Maharashtra Political Crisis Updates, 16 November 2022 : राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. ही पदयात्रा शेगावमध्ये पोहचल्यावर तिथे मोठी ऐतिहासिक सभा होणार असून, या सभेस काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ही माहिती दिली आहे.

याशिवाय विरोधकांकडून जितेंद्र आव्हाडांच्या अनंत करमुसे मारहाण प्रकरणाचा दाखला देत आव्हाडांवर टीकास्र सोडलं जात आहे. त्यामुळे आव्हाडांनी यावर खुलासा करणारं एक ट्वीट केलं असून त्यामध्ये अनंत करमुसे नावाच्या सोशल प्रोफाईलचे काही स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत.

तर मुंबईत गोवर आजाराची साथ प्रचंड वेगाने पसरत असतानाच त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात गोवरची साथ पसरल्याचे समोर आले आहे. या आजाराचे २७१ संशयीत रुग्ण आढळून आले आहेत.

यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील सविस्तर बातम्या वाचा फक्त एका किल्कवर

Live Updates

Marathi News Today, 16 November 2022 : यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील सविस्तर बातम्या वाचा फक्त एका किल्कवर

17:25 (IST) 16 Nov 2022
कल्याण डोंबिवलीतील वाढत्या घरफोड्यांनी नागरिक हैराण

कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पादचाऱ्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यांवर हे प्रकार घडत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याने गस्ती पोलीस करतात काय, असा प्रश्न नागरिकांकडून संतप्तपणे उपस्थित केला जात आहे.

सविस्तर वाचा...

17:06 (IST) 16 Nov 2022
ठाणे: आयुक्त अभिजीत बांगर सुट्टीवर गेल्याने महापालिकेत शुकशुकाट

महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर अधिकारी-कर्मचारी कार्यालयीन वेळेत कामावर उपस्थित राहत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. परंतु मंगळवारपासून आयुक्त बांगर हे सुट्टीवर जाताच पालिका मुख्यालयात अनेक अधिकारी-कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे पालिका मुख्यालयात शुकशुकाट असल्याचे दिसून आले. बातमी वाचा सविस्तर...

16:48 (IST) 16 Nov 2022
टिटवाळा इथे झालेल्या ‘रेल रोको’ चे मुख्य कारण आहे ८.३३ ची वातानुकूलित लोकल

टिटवाळा रेल्वे स्थानकातून सकाळी ८.३३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी अनेक वर्षांची सामान्य लोकल प्रवाशांना ठाणे, मुंबई परिसरातील कार्यालयीन वेळ गाठण्यासाठी सोयीस्कर होती. या सामान्य लोकलचे तीन महिन्यापूर्वी मध्य रेल्वेने वातानुकूलित लोकलमध्ये रुपांतर करत प्रवाशांची गैरसोय केली आहे. यामुळे संतप्त प्रवाशांचा बुधवारी टिटवाळा स्थानकात उद्रेक झाला.

सविस्तर वाचा...

15:52 (IST) 16 Nov 2022
पुणे: ‘हर हर महादेव’ चित्रपटातील तपशिलांबाबत बाजीप्रभू देशपांडे यांच्या कुटुंबीयांचा आक्षेप

चित्रपट निर्मितीसाठी मुभा घेणे (सिनेमॅटिक लिबर्टी) ही काल्पनिक चित्रपटांसाठी घेणे ठीक. मात्र, ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांसाठी ती घेणे योग्य नाही. चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम असल्याने त्याचा वापरही जबाबदारीने होणे अपेक्षित आहे, ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या निर्मितीत त्या जबाबदारीचे भान दिसत नाही

सविस्तर वाचा

15:44 (IST) 16 Nov 2022
पुणे: वारजे भागात दहशत माजविणाऱ्या गुंडांवर 'मोक्का'

वारजे भागात दहशत माजविणारा गुंड रवींद्र ढोले आणि साथीदारांच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्त गुप्ता यांच्या आदेशानुसार गेल्या दीड वर्षात शहरातील १०७ गुंड टोळ्यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

15:38 (IST) 16 Nov 2022
मुंबई: धारावी पुनर्विकासासाठी तीन कंपन्या स्पर्धेत

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या बांधकामासाठीच्या जारी करण्यात आलेल्या निविदांना अखेर चांगला प्रतिसाद मिळाला असून तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. या निविदा बुधवारी खुल्या करण्यात येणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बातमी वाचा सविस्तर...

