (IST) 10 Sep 2024
हेलिकॉप्टर खरेदीसाठी सुट, सायकल खरेदी केली तर लूट जयंत पाटील म्हणतात,‘ गद्दारांना…’

भंडारा : गद्दार आमदाराला धडा शिकवा आणि पुन्हा एकदा २०१९ ला जो इतिहास घडवला तो इतिहास घडवा, असे आवाहन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

सविस्तर वाचा...

17:11 (IST) 10 Sep 2024
कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर गुन्हा

कल्याण - कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयात येऊन फडके चौक प्रभागातील पाणी प्रश्नावरून आयुक्तांच्या दालनासमोर अर्धनग्न अवस्थेत उपोषण करणाऱ्या शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर पालिका सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा

17:00 (IST) 10 Sep 2024
"आमदार पुत्र आहे म्हणून झुकते माप नको, निष्पक्ष चौकशी व्हावी", काय म्हणाले काँग्रेस आमदार...

नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेतच्या चारचाकीने नागपुरात रविवारी मध्यरात्री दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिली. या अपघात प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधीपक्ष विशेषत: शिवसेनेने भाजप आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ही घटना काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या मतदारसंघात घडली आहे. त्यानीही यावर भाष्य केले आहे.

सविस्तर वाचा

16:58 (IST) 10 Sep 2024
Video: नाशिकमध्ये फटाक्यांच्या गोदामाला आग, दोन जण जखमी

Nashik Firecrackers Godown Fire: शहराजवळील शिंदे गाव परिसरातील फटाक्याच्या गोदामाला मंगळवारी दुपारी अकस्मात लागलेल्या आगीत मालमोटारीसह गोदामातील फटाके भस्मसात झाले.

सविस्तर वाचा...

16:48 (IST) 10 Sep 2024
संकेतच्या कारची मानकापूर चौकातही पोलो कारला धडक, तिघांनाही मारहाण ..

नागपूर : सेंटर पॉईट हॉटेलसमोर संकेत बावनकुळेच्या ऑडी कारने पाच वाहनांना धडक दिली. तेथून तिघेही कारने पळून जात असताना मानकापूर चौकात त्यांनी आणखी एका पोलो कारला धडक दिली.

सविस्तर वाचा...

16:34 (IST) 10 Sep 2024
एसटी महामंडळाची बसगाडी मेट्रो खांबाला धडकली; आठ प्रवासी जखमी

ठाणे : घोडबंदर येथील ओवळा भागात मंगळवारी पहाटे राज्य परिवहन सेवेची (एसटी) बसगाडी मेट्रो मार्गिकेच्या खांबाला धडकली. या अपघातात चालक आणि वाहकासह आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

सविस्तर वाचा

16:24 (IST) 10 Sep 2024
Sanket Bawankule Car Accident CCTV Footage: नाना पटोलेंनी शेअर केलं सीसीटीव्ही फूटेज

नागपुरात हिट अँड रन प्रकरणात भाजपच्या बड्या नेत्याचा प्रताप समोर आला आहे. पठ्ठ्यानं एका गाडीला, दोन दुचाकींना धडक दिली. पण आता ना त्या बारचा सीसीटीव्ही ताब्यात ना अटकेची कारवाई. कारण, या युवराजांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न होत आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था पुन्हा भाजपच्या दावणीला बांधलेली आहे, हे दिसून आलं. श्रीमंतांसाठी काम करणाऱ्या या सरकारला गरिबाच्या जीवाची किंमत नाही. गरिबाचा जीव गेला तरी यांना काय? गृहमंत्री फडणवीसांच्या गृहखात्याचा धाक त्यांच्याच पक्षातल्यांना नाही- नाना पटोलेंची सोशल पोस्ट

https://x.com/NANA_PATOLE/status/1833390108869071256

16:14 (IST) 10 Sep 2024
रायगड: सख्खा भाऊ ठरला पक्का वैरी…नेरळ येथील तिहेरी हत्याकांडाचा उलगडा…

कर्जत तालुक्यातील नेरळ येथील तिहेरी हत्याकांडाची उकल करण्यात रायगड पोलीसांना यश आले आहे.

सविस्तर वाचा...

16:13 (IST) 10 Sep 2024
मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर ध्वनी अवरोधक

मुंबई : मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी या मार्गावर ध्वनी अवरोधक बसवण्यात आले आहेत. या मार्गावरील ५०८ किमी अंतरापैकी आतापर्यंत ८७.५ किमी परिसरात १ लाख ७५ हजार ध्वनी अवरोधक बसविण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा

16:13 (IST) 10 Sep 2024
गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती,अनेक मार्ग बंद, रुग्णालयात पाणी,रुग्णांचे हाल..

गोंदिया: गोंदिया जिल्ह्यात सोमवारी मध्य रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी दुसर्‍या दिवशी कायम असून जिल्ह्य़ात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

सविस्तर वाचा...

15:46 (IST) 10 Sep 2024
संकेत बावनकुळेची वैद्यकीय चाचणी करणे का टाळले ?

नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका अपघातात कारमधील चालकासह पाच जणांवर गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली होती. मात्र, सेंट्रल बाजार रोडवरील अपघात प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत यांचा मुलाचा समावेश आहे. परंतु, पोलिसांनी संकेतवर गुन्हा दाखल करण्याचे टाळले. त्यामुळे संकेतसाठी वेगळा कायदा का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सविस्तर वाचा....

15:40 (IST) 10 Sep 2024
नाशिक: नियमबाह्य कामे केल्यास कारवाई; विभागीय सचिवांचा मुख्याध्यापक, प्राचार्यांना इशारा

बहुतांश विद्यालये, महाविद्यालये यांच्या नियमबाह्य कामांविषयी विभागीय सचिवांना तक्रारी प्राप्त झाल्या.

