Maharashtra Latest News Updates, 13 February 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार मविआ सरकारवर आरोप करत आहेत की, मविआ सरकारच्या काळात मला अटक करण्याचा डाव रचण्यात आला होता. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी पुन्हा या आरोपाचा पुर्नच्चार केला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी या विषयावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी असा कोणता गुन्हा केला होता? ज्यामुळे त्यांना अटक होणार होती, हे त्यांनी एकदा स्पष्ट करावे, असे सांगितले. त्याउपर मी मविआ सरकारमध्ये असलो तरी या विषयातली मला फार अधिक माहिती नाही, असे स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिले.
राज्यातील अशा विविध घडामोडींचे सर्व ताजे अपडेट्स एका क्लिकवर…
संकटात आम्हीच संजय राठोड यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राठोड यांना अभय दिले. तसेच बंजारा समाजाचे संजय राठोड हेच नेते आहेत हे अधोरेखित केले.
‘भाई का बड्डे’ सर्वोत्कृष्ट लघुपट, तर ‘ये गांव मेरा’ उत्कृष्ट माहितीपट ठरला. ये गांव मेरा माहितीपटाचे दिग्दर्शन हरीश पटेल यांनी केले होते. उमेश घेवारीकर यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला. उत्कृष्ट कॅम्पस चित्रपट म्हणून सुकल्या, तर उत्कृष्ट मायबोली लघुपट म्हणून द दप्तराचा ठरला. त्याचे दिग्दर्शक पराग चौधरी यांनी केले होते.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवरील छतावरील पत्रे दुरुस्तीच्या कामासाठी काढण्यात आल्याने प्रवाशांना गेल्या काही दिवसांपासून उन्हात उभे राहावे लागते. पत्रे काढलेला भाग महिला डब्याच्या जवळ असल्याने महिला प्रवाशांना विशेष करुन उन्हाचा त्रास सहन करावा लागतो.
मनमाड – लासलगाव रेल्वे स्थानकालगत सोमवारी सकाळी वीज वाहिनी (ओव्हरहेड वायर) दुरुस्त करणाऱ्या इंजिनने (टॉवर) उडवल्याने चार कर्मचाऱ्यांचा (गँगमन) मृत्यू झाला.
उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी उल्हासनगर शहरात येणार आहेत. बुधवारी पालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेले रुग्णालय, सिंधू भवन, विद्युत वाहने चार्जिंग स्थानक अशा विविध कामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.
बीकेसी येथील गुगल इंडियाच्या कार्यालयात रविवारी हैद्राबादमधील एका व्यक्तीने दूरध्वनी करून गुगलच्या पुण्यातील कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. प्राथमिक तपासात तो खोडसाळपणा असल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी हैद्राबाद येथील पणयम बाबू शिवानंद नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मी तुरुंगात असताना मला एक ऑफर मिळाली होती, ती स्वीकारली असती तर महाविकास आघाडीचे सरकार खूप आधी पडले असते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वर्धा येथील सभेत केला. तसेच शिवसेनेचे अर्ध्याहून अधिक आमदार ईडीच्या भीतीपोटी दुसऱ्या गटात पळून गेले, असाही आरोप त्यांनी केला.
पुण्यातील कोरेगाव पार्कात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा बोगस फोन आल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील Google कार्यालयात बॉम्ब असल्याचा बोगस फोन आला होता. या फोनमुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली. या फोननंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
त्रास देणाऱ्या सासूला अद्दल घडविण्यासाठी चोरीचा बनाव रचणाऱ्या सुनेसह चौघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. सासूला मारहाण करण्यास सांगून सुनेने साथीदारांच्या मदतीने घरातील दागिने लुटले होते.
बीकेसी येथील गुगल इंडियाच्या कार्यालयात रविवारी हैद्राबादमधील एका व्यक्तीने दूरध्वनी करून गुगलच्या पुण्यातील कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. प्राथमिक तपासात तो खोडसाळपणा असल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी हैद्राबाद येथील पणयम बाबू शिवानंद नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कधी काळी कापूस विकून सोने खरेदी करता येत असल्याने कापसाला ‘पांढरे सोने’ हे बिरुद मिळाले. नगदी पीक म्हणून पाहिले जाणारे हे सोने मात्र धारणी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक फटका देणारे ठरले.
अश्लिल नृत्याचे कार्यक्रम आयोजित करु नयेत, असे निर्देश अजित पवारांनी दिले होते. त्यावरुन आता गौतमी पाटीलने थेट अजित पवार यांची माफी मागितली आहे. अजितदादा खूप मोठे आहेत. मी त्यांना काही बोलू शकत नाही. माझ्याकडून काही चूका झाल्या होत्या, त्याबद्दल मी माफीही मागितली आहे. माझे जुने व्हिडिओ व्हायरल करुन त्यावरुन टीका केली जाते. माझी प्रसिद्धी काहींना पाहावत नाही, अशी प्रतिक्रिया गौतमी पाटीलने दिली.
“महाराष्ट्रला नवे राज्यपाल मिळाले. आनंद आहे. राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे.राजभवनाचे भाजपा कार्यालय करु नये असे मत व्यक्त होताच भाजपास मिरच्या का झोंबाव्यात? राज्याने कटू अनुभव घेतला आहे.राज्यपाल महाराष्ट्रला मिळाले फक्त भाजपाला नाही याचे भान ठेवले तरी पुरे”, असे ट्विट ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केले आहे.
महाराष्ट्रला नवे राज्यपाल मिळाले. आनंद आहे.राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे.राजभवनाचे भाजपा कार्यालय करु नये असे मत व्यक्त होताच भाजपास मिरच्या का झोंबाव्यात?
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 13, 2023
राज्याने कटू अनुभव घेतला आहे.राज्यपाल महाराष्ट्रला मिळाले फक्त भाजपाला नाही
याचे भान ठेवले तरी पुरे@BJP4Maharashtra pic.twitter.com/SQMYVr1cXL
हडपसर भागात दहशत माजविणाऱ्या कोयता गँगमधील दोघांना पोलिसांनी शिरुर तालुक्यातील पाबळ गावात पकडले. पोलिसांना पाहताच उसाच्या फडातून पसार झालेल्या दोघांना पाठलाग करुन पोलिसांनी ताब्यात घेतले. कोयता गँगमधील आणखी एकाला नगर जिल्ह्यातील पाथर्डी परिसरातून अटक केली.
विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांव येथे श्रींच्या १४५ व्या प्रकट दिना सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत नगरीमध्ये लाखो भाविक दाखल झाले आहेत. एकंदरीत संपूर्ण संत नगरी आज गण गण गणात बोतेच्या नाम स्मरणात नाहून निघाली आहे.
स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत गेल्या काही वर्षात शहरावर अस्वच्छतेचा बसलेला डाग पुसून काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहे. मात्र, शहरातील विविध भागात बांधकाम पाडल्यानंतर जागोजागी निर्माण झालेले मातीचे ढिगारे आणि रस्त्यावरील इतर कामांकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्वच्छता व आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहे.
नागपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ११ फेब्रुवारी रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये २७८९ प्रलंबित व २४ हजार २९६ वादपूर्व अशी एकूण २७ हजार ८५ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. निकाली निघालेल्या प्रकरणांचे तडजोड मूल्य ४९ कोटी ५९ लाख २१ हजार १९५ आहे.
उत्तर प्रदेशमधल्या मेरठमध्ये एका महिलेचा नग्नावस्थेत असलेल्या मृतदेह सापडला आहे. एक व्यक्ती बराच वेळ तो मृतदेह डोक्यावर घेऊन फिरत होता. त्यानंतर त्याने एका कॉलनीच्या कोपऱ्यात तो मृतदेह फेकला आणि निघून गेला. सविस्तर वाचा…
शिक्षण क्षेत्राचा अनुभव असणाऱ्या शिक्षकांचीच निवड शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी पदावर व्हावी, अशी मागणी समोर येत आहे. भाजपा शिक्षक आघाडीने तसे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
देशातल्या अनेक राज्यांमध्ये रविवारी (१२ फेब्रुवारी) राज्यपाल बदलण्यात आले. वेगवेगळ्या राज्यांमधल्या आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता असल्याचे पक्षातल्या सूत्रांनी जनसत्ताला सांगितले होते, नेमकं तसंच घडलं.
धारावी येथे २४ वर्षीय विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, पतीला अटक केली आहे. मृत महिलेच्या सासू-सासऱ्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.
दोन आरोपींनी लाखोंचा भूखंड एका महिलेचे बनावट बहीण-भाऊ दुय्यम निबंधक कार्यालयात उभे करून हडपला. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकास अटक केली. मोहम्मद इमरान मो. बद्रूद्दीन (फ्रेंड्स कॉलनी) आणि दिनेश शंकरराव जाधव (४३, जाततरोडी) अशी आरोपींची नावे आहेत.
“आरशात बघून स्वगत बोलणाऱ्या लोकांवर आपण फार व्यक्त न झालेलं बरं. कवी केशवसूत यांच्या कविते म्हटल्याप्रमाणे, पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा. त्यामुळे त्यांचे जेवढे डोकं आहे, तेवढं त्यांनी चालवलं आहे. त्यांच्या स्तरावर आम्ही उतरणार नाही, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी तानाजी सावंत यांच्यावर टीका केली. सविस्तर बातमी वाचा
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केली. आज चिंचवड मधील मविआचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे सभा घेत आहेत. त्याआधी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.