Maharashtra Latest News Updates, 13 February 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार मविआ सरकारवर आरोप करत आहेत की, मविआ सरकारच्या काळात मला अटक करण्याचा डाव रचण्यात आला होता. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी पुन्हा या आरोपाचा पुर्नच्चार केला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी या विषयावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी असा कोणता गुन्हा केला होता? ज्यामुळे त्यांना अटक होणार होती, हे त्यांनी एकदा स्पष्ट करावे, असे सांगितले. त्याउपर मी मविआ सरकारमध्ये असलो तरी या विषयातली मला फार अधिक माहिती नाही, असे स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राज्यातील अशा विविध घडामोडींचे सर्व ताजे अपडेट्स एका क्लिकवर…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चटर-पटर नसून राज्यात सर्वात 'बेटर' आहेत. उलट आरोप करणारे अजित पवार हे अमूल बटर आहेत, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली. अजित पवार हे विरोधी पक्षनेते असल्यामुळे त्यांना रोज टीका करावी लागते, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.
शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यातील उद्योग गुजरातला गेले, हे मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांना माहीत देखील नव्हते. मी जेव्हा ट्विट केले, तेव्हा हा विषय सर्वांसमोर आला, असा दावा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये केला.
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव ( केसीआर ) यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. भाजपाचे सरकार आल्यापासून देश आगीतून फुफूट्यात पडला असून, मोदी हे देशाचे सर्वात अकार्यक्षम पंतप्रधान असल्याचं सिद्ध झालं, अशी टीका केसीआर यांनी केली.
“मी मुख्यमंत्री होण्यासाठी पक्ष वाढवण्याचे काम करतोय, असे काही नाही. शेवटी हायकमांड जो निर्णय घेईल, त्या निर्णयाला मान्यता देणे माझी जबाबदारी आहे,” असे नाना पटोले यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच २३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवार – देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र शपथ घेतली होती, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
मच्छर मारण्याच्या औषधाची बाटली तोंडात घातल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी सक्करदरा परीसरात उघडकीस आली. रिद्धी दिनेश चौधरी असे मृत मुलीचे नाव आहे. दिनेश चौधरी यांचे औषधालय असून त्यावरील मजल्यावर कुटुंबासह राहतात. त्यांना दोन मुली आहेत. सविस्तर वाचा…
अनिल देशमुख यांची तुरुंगातून जामिनावर सुटका झाली आहे, त्यांना त्यांच्यावरील आरोपातून क्लिनचिट मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी बोलताना संयम ठेवून बोलावे,असा सल्ला, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनिल देशमुख यांना दिला. ते नागपूरमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. सविस्तर वाचा…
नवी मुंबई मनपातील ६५०० कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी मनसे मनपा कामगार सेनेने नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले.
कामगारांची कुशल वर्गवारी, मंजूर वार्षिक ८ सुट्ट्या, उद्यान व सफाई कामगारांचा वाढीव महागाई भत्ता २ वर्षांपासून देणे बाकी आहे, सफाई कामगारांच्या हजेरी शेड नाहीत, एनएनएमटी कामगारांचा किमान वेतनाचा फरक देणे बाकी आहे, मयत कामगारांच्या वारसांना ५० लाख विम्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवणे, या सर्व विषयांसाठी आज आंदोलन करण्यात आले.
दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनची निर्मित, कार्तिक आर्यन अभिनीत ‘शहजादा’ या येत्या शुक्रवारी प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या चित्रपटासाठी आगाऊ तिकीटविक्री सुरू झाली आहे. बहुचर्चित ‘शहजादा’ चित्रपटाच्या तिकीटविक्रीला मिळणारा प्रतिसाद पाहता प्रदर्शनपूर्व हा चित्रपट ८ कोटींची कमाई करेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
लंडनच्या धर्तीवर देशातील पहिली विद्युत (इलेक्ट्रिक) दुमजली वातानुकूलित बस बेस्ट उपक्रमाद्वारे सुरू करण्यात आली असून, सोमवारी ही बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाली. येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबईच्या रस्त्यांवर ही बस धावेल.
शेतमालाला दरवाढ मिळावी व पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर बुलढाणा पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना तात्काळ निलंबित करावे व विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, सविस्तर वाचा…
घरात लग्नकार्याची धावपळ सुरू होती. सर्वांची लाडाची लेक बोहल्यावर चढणार म्हणून कुटुंबीय आनंदात होते. सनई-चौघड्याचे सूर सर्वत्र निनादत होते. सर्वांना प्रतीक्षा असलेली लग्नघटिका जवळ आली, नववधू-वर बोहल्यावर चढले आणि त्याच दिवशी वधूच्या पाठवणी प्रसंगी आईने अखेरचा श्वास घेतला. सविस्तर वाचा…
वाशीतील एपीएमसी बाजारात सध्या हापूसच्या आंब्याची आवक वाढली असून दरात घसरण पहावयास मिळत आहे. सध्या बाजारात देवगडच्या ३०० ते ३२५ पेट्या दाखल झाल्या आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत प्रतिपेटी दरात २ ते ३ हजार रुपयांची घसरण झाली आहे. मागील आठवड्यात ३७ ते १३० पेट्या दाखल झाल्या होत्या ,त्यामुळे हापूसचे दर चढेच होते . प्रतिपेटी ५ ते १० हजार रुपयांनी विक्री होत होती. सविस्तर वाचा…
राष्ट्रवादीचे नेते आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार निधीतून केलेल्या कामांचे कळवा पुर्व भागात लावलेले एलईडी फलक पालिका अधिकाऱ्यांनी काढले असून याच मुद्द्यावरून सुडाचे राजकारण सुरु असल्याचा आरोप करत आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
सरकार बदलताच मंजूर असलेल्या अनेक विकास कामांना स्थगिती देण्यात आल्याने ती उठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाच्या मंत्र्यांना विनंती करावी लागत आहे. आमदार कुणाल पाटील आणि माजी आमदार गोटे यांच्याही कामांना स्थगिती देण्यात आली होती, अशी माहिती एमआयएमचे आमदार फारुक शहा यांनी दिली.
