Maharashtra Politics Crsis Updates : मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक अडामोडी घडत आहेत. विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील बेबनाव पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजपा-शिंदे गटाने पाचही जागांवर महाविकास आघाडीला तगडे आव्हान उभे केले आहे.

दुसरीकडे राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ काश्मीरकडे प्रस्थान करत असून जम्मू-काश्मीरमध्ये या यात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली जात आहे. या घडामोडींसह राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

Live Updates

Mumbai Maharashtra News Live Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

19:52 (IST) 14 Jan 2023
जळगाव : जात प्रमाणपत्र प्रकरण; आमदार सोनवणे यांना न्यायालयाचा दिलासा, जगदीश वळवींची याचिका फेटाळली

जळगाव – चोपड्याच्या आमदार लताबाई सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांच्याऐवजी आपल्याला आमदार घोषित करावे, यासाठी माजी आमदार जगदीश वळवी यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याची माहिती लताबाई यांचे पती माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी दिली. वळवी यांची याचिका फेटाळल्याने आमदार सोनवणे यांना दिलासा मिळाला आहे.

सविस्तर वाचा...

19:39 (IST) 14 Jan 2023
“खोके सरकार अल्पायुशीच, वादग्रस्त विधाने करून मूळ प्रश्नांपासून भटकवणारे सरकार”, आदित्य ठाकरेंचा आरोप

नवी मुंबई – खोके सरकार अल्पायुषी ठरणार असून वादग्रस्त विधाने करून जनतेचे लक्ष मूळ प्रश्नांपासून विचलित करण्याचे काम शिंदे सरकार करत असून, जनतेचा पैसा हवा तसा वापरला जात असल्याचा आरोप युवा नेते आदित्य ठाकरे यांनी नवी मुंबईत केला आहे.

सविस्तर वाचा...

19:04 (IST) 14 Jan 2023
कोल्हापुरात रासायनिक कंपनीत भीषण आग, मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान

कोल्हापूर : शहरालगतच्या रासायनिक कंपनीस शनिवारी भीषण आग लागली. यामध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. चार तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. शॉर्टसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

सविस्तर वाचा...

18:54 (IST) 14 Jan 2023
“लक्ष्मणभाऊ जमिनीशी जुळलेले नेते..”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या कुटुंबियांना सांत्वनपर पत्र

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपरी-चिंचवडचे लोकनेते आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचे पत्राद्वारे सांत्वन केले आहे. चिंचवड मतदारसंघाचे तीन वेळा नेतृत्व केलेले आणि एकदा विधान परिषदेवर निवडून आलेले आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी रोजी निधन झाले होते.

सविस्तर वाचा...

18:00 (IST) 14 Jan 2023
पुणे : एमएनजीएलच्या गॅस वाहिनीला पुन्हा आग, सिंहगड रस्त्यानंतर खराडीतील घटना; गॅस पुरवठा विस्कळीत

पुणे : सिंहगड रस्ता भागानंतर आता खराडी भागात एमएनजीएलच्या गॅस वाहिनीला आग लागल्याची घटना घडली. गॅस वाहिनीला आग लागल्याने खराडी भागातील गॅस पुरवठा विस्कळीत झाला.

सविस्तर वाचा...

17:49 (IST) 14 Jan 2023
पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांच्या दमदाटीमुळे तरुणाच्या मृत्यूचा नातेवाईकांचा आरोप, उपायुक्तांकडून चौकशीचे आदेश

पुणे : पिंपरी- चिंचवडमध्ये पोलिसांनी दमदाटी केल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाईकांनी केला असून, प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिले आहेत.

सविस्तर वाचा...

17:28 (IST) 14 Jan 2023
“बाळासाहेबांच्या सुपूत्राने जेव्हा…”, आदित्य ठाकरेंचे शिंदे गटावर टीकास्त्र; म्हणाले, “दोन महिन्यात सरकार कोसळणार”

ठाण्यातील घोडबंदर भागात शनिवारी ठाकरे गटाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राजकीय कार्यक्रम, मेळावे होत असतात. ज्या व्यक्तिला आम्ही पुढे आणले. त्या एका गद्दाराने राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळविले, याची लाज वाटते.

