Maharashtra Updates, 16 January 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी दावोस दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यात २० उद्योगांसमवेत सुमारे १ लाख ४० हजार कोटींचे करार होणार आहेत. तसेच, विधानपरिषद निवडणुकींवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापलं आहे. आज विधानपरिषद निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोणता उमेदवार माघार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. तर, दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ‘भारत जोडो यात्रा’ पंजाबातील जालंधरमधील अदमापूर येथून सुरु झाली आहे.

Live Updates

Mumbai Maharashtra News Live Updates : देश, विदेश आणि राज्यातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

17:41 (IST) 16 Jan 2023
'साहेब, धावून आलात, खूप खूप आभार...', आठवीतल्या विद्यार्थ्यांने पत्र लिहून मुनगंटीवारांचे मानले धन्यवाद, नेमकं काय घडलं?

एका मुलाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र लिहिले. संकट काळात देवासारखा धावून आल्याबद्दल धन्यवादाचे. या मुलाच्या हृदयाला छिद्र होते. यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. मात्र, शस्त्रक्रियेसाठी दीड लाखांचा खर्च होता. त्या मुलाच्या आई-वडिलांकडे एवढी रक्कम नव्हती. आर्थिक जुळवाजुळव कशी करायची यासाठी आई-वडील चिंतेत होते. अशा कठीण समयी मंत्री सुधीर मुनगंटीवार धावून आले. मुलाला जीवनदान लाभले.

सविस्तर वाचा…

17:11 (IST) 16 Jan 2023
मालेगाव आणि रिसोड येथे कडकडीत बंद, शिरपूर जैन येथील घटनेचा निषेध

जिल्ह्यातील शिरपूर जैन येथे एका युवकाने इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने दोन गटात वाद झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज १६ जानेवारी रोजी मालेगाव आणि रिसोड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला तर मंगळवार १७ जानेवारी रोजी वाशीम शहर बंद ठेवण्यात येणार आहे. सविस्तर बातमी

16:16 (IST) 16 Jan 2023
नवी मुंबई: २ वाहन चोरांकडून २१ वाहने जप्त; एपीएमसी पोलिसांची कारवाई

ज्या गाड्यां चोरण्यास सोप्या आणि मागणी जास्त त्याच गाड्या चोरणार्या दोन जणांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या कडून तब्बल १४ लाख ७० हजाराच्या २१ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. यात १० रिक्षा १० स्कुटर आणि एका मोटारसायकलचा समावेश आहे. सविस्तर बातमी

15:20 (IST) 16 Jan 2023
पुण्यात नायलॉन मांजामुळे दोन पोलिस कर्मचारी जखमी; एकाचा गळा, तर दुसऱ्याचा हात चिरला

नायलॉन मांजावर घातलेले बंदीचे आदेश धुडकावून संक्रातीला पतंगबाजी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावर नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार दोन पोलीस जखमी झाल्याची घटना घडली.पोलीस कर्मचारी महेश पवार आणि सुनील गवळी अशी जखमी झालेल्यांची नावे आहे. पवार आणि गवळी दोघे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नियुक्तीस आहेत. सविस्तर बातमी

15:12 (IST) 16 Jan 2023
पुणे : विद्यापीठाच्या वेळापत्रकात बदल, सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त

आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या जी-२० परिषदेतील कार्यक्रमामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत विद्यापीठाचे प्रशासकीय काम करण्यात आले.

सविस्तर वाचा

14:50 (IST) 16 Jan 2023
पुणे : जी- २० परिषदेसाठी लोकप्रतिनिधींना डावलले; राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार ॲड. वंदना चव्हाण यांची नाराजी

पुण्यात होत असलेल्या जी-२० परिषदेसाठी शहरातील लोकप्रतिनिधींना डावलण्यात आले आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जी -२० परिषद पुण्यात होत आहे, ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. मात्र, या परिषदेसाठी आजी- माजी खासदार, आमदार, माजी महापौरांना परिषदेतील चर्चा ऐकण्यासाठी निमंत्रित करणे आवश्यक होते. सविस्तर वाचा…

14:15 (IST) 16 Jan 2023
४०० किलोमीटर रस्त्यांचा प्रस्ताव कुणी मांडला? आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल

४०० किलोमीटर रस्त्यांचा प्रस्ताव कुणी मांडला, असा सवाल शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. तसेच, याबाबत आयुक्त इक्लाबसिंह चहल यांना पत्र लिहलं आहे. महापौर आणि लोकप्रतिनिधी नसताना हे कंत्राट काढलं कसं, असेही आदित्य ठाकरेंनी विचारलं.

13:40 (IST) 16 Jan 2023
जळगावसह जिल्ह्यात नायलॉन मांजा मानवासह पशुपक्ष्यांच्या जीवावर

बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे रविवारी शहरात दुचाकीस्वाराच्या गळ्याला जखम झाली, तर १० वर्षाच्या मुलाचे बोट कापले गेले. तसेच मेहरुण तलाव परिसरात पतंग महोत्सवात पाच जण किरकोळ जखमी झाले. अमळनेर येथे दुचाकीस्वाराचा ओठ, डोळे आणि पायाला मांजामुळे जखम झाली.