15:08 (IST) 16 Nov 2022
यवतमाळ: पुसद तालुक्यातील बांसी गावात किशोरवयीन मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी

मोबाईलमुळे किशोरवयीन मुलांचे भावविश्व व्यापले आहे. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी पालक अनेक क्लृप्त्या योजतात, तरीही मुलं मोबाईलच्या आहारी जात आहेत. पालक आणि एकूणच समाजाच्या या समस्येवर पुसद तालुक्यातील बांसी गावाने ग्रामसभेच्या अधिकारांचा वापर करत नामी उपाय शोधून काढला आहे.

सविस्तर वाचा

15:07 (IST) 16 Nov 2022
पुणे: गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी अमोल झेंडे; वाहतूक शाखेची जबाबदारी विजयकुमार मगर यांच्याकडे

शहरात नव्याने आलेल्या पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी सायंकाळी दिले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी अमोल झेंडे, वाहतूक शाखेच्या उपायुक्तपदी विजय मगर यांची नियुक्ती करण्यात आली.

सविस्तर वाचा

15:07 (IST) 16 Nov 2022
पिंपरीः जलतरण तलावात बेकायदेशीर क्रिकेट अकादमी?;चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे चालवण्यात येणाऱ्या जलतरण तलावाच्या जागेतच दोन वर्षांपासून बेकायदेशीर क्रिकेट अकादमी चालवण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अकादमीच्या माध्यमातून संगनमताने लाखो रुपयांची कमाई झाली असताना, महापालिकेला मात्र एक रुपयाही उत्पन्न मिळाले नाही.

सविस्तर वाचा

14:22 (IST) 16 Nov 2022
नवाब मलिक यांच्यावर ‘अ‍ॅट्रॉसिटी’अंतर्गत गुन्हा दाखल करा; वाशीम जिल्हा न्यायालयाचे आदेश

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे तत्कालीन मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अनुसूचित जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेऊन, जातीवाचक टिप्पणी केल्याप्रकरणी वाशीम जिल्हा न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात ‘अ‍ॅट्रॉसिटी’अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

सविस्तर वाचा...

13:59 (IST) 16 Nov 2022
कदाचित ‘या’ सगळ्या गोष्टींचा देवेंद्र फडणवीसांना उबग आला असेल, म्हणून…; सुनील तटकरेंचं विधान!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिंदे गटाच्या आमदरांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. यावरून राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनते अंबादास दानवे यांनी यावरून शिंदे गटाला टोला लगावलेला असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर बातमी...

13:58 (IST) 16 Nov 2022
“हिंदुत्वाचं बाळकडू मिळालेलं असताना भाजपाच्या नेत्यांकडून ‘हे’ जर हिंदुत्वाचे धडे घेत असतील, तर …” ; अंबादास दानवेंचा शिंदे गटाला टोला!

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज(बुधवार) पत्रकारपरिषदेत बोलताना शिंदे गटातील आमदरांवर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदे गटातील आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत, या पार्श्वभूमीवर बोलताना दानवे यांनी शिंदे गटातील आमदारांना टोला लगावला आहे. वाचा सविस्तर बातमी...

13:57 (IST) 16 Nov 2022
औरंगाबादेत तरुणीसोबत अश्लिल संभाषण, छेडछाड; धावत्या रिक्षातून घेतली उडी

औरंगाबादेत रिक्षाचालकाने धावत्या रिक्षात तरुणीशी अश्लिल भाषेत संभाषण करत छेड काढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छेडछाडीच्या या प्रसंगामुळे तरुणीने धावत्या रिक्षातून उडी घेतली. या घटनेत तरुणीच्या डोक्याला दुखापत झाली असून पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकास ताब्यात घेतले आहे. सय्यद अकबर सय्यद हमीद असे आरोपीचे नाव आहे. वाचा सविस्तर

13:55 (IST) 16 Nov 2022
रशियाकडून पोलंडवर क्षेपणास्त्र हल्ला? जो बायडेन यांनी बोलावली तातडीची बैठक

रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्ष आता नाटो देशांपर्यंत पोहोचला आहे. आज (१६ नोव्हेंबर) रशियाने डागलेले क्षेपणास्त्र पोलंड देशात पडले आहे. या घटनेत दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नाटो सदस्य देशांच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. रशियाच्या या कृतीमुळे युद्ध आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाचा सविस्तर

