Maharashtra Political Crisis Updates, 06 October 2022 : शिवसेनेत फूट पडून राज्यात सत्तारांनतर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असेला शिवसेनाच दसरा मेळावा अखेर काल झाला. शिंदे गटाचा हा पहिलाच दसरा मेळावा होता, तर न्यायालयीन लढाई जिंकत उद्धव ठाकरेंनी परंपरेनुसार शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेतला. या दोन्ही दसरा मेळाव्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून होते. अपेक्षेप्रमाणे दोन्ही बाजूंनी जोरदार टीका, टिप्पणी पाहायला मिळाली. आता यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याशिवाय दोन वर्षांपूर्वी आरटीओमधील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या २४० पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेची अंतिम निवड यादी जाहीर करण्यास उच्च न्यायालयाने संमती दिली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने(डीआरआय) मोठी कारवाई केली आहे. या ठिकाणी तब्बल ८० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

याशिवाय राज्यभरातील विविध अन्य महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती वाचा फक्त एकाच क्लिकवर

Live Updates

Maharashtra Breaking News Updates : राज्यभरातील विविध अन्य महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती वाचा फक्त एकाच क्लिकवर

19:30 (IST) 6 Oct 2022
धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास उद्धव ठाकरेंकडे पर्याय काय? शिवसेनेतील महिला नेत्याने पहिल्यांदाच दिलं थेट उत्तर

एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक अशा दोन्ही गटात पक्षवर्चस्वावरून वाद सुरू असताना अंधेरी पूर्व विधानभा पोटनिवडणूक आणि महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यास उद्धव ठाकरे कोणते चिन्ह वापरणार यावर शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर

19:29 (IST) 6 Oct 2022
अडीच वर्षांचा फॉर्म्यूल्यावरून पुन्हा आरोप प्रत्यारोप, केशव उपाध्ये म्हणाले…

उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेत भाजपा आणि शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे सत्तावाटपाचे सूत्र ठरले होते, असे सांगितले. उद्धव ठाकरेंच्या याच दाव्यावर आता भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरेंची सर्व भाषणं एकसुरी असून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घ्यायला नको होती, अशी प्रतिक्रिया उपाध्ये यांनी दिली आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते. वाचा सविस्तर

18:12 (IST) 6 Oct 2022
ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती खडतरच, वसुली चांगली पण…

ठाणे : करोना काळात उत्पन्न वसुलीवर परिणाम झाल्याने पालिकेवर चार हजार कोटींच्या आसपास दायित्व झालेले होते. मात्र, करोना काळानंतर पालिकेच्या उत्पन्न वसुलीत वाढ होऊ लागल्याने दायित्वाचा भार कमी होऊ लागला असून तो आता २८०० कोटी रुपयांवर आला आहे. बातमी वाचा सविस्तर …

18:01 (IST) 6 Oct 2022
श्रीकांत शिंदेंचं उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाले “दुखावलेला बाप…”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात मुलाचा उल्लेख केल्याने मुक्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे दुखावले आहेत. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून आपला संताप आणि भावना व्यक्त केल्या आहेत. “ज्या डोळ्यांत फक्त आणि फक्त निरागसता भरलेली आहे, ज्या डोळ्यांतून केवळ आणि केवळ निर्मलता ओसंडून वाहाते आहे, असे डोळे खुर्चीकडे लागलेले आहेत, असं वक्तव्य करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही?,” अशी विचारणा श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. फेसबुकला त्यांनी हे पत्र शेअर केलं आहे.

सविस्तर बातमी

17:51 (IST) 6 Oct 2022
जयदेव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया, मनिषा कायंदे म्हणाल्या…

जयदेव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कलह प्रत्येकाच्याच घरात असतात. मात्र एखाद्याच्या घरातील विषय चव्हाट्यावर आणणे चुकीचे आहे. उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातील लोक त्यांच्यासोबत नाहीत, असे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, असे मनिषा कायंदे म्हणाल्या. त्या ‘एबीपी माझा’शी बोलत होत्या. वाचा सविस्तर

17:23 (IST) 6 Oct 2022
पाण्यासाठी कामोठेवासियांचा सिडको कार्यालयात ठिय्या

पनवेल : सिडको महामंडळाकडून पाणी पुरवठा सूरळीत होत नसल्याने कामोठे वसाहतीमधील सेक्टर ३६ येथील सत्यकुंज गृहनिर्माण संस्थेच्या सदनिकाधारकांनी गुरुवारी दुपारपासून सिडकोच्या पाणी पुरवठा कार्यालयात ठिय्या मांडला. बातमी वाचा सविस्तर …

17:16 (IST) 6 Oct 2022
सभा सुरु असतानाच केसरकरांना डुलकी? अमोल मिटकरींचा खोचक टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा मुंबईतील बिकेसी मैदानात पार पडला. या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केलं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांना डुलकी लागल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवेसना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दीपक केसरकरांना खोचक टोला लगावला आहे. सविस्तर वाचा

17:04 (IST) 6 Oct 2022
७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार

राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या सुमारे ७ हजार ६४९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर १८ ऑक्टोबर पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. तर, विधानसभा मतदारसंघाच्या ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर १८ ऑक्टोबर पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या २१ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

16:41 (IST) 6 Oct 2022
जसप्रित बुमराह भारतीय संघासाठी महत्त्वाचा का आहे? वाचा सविस्तर

बुमराह हा जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे भारतीय क्रिकेट संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. बुमराह संघात नसल्यामुळे भारतीय संघ यावेळी टी-२० विश्वचषक जिंकणार का? असा प्रश्न विचारला जातोय. याच पार्श्वभूमीवर बुमराह संघात असल्यानंतर टीम इंडियाने कशी कामगिरी केलेली आहे आणि तो संघात नसल्यावर भारतीय संघ तसेच इतर गोलंदाजांनी कसा खेळ केलेला आहे, यावर एक नजर टाकुया. वाचा सविस्तर

16:40 (IST) 6 Oct 2022
Mexico Firing : मेक्सिकोत गोळीबार, महापौरांसह १८ जणांचा मृत्यू

Mexico Shooting News : मेक्सिकोमधील सॅन मिग्यूएल टोटोलपॅन या भागात गोळीबाराची घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यात एकूण १८ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. या घटनेत मेक्सिकोचे महापौर कॉनरॅडो मेंडोझा यांच्यासह त्यांच्या वडिलांचाही यामध्ये मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर

16:39 (IST) 6 Oct 2022
भारत मुक्ती मोर्चाचा संघ मुख्यालयावर मोर्चा, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

नागपूरमधील संघ मुख्यालयावर भारत मुक्ती मोर्चातर्फे मोर्चा काढण्यात आला. यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघाची विचारधारा भारतीय संविधानाला धरून नाही, असे म्हणत त्यांनी संघ मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या मोर्चाला प्रशासनाची परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना रस्त्यातच रोखलं. पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. वाचा सविस्तर

16:23 (IST) 6 Oct 2022
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती रकमेत वाढ

राज्याच्या अल्पसंख्यांक विकास विभागातर्फे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेत शिष्यवृत्तीची रक्कम वाढविण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार असून, आधारसंलग्न बायोमेट्रिक प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची किमान पन्नास टक्के उपस्थिती नोंदवणे बंधनकारक आहे. बातमी वाचा सविस्तर

15:55 (IST) 6 Oct 2022
मुंबई : रेल्वे स्थानकांमध्ये फेरीवाल्यांचाय वावर कायम ; कारवाई केल्यानंतरही परिस्थिती जैसे थे

ठाणे रेल्वे स्थानकात काही फेरीवाल्यांनी महिला प्रवाशाला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली असून या घटनेमुळे पुन्हा एकदा फेरीवाल्यांचे वर्चस्व आणि महानगरपालिका, तसेच रेल्वे प्रशासनाच्या कुचकामी यंत्रणेचे वाभाडे निघू लागले आहेत. रेल्वे सुरक्षा दलाने २०२१ पासून आतापर्यंत मध्य रेल्वे उपनगरीय हद्दीतील सुमारे नऊ हजार ९७१ अनधिकृत फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई केली असून ५५ जणांना तुरुंगवासाची शिक्षाही झाली आहे.

सविस्तर वाचा…

15:36 (IST) 6 Oct 2022
सनदी अधिकाऱ्याच्या नियुक्तीला जनहित याचिकेतून आव्हान देता येईल का? ; उच्च न्यायालयाचा प्रश्न

मीरा-भाईंदरचे आयुक्त दिलीप ढोले हे सनदी अधिकारी नसताना त्यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. मात्र सनदी अधिकाऱ्याच्या नियुक्तीला जनहित याचिकेतून आव्हान देता येईल का ? अशी विचारणा करून ही याचिका ऐकण्यायोग्य कशी ? हे आम्हाला पटवून देण्याचे आदेश न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत. सविस्तर वाचा…

15:23 (IST) 6 Oct 2022
सायबर फसवणुकीत ओळख लपविणारी यंत्रणा हस्तगत? ; सीबीआयचे ‘ॲापरेशन चक्र’

तुम्हाला मोबाइलवर सायबर फसवणुकीच्या दृष्टीने छळणारे अनेक काॅल्स येतात वा कर्जवसुलीसाठी येणाऱ्या कॅालवरून तुम्हाला प्रचंड त्रास दिला जातो. पोलिसांकडे तक्रारीची धमकी दिली तरी बिनधास्त करा, असे समोरचा उद्धटपणे ऐकवतो. कारण त्याचा ठावठिकाणा शोधला जाणार नाही याची त्याला खात्री असते. अशीच यंत्रणा केंद्रीय गुप्तचर विभागाने गेली काही दिवस सुरू केलेल्या ‘ॲापरेशन चक्र’ या मोहिमेमुळे उघड झाली आहे.

सविस्तर वाचा…

15:20 (IST) 6 Oct 2022
लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून महिलांमध्ये तुंबळ हाणामारी

पनवेल : विजयादशमीला (बुधवारी) संध्याकाळी पावणे आठ वाजता ठाण्याकडून पनवेलला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी महिलांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये महिला पोलीस जखमी झाली. लोकलमधील बसण्याचे आसनावरून तीन महिलांमध्ये बाचाबाचीने सुरुवात झाली. बातमी वाचा सविस्तर …

15:10 (IST) 6 Oct 2022
घाऊक व किरकोळ बाजारात कोथिंबीरीचे दर आवाक्यात

नवी मुंबई : मागील महिन्यात घाऊक तसेच किरकोळ बाजारात कोथिंबीर व इतर पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले होते. मात्र आता पालेभाज्या दर आवाक्यात आले असून कोथिंबीर १५-३०रुपये जुडी तर मेथी १०-२५ रुपयांनी उपलब्ध आहे . बातमी वाचा सविस्तर …

15:09 (IST) 6 Oct 2022
मनोरा आमदार निवास पुनर्विकास अधांतरी ;  बांधकामासाठी एकच निविदा सादर पुढील निर्णयासाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे

नरिमन पॉईंट येथील मनोरा आमदार निवासाचा पुनर्विकास अधांतरीच आहे. या प्रकल्पाच्या बांधकामासाठी केवळ एक निविदा सादर झाली आहे. एकच निविदा सादर झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत. एकच निविदा आल्यामुळे या संदर्भात निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य सरकारला पाठविला आहे. सविस्तर वाचा…

14:53 (IST) 6 Oct 2022
मराठी नामफलक नसलेल्या दुकानांविरुद्ध कारवाईला मुहूर्त मिळेना ; महानगरपालिकेचा कारवाईचा आराखडा तयार, पण आयुक्तांच्या मंजुरीची प्रतीक्षा

मुंबईमधील सर्वच दुकाने आणि आस्थापनांवरील नालफलक मराठी भाषेत असावेत असे निर्देश  राज्य सरकारने दिले असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेवर सोपविली आहे. मात्र दुकानदारांच्या मागणीनुसार चार वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही या निर्देशांची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. सविस्तर वाचा…

14:41 (IST) 6 Oct 2022
वाशीममध्ये वीज कोसळून सतरा वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू

वाशीम : शहरात बुधवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी वीज कोसळून एका सतरा वर्षीय शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बातमी वाचा सविस्तर

14:33 (IST) 6 Oct 2022
विदेशातून आलेल्या कुरिअर वरील सीमा शुल्क भरण्याच्या नावाखाली कल्याण मधील महिलेची १३ लाखाची फसवणूक

विदेशातून आपल्या नावाने एक कुरिअर आले आहे. या कुरिअरवर आपणास सीमा शुल्क, प्राप्तिकर आणि इतर वहन कर भरावा लागणार आहे. हे शुल्क भरणा केले नाहीत तर आपल्या विरुध्द कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल, अशी भीती कल्याण मधील एका वित्तीय कंपनीतील उच्चपदस्थ महिलेला दाखवून तिच्याकडून तीन भामट्यांनी गेल्या महिन्यात १० दिवसाच्या अवधीत १३ लाख ४६ हजार ५०० रुपये ऑनलाईन पध्दतीने उकळले आहेत. सविस्तर वाचा…

14:09 (IST) 6 Oct 2022
चोपड्यात आज रथोत्सव ; व्यंकटेश बालाजी संस्थानचा शेकडो वर्षांचा उपक्रम

जळगाव : चोपडा येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचा सुमारे चारशे वर्षांची विशाल परंपरा असलेला रथोत्सव गुरुवारी (6 आक्टोबर) साजरा होत असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष प्रवीण गुजराथी यांनी दिली. बातमी वाचा सविस्तर …

14:02 (IST) 6 Oct 2022
तलाव भरले, पाणीकपात रद्द झाली तरी देखील कांदिवलीकर टँकरवरच अवलंबून

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची तहान भागविणारे सातही तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. तलावातील जलसाठा खालावल्याने लागू करण्यात आलेली पाणीकपातही मागे घेण्यात आली. बातमी वाचा सविस्तर …

13:50 (IST) 6 Oct 2022
बनावट कागदपत्रांद्वारे महारेरा नोंदणी करणाऱ्या ५२ विकासकांना दणका

मुंबई : बनावट कागपदपत्रांच्या आधारे महारेराची नोंदणी करणाऱ्या, तसेच ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या ६५ विकासकांविरोधात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने गुन्हे दाखल केले आहेत. पालिकेपाठोपाठ आता महारेरानेही ५२ विकासकांना दणका दिला आहे. बातमी वाचा सविस्तर …

13:45 (IST) 6 Oct 2022
तुम्ही कोणाचं भाषण ऐकलंत? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “कोणाचंच नाही, कारण…”

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणांनंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली असून, शिमग्यावर कधीही प्रतिक्रिया देत नसतात असा टोला लगावला आहे.

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

13:35 (IST) 6 Oct 2022
उरण मध्ये जोरदार पावसाची हजेरी

उरण : गुरुवारी साडे अकरा वाजता उरण शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे उरणच्या बाजारात आलेल्या ग्राहकांची व नागरिकांची व शाळेतून परतणाऱ्या विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली. गुरुवारी सकाळी कडक ऊन पडलं होतं. बातमी वाचा सविस्तर …

13:07 (IST) 6 Oct 2022
पदवीधर विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढीसाठी अभ्यासक्रमांची निर्मिती करण्याचे यूजीसीचे निर्देश

पुणे : पदवीधर विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढण्यासाठी देशभरातील विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांनी आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांशी चर्चा करून उद्योग केंद्रीत अभ्यासक्रमांची निर्मिती करावी. या अभ्यासक्रमांसाठी श्रेयांक देता येऊ शकतात, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत. बातमी वाचा सविस्तर …

12:57 (IST) 6 Oct 2022
अंबानी कुटुंबाला धमकी दिल्याप्रकरणी बिहारमधून एकजण ताब्यात

मुंबई : रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.याप्रकरणी बिहार येथील दरभंगा येथून एका संशयीताला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बातमी वाचा सविस्तर …

12:41 (IST) 6 Oct 2022
विरारमध्ये गरबा खेळण्यावरून दोन गटात वाद ; मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाची हत्या

विरार : विरार मध्ये गरब्यात खेळण्यावरून दोन गटात भांडणे झाली. त्यात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणालाच मारहाण करण्यात आली. या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी विरार पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. बातमी वाचा सविस्तर …

12:36 (IST) 6 Oct 2022
“…तरच उत्साह शेवटपर्यंत टिकतो आणि निष्ठा दिसते हेच पुन्हा अधोरेखित झालं”

शिवसेनेत फूट पडून राज्यात सत्तारांनतर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असेला शिवसेनाच दसरा मेळावा अखेर काल झाला. शिंदे गटाचा हा पहिलाच दसरा मेळावा होता, तर न्यायालयीन लढाई जिंकत उद्धव ठाकरेंनी परंपरेनुसार शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेतला. या दोन्ही दसरा मेळाव्याकडे राज्यभरातील जनतेचे लक्ष लागून होते. अपेक्षेप्रमाणे दोन्ही बाजूंनी जोरदार टीका, टिप्पणी पाहायला मिळाली. आता यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवाय, आपला दसरा मेळावा हा अधिक भव्य झाला पाहिजे, यासाठी दोन्ही गटांकडून मोठी ताकदही लावण्यात आली होती. वाचा सविस्तर बातमी…

उद्धव ठाकरेंचं भाषण अंतिम टप्प्यात येताच एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहिले होते. एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड तास भाषण केलं. दरम्यान त्यांच्या या भाषणावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. ‘काही भाषणं फारच लांबली, नको तिथे लांबली,” असं ते मिश्कीलपणे म्हणाले.