सविस्तर वाचा

17:23 (IST) 14 Jan 2023
अखेर उलगडा, गडकरींना धमकीचा फोन बेळगावमधून!, गुन्हे शाखेचे पथक तत्काळ रवाना

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन गडकरी यांच्या खामल्यातील जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी   तीन फोन आले. गडकरी यांना १०० कोटींची खंडणीची मागणी करण्यात आली. खंडणी न दिल्यास बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली गेली. या गंभीर प्रकरणात स्वत: पोलीस आयुक्तांनी लक्ष घातले.

सविस्तर वाचा

17:18 (IST) 14 Jan 2023
ठाणे : परदेशात नोकरीला लावून देतो असे सांगून २५ तरुणांची फसवणूक, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

ठाणे : अझरबैजान या देशात नोकरीला लावून देतो असे सांगून मुंबई, ठाण्यातील २५ हून अधिक तरुणांची २२ लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोनजणांविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

सविस्तर वाचा...

16:56 (IST) 14 Jan 2023
ठाणे : मुख्यमंत्री उद्या आमच्या एन्काउंटरचे आदेशही देऊ शकतील, राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांचा खळबळजनक आरोप

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त गणेश गावडे आणि अमरसिंह जाधव हे सत्ताधार्‍यांची प्रायव्हेट आर्मीसारखे काम करीत आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के हे पोलीस आयुक्त सिंग यांना आपला एन्काउंटर करण्याचे आदेश देतील आणि पोलीस आयुक्तही खुर्चीतून उठून आदेश पाळण्याची ग्वाही देतील, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.

सविस्तर वाचा...

16:25 (IST) 14 Jan 2023
नाशिक : अपघातप्रवण क्षेत्रात उपायगती संथच, घोटी सिन्नरमार्गे शिर्डी रस्त्यावर वाहनधारकांची कसरत

नाशिक : शहर आणि ग्रामीण भागात अपघातांचा आलेख उंचावत असताना अपघातप्रवण क्षेत्रातील उपाय योजनांची गती मात्र संथच आहे. जिल्ह्यात १४६ अपघातप्रवण क्षेत्र असून तेथील उपाययोजनांबाबत आराखडे तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबईहून शिर्डीला ये-जा करणारे बहुतांश वाहनधारक ज्या घोटी-सिन्नरमार्गे शिर्डी या रस्त्याचा वापर करतात, त्याची अवस्था फारशी चांगली नाही.

सविस्तर वाचा...

16:02 (IST) 14 Jan 2023
नंदुरबार : पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरे बांधणाऱ्या लाभार्थ्यांची परवड; रक्कम मिळत नसल्याने उपोषणाचा इशारा

नंदुरबार – सरकारी काम आणि चार वर्ष थांब याची प्रचिती नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरच्या घरकुल लाभार्थ्यांना आली आहे. मोलमजुरी करून कसेबसे चरितार्थ चालवणाऱ्या लाभार्थ्यांनी कर्ज काढून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधली. परंतु, चार वर्षांपासून ९० हजार रुपयांचा शेवटचा हप्ता मिळत नसल्याने सरकारी उंबरे झिजविणाऱ्या या लाभार्थ्यांनी आता उपोषणाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा...

15:39 (IST) 14 Jan 2023
पुणे महापालिकेच्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रम पत्रिकेतून अजित पवारांना वगळले!

पुणे : पुणे शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा येरवड्यातील अण्णाभाऊ साठे कलामंदिर येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, आमदार सुनिल टिंगरे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, संजय जगताप आणि संग्राम थोपटे यांची नावे आहेत. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अजित पवार यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेवर नाही.

सविस्तर वाचा...

14:43 (IST) 14 Jan 2023
पुणे : निरोगी आरोग्यासाठी अजित पवारांचा सल्ला, ‘या’ वस्तूंपासून लांब राहण्याचे केले आवाहन

पिंपरी-चिंचवड : निसर्गाचे चक्र बदलत असल्याने नागरिकांनी देखील आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करावा. दारू, सिगरेट, ड्रग्सपासून दूर राहिले पाहिजे. आयुष्य हे तणावमुक्त जगले पाहिजे. दूषित हवामानामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.

सविस्तर वाचा...