सविस्तर वाचा

13:33 (IST) 16 Jan 2023
अकोला : निधीअभावी विदर्भातील सिंचन प्रकल्पाच्या रखडपट्टीचे ग्रहण कायमच

पश्चिम विदर्भाच्या खारपाणपट्ट्यातील महत्त्वाकांक्षी जिगाव सिंचन प्रकल्पाच्या किंमतीमध्ये तब्बल २२ पटीने वाढ झाली आहे. ६९८.५० कोटींची मूळ किंमत असलेल्या जिगाव प्रकल्पाची अद्ययावत किंमत आता १५ हजार ७२९.९२ कोटींवर पोहोचली.

सविस्तर वाचा

13:30 (IST) 16 Jan 2023
औरंगाबादच्या वाळूज परिसरातील चटाई कंपनीला भीषण आग

औंरगाबादमधील वाळूज महानगर परिसरातील औद्योगित वसाहतीतल असलेल्या चटाई कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीचे लोट मोठ्या प्रमाणात परिसरात पाहायला मिळत आहे. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

13:18 (IST) 16 Jan 2023
धुळे: अहिराणी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग, खान्देशसह गुजरात, मध्यप्रदेशातील साहित्यिकांचाही सहभाग

धुळे येथे २१ आणि २२ जानेवारी रोजी होणाऱ्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनात खान्देशासह महाराष्ट्र, सुरत(गुजरात), मध्यप्रदेशातील साहित्यिक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. धुळ्यात संमेलनाची जय्यत तयारी सुरु आहे.

सविस्तर वाचा

13:13 (IST) 16 Jan 2023
राधाकृष्ण विखे-पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होऊ शकतात; प्रकाश आंबेडकर

भाजपाच्या नवीन मुख्यमंत्री पदाचा चेहरा राधाकृष्ण विखे-पाटील होऊ शकतात. बाळासाहेब थोरात यांना सुद्धा इच्छा झाली, असेल काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होऊ शकतो, असं वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

13:08 (IST) 16 Jan 2023
जी २० परिषदेच्या लोगोतील कमळाबाबत नारायण राणे यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, "ते कमळ म्हणजे.."

पुण्यात जी-२० परिषदेचे उदघाटन केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आज करण्यात आले. जी २० परिषदेच्या लोगोवर भाजपाचे चिन्ह कमळचा फोटो आहे. ते कमळ भाजपाचे आहे की, भारताचे आहे. यावरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावर नारायण राणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

सविस्तर बातमी

12:59 (IST) 16 Jan 2023
मिनी शीव रुग्णालयामध्येही सीटी स्कॅन व एमआरआय

धारावीमधील झोपडपट्टीवासीयांना घराजवळ उपचार मिळावेत यासाठी शीव रुग्णालयाने धारावीमध्ये सुरू केलेले प्राथमिक आरोग्य केंद्र मिनी शीव रुग्णालय नावाने प्रसिद्ध असून या आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्यवियक सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. आता लवकरच या केंद्रामध्ये रुग्णांना सीटी स्कॅन व एमआरआय सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

12:59 (IST) 16 Jan 2023
राज्यातील निवडणुकांचे भवितव्य मंगळवारी ठरणार ?

मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी ठरणार आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या त्रिसदस्यीय पीठापुढे या याचिकांवर मंगळवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

11:39 (IST) 16 Jan 2023
“देशात जूनपर्यंत आर्थिक मंदी येऊ शकते”; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली चिंता

जी २० परिषदेला आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. आजपासून इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप ची दोन दिवसीय बैठक सुरु होणार आहे. या बैठकीत सहभागी होणारे देश आणि संस्था पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर विचारमंथन करणार आहेत.

वाचा सविस्तर...

11:17 (IST) 16 Jan 2023
कोविड सेंटर घोटाळा प्रकरण : आयुक्त इक्बालसिंह चहल ईडी चौकशीसाठी हजर राहणार

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. करोना काळातील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी आयुक्त चहल यांना ईडीने नोटीस बजावली होती. त्यानुसार, इक्बाल सिंह चहल आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहतील.

11:12 (IST) 16 Jan 2023
अभिनेत्रीची साडेआठ लाखांची फसवणूक, ‘जेलर’, ‘शहिद’ व ‘पुष्पा’मध्ये प्रमुख भूमिका देण्याच्या नावाखाली गंडा

अंधेरीतील चार बंगला परिसरात वास्तव्याला असलेल्या महिलेचा खाद्यपदार्थ पुरवण्याचा व्यवसाय आहे. त्यांची ३२ वर्षांची मुलगी मॉडेल आणि अभिनेत्री असून तिने ‘कसम’, ‘आहाट’, ‘क्राईम पेट्रोल’ आदी हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तिचे इन्स्टाग्रामवर एक खाते आहे.