13:54 (IST) 16 Nov 2022
ठरलं! डोनाल्ड ट्रम्प पुन्हा मैदानात, अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष तथा रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार आहेत. त्यांनी आपल्या उमेदवारीची सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाकडून अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही. वाचा सविस्तर

13:54 (IST) 16 Nov 2022
‘भाजपाच्या गुंडांकडून आमच्या उमेदवाराचे अपहरण,’ आप पक्षाचा भाजपावर गंभीर आरोप

आम आदमी पार्टीचे नेते मनिष सिसोदियांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपाच्या लोकांनी आमच्या एका उमेदवाराचे अपहरण केल्याचे सिसोदिया म्हणाले आहेत. विशेष म्हणजे या आरोपासह आप पक्षाने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर काही व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. वाचा सविस्तर

13:52 (IST) 16 Nov 2022
राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसेने समोर आणला सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ

कोल्हापुरात असताना अंधारे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणणं उर्मटपणा असल्याचे अंधारे म्हणाल्या आहेत. दरम्यान, अंधारे यांच्या याच टीकेला मनसेने जशास तसे उत्तर दिले आहे. मनसेचे नेते गजानन काळे यांनी सुषमा अंधारे यांचा एक जुना व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. वाचा सविस्तर

13:51 (IST) 16 Nov 2022
मोठी बातमी! एकनाथ शिंदे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्याची शक्यता

वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाशी आघाडी करण्यास तयार असल्याची भूमिका घेतली आहे. याच कारणामुळे राज्यात आगामी काळात नवे सत्तासमीकर उदयास येणार का? असा प्रश्व विचारला जात आहे. असे असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. वाचा सविस्तर

13:45 (IST) 16 Nov 2022
"माझ्या करिअरमध्ये मी इतकी थंड डोक्याने...", माजी पोलीस महासंचालकांनी सांगितली श्रद्धा हत्येप्रकरणी पोलिसांसमोरील आव्हानं

वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने दिल्लीत हत्या केली. तसेच प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले. या घटनेने देशभरात खळबळ उडाली. सध्या पोलीस या प्रकरणात तपास करत असले, तरी तब्बल सहा महिन्यांनी हा गुन्हा उघडकीस आल्याने पुरावे गोळा करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांसमोर नेमकी कोणती आव्हानं असतील याबाबत महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्या बुधवारी (१६ नोव्हेंबर) एबीपी माझाशी बोलत होत्या.

सविस्तर बातमी...

13:17 (IST) 16 Nov 2022
भारत जोडो’ला ज्येष्ठ विचारवंत, समाजसेवींचे बळ; खा. राहुल गांधींची पदयात्रा आज अकोला जिल्ह्यात दाखल होणार

अकोला : काँग्रेस नेते खा. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेला ज्येष्ठ विचारवंत, समाजसेवींचे बळ मिळणार आहे. अकोला जिल्ह्यात अनेक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी पदयात्रेशी जुळणार आहेत. जिल्ह्यातील पातूर येथे राहुल गांधींची पदयात्रा आज, १६ नोव्हेंबरला सायंकाळी दाखल होईल . बातमी वाचा सविस्तर...

13:04 (IST) 16 Nov 2022
विनायक मेटे मृत्यूप्रकरणी सीआयडीच्या हाती सबळ पुरावे, चालकाविरोधात गुन्हा दाखल

शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांच्या मृत्यूप्रकरणात सीआयडीच्या हाती सबळ पुरावे लागले आहेत. त्यानंतर सीआयडीने विनायक मेटे यांचा वाहन चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. रसायनी पोलीस स्टेशनमध्ये कलम ३०४ (२) नुसार या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

सविस्तर वाचा...

13:01 (IST) 16 Nov 2022
Bharat Jodo Yatra : सोनिया गांधींच्या उपस्थितीत शेगावात काँग्रेसची ऐतिहासिक सभा होणार – नाना पटोले

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेली काँग्रेसची भारत जोडो पदयात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. ही पदयात्रा १८ नोव्हेंबर रोजी शेगावमध्ये पोहचल्यावर तिथे सभा होणार आहे. या सभेस काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली आहे. वाचा सविस्तर बातमी...

12:43 (IST) 16 Nov 2022
पुणे: एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महिला पोलीस अधिकारी निलंबित

एक लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात कोंढवा पोलिस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले. बातमी वाचा सविस्तर...