14:22 (IST) 14 Jan 2023
सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत बावनकुळेंचे सूचक वक्तव्य, म्हणाले “आम्ही संन्याशी…”

सत्यजित तांबे यांनी पाठिंब्यासाठी संपर्क साधलेला नाही. मात्र त्यांनी इच्छा व्यक्त केली तर नक्कीच केंद्रीय संसदीय मंडळाकडे प्रस्ताव पाठवून परवानगी घेतली जाईल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटातून चांगले युवा नेतृत्व आमच्याकडे येणार असतील, तर आम्ही का नाही घ्यायचे.

सविस्तर वाचा

14:17 (IST) 14 Jan 2023
धुळे : मध्यप्रदेशातून बंदुका, काडतुसांची वाहतूक करणाऱ्या नाशिकच्या पाच जणांना अटक

धुळे – मध्यप्रदेशातून गावठी बंदुकींसह काडतुसांची शिरपूरमार्गे वाहतूक करणाऱ्या नाशिकच्या पाच तरुणांसह सहा जणांना शिरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाख ६६ हजार रुपयांच्या बंदुका, जीवंत काडतुसे आणि पाच लाख रुपयांची मोटार जप्त करण्यात आली. हे पाच तरुण मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशाने ही शस्त्रास्त्रे नाशिकला घेऊन जात होते का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

सविस्तर वाचा...

13:39 (IST) 14 Jan 2023
मोठी बातमी! नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी

भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी देणारा कोण आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे.

13:15 (IST) 14 Jan 2023
पुणे : तुमच्या अनास्थेमुळे माझ्या फुलराणीचे वाटोळे!, मनसेचे नेते वसंत मोरेंची समाजमाध्यमावर पोस्ट

मनसे नेते वसंत मोरेंच्या पुढाकाराने ‘फुलराणी’ पुन्हा धावणार आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून बंद असल्याने रुळाखाली असलेल्या लाकडी स्लीपरला वाळवी लागली आहे. याबाबतचे फोटो शेअर करत मोरे यांनी ट्विट करत लोकप्रतिनिधींना लक्ष्य केले आहे.

सविस्तर वाचा

12:55 (IST) 14 Jan 2023
महाविकास आघाडी शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सध्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपा पाठिंबा देण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्याबाबत महाविकास आघाडीची सध्या बैठक सुरू आहे.

12:52 (IST) 14 Jan 2023
VIDEO : समृद्धी महामार्ग ओलांडणाऱ्या नीलगायींची चित्रफित व्हायरल, हा रस्ता की?

केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य तथा एसएनडीटी विद्यापिठाचे सिनेट सदस्य किशोर रिठे यांनी लोकसत्तासोबत समृद्धी महामार्ग ओलांडणाऱ्या निलगायींचा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ पाहताना या महामार्गाचे वास्तव देखील समोर येते. महामार्गाची ‘आऊटर वॉल’ अजूनही पूर्ण झालेली नाही.

सविस्तर वाचा

12:35 (IST) 14 Jan 2023
पुण्याच्या नामांतरावरून अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, “पुणे म्हणजे मिनी…”

नामांतरावरून मूळ पुणेकरांना काय वाटेल याचा विचार करायला हवा. उगाच बाहेरच्यांनी सल्ले दिल्याने अडचणीचं ठरते. कुणाबद्दल ही अनादर होणार नाही. सामंजस्याने भूमिका घेतली पाहिजे. सगळीच नावं चांगली आहेत. पुणे हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले आहे.

सविस्तर वाचा

12:23 (IST) 14 Jan 2023
“राज ठाकरेंना वैयक्तिक विरोध नाही”, ब्रिजभूषण सिंह यांचं पुण्यात विधान; म्हणाले…

स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशनाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

12:03 (IST) 14 Jan 2023
कल्याणमध्ये माथेफिरू तरुणाचा विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला

कल्याण- अंबरनाथ तालुक्यातील भाल येथील आयडियल महाविद्यालयाच्या बाहेर गुन्हेगार प्रवृत्तीच्या माथेफिरू तरुणाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा बुधवारी प्रयत्न केला. ही विद्यार्थीनी थोडक्यात बचावली. त्यानंतर माथेफिरू तरुण तेथून पळून गेला.

