Maharashtra Breaking News Today, 19 Oct : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी अंमलबजावणी संचलनालय (ईडी) आणि सीबीआयमार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे. दादरस्थित गौरी भिडे यांनी ही याचिका केली आहे.

उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या चिपळूणमधील घरासमोर जगड, क्रिकेटचे स्टम्प आणि काचेच्या बाटल्या सापडल्यामुळे स्थानिक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Live Updates

Maharashtra News updates : धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा; देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

19:42 (IST) 19 Oct 2022
VIDEO: कार्यकर्त्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या, पंकजा मुंडेंची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाल्या, "माझं व्हॉट्सअॅप दहावेळा..."

बीडचे भाजपा शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आठवडाभरापूर्वी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर बुधवारी (१९ ऑक्टोबर) भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केलं. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना भगीरथ बियाणी यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.

सविस्तर बातमी...

19:39 (IST) 19 Oct 2022
पंतप्रधान मोदींनी नवनिर्वाचित काँग्रेस अध्यक्ष खरगेंना दिल्या शुभेच्छा; म्हणाले, “पुढील…”

अखेर काँग्रेसला २४ वर्षानंतर गांधी परिवाराबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी शशी थरुर यांचा पराभव केला आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मल्लिकार्जुन खरगेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचा सविस्तर

19:20 (IST) 19 Oct 2022
“राज्य सरकारची ‘शिधा किट’ बाबत घोषणा म्हणजे…” ; विजय वड्डेटीवारांनी केली टीका

गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल अशा चार वस्तू फक्त १०० रुपयांत देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. याशिवाय दिवाळीपूर्वी चांगल्या दर्जाचा शिधा लोकांपर्यंत पोहोचेल, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागास केलेली आहे. राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने १०० दिवसांच्या कारभाराचे औचित्य साधून गोरगरीब जनतेची दिवाळी गोड व्हावी, यासाठी सुमारे ३०० रुपयांच्या या वस्तू १०० रुपयांत देण्याचा निर्णय घेतला. यावरून विरोधकांकडून टीका होत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर बातमी...

19:15 (IST) 19 Oct 2022
नवाब मलिकांना दिलासा नाहीच! न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक मागील काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही.

वाचा सविस्तर

19:14 (IST) 19 Oct 2022
ठाणे: दिवाळीच्या तोंडावर ठाण्यात दुध बंदी; ‘या’मागण्यांसाठी दुध विक्रेत्यांचे शुक्रवारी दुध बंद आंदोलन

गेल्या चार वर्षात दुधाचे भाव लिटर मागे १८ रुपयांनी वाढले असले तरी त्या तुलनेत दुध विक्रेत्यांना कंपनीकडून कमिशन मिळत नसल्याचा आरोप ठाणे शहर दुध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून दुध पिशवीवरील मुळ रक्केवर दहा टक्के कमिशन विक्रेत्यांना देण्याच्या मागणीसाठी पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी एक दिवस दुध बंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

19:08 (IST) 19 Oct 2022
यवतमाळ: माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांची भाजपातून दोन वर्षांपूर्वीच हकालपट्टी; भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांची माहिती

पूर्वाश्रमीचे शिवसेना जिल्हाप्रमुख व त्यानंतर विविध पक्ष फिरून भाजपात स्थिरावलेले व आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात सहभागी होत असलेले माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांची भाजपातून दोन वर्षांपूर्वीच हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिली.

सविस्तर वाचा

19:01 (IST) 19 Oct 2022
२४ वर्षांनंतर काँग्रेस अध्यक्षपद गांधी कुटुंबाहेर; विजयानंतर मल्लिकार्जून खरगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "शशी थरूर..."

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत खरगेंना ७ हजार ८९७ मतं मिळाली. त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांना १ हजार ७२ मतं मिळाली. निकाल जाहीर झाल्यानंतर मल्लिकार्जून खरगे यांनी पत्रकार परिषद घेत पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी शशी थरूर यांनाही मी शुभेच्छा देतो म्हटलं. तसेच निकालानंतर थरूर यांनी भेट घेत पक्षवाढीच्या कामावर चर्चा केल्याचं सांगितलं.

सविस्तर बातमी...

18:29 (IST) 19 Oct 2022
Congress President Election: “खरगेंचा विजय म्हणजे…”, पराभवानंतर शशी थरुर यांची प्रतिक्रिया, समर्थन देणाऱ्यांचे मानले आभार

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत. २४ वर्षांनंतर काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष लाभले आहेत. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी ७ हजार ८९७ मतं मिळवत प्रतिस्पर्धी ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरुर यांचा पराभव केला आहे. थरुर यांना १ हजार ७२ मतं मिळाली आहेत. या पराभवानंतर शशी थरुर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर बातमी वाचा...

18:28 (IST) 19 Oct 2022
“राज्याचे मुख्यमंत्री बोलकं बाहुलं तर फडणवीस…” अरविंद सावंतांची टोलेबाजी, म्हणाले, “४० बंडखोर तर…”

नवी मुंबईत आज ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आंदोलनात खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. “राज्याचे मुख्यमंत्री बोलकं बाहुलं, बटणं दाबलं की सुरू होतं” अशी मिश्किल टीप्पणी सावंत यांनी केली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘अलीबाबा’ असून बाकीचे ४० चोर असल्याचं सांगत सावंत यांनी बंडखोरांवर निशाणा साधला आहे.

सविस्तर बातमी वाचा...

18:27 (IST) 19 Oct 2022
काँग्रेसकडून उद्धव ठाकरेंना ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होण्याचे आदेश – भाजपाने ट्वीटद्वारे लगावला टोला!

भारत जोडो यात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांची तयारीही सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी महाविकास आघाडीमधील आपले प्रमुख मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला देखील या यात्रेत सहभाग नोंदवण्यासाठी निमंत्रण दिले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भारत जोडो यात्रेचे निमंत्रण स्वीकारले आहे. यावरून भाजपाने ट्वीटद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर बातमी...

18:26 (IST) 19 Oct 2022
ठाकरे गटाला मोठा दिलासा, दिल्ली उच्च न्यायालयाने ‘मशाल’ चिन्हाविरोधातील समता पक्षाची याचिका फेटाळली

शिवसेना पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठविल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ११ ऑक्टोंबर रोजी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नव्या चिन्हाचे नाव वाटप केले होते. त्यानुसार, ठाकरे गटाला ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आले होते. मात्र, याविरोधात आक्षेप घेत समता पक्षाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण, उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली आहे.

वाचा सविस्तर

18:26 (IST) 19 Oct 2022
बुलडाण्यातील शिवसैनिकांना ‘मातोश्री’वर भेट नाकारली, भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना चिमटा; म्हणाले, “हा तर अंधेरी…”

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंड केलं आहे. त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी ‘मातोश्री’ आणि सेनाभवनात भेटी घेत संवाद साधत आहे. त्यातच बुलडाणा जिल्ह्यातील दोन गट उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर आले होते. पण, यातल्या एका गटाला भेट नाकारण्यात आली. यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

वाचा सविस्तर

18:12 (IST) 19 Oct 2022
चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात दोन गुराखी ठार, तीन दिवसात तिघांचा बळी

जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून वाघाने तीन दिवसात तीन जणांचा बळी घेतला आहे. आज मूल तालुक्यातील चिंचाळा येथे वाघाच्या हल्ल्यात दोन गुराखी जागीच ठार झाल्याची घटना १९ सप्टेंबर बुधवार दुपारच्या सुमारास घडली. नानाजी निकेसर ५३, ढिवरू वासेकर ५५ असे मृत गुराख्याचे नाव आहे.

सविस्तर वाचा

18:11 (IST) 19 Oct 2022
दिवा रेल्वे फाटक ओलांडताना तरुणीचा मृत्यू

दिवा रेल्वे स्थानक येथील रेल्वे फाटक ओलांडताना एका २५ वर्षीय मुलीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली आहे. लीना दुर्गगवळी (२५) असे या तरुणीचे नाव असून या अपघाताची नोंद ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी या रेल्वे फाटकात दोन जणांचा मृत्यू झाला होता.

सविस्तर वाचा

18:01 (IST) 19 Oct 2022
पुणे : शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीशपदी एस. सी. चांडक

शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयातील प्रमुख जिल्हा न्यायाधीशाचा पदभार एस. सी. चांडक यांनी नुकताच स्वीकारला. जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे.

सविस्तर वाचा

17:27 (IST) 19 Oct 2022
नाशिक : सिन्नर तालुक्यातील बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात

नाशिक जिल्ह्यात सध्या बिबटे कुठेही दिसू लागले आहेत. सिन्नर परिसरातही त्यांचा वावर वाढला असून शेतकरी, वाहनचालकांवर हल्ले करण्यात आले आहेत. बुधवारी आडगाव परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला.

सविस्तर वाचा

17:10 (IST) 19 Oct 2022
भंडारा: वीज बिलाच्या नावाखाली न्यायाधीशांची ३ लाखांची ‘ऑनलाईन’ फसवणूक

वीज बिल भरण्याच्या नावाखाली भंडारा येथील एका न्यायाधीशांना एका भामट्याने तीन लाख रुपयाने ऑनलाईन फसवल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायाधीश चारुदत्त लक्ष्मीकांत देशपांडे यांच्या मोबाईलवर एक संदेश आला. त्यात वीज बिल थकीत असून तत्काळ न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येईल असे म्हटले.

सविस्तर वाचा

17:09 (IST) 19 Oct 2022
वाशीम: परिवहन विभागाकडून ५९ खासगी बसेसवर कारवाई, केवळ १० टक्के अधिक भाडे आकारण्यास मुभा

दिवाळीच्या दिवसात प्रवाशांची होणारी लूट आणि अवैध प्रवाशी वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी परिवहन विभाग सतर्क झाला असून १७ दिवसात २१७ खासगी स्लीपर कोच बसेसची चौकशी करून ५९ खासगी बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात एका खासगी स्लीपर कोच बसचा अपघात होऊन अनेक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याने खासगी बसच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला होता.

सविस्तर वाचा

16:23 (IST) 19 Oct 2022
पिंपरी: नाट्यगृहांच्या खासगीकरणास विरोध

नाट्यगृहांची देखभाल व दुरुस्तीवर होणारा वारेमाप खर्च आणि तेथून मिळणारे अत्यल्प उत्पन्न लक्षात घेता तोडगा म्हणून सर्वच नाट्यगृहांचे खासगीकरण करण्याचा निर्णय पिंपरी पालिकेने जवळजवळ घेतला आहे.

सविस्तर वाचा

16:02 (IST) 19 Oct 2022
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात मतभेद आहेत का?, उदय सामंत म्हणाले…

पिंपरी चिंचवड : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज तळेगाव एमआयडीसीमध्ये फॉक्सकॉन वेदांता ज्या जागेवर होणार होता त्या जागेची पाहणी केली. बातमी वाचा सविस्तर...

15:53 (IST) 19 Oct 2022
लाभार्थ्यांनो, सदनिका विकू नका ! ; पिंपरी पालिकेचे आवाहन

घरकुल योजनेअंर्तगत लाभार्थ्यांना मिळालेली सदनिका त्यांनी दुसऱ्यास विकता कामा नये. तसेच, त्या भाड्याने देऊ नये, असे आवाहन पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

सविस्तर वाचा

15:34 (IST) 19 Oct 2022
भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ल्याच्या घटनेवर आदित्य ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या चिपळूणमधील घरासमोर दगड, क्रिकेटचे स्टम्प आणि काचेच्या बाटल्या सापडल्यामुळे स्थानिक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान या प्रकारामुळे आता राजकीय वातावरणही तापताना दिसत आहे. आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर बातमी...

15:04 (IST) 19 Oct 2022
खासदार राजन विचारे यांची नवी मुंबई पोलिसांसोबत झाली जोरदार बाचाबाची

नवी मुंबई : राज्य शासनावर दडपशाहीचा आरोप करत आज नवी मुंबई पोलीस आयुक्ताल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने मोर्चा काढला. मात्र आयुक्तांना भेटण्यास खासदार राजन विचारे यांना मज्जाव करण्यात आल्याने आयुक्तालय प्रवेशद्वारावरील बंदोबस्ताला असणारे पोलीस आणि राजन विचारे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. बातमी वाचा सविस्तर...

14:57 (IST) 19 Oct 2022
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाचा ठाकरे गटाला धक्का, ठाण्यात शिंदे गटाचीच ‘दिवाळी पहाट’ होणार

ठाण्यातील तलावपाली येथे शिंदे गटाला दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यास परवानगी मिळाली आहे. मुंबई हायकोर्टाने शिंदे गटाला परवानगी दिली असून, ठाकरे गटाची याचिका फेटाळली आहे. ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही गट आमने-सामने उभे ठाकल्याचं चित्र होतं. ठाण्याच्या तलावपाली भागातील एकाच जागेवर दोन्ही गटाने दिवाळी पहाट कार्यक्रम घेण्याचा आग्रह धरला होता. यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं होतं.

सविस्तर बातमी

14:47 (IST) 19 Oct 2022
विदर्भ साहित्‍य संघाच्‍या अध्‍यक्षपदी प्रदीप दाते

विदर्भ साहित्‍य संघाच्‍याअध्‍यक्षपदी प्रदीप दाते यांची कार्यकारिणीच्‍या तातडीच्‍या बैठकीत निवड करण्‍यात आली. मनोहर म्‍हैसाळकर यांच्यानिधनानंतर वि. सा. संघाचे अध्‍यक्षपद रिक्‍त झाले होते.विदर्भ साहित्‍य संघाच्‍या येथील कार्यालयात सरचिटणीस विलास मानेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यात प्रदीप दाते यांच्‍या नावावर अध्‍यक्षपदासाठी शिक्‍कामोर्तब करण्‍यात आले.

सविस्तर वाचा

14:45 (IST) 19 Oct 2022
बच्चू कडूंच्या टीकेला रवी राणांकडून प्रत्युत्तर; म्हणाले, “मी किराणा वाटतो तू….”

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अलीकडेच आपल्या मतदारसंघातील गरीब नागरिकांना किराणा वाटप केलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक लाख लोकांना किराणा वाटप करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावरून अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली. त्यानंतर अपेक्षेनुसार रवी राणा यांनीही बच्चू कडू यांना प्रत्युत्तर दिलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

14:44 (IST) 19 Oct 2022
तुमच्या राजकारणात जास्तीची चहापावडर टाकून कोणी कडवटपणा आणतंय का? पंकजा मुंडे म्हणाल्या...

भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना आपल्याच पक्षात डावललं जातंय, असा आरोप अनेकदा मुंडे समर्थकांनी केलाय. अशातच विधान परिषदेत आणि मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मुंडे समर्थक कार्यकर्ते आक्रम झालेले पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंना तुमच्या राजकारणात जास्तीची चहापावडर टाकून कोणी कडवटपणा आणतंय का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. त्या बुधवारी (१९ ऑक्टोबर) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

सविस्तर बातमी...

14:43 (IST) 19 Oct 2022
नाशिक : दिवाळीत सिटीलिंकची पूर्ण क्षमतेने प्रवासी सेवा

शनिवारपासून दिवाळीला प्रारंभ होत असून खरेदी, गावी जाण्यासाठी सर्वांची लगबग सुरू आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून दिवाळी काळात सुट्टीच्या दिवशीही मनपाच्या सिटीलिंकच्या बसेस पूर्ण क्षमतेने चालविण्याचा निर्णय सिटीलिंक प्रशासनाने घेतला आहे .

सविस्तर वाचा

14:30 (IST) 19 Oct 2022
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मोर्चा आणि पोलीस आयुक्तालयाला छावणीचे रूप

नवी मुंबई : सरकारच्या दडपशाही विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने सभा आणि त्या नंतर मोर्चाचे आयोजन केले आहे . यात ठाकरे गटाच्या शिवसेनेने मुंबई पोलीस गृह विभागाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे. बातमी वाचा सविस्तर...

14:29 (IST) 19 Oct 2022
पुणे: हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांची दहा लाखांची फसवणूक

गुऱ्हाळासाठी घेतलेल्या उसाचे पैसे न देता शेतकऱ्यांची नऊ लाख ८० हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.  भगवान काळे (वय ५५, रा. वाळकी, ता. दौंड, जि. पुणे ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेश परशुराम कोतवाल (वय ५५, रा. अष्टापूर, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सविस्तर वाचा

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेची जागा देण्याबाबत रेल्वे मंत्रालयाच्या जमीन विकास प्राधिकरण (रेल लँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी) आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरण यांच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत ‘संयुक्त करारनाम्यावर (डेफिनेटिव्ह अ‍ॅग्रीमेंट)’ काल (मंगळवार) स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Story img Loader