12:35 (IST) 16 Nov 2022
नागपूर: शिकवणी वर्गांकडून शिष्यवृत्ती, प्रवेश परीक्षांचे आमिष दाखवून पालकांची लूट

नागपूर : शासनाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने शहरात वेगाने वाढणाऱ्या शिकवणी वर्गांकडून आयआयटी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षेच्या नावावर गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश तर सामान्य विद्यार्थ्यांकडून लाखोंचे शुल्क आकारत फसवणूक केली जात असल्याचे चित्र आहे. बातमी वाचा सविस्तर...

12:13 (IST) 16 Nov 2022
डोंबिवली: तळ कोपर ते अप्पर कोपर रेल्वे स्थानका दरम्यान करण्यात येणार पादचारी पुलाची उभारणी

अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून पनवेल, वसई-विरार भागात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. हे प्रवासी ठाणे, कल्याण दिशेने तळ कोपर रेल्वे स्थानकात येऊन तेथून अप्पर कोपर रेल्व स्थानकात जाऊन तेथून इच्छित स्थळी प्रवास करतात. बातमी वाचा सविस्तर...

11:50 (IST) 16 Nov 2022
पुणे: राष्ट्रीय नदी सुधार प्रकल्प कक्षातील अभियंत्यांच्या बदल्या

राष्ट्रीय नदी सुधार प्रकल्पाला (जायका प्रकल्प) गती देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रकल्प अंमलबजावणी कक्षातील अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आधीच विविध कारणांनी रखडलेली ही योजना पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

बातमी वाचा सविस्तर...

11:49 (IST) 16 Nov 2022
पुणे: शनिवारवाडा परिसरातील दर्गा हटविण्याची हिंदू महासंघाकडून मागणी

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफजल खानाच्या कबर परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर आता पुण्यातील शनिवारवाडा परिसरातील मस्तानी दरवाज्यासमोरील हजरत ख्वाजा सैय्यद शाह पीर मकबूल हुसेनी दर्गा हटविण्यात यावा अशी मागणी हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी केली आहे. बातमी वाचा सविस्तर...

11:24 (IST) 16 Nov 2022
Shraddha Murder Case: “श्रद्धाचा खून विकृतीच्या पुढचं पाऊल”, संजय राऊतांचं विधान; आरोपीला भरचौकात फाशी देण्याची मागणी

वसईच्या श्रद्धा वालकर खून प्रकरणाने देशात खळबळ माजली आहे. या प्रकरणात रोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या खून प्रकरणातील मारेकऱ्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. “मारेकऱ्यावर खटले चालवू नका. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे त्याला भरचौकात फासावर लटकवा” असे राऊत यांनी म्हटले आहे.

सविस्तर बातमी वाचा...

11:16 (IST) 16 Nov 2022
पुण्याला सर्वोत्तम म्हणा ! देशातील सर्वोत्तम शहर ठरण्यासाठी महापालिकेची अधिकारी-कर्मचाऱ्यांना सक्ती

पुणे : वास्तव्यासाठी देशातील सर्वोत्तम शहर (इज ऑफ लिव्हिंग) ठरविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सकारात्मक अभिप्राय देणे आवश्यक असताना हा निकष पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने चक्क महापालिकेच्या अठरा हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सकारात्मक अभिप्राय देणे सक्तीचे केले आहे. बातमी वाचा सविस्तर...

11:15 (IST) 16 Nov 2022
ठाण्यातील भिवंडी शहरात गोवरची साथ; २७१ संशयित रुग्णांमध्ये ३७ रुग्ण गोवर रुबेला बाधीत

ठाणे : मुंबईत गोवर आजाराची साथ प्रचंड वेगाने पसरत असतानाच त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात गोवरची साथ पसरल्याचे समोर आले आहे. या आजाराचे २७१ संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये १०९ रुग्णांचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणीकरीता मुंबई येथील हाफकीन रिसर्च इन्स्टीट्यूट येथे पाठविण्यात आले असून त्यापैकी ३७ रुग्ण हे गोवर रुबेला बाधीत असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. बातमी वाचा सविस्तर...

आता विरोधकांकडून जितेंद्र आव्हाडांच्या अनंत करमुसे मारहाण प्रकरणाचा दाखला देत आव्हाडांवर टीकास्र सोडलं जात आहे. त्यामुळे आव्हाडांनी यावर खुलासा करणारं एक ट्वीट केलं असून त्यामध्ये अनंत करमुसे नावाच्या सोशल प्रोफाईलचे काही स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत.

Story img Loader