10:46 (IST) 14 Jan 2023
काँग्रेसचे खासदार संतोष सिंह चौधरी यांचे निधन

जालंधर लोकसभेचे काँग्रेसचे खासदार संतोख सिंह चौधरी यांचे हृदयविकाराचा झटक्याने शनिवारी सकाळी निधन झाले. भारत जोडो यात्रेमध्ये ते समील झाले होते.

09:56 (IST) 14 Jan 2023
पुण्यात स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचे आंदोलन १८ तासांनंतर स्थगित

राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा. या मागणीसाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात कडाक्याच्या थंडीत शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचो सुरू झालेले आंदोलन तब्बल १८ तासानंतर स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि काँग्रेस पक्षाचे सहकार प्रदेश सरचिटणीस बळीराम डोळे हे सकाळपासून विद्यार्थ्यांसोबत होते. खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, अॅड असीम सरोदे यांनींही आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतल्या. या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयोगाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

09:27 (IST) 14 Jan 2023
"फडणवीसांनी संकेत दिले होते, पण..," शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकीवर शिवसेनेचे महत्त्वाचे भाष्य

विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या तिन्ही घटकपक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. तर नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराने ऐनवेळी अर्जच भरला नाही. या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीतील बेबनाव पुन्हा एकदा समोर आला आहे. याच मुद्द्यावर शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मध्ये भाष्य करण्यात आले आहे. वाचा सविस्तर

08:17 (IST) 14 Jan 2023
उर्फी जावेदला मुंबई पोलिसांची नोटीस

उर्फी जावेदला मुंबई पोलिसांनी नोटीस दिली आहे. अंबोली पोलिसांनी ही नोटीस देण्यात आली असून उर्फी जावेद आज चौकशीसाठी हजर राहणार आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी आता चौकशी केली जाणार आहे.

08:14 (IST) 14 Jan 2023
अशोक चव्हाणांनी दिला पंकजा मुंडेंना मोलाचा सल्ला, नाराजीच्या चर्चेवर बोलताना म्हणाले "कोणत्या घोड्यावर..."

शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार सुनील शिंदे यांनीदेखील नुकतेच पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होत आहे. त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत आहे, असे विधान केले आहे. त्यानंतर विधानानंतर पंकजा मुंडे यांच्या नाराजीचा विषय पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. याच मुद्द्यावर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते १३ जानेवारी रोजी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. वाचा सविस्तर

07:32 (IST) 14 Jan 2023
द्वेषाचे राजकारण फार काळ चालणार नाही! खुल्या पत्रात राहुल गांधींचा आशावाद

‘देशाला विभाजनवादाचा धोका असून हे घटक आपल्या वैविधपूर्ण संस्कृतीचा आपल्याच विरोधात गैरवापर करत आहेत. धर्मा-धर्माना, जाती-जातींना, भाषा-भाषांना, राज्या-राज्यांना एकमेकांविरोधात लढवले जात आहे. लोकामध्ये असुरक्षितता आणि भीती निर्माण करून एकमेकांविरोधात द्वेषाचे बीज पेरले जात आहे. पण, द्वेषाच्या राजकारणाला मर्यादा असतात. द्वेषाचे राजकारण फार काळ चालणार नाही, याची मला या यात्रेमुळे खात्री झाली आहे’, अशी आशा राहुल गांधी यांनी देशवासींना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली. वाचा सविस्तर

07:31 (IST) 14 Jan 2023
“मी जनावरांचा डॉक्टर आहे, जनावरांमध्येही एलजीबीटीप्रमाणे…”, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी “आपल्या समाजात आधीपासून एलजीबीटीक्यू समूह (LGBTQ+) आहे,” असं मत व्यक्त केलं. तसेच आपण जनावरांचे डॉक्टर असल्याचं सांगत जनावरांमध्येही एलजीबीटीक्यूप्रमाणे प्रकार असतात, असं म्हटलं. ते ९ जानेवारीला संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर त्यांची मतं मांडली. वाचा सविस्तर

MAHARASHTRA NEWS LIVE UPDATE

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट

राजकीय, क्रीडा, आर्थिक तसेच अन्य क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.