कळवा येथील खारेगाव टोलनाका भागात सोमवारी पहाटे एका मोटारीने अचानक पेट घेतला. सुदैवाने प्रवासी आणि वाहन चालकांनी मोटारीबाहेर धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. मुंबई नाशिक महामार्गावरून अकलक शेख हे सोमवारी पहाटे कुर्ला येथून नाशिकच्या दिशेने मोटारीने जात होते. त्यावेळी मोटारीत त्यांच्यासोबत तीन प्रवासी होते. सविस्तर वाचा…
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच जालना जिल्ह्यातील तीन ठिकाणी शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने मेळावे घेतले. बदनापूर विधानसभा मतदारसंघातील रमानगर आणि घनसावंगी मतदारसंघातील मंगू जळगाव येथे हे मेळावे झाले. यापूर्वी या तीनही विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेचा प्रभाव राहिलेला आहे.
उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व पक्षावर लादण्यात आल्याचा आरोप शिंदे गटाकडून होत असतानाच, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी हा आरोप खोटा असल्याचा दावा केला आहे. पहिल्यांदा खासदार म्हणून निवडुण आल्यानंतर प्रकाश परांजपे आणि जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे हे पक्षाचे कार्याध्यक्षही नव्हते, असे सांगत आनंद यांनी या भेटीचे जुने छायाचित्र दाखवून या दोन्ही नेत्यांनाही उद्धव यांचे नेतृत्व मान्य होते, असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा…
प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी लढणा-या भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकीसाठी तयार केलेल्या 'वॉर रूम' मध्ये बुथ पासून तर निवडणूक मतदान केंद्रापर्यंत सर्व आकडेवारी उपलब्ध असून त्याचे विश्लेषण करून रणनीती तयार केली जाणार आहे. भाजप कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक 'वॉर रुम’ मध्ये आठ संगणक आहेत. सविस्तर वाचा…
खारघर येथील मेडिकव्हर रुग्णालयात तीन वेगवेगळ्या अवयव प्रत्यारोपनाच्या शस्त्रक्रीया यशस्वी पार पडल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली. या तीनही प्रत्यारोपनात पत्नी आणि बहिणींनी अवयवदाते होऊन आपल्या प्रियजनांचे प्राण वाचवले आहेत.
शहराचा प्राणवायु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येऊरच्या जंगलात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहत असल्याच्या तक्रारी पुढे येत असतानाच, या जंगलात पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्राची परवानगी नसतानाही बंगले उभारणीचा प्रकल्पाचे काम सुरु असल्याची बाब पुढे आली आहे. सविस्तर वाचा…
मागील दोन वर्षांपासून शासनाकडे पत्रव्यवहार करून, दोन महिन्यांहून अधिक काळ बेमुदत धरणे आंदोलन करूनही शिंदे-फडणवीस सरकार शिळफाटा रस्ते बांधित शेतकाऱ्यांना भरपाई देण्यात टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
परिसरात पाणी येत नसल्याने वर्षभरापूर्वी घाटकोपरमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक किरण लांडगे यांनी एका पालिका अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली होती. याबाबत विनोबा भावे नगर पोलिसानी सोमवारी लांडगे यांना अटक केली असून, अटकेनंतर नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन सुरू केले होते.
“ज्यांना चिंता वाटते, तेच सर्वोच्च न्यायालयात त्यांची बाजू मजबूत असल्याचे माध्यमांना सांगत असतात. मी कधीही न्यायालयाच्या निर्णयावर बोललो नाही. हे आपले क्षेत्र नाही, न्यायालय मेरीटप्रमाणे निर्णय देईल, आम्ही तर कधीही निवडणुकीसाठी तयार आहोत”, असे भाष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना दिले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असताना त्यांच्यावर जो लाठीचार्ज झाला. त्याच्या निषेधार्थ चांदूर रेल्वे येथील सोनगाव चौफुली बायपास रोड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
मनसेचा वर्धापन दिन हा ९ मार्चला आयोजित केला जातो. हा वर्धापनदिन ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे होणार असल्याचे मनसेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, राज ठाकरे हे वर्धापन दिनानिमित्ताने ठाण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका महिन्यात दुसऱ्यांदा मुंबईचा दौरा केला होता. या दौऱ्यावर टीका करत असताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “अमित शहा किंवा मोदीजी असतील. त्यांनी असे सतत दौरे करुन उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नावाने कंठशोष करण्यापेक्षा ती एनर्जी वाचवून ठेवावी. मुंबईतच एखादा टू बीएचकेचा फ्लॅट घ्यावा आणि इथेच मुक्काम करावा.”
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत आनंद दवे हे भाजपाच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. यावेळी त्यांना निवडणूक आयोगाकडून बासरी हे चिन्ह मिळाले आहे.
गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांच्या घरांच्या प्रश्नी राज्य सरकार उदासीन असल्याचा आरोप करत कामगारांनी आता घरांसाठीचा लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ११ मार्च रोजी गिरणी कामगार आणि त्यांचे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरावर मोर्चा काढणार आहेत.
कल्याण – ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातील न्यायालयांमध्ये शनिवारी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये विविध प्रकारची, अनेक वर्षे रखडलेली ४८ हजार ९८८ प्रकरणे निकाली काढून १२८ कोटी लाभार्थींना देण्यात आले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली.