Maharashtra Latest News : आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. किल्ले शिवनेरीवरही मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. याबरोबरच शिवजयंती निमित्त राज्यभरातही विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. याबरोबच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट संघर्ष वाढला आहे. अशातच ठाकरे गटाने आपल्या सर्व सोशल मीडिया खात्यांचे नावही बदलले आहेत. त्यामुळे हा विषयही आज दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Live Updates

Maharashtra Updates, 19 February 2023 : शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरीवर शासकीय कायक्रमांचं आयोजन

18:14 (IST) 19 Feb 2023
VIDEO: भाजपा खासदार सुजय विखेंना भेटणार का? सत्यजीत तांबे म्हणाले, "मी त्यांना संपर्क केला होता, ते..."

नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलं. काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष आमदार यांच्यावर भाजपाची मदत घेतल्याचा आरोपही झाला. आता विजयानंतर सत्यजीत तांबे विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा खासदार सुजय विखे यांच्या भेटीबाबत सत्यजीत तांबेंनी सूचक विधान केलं. ते रविवारी (१९ फेब्रुवारी) अहमदनगरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना बोलत होते.

सविस्तर वाचा...

17:28 (IST) 19 Feb 2023
शिवसेनेचं नाव-पक्षचिन्ह शिंदे गटाला, आमदार सत्यजीत तांबे म्हणाले, "एका बाजूला त्या पक्षाची..."

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हावर शिंदे गटाचा दावा मान्य केला. यानंतर त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. आता काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. ते रविवारी (१९ फेब्रुवारी) अहमदनगरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना बोलत होते.

सविस्तर वाचा...

16:48 (IST) 19 Feb 2023
''संजय राऊत बोलायला लागले की लोक...''; दोन हजार कोटींच्या आरोपावर दादा भुसेंची प्रतिक्रिया

संजय राऊतांनी आज सकाळी माध्यामांशी बोलताना, धनुष्यबाण चिन्हासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाला, असा आरोप केला होता. याबाबत बोलताना, मला आता संजय राऊतांचे कीव येते. ते बोलायला लागले की लोक टीव्ही बंद करतात, असा टोला, शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांनी लगावला आहे.

15:53 (IST) 19 Feb 2023
लोकशाहीचा अपमान करणाऱ्याचं डोकं ठिकाणावर आणण्याची गरज मुनगंटीवारांचा संजय राऊतांना टोला

देशातील संस्थांचा अनादर करणारे केवळ संस्थांचा अपमान करत नाही, तर लोकशाहीचा अपमान करतात. स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करतात. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय या स्वतंत्र संस्था आहेत. या संस्थाचा अपमान केवळ संविधान न मानणारे लोकच करू शकतात. आगामी निवडणुकीत जनतेने अशा लोकशाहीचा अनादर करणाऱ्या लोकांचं डोकं ठिकाणावर आणण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवर यांनी दिली.

15:10 (IST) 19 Feb 2023
'मातोश्री'वर ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक सुरू; धनुष्यबाण चिन्हासाठी पुढील लढ्याची रणनिती ठरणार

उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' या निवासस्थानी ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्षनाव याबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधातील लढ्याची पुढील रणनिती या बैठकीत ठरणार आहे.

14:59 (IST) 19 Feb 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवजयंतीनिमित्त आज थेट आग्र्याच्या लाल किल्ल्यात जाणार, वाचा दिवसभराचा कार्यक्रम...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवजयंतीनिमित्त आज (१९ फेब्रुवारी) थेट उत्तर प्रदेशमधील आग्र्यात लाल किल्ल्यावर जाणार आहेत. ते शिवजयंतीनिमित्त सकाळी पुण्यात असतील. त्यानंतर एकनाथ शिंदे दुपारी कोल्हापूरमध्ये आणि शेवटी रात्री आग्रा येथे जातील. ते आग्र्यात शिवजन्मोत्सव कार्यक्रमास उपस्थिती लावणार आहेत.

सविस्तर वाचा...

14:39 (IST) 19 Feb 2023
लोकमान्या टिळकांच्या अग्रलेखाचा दाखला देत आशिष शेलारांची संजय राऊतांवर टीका; म्हणाले...

लोकमान्य टिळकांनी केसरीतील "आधी कोणते राजकीय की सामाजिक" या अग्रलेखात म्हटले आहे की, "विचारशक्तीस अनावर सोडून जे-जे तरंग निघतील, ते लेखणीने अगर तोंडाने सांगणाऱ्या गृहस्थात आणि वेड लागून किंवा गांजाची चिलीम ओढून बडबडणाऱ्या गृहस्थात काही विशेष फरक आहे, असे आम्ही मानत नाही." रोज सकाळी टीव्हीवर वेगवेगळे हावभाव करुन बोलणाऱ्या एका गृहस्थास महाराष्ट्र पाहू लागला की, लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या वरील वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

आज संपूर्ण महाराष्ट्राचा सकाळचा ताजा अनुभव ही असाच होता, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली.

https://twitter.com/ShelarAshish/status/1627198067027099649?s=20

13:59 (IST) 19 Feb 2023
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला धनुष्यबाण मिळालं : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन दिवसापूर्वी घेतला.याच निर्णयाचा धागा पकडत पुण्यातील शिवसृष्टी लोकार्पण कार्यक्रमा दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला  धनुष्यबाण मिळाल असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सविस्तर वाचा -

12:39 (IST) 19 Feb 2023
शिवसृष्टीचं लोकार्पण अमित शाहांच्या हस्ते, ही अभिमानाची बाब - एकनाथ शिंदे

शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करणयात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी बोलताना, या शिवसृष्टीचं लोकार्पण हे अमित शाहांच्या हस्ते होत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. तसेच शिवरायांचा आदर्श ठेऊन आम्ही राज्यकारभार करत असल्याचेही ते म्हणाले. याबरोबरच शिवसृष्टीचं उर्वरित कामही लवकर पूर्ण होईल, असे आश्वासहनही त्यांनी दिले.

12:33 (IST) 19 Feb 2023
शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं अमित शाहांच्या हस्ते लोकार्पण

शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करणयात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

12:20 (IST) 19 Feb 2023
"माझ्या पूर्ण हाताला मुंग्या येतात, हातपाय थंड पडतात आणि घाम फुटतो, कारण…", राज ठाकरेंचं मोठं विधान

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ज्या दिवशी भाषण असतं त्या दिवशी माझ्या पूर्ण हाताला मुंग्या येतात, हातपाय थंड पडतात आणि हातापायाला घाम फुटतो असं म्हटलं आहे. तसेच असं का होतं याचं कारणही सांगितलं आहे. ते रविवारी (१९ फेब्रुवारी) मुंबईतील मुलुंड येथे व्हीजेटीआय महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.

सविस्तर वाचा...

12:07 (IST) 19 Feb 2023
“धनुष्यबाण चिन्हासाठी दोन हजार कोटींचा सौदा”, संजय राऊतांच्या आरोपाला भाजपाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “बेताल बडबड…”

शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाला, अशा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना केला होता. दरम्यान, राऊतांच्या आरोपाला भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा

11:41 (IST) 19 Feb 2023
शिवनेरीवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसमोर संभाजीराजेंची जाहीर नाराजी, देवेंद्र फडणवीस म्हणाले, "एकनाथ शिंदेंनी..."

शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, यावेळी शिवभक्तांना गडावर येण्यास अडवल्याने माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी शिंदे-फडणवीसांसमोरच जाहीर नाराजी व्यक्त केली. यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते रविवारी (१९ फेब्रुवारी) शिवनेरीवर शासकीय कार्यक्रमात बोलत होते.

सविस्तर वाचा...

11:31 (IST) 19 Feb 2023
''शिवजयंती केवळ हार घालण्यापुरता मर्यादीत ठेऊ नका, तर...''; राज ठाकरेंचा VJTI महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद

शिवजयंती केवळ हार घालण्यापुरता मर्यादीत ठेऊ नका. शिवाजी महाराजांना समजवून घेतलं पाहिजे. मी केवळ शिवभक्त नाही तर शिववेडा आहे. पण मी कधी त्याचा आव आणत नाही. मी त्यांचे विचार आत्मसात करतो, असेही राज ठाकरे म्हणाले.

11:26 (IST) 19 Feb 2023
''...तो माझा सर्वात वाईट दिवस''; VJTI महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राज ठाकरेंची उत्तरं

ज्या दिवशी मला भाषण द्यायचं असतं, तो माझा सर्वात वाईट दिसत असतो. माझ्या हाताला मुंग्या आलेल्या असतात. हातपाय थंड पडलेले असतात. कोणला हे खरं वाटत नाही, पण हे सत्य आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली. मुंबईतील वीजेटीआय महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

11:09 (IST) 19 Feb 2023
संजय राऊतांच्या आरोपाला भाजपाचे प्रत्युत्तर

धनुष्यबाण चिन्हासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाला, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे. ''किती घसरणार संजय राऊत? गेल्या दोन अडीच वर्षाच नुसती बेछूट आरोपांची राळ उडवली. एक आरोप ठोस सिद्ध करू शकले नाहीत. नैराश्यातून माणूस बेताल बडबड करून चेष्टेचा विषय होतो, म्हणून इतकही हसू करून घेऊ नका. संघर्ष करणारे अण्णाभाऊ साठे कुठे आणि आरामात जगणारे तुमचे नेते कुठे?'', असेही ते म्हणाले.

https://twitter.com/keshavupadhye/status/1627174223386120192?s=20

11:09 (IST) 19 Feb 2023
विश्लेषण : चेतन शर्मांच्या राजीनाम्याने काय साधले? सर्व प्रश्न मिटतात का?

भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी चार दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट आणि क्रिकेटपटूंबाबत काही वक्तव्ये एका वाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये केली. या वक्तव्यांनी खरे तर भारतीय क्रिकेट ढवळून निघणे अपेक्षित होते. पण, त्यावर फारशी कुणी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. अचानक चार दिवसांनी चेतन शर्मा यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आले. वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर चेतन शर्मांनी राजीनामा दिल्याने सर्व प्रश्न मिटतात का किंवा त्यांच्या राजीनाम्याने नेमके काय साधले, या बाबतचा घेतलेला हा परामर्श..

सविस्तर वाचा...

11:08 (IST) 19 Feb 2023
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या ट्विटर हँडलचं ब्ल्यू टिक गेलं, वेबसाईटही बंद

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला दिलं. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचं (@ShivSena) ब्ल्यू टिक गेलं आहे आणि या हँडलवर क्लिक केलं की, सध्या रॉक अँड रोल असं नाव दिसत आहे. या हँडलला दोन लोक फॉलो करत आहेत. दुसरीकडे शिवसेनेची ShivSena.in ही अधिकृत वेबसाईटही बंद पडली आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

सविस्तर वाचा...

10:43 (IST) 19 Feb 2023
भाजपाला वाटलं, तर उद्या ते मुंबई आणि महाराष्ट्रही विकत घेतील - संजय राऊत

भारतीय जनता पक्षाला वाटलं, तर उद्या ते मुंबई आणि महाराष्ट्रही विकत घेतील. आत्तापर्यंत चिन्ह आणि नाव २ हजार कोटी उडवण्यात आले आहेत. यापुढे अनेक गोष्टी विकत घेण्यासाठी प्रयत्न होतील. २ हजार कोटी ही रक्कम लहान नाही. चार अक्षरांचं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळण्यासाठी हे डील झालं आहे. मी ट्विट करून देशाला ही माहिती दिली आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

https://twitter.com/rautsanjay61/status/1627157588545777664?s=20

10:41 (IST) 19 Feb 2023
“देशात आजही ‘पेगासस’चा वापर सुरू”; संजय राऊत यांचा मोठा दावा; म्हणाले, “देशातील प्रमुख उद्योगपती…”

मोदी सरकारने पेगासस या स्पायवेअरचा वापर करून देशातील काही पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री, तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पाळत ठेवल्याचा दावा जुलै २०२१ मध्ये काही आंतरराष्ट्रीय पातळीवरील माध्यम संस्थांनी केला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान, देशात या पेगासस या स्पायवेअरचा वापर आजही सुरू असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तील ‘रोखठोक’ या सदराद्वारे केला आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेवरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सविस्तर वाचा

10:39 (IST) 19 Feb 2023
संभाजीराजेंच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया, म्हणाले...

संभाजीराजेंच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुढच्या वर्षी सर्वांना विश्वासात घेऊन नियोजन करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

10:36 (IST) 19 Feb 2023
Shiv Jayanti 2023 : “…मग लोकांना गडावर का सोडता?” किल्ले शिवनेरीवरील नियोजनावरून संभाजीराजेंनी व्यक्त केली नाराजी!

आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. किल्ले शिवनेरीवरही मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने अनेकांना गडावरच थांबवण्यात आल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी गडकिल्ले संवर्धनाच्या मुद्द्यावरूनही सरकारला खडे बोल सुनावले आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा

10:24 (IST) 19 Feb 2023
शिवसेना नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी दोन हजार कोटींचा सौदा - संजय राऊत

शिवसेना नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाला, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत लवकरच पुरावे सादर करू, असा इशाराही त्यांनी दिला. हे सरकार आमदार खासदार विकत घेऊन झालं आहे. हे खोके सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023

आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. निमित्त राज्यभरातही विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे.

Story img Loader