Maharashtra Political Crisis Updates, 06 October 2022 : शिवसेनेत फूट पडून राज्यात सत्तारांनतर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असेला शिवसेनाच दसरा मेळावा अखेर काल झाला. शिंदे गटाचा हा पहिलाच दसरा मेळावा होता, तर न्यायालयीन लढाई जिंकत उद्धव ठाकरेंनी परंपरेनुसार शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेतला. या दोन्ही दसरा मेळाव्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून होते. अपेक्षेप्रमाणे दोन्ही बाजूंनी जोरदार टीका, टिप्पणी पाहायला मिळाली. आता यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याशिवाय दोन वर्षांपूर्वी आरटीओमधील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या २४० पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेची अंतिम निवड यादी जाहीर करण्यास उच्च न्यायालयाने संमती दिली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने(डीआरआय) मोठी कारवाई केली आहे. या ठिकाणी तब्बल ८० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

याशिवाय राज्यभरातील विविध अन्य महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती वाचा फक्त एकाच क्लिकवर

Live Updates

Maharashtra Breaking News Updates : राज्यभरातील विविध अन्य महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती वाचा फक्त एकाच क्लिकवर

12:19 (IST) 6 Oct 2022
‘निवडक’ चोरी, चोरांनी महागड्या साड्या चोरल्या, स्वस्त साड्यांपासून राहीले चार हात दूर

नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे भागातील एका साडीच्या दुकानात चोरट्यांनी महागड्या साड्यांची चोरी केली आहे. साड्या चोरताना ज्या पद्धतीने निवड करण्यात आली ते पाहून साड्यांची चोरट्यांना माहिती असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बातमी वाचा सविस्तर …

12:06 (IST) 6 Oct 2022
टिटवाळा ते कल्याण-नगर महामार्ग गोवेली येथे वर्तुळकार रस्त्याने जोडणार

कल्याण : २७ गाव, डोंबिवली, कल्याण ते टिटवाळा हा २० किलोमीटरचा वर्तुळकार शहरा बाहेरील रस्ता टिटवाळा येथे कल्याण-अहमदनगर महामार्गाला गोवेली (मुरबाड रस्ता) येथे जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. टिटवाळा ते मुरबाड रस्ता हा वर्तुळकार रस्त्याचा आठवा टप्पा असणार आहे. बातमी वाचा सविस्तर …

11:53 (IST) 6 Oct 2022
दारू पिण्यास मनाई केल्याने जीवे मारण्याची धमकी

पुणे : दारू पिण्यास मनाई केल्याने एकास जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना कोथरुड भागात घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बातमी वाचा सविस्तर …

11:40 (IST) 6 Oct 2022
नंदुरबारमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना, वेगाने धावणाऱ्या घोड्याची तरुणांना जोरदार धडक,

तेराव्या शतकापासुन सुरु असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या काठी संस्थानच्या दसरा मेळाव्यात घोडेशर्यत ही आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. नंदुरबार जिल्ह्यातल्या काठी संस्थानाच्या याच दसरा मेळाव्यातील घोडेशर्यती दरम्यान काळजाचा ठोका चुकवणारी एक दुर्घटना घडली आहे. शर्यतीदरम्यान रस्त्यावर आलेल्या काही तरुणांना वेगात धावणाऱ्या घोड्याने धडक दिली. यामध्ये एक तरुण किरकोळ जखमी झाला आहे. घटनेचा व्हीडीओ सध्या व्हायरल होत आहे.

सविस्तर बातमी

11:25 (IST) 6 Oct 2022
‘शिवसेनेचा झेंडा आणि राष्ट्रवादीचा अजेंडा’, CM शिंदेंच्या टीकेला अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले “माझ्या बाजूला बसायचे तेव्हा…”

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी, काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याच्या निर्णयावरुन लक्ष्य केलं. पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविण्याच्या हट्टापायी तुम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली. दरम्यान एकनाथ शिंदेंच्या टीकेला विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे.

सविस्तर बातमी

11:14 (IST) 6 Oct 2022
उरण शहरातील गांधी पुतळा परिसर बनलेय वाहनतळ

उरण : शहरात एकही अधिकृत वाहनतळ नसल्याने वाहनतळाची गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी वाहन चालकांकडून वाहने उभी केली जात आहेत.अशाच प्रकारची शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी पुतळ्या जवळ चारचाकी वाहने उभी करून या रस्त्याचे वाहनतळ बनविले आहे. बातमी वाचा सविस्तर …

11:03 (IST) 6 Oct 2022
Dasara Melava 2022: “मी उद्धव ठाकरेंची साथ सोडली कारण…” शिंदे गटाच्या मेळाव्यानंतर प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा ऐतिहासिक दसरा मेळावा पार पडला. दोन्ही मेळाव्याला लाखो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. या मेळाव्यात बंडखोर नेत्यांना ‘गद्दार’ म्हणत उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली. या टीकेनंतर शिंदे गटातील नेते प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर बातमी वाचा…

11:02 (IST) 6 Oct 2022
“सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट”, अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्ला; म्हणाले, “बापाच्या नावाने थापा अन…”

मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये पार पडलेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच भाजपावर तुफान फटकेबाजी केली. या फटकेबाजीनंतर भाजपाच्या गोटातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. ‘सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट, बापाच्या नावाने थापा, अरे हाच खरा थापा आहे, पण त्या आधी वाफा आहे..’ असे ट्वीट करत भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला आहे.

सविस्तर वाचा…

10:57 (IST) 6 Oct 2022
मुंबईत प्रकल्पबाधितांसाठी सदनिका बांधण्याच्या निविदेत अनियमितता ?

मुंबई : प्रकल्पबाधितांसाठी मुंबईतील विविध खासगी भूखंडांवर बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. या प्रकल्पात बांधकाम व्यावसायिकांना हजारो कोटी रुपयांचा लाभ मिळवून दिल्याचा आरोप त्यांनी केला असून लोकायुक्तांकडे याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. बातमी वाचा सविस्तर …

10:41 (IST) 6 Oct 2022
पुणे जिल्ह्यात १०३ जणांना नव्याने करोना संसर्ग

पुणे : बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील १०३ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली. मात्र, बहुसंख्य करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बातमी वाचा सविस्तर …

10:40 (IST) 6 Oct 2022
पुण्यात समाजमाध्यमावरील ओळखीतून ज्येष्ठ महिलेची ५७ लाखांची फसवणूक

पुणे : समाजमाध्यमावरील ओळखीतून सिंहगड रस्ता भागातील ज्येष्ठ महिलेची सायबर चोरट्यांनी ५७ लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. सायबर चोरट्यांनी परदेशातून ज्येष्ठ महिलेला दोन कोटी रुपये पाठविण्याचे आमिष दाखविले होते. बातमी वाचा सविस्तर …

10:40 (IST) 6 Oct 2022
ठाण्यातील वाहतूक कोंडीवर आंनद नगर – साकेत उन्नत मार्गाची मात्रा

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आंनद नगर – साकेतदरम्यान उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दोन वेळा निविदा मागविल्यानंतरही या प्रकल्पासाठी सल्लागार मिळू शकलेला नाही. बातमी वाचा सविस्तर …

10:38 (IST) 6 Oct 2022
नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका, म्हणाल्या…

अमरावती : माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचे वारसदार होऊ शकतात. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत, असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. बातमी वाचा सविस्तर …

10:34 (IST) 6 Oct 2022
२४० सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

दोन वर्षांपूर्वी आरटीओमधील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या २४० पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेची अंतिम निवड यादी जाहीर करण्यास उच्च न्यायालयाने संमती दिली असून त्यामुळे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या रखडलेल्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:32 (IST) 6 Oct 2022
मुंबई विमानतळावर ८० कोटींचे ड्रग्ज जप्त; DRI ची मोठी कारवाई

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने(डीआरआय) मोठी कारवाई केली आहे. या ठिकाणी तब्बल ८० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे आणि केरळमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळ १६ किलो हेरॉईन आढळून आलं आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:31 (IST) 6 Oct 2022
शिंदे की ठाकरे? कोणाचं भाषण तुम्हाला आवडलं? अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले…

शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा बुधवारी वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंचं भाषण अंतिम टप्प्यात येताच एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहिले होते. एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड तास भाषण केलं. दरम्यान त्यांच्या या भाषणावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. ‘काही भाषणं फारच लांबली, नको तिथे लांबली,” असं ते मिश्कीलपणे म्हणाले. ते बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. वाचा सविस्तर बातमी…

10:31 (IST) 6 Oct 2022
Dasara Melava : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली. माजी मुख्यमंत्र्यांनी पाऊण तासाच्या भाषणात हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं. उद्धव ठाकरेंची अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी मशिदींना भेट दिल्याच्या मुद्द्यापासून ते नामांतरणापर्यंतचे मुद्द्यांचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली. उद्धव यांच्या या भाषणावर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पहिली प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी…

उद्धव ठाकरेंचं भाषण अंतिम टप्प्यात येताच एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहिले होते. एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड तास भाषण केलं. दरम्यान त्यांच्या या भाषणावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. ‘काही भाषणं फारच लांबली, नको तिथे लांबली,” असं ते मिश्कीलपणे म्हणाले.