Mumbai Maharashtra News Updates, 10 September 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दिवाळीआधी होणार की दिवाळीनंतर याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, त्यामुळे राजकीय घडामोडी अजिबात थांबल्या नसून नेत्यांच्या भेटीगाठी, जागावाटपासाठीच्या बैठका आणि मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची चर्चा यासंदर्भात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. निवडणुकांच्या आधी पक्षांतराच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यातच अजित पवारांनी बारामतीमधून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
Maharashtra News Live Today, 10 September 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या
दुधामध्ये चुना व युरिया यासारखे घटक मिसळण्यात येतात. मात्र ही बाब अन्न निरीक्षकांच्या सहज लक्षात येऊ लागल्याने आता भेसळ करणाऱ्यांनी दुधात भेसळ करण्यासाठी विविध पर्याय शोधले आहेत.
कल्याण : एका ठेकेदाराकडून कामाच्या बदल्यात लाच स्वीकारणारा कल्याण डोंबिवली पालिकेच्या दक्षता आणि गुणनियंत्रण विभागाचा कनिष्ठ अभियता तथा प्रयोगशाळा साहाय्यक संजय सोमवंशी यांना आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी सोमवारी तडकाफडकी निलंबित केले
छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपी लोकसेवक विशाल सावंत यांनी तक्रारदाराकडे २५ लाख रुपयांची लाच मागितली होती.
महारेराने गेल्या दीड ते दोन वर्षांत वसुली आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जोरदार मोहिम सुरू केली होती.
वर्धा : वर्धा दारूबंदी जिल्हा असला तरी दारूचे पाट पाण्यापेक्षा वेगाने वाहत असल्याचे चित्र वर्ध्यात नवे नाही. अवैध दारू विक्रेते मग नामी शक्कल लावत चोरीने दारू विकतातच.
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मातोश्री साखर कारखान्याने थकीत ठेवलेली उसाची देयके मिळण्यासाठी मराठवाड्यासह शेजारच्या कर्नाटकातीलही शेतकऱ्यांनी सोलापुरात काँग्रेस भवनासमोर उपोषण सुरू केले आहे. मंगळवारी, सातव्या दिवशीही या आंदोलनाची कोंडी फुटली नव्हती.
दरम्यान, या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबंधित शेतकरी प्रतिनिधी आणि मातोश्री साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाची बैठक बोलावली होती. या बैठकीत कारखाना व्यवस्थापनाकडून आठ महिन्यांपासून थकीत असलेली ऊस देयके लवकरात लवकर अदा करण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु त्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान न मानता, तोपर्यंत थकीत देयके पदरात पडणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार कायम ठेवला आहे.
ठाणे : ट्रान्स हार्बर मार्गावरील नेरूळ रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा परिणाम ट्रान्स हार्बर मार्गावर झाला.
आदिवासी विकास विभागाच्या राज्यात ४९९ आश्रमशाळा असून, त्यामध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थी धडे गिरवतात.
चंद्रपूर : कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे लाखो रुपये स्वतःच्या खात्यात वळविणाऱ्या तीन लेखापाल व कार्यक्रम सहायक, अशा राष्ट्रीय आरोग्य अभियानंतर्गत कार्यरत चार कर्मचाऱ्यांची सेवा तातडीने समाप्त करण्याची कारवाई करण्यात आली.
मराठ्यांच्या आमदारांना फक्त त्यांची मालमत्ता, पक्ष व नेता वाचवायचा आहे. गरीब मराठ्यांना वाचवायचं नाहीये. हे फक्त राजकारण करत आहेत. गरीब मराठ्यांनी एकजूट राहायला हवं – मनोज जरांगे पाटील यांचं आवाहन
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या आदल्या दिवसापासून मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करणार. १६ सप्टेंबरपासून उपोषणाला सुरुवात करणार.
पायधुनी येथे पोलीस असल्याची बतावणी करून ३० लाख रुपये लुटल्याचा प्रकार घडला आहे.
ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून ठाण्यातील घोडबंदर भागात सुरू असलेल्या वाहतुक कोंडीमुळे हैराण झालेल्या ठाणेकरांनी प्रशासनाला धारेवर धरण्यास सुरूवात केल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे.
भाजपाच्या बॅनरवरून तुमचे फोटो बाहेर गेलेत, अशी विचारणा माध्यम प्रतिनिधींनी करताच अजित पवार मिश्किलपणे म्हणाले, “मीच त्यांना सांगितलंय की माझे फोटो तिथे लावू नका. माझे फोटो फारच सगळीकडे झाले आहेत. म्हणून म्हटलं जरा कमी करा. लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं आणली आहे. त्यामुळे घटकपक्ष आपापल्या परीने ते लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आणि महायुती म्हणून आम्हीही एकत्रपणे लोकांसमोर मांडणार”!
मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाह यांच्याशी माझी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही सगळे बसून २८८ जागांबाबत निर्णय घेऊ. त्यातलं बरंचसं ठरलेलं आहे. ते अंतिम झाल्यावर जाहीर केलं जाईल – अजित पवार</p>
नांदगाव तालुक्याचा समावेश नार-पार प्रकल्पात व्हावा, या मागणीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय येथे घेण्यात आला.
गणेशोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांत शहरात सर्वच ठिकाणी आवाजाच्या पातळीने ध्वनिप्रदूषणाची कमाल मर्यादा ओलांडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारपासून (११ सप्टेंबर) शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवात भाविकांकडील मोबाइल संच, दागिने, रोकड, तसेच गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे.
कोल्हापूर विमानतळासाठी ६४ एकर जमीन ऑक्टोबरपर्यंत संपादित केली जाणार आहे, असे विमानतळाचे संचालक अनिल शिंदे यांनी स्पष्ट केले.
पाच वर्षांपासून एक दिवसाआड सुरू असलेला पाणीपुरवठा पावसाळ्यातही कायम आहे.
घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर रोझरी सोसायटीच्यासमोर काहीजण दारू पिऊन गोंधळ घालत असल्याची माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला (पोलीस कंट्रोल) दिली.
Ajit Pawar Helps Accident Victim in Pune : अजित पवार यांनी ताफा थांबवत अपघातग्रस्त व्यक्तीची विचारपूस करीत ताफ्यातील अँब्युलन्समधील डॉक्टर यांना ताबडतोब उपचार करण्यासाठी सांगितले.
पुणे: शिवाजीनगर येथील निवासस्थान येथून उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्किट हाऊसच्या दिशेने जात होते. त्यावेळी संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकीस्वाराचा आणि रिक्षाचा अपघात झाला. अजित पवार यांनी ताफ्यातील अँब्युलन्समधील डॉक्टर यांना ताबडतोब उपचार करण्यासाठी सांगितले.
https://x.com/LoksattaLive/status/1833337383573442920
भाग्यश्री अत्राम मला भेटल्या आहेत. त्यांची त्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मी १२ तारखेला तिकडे जाणार आहे. तेव्हा कदाचित आमची भेट होईल – जयंत पाटील यांचे उमेदवारीचे सुतोवाच
Maharashtra News Live Today, 10 September 2024: सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर