पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या मदतीवरून टीका करणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केलं आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध लागू करण्यात आले होते. निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. दरम्यान, करोनाचा शिरकाव झाल्यापासून सरकारकडून सण उत्सवांसाठी नियमावली ठरवून दिली जात असून, याच मुद्यावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
नितेश राणे यांनी ट्वीट करून राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. पश्चिम बंगालसारखंच मुंबईत राहणारा हिंदू खतरे में है असं सांगण्याची वेळी आलीये असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. “हिंदू समाज… हिंदू सण… हिंदू संस्कृतीवर नियोजित पद्धतीने हल्ले केले जात आहेत आणि तेही महाराष्ट्र सरकारच्या मदतीने… असंख्या घटना कानावर येत आहेत. पश्चिम बंगालसारखा मुंबईत राहणारा “हिंदू खतरे में है” असं सांगण्याची वेळ आली आहे”, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
हिंदू समाज.. हिंदू सण.. हिंदू संस्कृती वर नियोजित पद्धतीने हल्ले केले जात आहेत.
आणि तेही महाराष्ट्र सरकारच्या मदतीने..
असंख्या घटना कानावर येत आहेत.. पश्चिम बंगाल सारखा मुंबईत राहणारा “हिंदू खतरे में है” असं सांगण्याची वेळ आली आहे!!!— nitesh rane (@NiteshNRane) August 6, 2021
“गणेश मंडळे आर्थिक संकटात असताना स्वागत कमानी त्यांच्या उत्पनाचे साधन आहे. स्वागत कमानीमुळे करोना पसरतो, असं कुठल्या मुन्ना भाई MBBS नी या ठाकरे सरकारला सांगितले आहे? १०० कोटींची वसुली करून स्वतःचे किसे भरता, मग या मंडळांनी काय करावे? मग यांच्या वाढदिवसाचे फलक कसे लागतात?”, असा सवालही राणे यांनी सरकारला केला आहे.