सविस्तर वाचा...

15:24 (IST) 10 Sep 2024
आकस्मिक निधीत सहकार्याची मागणी भ्रष्टाचार नव्हे...कोर्टाच्या एका निर्णयाने लाचखोरीच्या आरोपीला…

नागपूर : शासकीय अधिकाऱ्याने सहकार्य निधीची मागणी करणे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत गुन्हा ठरत नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केले. न्या. विनय जोशी आणि न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने हे मत नोंदवत आरोपीवरील गुन्हा रद्द केला.

सविस्तर वाचा

15:07 (IST) 10 Sep 2024
भीषण! गोंदियात मुसळधार पावसाचा कहर; इमारत कोसळल्याने मायलेकाचा मृत्यू

गोंदिया : जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. आज पहाटे शहरालगतच्या एका नाल्याला पूर आल्यामुळे लगतची एक दुमजली इमारत नाल्यात कोसळली. यामुळे मायलेकाचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा...

14:41 (IST) 10 Sep 2024
स्वस्तात परदेशी पर्यटनाच्या नावाखाली १९ जणांची ४० लाखांची फसवणूक, एजन्सी चालक-मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

नवी मुंबई : विदेशात खासकरून युरोप आणि सिंगापूर येथे स्वस्तात पर्यटनाच्या नावाखाली १९ जणांची ३९ लाख ७ हजार ७४ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात संबंधित एजन्सी चालक-मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

14:31 (IST) 10 Sep 2024
गोंदिया : महाविकास आघाडीत वादाची ठिणगी; गोपालदास अग्रवाल यांच्या काँग्रेस प्रवेशापूर्वीच…

गोंदिया : गोंदिया विधानसभेचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपाला ‘रामराम’ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे रविवार, ८ सप्टेंबर रोजी पत्रपरिषदेत जाहीर केले.

सविस्तर वाचा...

14:30 (IST) 10 Sep 2024
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य

कल्याण - कल्याण-शिळफाटा आणि मुंब्रा-पनवेल जोड रस्त्यांवरील कल्याण फाटा चौकात उड्डाण पूल उभारणीच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याच्या हालचाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केल्या आहेत. तीन वर्षापूर्वी कल्याण शिळफाटा रस्त्यावरील वाहन कोंडीचा विचार करून शासनाने या रस्त्यावर तीन उड्डाण पूल उभारणीचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा

14:19 (IST) 10 Sep 2024
पनवेल प्रारूप विकास आराखड्यावर सुमारे सहा हजार हरकती-सूचना

पनवेल : पनवेल महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप विकास आराखड्याबाबत सूचना व हरकतींसाठी ७ सप्टेंबर ही अंतिम तारीख जाहीर असल्याने शेवटच्या दिवसापर्यंत ६ हजार ३९३ हरकती व सूचना पालिका प्रशासनाकडे आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

सविस्तर वाचा....

14:08 (IST) 10 Sep 2024
डोंबिवलीत देवीचापाडा गावदेवी मंदिर येथील बगिचा आरक्षणावर बेकायदा इमारतीची उभारणी

डोंबिवली - डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील रेतीबंदर छेद रस्ता ते सत्यावान चौक दरम्यानच्या गावदेवी मंदिर मैदानाजवळ कल्याण डोंबिवली पालिकेचे बगिचा आरक्षण असलेल्या एका भूखंडावर भूमाफियांनी सात माळ्याची बेकायदा इमारत उभी केली आहे. या इमारतीमधील सदनिका घर खरेदीदारांना बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करून भूमाफियांनी खरेदीदारांची फसवणूक सुरू केली आहे, अशी तक्रार उमेशनगर मधील रहिवासी संजय वसंत म्हात्रे यांनी पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्याकडे केली आहे.

सविस्तर वाचा

14:07 (IST) 10 Sep 2024
मुंबई: राजकीय फलकबाजी; गणेशोत्सव काळात न्यायालयाच्या आदेशांचा विसर

सध्या राज्यासह मुंबईत गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जात असून सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे.

सविस्तर वाचा...

14:04 (IST) 10 Sep 2024
अकोल्यातील श्री बाराभाई गणपतीची १३४ हून अधिक वर्षांची परंपरा

अकोला : लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव विदर्भातील काही जुन्या गणेशोत्सव मंडळांनी आणि घराण्यांनी तेवढ्याच श्रद्धेने व भक्तिभावाने जोपासला. या मंडळ व घराण्यांच्या उत्सवाने आता शतके ओलांडली आहेत.

सविस्तर वाचा...

13:56 (IST) 10 Sep 2024
Rohit Pawar on BJP Internal Survey: भाजपाला ६२-६७ जागा, शिंदे गटाला १७-२२ जागा व अजित पवार गटाला ७-११ जागा...

एका internal source च्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला असून त्यामध्ये अजितदादांच्या गटाला ७-११ जागा, शिंदे साहेबांच्या गटाला १७-२२ जागा आणि भाजपला ६२-६७ जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर ६ ते ७ जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिलीय. ्जत_जामखेड संदर्भात तर "कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको", असं सांगितल्याने ्जत_जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटेरेस्टिंग होणार हे नक्की आहे. पण मीही या ाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज असून या महायुद्धात कर्जत-जामखेडकर ्वाभिमान आणि िष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील, असा विश्वास आहे - रोहित पवार यांची सोशल पोस्ट

https://x.com/RRPSpeaks/status/1833349842912842004

Mahayuti Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar

महायुतीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या श्रेयावरून वाद उद्भवला आहे. (Photo - Maha DGPIR)

Maharashtra News Live Today, 10 September 2024: सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर