Maharashtra Breaking News Today, 19 Oct : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी अंमलबजावणी संचलनालय (ईडी) आणि सीबीआयमार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे. दादरस्थित गौरी भिडे यांनी ही याचिका केली आहे.
उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या चिपळूणमधील घरासमोर जगड, क्रिकेटचे स्टम्प आणि काचेच्या बाटल्या सापडल्यामुळे स्थानिक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
Maharashtra News updates : धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा; देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती
नवी मुंबईत पोलीस प्रशासनाविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी भाजपा नेत्यांवर घणाघाती टीका केली. “देशाचे गृहमंत्री तडीपार होते, जो तडीपार होईल तो उद्या मंत्री होईल एवढं लक्षात ठेवा”, असं वक्तव्य करत त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी आज(बुधवार) शिंदे गटावर जोरदार टीका केली. शिवाय, महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडी, सीबीआय, एनआयए, आयकर विभाग आदींकडून होत असलेल्या कारवायांवरूनही भास्कर जाधवांनी सत्ताधाऱ्यावर निशाणा साधला. तसेच, उद्धव ठाकरे यांनी सातत्याने शिवसेना पुढे नेण्याचं काम केलं मात्र त्यांच्यावर टीका, टिप्पणी केली गेली, असंही त्यांनी म्हटलं. वाचा सविस्तर बातमी…
उशिरा का होईना मनसेने विदर्भाकडे लक्ष देणे सुरू केले आहे. राज ठाकरे येऊन गेले. मुंबईतील नेते पक्ष बांघणीसाठी दौरे करीत आहेत. मात्र त्यातून काही अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने नेत्यांचा तोल सुटतो की काय असे वाटायला लागले आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) सोलू ते निरगुडी-वडगाव शिंदे या दरम्यानचा पाच किलोमीटर लांबीच्या वर्तुळाकार रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे.
कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांना न जुमानता राजकीय मंडळींचा आशीर्वाद असलेल्या भाई मंडळींनी पालिकेच्या परवानग्या न घेता बिनधास्तपणे डोंबिवली, कल्याण मधील रस्ते अडवून फटाक्यांची दुकाने लावली आहेत. बातमी वाचा सविस्तर…
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेची जागा देण्याबाबत रेल्वे मंत्रालयाच्या जमीन विकास प्राधिकरण (रेल लँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी) आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरण यांच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत ‘संयुक्त करारनाम्यावर (डेफिनेटिव्ह अॅग्रीमेंट)’ काल (मंगळवार) स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. वाचा सविस्तर बातमी…
पुढील आठवड्यात दिवाळी सुरु होत असल्याने नागरिकांची खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये एकच गर्दी झाली आहे. आकाश कंदील, रांगोळ्या, लक्ष्मीदेवीच्या मूर्ती, पणत्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. बातमी वाचा सविस्तर…
केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर गुजरात सरकारने बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणातील दोषींना १५ ऑगस्ट २०२२ रोजी चांगल्या वर्तणुकीच्या आधारावर तुरुंगातून सोडून दिलं. मात्र, याच दोषींपैकी एकाने १९ जून २०२० रोजी पॅरोलवर तुरुंगाबाहेर असताना एका महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली. मितेश चिमनलाल भट असं या दोषीचं नाव आहे.
भुसावळ येथील माजी नगराध्यक्षांसह दहा नगरसेवकांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांना मोठा धक्का मानला जात आहे. ते सर्व खडसे यांचे समर्थक होते.
‘भारत जोडो’ यात्रा ही राजकीय यात्रा नसल्याचे काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश सातत्याने सांगत असले तरी, यात्रेमध्ये दररोज राहुल गांधींच्या सकाळच्या सत्रात तीन-चार तास होणाऱ्या भेटीगाठी म्हणजे अराजकीय चर्चेतून राजकीय पेरणी असल्याचे दिसत आहे. बातमी वाचा सविस्तर…
मुंबई : कथित ध्वनिफीत प्रसारीत करून बदनामी केल्याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात आठ जणांसह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बातमी वाचा सविस्तर…
सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी राज्यातील लाखो नागरिकांना प्रत्येकी एक किलो साखर, चणाडाळ, रवा आणि पामतेल या चार वस्तूंचा संच फक्त १०० रुपयांमध्ये पुढील दोन दिवसांमध्ये शिधावाटप दुकानांमधून उपलब्ध होण्यास सुरुवात होईल, असे अन्न व नागरी पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. या संचाचे वितरण तातडीने सुरू करण्याचे निर्देश चव्हाण यांनी राज्यातील शिधावाटप अधिकाऱ्यांना दृक्-श्राव्य माध्यमातून घेतलेल्या बैठकीत दिले.
डोंबिवली : मुंबईच्या वेशीवरील सामान्य, मध्यमवर्गियांची वस्ती असलेले डोंबिवली शहर नागरी समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. या शहरातील रस्ते, वाहनतळ, वाहन कोंडी अशा अन्य नागरी समस्या सोडविण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. बातमी वाचा सविस्तर…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार असलेले गुलाबराव पाटील हे कायमच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी एका जाहीर भाषणामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात केलेलं विधान आता चर्चेत आलं आहे. कार्यकर्त्यांसमोर आपण आपल्या जीवावर निवडून येतो अशा अशयाचं विधान करताना गुलाबराव पाटील यांनी मुस्लीम मतदार आपल्याला बाळासाहेबांचं काय करायचं आहे आपल्यासाठी गुलाबरावच सर्वकाही आहेत, असा विचार करुन मला मतदान करतात असं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगमी अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही उल्लेख पाटील यांनी केला आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेची जागा देण्याबाबत रेल्वे मंत्रालयाच्या जमीन विकास प्राधिकरण (रेल लँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी) आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरण यांच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत ‘संयुक्त करारनाम्यावर (डेफिनेटिव्ह अॅग्रीमेंट)’ काल (मंगळवार) स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.