Mumbai Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद अद्यापही पाहण्यास मिळत आहेत. या निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीत धुसफूस चालू झाली आहे. मविआमधील नेते एकमेकांवरच टीका करू लागले आहेत. तर बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण अजून तापलं आहे. परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणाचेही पडसाद उमटत आहेत. या दोन घटनांमुळे जनता रस्त्यावर उतरली आहे. नव्या सरकारच्या पहिल्याच महिन्यात राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून काही विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, विरोधकांमध्येच अंतर्गत संघर्ष चालू असल्यामुळे त्यांच्या आंदोलनाची तीव्रता दिसून आलेली नाही. यासंदर्भात राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असेल. तसेच इतर सामाजिक व राजकीय बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Live Updates : महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक बातम्या.
नाशिक अपघातास कारणीभूत तिघांविरुध्द गुन्हा, सळई पुरवठादाराचाही समावेश
नाशिक : लोखंडी सळयांची धोकादायकपणे वाहतूक करुन अपघातास कारणीभूत ठरल्याने टेम्पो चालक, मालक आणि सळईंचा पुरवठादार अशा तीन जणांविरुध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टच्या अनधिकृत गाड्या, नाशिक मार्गावरही बेस्टच्या गाड्यांचा वापर; कंत्राट रद्द झालेल्या गाड्यांचा गैरवापर
मुंबई : बेस्टच्या बसगाड्यांची हद्द ही फक्त मुंबईच्या सीमेपर्यंतच असली तरी बेस्टचे बोधचिन्ह असलेल्या मिनी गाड्या नाशिक-कसारा मार्गावर दिसत चालवण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच मुंबईतही अनेक ठिकाणी बेस्टचे बोधचिन्ह असलेल्या गाड्या अनधिकृतपणे चालवल्या जात आहेत.
अभ्युदयनगर पुनर्विकासासाठी म्हाडाला विकासक मिळेना, प्रतिसादाअभावी चौथ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्कीच
मुंबई : काळाचौकी येथील अभ्युदयनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या निविदेला तिसऱयांदा मुदतवाढ देऊनही विकासकांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता निविदेला चौथ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की मुंबई मंडळावर आली आहे. त्यानुसार निविदेला आता ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
निर्यात शुल्कविरोधात कांदा उत्पादक आक्रमक, लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले
नाशिक : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क तत्काळ रद्द करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले.
नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी, पतंग महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हा
वसई : पतंग महोत्सवात नायलॉन मांज्याचा वापर केल्याप्रकरणी स्मार्ट सिटी च्या कन्सेपच्युल ॲडव्हायसरी सर्व्हिसेस विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी या परिसरातून जाणार्या दुचाकीस्वाराचा गळ्यात नायलॉन मांजा अडकून ते जखमी झाले होते.
गडचिरोली : धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
गडचिरोली : ‘फ्री फायर’ या ऑनलाईन गेमींगच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीवरून नाशिकच्या तरुणाने अहेरीत येऊन एका अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना १२ जानेवारीला उघडकीस आली. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
सर्वांना शिक्षण हक्क प्रक्रियेत ४०७ शाळा सहभागी
नाशिक : सर्वांना शिक्षण हक्क कायद्यातंर्गत समाजातील वंचित घटकातील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येता यावे यासाठी शालेय प्रवेशाकरिता मंगळवारपासून २७ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४०७ शाळा या प्रक्रियेत सहभागी झाल्या आहेत.
सविस्तर वाचा…
७४२ अंगणवाड्यांना वीज जोडणीची प्रतिक्षा, विशेष मोहिमेतंर्गत कार्यवाही
नाशिक : शासनाने अंगणवाडी केंद्रांना वीजजोडणी देण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या स्वमालकीच्या इमारतीतील अंगणवाडी केंद्रांना विद्युत जोडणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत एका महिन्यात विद्युत जोडणी नसलेल्या ३०३० पैकी आतापर्यत २२८८ अंगणवाड्यांना वीज जोडणी करण्यात आली असली तरी अद्याप ७४२ अंगणवाड्यांना जोडणीची प्रतिक्षा आहे.
हरसूल, त्र्यंबकेश्वर भागात घरफोडी करणारी टोळी ताब्यात
नाशिक : हरसूल आणि त्र्यंबकेश्वर भागात लुटमारीसह घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक करण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. विधीसंघर्षित बालकासह पाच जण ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून १७ हजार रुपये हस्तगत करण्यात आले.
Video : मादी बिबट्याने हरविलेले पिल्लू अलगद तोंडात धरून…
बिबट्याचे पिल्लू खेळता खेळता आईपासून वेगळे झाले. थोड्या वेळाने आई दिसत नसल्याने ते कासाविस झाले.
डोंबिवलीत ग प्रभागात फेरीवाला हटाव पथकाच्या वाहनावर दगडफेक
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानक भागात ग प्रभागात आणि फ प्रभागात फेरीवाल्यांना हटविण्याची जोरदार मोहीम सुरू आहे. या सततच्या कारवाईमुळे फेरीवाले संतप्त आहेत. ग प्रभागाची कारवाई सुरू असताना दोन दिवसापूर्वी अज्ञातांनी फेरीवाला हटाव वाहनाच्या दर्शनी भागावरील काचेवर दगड मारून काचेची तोडफोड केली.
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
ठाणे – फलाटावरील चुकीच्या उद्घोषणांमुळे उपनगरीय रेल्वेगाडी पकडण्यात होणारा गोंधळ मध्य रेल्वेवरील प्रवाशांना काही नवीन नाही. मात्र आता रेल्वे स्थानकातील चुकीच्या उद्घोषणांनंतर धावत्या लोकलमध्ये होणाऱ्या ” पुढील स्थानक ” अशा कानी पडणाऱ्या घोषणा देखील बहुतांश वेळा चुकीच्या होत असल्याने प्रवाशांचा चांगलाच गोंधळ उडत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे.
कल्याण-डोंबिवलीत मालमत्ता कर, पाणीपट्टी सवलतीची अभय योजना
कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेने मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवर चालू आर्थिक वर्षासाठी अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवर १५ जानेवारी २०२५ पर्यंत १०० टक्के दंड आणि व्याज, १६ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ पर्यंत ७५ टक्के दंड आणि व्याज माफ होणार आहे.
मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार, आधीच दिली होती सूचना तरीही…
मुंबई पोलिस भरतीत शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा ११ व १२ जानेवारी रोजी घेण्यात आली.
‘एमपीएससी’च्या समाज कल्याण अधिकारी पदाचा निकाल जाहीर, मात्र केवळ ‘या’ उमेदवारांना मुलाखतीची संधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या पदांच्या परीक्षांना सुधारित आरक्षण निश्चितीसाठी स्थगिती देण्यात आली होती.
अमित शहां यांना अनिल देशमुखांचे चोख उत्तर म्हणाले,”शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा भाजपच दगाबाज ”
नागपूर : भाजपने सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना फोडली, त्यावर समाधान झाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. महाविकास आघाडीचे सरकार पाडले आणि अडीच वर्ष सत्ता उपभोगली. भाजप हाच सर्वांत मोठा दगाबाज पक्ष आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे ( शरद पवार) नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर केली.
कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ५०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त
कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील व्यापारी, दुकानदार, विक्रेते अधिक प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करत असल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत कल्याण डोंबिवली पालिका आणि प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाजार समिती आवारात अचानक छापे टाकून दुकानदारांकडून ५०० किलो प्रतिब्ंधित प्लास्टिक जप्त केले.
नांदुरी-सप्तश्रृंगी गड रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत
नाशिक : सप्तशृंगी गड विकास आराखडा योजनेतून चार महिन्यांपासून सुरू असलेले सप्तशृंगी गड- नांदुरी घाट मार्गातील कड्याकडील बाजूस दरड प्रतिबंधक जाळी लावण्याचे काम पूर्ण झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे.
“पप्पांना रस्त्यावरून उचललं, आता काकाला…”, संतोष देशमुखांच्या लेकीचा सरकारला संतप्त प्रश्न
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर ३५ दिवस उलटल्यानंतरही देशमुख कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे देशमुख कुटुंबीयांसह मस्साजोग गावात प्रचंड आक्रमकता आहे . संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावातील उंच टाकीवर चढून आंदोलन केलं. गावातील महिला आंदोलकांनी संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयीत असल्याने टाकीवर चढत आक्रोश व्यक्त केला. दरम्यान, संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने सरकारला संतप्त प्रश्न विचारला आहे. माझ्या पप्पांना वडिलांना तर रस्त्यावरून उचलून नेलं. आता काकाला काही झालं तर कोण जबाबदार? प्रशासन नक्की करतंय काय? आज माझे पप्पा गेले. काकाला गमावलं तर आम्ही काय करायचं? आज काका टाकीवर चढलाय, आरोपींना अटक झाली नाही तर आमचं संपूर्ण कुटुंब टाकीवर जाईल.
मुलांना नायलॉन मांजा देणारे पालकही कारवाईच्या फेऱ्यात
नाशिक : पतंगोत्सवात नायलॉन मांजाचा वापर रोखण्यासाठी प्रतिबंधित मांजाची विक्री करणाऱ्यांवर हद्दपारीची कारवाई केल्यानंतर शहर पोलिसांनी आता या मांजाने पतंग उडवणाऱ्या मुलांसह त्यांना नायलॉन मांजा खरेदी करुन देणाऱ्या पालकांवर थेट कारवाईचे सत्र सुरु केले आहे.
मुंबईच्या वेशीवर जड-अवजड वाहनांकडून २०२७ नंतरही पथकर वसुली?
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईच्या वेशीवरील पाच पथकर नाक्यांवर हलक्या वाहनांना, शाळांच्या बस आणि एसटी गाड्यांना पथकर माफी देण्यात आली. या निर्णयानुसार पथकर वसुलीचा कालावधी संपेपर्यंत पथकर माफीमुळे पथकर वसूल करणाऱ्या कंपनीला नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थी व पालकांना अनेक अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून ‘तिकीट सिस्टिम’ ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
अंधेरीतील झोपु योजनेत मृत व्यक्तींच्या नावे पात्रता! आणखी सहा झोपडीवासीयांची पात्रता रद्द
मुंबई : अंधेरीतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घर मिळालेल्या झोपडीवासियांच्या नावे पुन्हा नव्याने पात्रता करून घेऊन घरे लाटण्याच्या घोटाळ्यात आणखी सहा बोगस झोपडीवासियांची पात्रता रद्द करण्यात आली आहे.
मुंबई : बेस्ट बसचा प्रवास रखडला, प्रवासी बस थांब्यावरच उभे
मुंबई : बेस्ट उपक्रमातील भाडेतत्त्वावरील वाहक, चालकांचे विविध आर्थिक मागण्यांसाठी सोमवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. त्याचा थेट फटका बेस्ट प्रवाशांना बसला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून धारावी, प्रतीक्षानगर आगारातून बस चालवण्यात येत नसल्याने प्रवासी खोळंबले आहेत. विविध बस थांब्यावर शेकडो प्रवासी बसची वाट पाहात उभे राहिले आहेत.
खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…
थ्री इडियट हा कमालीचा लोकप्रिय ठरलेला चित्रपट. नवनवे कीर्तिमान स्थापन करणाऱ्या या चित्रपटातील ‘रँचो’ म्हणजे फुंगसूक वांगडूची मध्यवर्ती भूमिका खूपच गाजली होती.
राष्ट्रीय महामार्गांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, मुख्यमंत्र्यांचे गडचिरोलीला ‘स्टील सिटी’ बनवण्याचे…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना गडचिरोलीचा चौफेर विकास करून ‘स्टील सिटी’ बनवू असे आपल्या भाषणात सांगितले.
चंद्रपूर जिल्हा बँकेची वादग्रस्त नोकर भरती: आजपासून मुलाखत
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पदभरती अगदी पहिल्या पासूनच वादात सापडली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ जानेवारीला महाराष्ट्रात येणार
Prime Minister @narendramodi to visit Maharashtra on 15th January
— PIB India (@PIB_India) January 13, 2025
PM to dedicate three frontline naval combatants INS Surat, INS Nilgiri, and INS Vaghsheer to the nation at the Naval Dockyard, Mumbai
PM to inaugurate ISKCON Temple at Kharghar, Navi Mumbai
Read here:…
पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ जानेवारीला महाराष्ट्रात येणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ जानेवारीला महाराष्ट्रात येणार
https://x.com/PIB_India/status/1878686321331597557