सविस्तर वाचा

10:44 (IST) 16 Jan 2023
ठाणे-बोरिवली प्रवास केवळ २० मिनिटांत, भूमीगत मार्गाच्या बांधकामासाठी निविदा जारी; पावसाळ्यात कामाला सुरुवात

ठाणे-बोरिवली दरम्यानचे अंतर केवळ २० मिनिटांत पार करता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेला ११.८ किमी लांबीच्या ठाणे-बोरिवली भूमीगत मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. सहा-सात वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्यासाठी एमएमआरडीएने बांधकामाकरीता निविदा जारी केल्या आहेत.

सविस्तर वाचा

10:14 (IST) 16 Jan 2023
जी२० चे उद्घाटन माझ्या हाताने झालं, स्वत:ला भाग्यशाली समजतो; नारायण राणे

२० ही जागतिक संस्था आहे. त्याचे उद्घाटन माझ्या हाताने झाले. मी स्वतःला भाग्यशाली समजतो. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं धन्यवाद मानतो. नरेंद्र मोदी जे बोलतात ते पूर्ण करतात. मला याचा अभिमान आहे, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं.

10:12 (IST) 16 Jan 2023
नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला; वेडमपल्ली जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमक

भूमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकाने नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळून लावला. नक्षलविरोधी अभियानादरम्यान अहेरी तालुक्यातील पेरमीली हद्दीत येणाऱ्या वेडमपल्ली परिसरात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली.

सविस्तर वाचा

09:53 (IST) 16 Jan 2023
‘एमआयडीसी’ करणार ‘पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स’चा सर्वेक्षण अहवाल

विदर्भासाठी औद्योगिक प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ‘पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स’ आणि ‘फेरोअलॉय क्लस्टर’ बाबत सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे.

सविस्तर बातमी

09:44 (IST) 16 Jan 2023
नागपूर : अनेक शिक्षक आमदारांना शिक्षकांऐवजी बिल्डरच्या प्रश्नात रस, मात्र नागो गाणार…; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

भाजप समर्थित महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांच्या प्रचारार्थ रेशीमबागेतील स्मृती भवनमध्ये पूर्व विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्त्याचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार सुनील मेढे, उपेंद्र कोठेकर, अशोक नेते, अनिल सोले, कल्पना पांडे, प्रवीण दटके आदी उपस्थित होते.

सविस्तर वाचा

09:36 (IST) 16 Jan 2023
आर्थिक सल्लागार परिषदेवर विदर्भाला प्रतिनिधित्व द्या, डॉ. नितीन राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने जाहीर केलेल्या आर्थिक सल्लागार परिषदेवर विदर्भाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी काँग्रेस नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

सविस्तर वाचा

09:30 (IST) 16 Jan 2023
‘मॅट्रिमोनिअल वेबसाईट’वरून ओळख वाढविताना सावधान!

अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत राहणारी युवती पुण्यात मेडीकल उपकरण क्षेत्रात काम करते. लग्नासाठी योग्य जोडीदार निवडायचा असल्याने युवतीने ‘जीवनसाथी डॉट कॉम’वर नोंदणी केली. तसेच स्वत:बद्दलची माहिती ‘जीवनसाथी’वर अपलोड केली.

सविस्तर वाचा

09:26 (IST) 16 Jan 2023
नागपूर : संक्रांतीनिमित्त विष्णू मनोहर यांनी केली दोन हजार किलोंची खिचडी

लोटस कल्चरल ॲन्ड स्पोर्टिंग असोसिएशनच्यावतीने बजेरियातील वंदेमातरम उद्यानात माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात हा उपक्रम करण्यात आला. सकाळी ९ वाजता खिचडी तयार करण्यास सुरूवात केल्यानंतर विष्णू जी रसोई येथील कर्मचाऱ्यांनी सहकार्य करत संक्रांतीनिमित्त आगळावेगळा उपक्रम केला.

सविस्तर वाचा

09:19 (IST) 16 Jan 2023
“न्यायपालिकेवर ताबा मिळवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न, पण…”, कपिल सिब्बल यांचं टीकास्त्र

देशातील न्यायमूर्तींच्या नियुक्तीसाठी वापरण्यात येत असलेल्या ‘न्यायवृंद’ यंत्रणेवरून केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात वाद सुरु आहे. या यंत्रणेवरून उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय विधिमंत्री किरेन रिजिजू यांनी टीका केली आहे. यावरून राज्यसभेचे खासदार आणि वकील कपिल सिब्बल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

वाचा सविस्तर...

09:16 (IST) 16 Jan 2023
उर्फी जावेद वादावर शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मी…”

मागील काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि ती परिधान करत असलेली कपडे चर्चेचा विषय ठरतोय. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीने सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर नंगटपणा करू नये, अशी भूमिका घेतली असून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तर मी कोणते कपडे परिधान करावेत हे निवडण्याचा मला अधिकार आहे, असे म्हणत उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्या मागणीला थेट धुडकावून लावले आहे. तसेच चित्रा वाघ यांनी धमकी दिल्याचा आरोपही उर्फी जावेदने केला आहे. याच मुद्द्यावर आता राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या नवी मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या.

वाचा सविस्तर...

ajit-pawar

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…