Maharashtra Monsoon Weather Updates in Marathi : महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती तयार झाली आहे. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणं जलमय झालीत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पूरग्रस्त भागाचा आढावा घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत. या ठिकाणांहून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी देखील पोहचवण्यात येत आहे. राज्यातील पावसासह इतर सर्वच घडामोडींचा एकाच ठिकाणी आढावा…
Maharashtra Live Updates 12 July 2022 : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट
अनेक राजकीय घडामोडींनंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. मात्र, त्यानंतर देखील नाट्यमय घडामोडी संपण्याचं नाव घेत नाहीयेत. शिवसेना खासदार संजय राऊत हे बंडखोर आमदारांच्या निशाण्यावर आले आहेत. संजय शिरसाट, दीपक केसरकर, शहाजीबापू पाटील, अब्दुल सत्तार अशा अनेक बंडखोर आमदारांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. टीकेचं हे सत्र अद्याप कायम आहे. सविस्तर बातमी
सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी वेगवेगळे फंडे वापरताना दिसत आहेत. वेगवेगळे मेसेज आणि लिंक पाठवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. यात अशिक्षित नागरिकांचाच समावेश नाही, तर अगदी सुशिक्षित, उच्चशिक्षित नागरिकांनाही गंडा घातला जात आहे. असाच एक प्रकार जालन्यात उघड झालाय. सायबर गुन्हेगारांनी एका महिला प्राध्यपिकेची ऑनलाईन वीज बिल भरण्याच्या नावाखाली २ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
सलग पाचव्या दिवशी पडत असलेल्या मुसळधार पावसाने चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाची तीन दारे उघडण्यात आली आहेत. ०.२५ मीटर्सने उघडलेल्या तीन दारातून ५१ क्युसेक एवढा जलविसर्ग होत आहे. इरई नदी व पुढे वर्धा नदीच्या तीरावरील वसाहती व गावांना अती सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात ४८ मिलिमीटर (मिमी) सरासरी पावसाची नोंद, बल्लारपूर राजुरा व जिवती या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील दहापैकी पाच सिंचन प्रकल्प काठोकाठ भरले आहेत, तर इरई धरणही ८६ टक्के भरले आहेत.
पुढील तीन महिन्यांचा पाऊस काळ बघता धरणातून विसर्गाला सुरुवात झाली. सलग पाचव्या दिवशी पडत असलेल्या मुसळधार पावसाने चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाची तीन दारे उघडण्यात आली आहेत. ०.२५ मीटर्सने उघडलेल्या तीन दारातून ५१ क्युसेक एवढा जलविसर्ग सुरू आहे. इरई नदी व पुढे वर्धा नदीच्या तीरावरील वसाहती व गावांना अती सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात ४८ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. बल्लारपूर राजुरा व जिवती या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील दहापैकी पाच सिंचन प्रकल्प काठोकाठ भरले आहेत. इरई धरणही ८६ टक्के भरले आहेत. पुढील तीन महिन्यांचा पाऊस काळ बघता धरणातून विसर्गाला सुरुवात करण्यात आली आहे.
दोन दिवसापासून धुळे जिल्ह्यासह साक्री तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे उपनद्यांना देखील मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. त्याचा परिणाम अक्कलपाडा धरणातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अक्कलपाडा धरणाचे १७ दरवाजे उघडण्यात आले. त्यातून सुमारे २२ हजार क्युसेस जलप्रवाह पांझरा नदीत सोडण्यात आला आहे. धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारीच्या सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
तसेच पांझरा नदीवरील अक्कलपाडा मध्यम प्रकल्प व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत गेल्या २४ तासांत वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत पाणीपातळी सतत वाढत आहे. हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील ४८ तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पांझरा नदीच्या काठावरील गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. पांझरा नदी काठावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात गुरे-ढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावेत, असे आवाहन धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा एकदा कुलाबा वांद्रे मेट्रो ३ चा कार्यभार देण्यात आला आहे. याआधी फडणवीस सरकारच्या काळातही ही जबाबदारी त्यांच्याकडे होती. मात्र, सत्तांतरानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती. राज्य सरकारने याशिवाय आणखी काही अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत.
शिंदे गट वेगळा होऊन राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर ठाण्यातील राजकीय घडामोडींनाही मोठा वेग आला आहे. परंतू, मुळ शिवसैनिक बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील पहिल्या महिला शिवसैनिक अनिता बिर्जे या शिवसेनेतच असल्याची माहिती समोर आली आहे. नुकत्याच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सविस्तर वाचा बातमी…
नवीन संसद भवनावर उभारण्यासाठी तयार केलेल्या राष्ट्रीय बोधचिन्हाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी अनावरण करण्यात आले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह आणि नगरविकास मंत्री हरदीप सिंह यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यानंतर विरोधी पक्षांनी पंतप्रधानांवर टीकेची झोड उठवली आहे. या कार्यक्रमासाठी इतर पक्षांना आमंत्रित करण्यात आलं नाही याबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त करतानाच पंतप्रधानांची ही कृती असंवैधानिक, सर्व धर्मसमभाव धोरणाला अनुसरुन, संघराज्यवादाला शोभणारी नसल्याची टीका केली जातेय. येथे वाचा सविस्तर वृत्त.
शिंदे गटातील बंडखोर आमदार संतोष बांगर यांना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आल्यानंतर त्यांनी मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. संतोष बांगर आपल्या समर्थकांसह आज सकाळी मुंबईत दाखल झाले. यानंतर मुंबईत सह्याद्री अतिथीगृहाबाहेर समर्थकांसह शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारदेखील हजर होते. एकनाथ शिंदे यांनी संतोष बांगरच जिल्हाप्रमुख असतील असं जाहीर करत थेट उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला आव्हान दिलं.
सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीकडे ओबीसी समाज लक्ष ठेऊन होता. सुनावणी पुढे ढकलली गेली आहे. पण ठरलेल्या निवडणुका होणं क्रमप्राप्त असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. या पार्श्वभूमीवर या निवडणुकांना तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करेन. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत निवडणुका स्थगित कराव्यात. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासोबतच या निवडणुका व्हायला हव्यात. या बाबतीत कोणतीही तडजोड केली जऊ नये.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपा एकत्र येण्याची चर्चा रंगू लागलं आहे. यावर बोलताना भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
करोना काळात वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या ‘मेट्रो १’ मार्गिकेवरील कमी झालेली प्रवासी संख्या हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. आजघडीला ‘मेट्रो १’मधून प्रतिदिन तीन लाख १५ हजार प्रवासी प्रवास करू लागले असून करोनाकाळात दूरावलेले प्रवासी पुन्हा ‘मेट्रो १’मधून प्रवास करतील, असा विश्वास मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या (एमएमओपीएल) अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
काही दिवसांपासून रोज येणाऱ्या पावसामुळे शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. अशाच एका ठिकाणी काही नागपूरकरांनी बोट चालवण्याचा आनंद लुटला. काहींनी या मुद्यावरून भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीकाही केली.
कल्याण येथून मंगळवारी सकाळी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या एका जलद वातानुकूलित लोकलचे दरवाजे दादर स्थानकात उघडलेच नाहीत. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने पुढील स्थानकात उतरावे लागले. या घटनेची चौकशी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.कल्याण येथून सकाळी ६.३२ वाजता सीएसएमटीला जाणारी जलद लोकल सुटते. वाचा सविस्तर बातमी…
डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसीतील आयसीआयसीआय बँकेची याच बँकेतील जनसंपर्क व्यवस्थापक आणि त्याच्या साथीदारांनी बँक खातेदारांच्या व्यवहारात बेकायदा आर्थिक उलाढाली करून बँकेची आणि खातेदारांची तीन कोटी ५७ लाख ४९ हजार १४१ रुपयांची फसवणूक केली आहे. वाचा सविस्तर बातमी…
कल्याण तालुक्यातील टिटवाळा शहरा जवळील रूंदे गाव नदीवरील पूल मुसळधार पावसाच्या लोंढ्याने पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे परिसरातील आठ ते १० गावांचा कल्याण, टिटवाळा शहरांशी असलेला संपर्क तुटला आहे. पुरामुळे पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
मागील काही काळापासून महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा गोंधळ सुरू आहे. आज सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी झाली असून निवडणूक आयोगाला आपली बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. तसेच बांठिया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला असून येत्या १९ जुलैला त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १९ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीत मध्य प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्राला देखील ओबीसी आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. सविस्तर बातमी
कल्याण-शीळफाटा रस्त्यावरील मानपाडा, काटई नाका, काटई टोल नाका ते पलावा चौक दरम्यान रस्त्यांवर अधिक संख्येने खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे या मार्गिकेवर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियोजना बरोबर खड्डे भरण्याची कामे सुरू केली आहेत.
उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी जवळील इंडियन ऑइलच्या डेपोतून एकूण २४ हजार लिटर पेट्रोल आणि डिझेल घेउन टँकर निघाला होता. तो टँकर सोलापूरच्या दिशेने फ्लाय ओव्हेर पुलादरम्यान सर्व्हिसरोड वरून जात असताना अचानक टँकर चालकाच्या केबिनला आग लागली. टँकर चालकाने अगीचा अंदाज घेत गाडी थांबावली आणि टँकर बाहेर पडला. क्षणार्धाथ पूर्ण केबिन पेटले. त्यामुळे संपूर्ण परिसरात कांही काळ भीतीचे वातावरण ही पसरले होते. याची माहिती अग्निशामक दलाला मिळतास अग्निशामक दलाचे जेवण घटनास्थळी दाखल झाले आणि मोठा अनर्थ होण्यापासून वाचला.
जानेवारी ते जून २०२२ या काळात लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाईनवर महिला प्रवाशांनी एकूण दोन हजार १७५ तक्रारी केल्या आहेत. यामध्ये १,४४४ तक्रारी या हरवलेल्या बॅगा आणि आरक्षित डब्यातील पुरुष प्रवाशांच्या घुसखोरीविषयी आहेत.
(०२५१) २२०११६८ या हेल्प लाइनवर नागरिकांनी पालिका हद्दीतील खड्ड्यांच्या तक्रारी, निवेदने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे पालिकेच्या जनसंपर्क विभागाने जाहीर केले आहे. जुलै उजाडला तरी खड्ड्यांच्या निविदा प्रक्रियेत अडकलेल्या शहर अभियंता विभागाला टिकेच्या रोषा पासून वाचविण्यासाठी प्रशासनाने कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती, तक्रारी, निवेदने देण्यासाठी हेल्प लाइन क्रमांक जाहीर केला आहे.
गेल्या काही दिवसात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठ्यात चांगली वाढ झाली असून सातही तलावांमधील जलसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे पाणी तुटवड्याची चिंता काही प्रमाणात मिटली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात जानेवारी २०२३ मध्ये होणाऱ्या १०८ व्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’च्या तयारीसाठी ‘इस्का’च्या चमूने विद्यापीठातील पायाभूत सुविधा, कार्यक्रमाचे स्थळ, चर्चासत्रांचे सभागृह आदी सुविधांची पाहणी केली. यावेळी अमरावती मार्गावरील विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरामध्ये ही परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला. वाचा सविस्तर बातमी…
अमरावती जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी कॉलराचा उद्रेक झाल्याचे आढळले आहे. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला, तर ३२२ जणांना कॉलराची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यत सात ठिकाणी कॉलराचा उद्रेक झाला आहे.
शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी सोमवारी रत्नागिरीत झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलताना बंडखोर आमदारांवर टीका केली आहे.
घरातील भाजीच्या टोपलीत अत्यंत विषारी घोणस साप दडून बसल्याचे शहरातील अकोट फैल परिसरात आढळून आले. सर्पमित्र बाळ काळणे यांनी शिताफीने त्या सापाला पकडून कुटुंबाला भयमुक्त केले. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, सर्वत्र पाणी साचल्यामुळे घरांमध्ये साप आढळण्याच्या घटना वाढल्या आहेत. वाचा सविस्तर बातमी…
आषाढी एकादशीनिमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी केलेल्या पोस्टवरुन सध्या भाजपाचे आमदार नितेश राणे आणि युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांच्यामध्ये सोशल मिडीयावरच बाचाबाची झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. नितेश राणे यांनी यांनी ट्विटरवरुन आषाढी एकादशीच्या दिवशी पावणेसातच्या सुमारास राहुल गांधींनी आषाढी एकादशीनिमित्त साध एक ट्वीटही केलं नसल्याचं सांगत राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं. मात्र नितेश यांच्या याच ट्विटखाली अनेकांनी राहुल गांधींच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन मराठीमध्ये आषाढीनिमित्त पोस्ट करण्यात आल्याचे स्क्रीनशॉट पोस्ट केले. यामध्ये श्रीनिवास यांनीही नितेश यांना टोला लगावत रिप्लाय दिला आणि तिथूनच या दोघांमध्ये वाद सुरु झाला. येथे वाचा सविस्तर वृत्त
‘एकनाथ शिंदेंप्रमाणे आमदार फोडा आणि मुख्यमंत्री व्हा’ अशी ऑफर छत्तीसगडचे कोसळा व्यापारी सूर्यकांत तिवारी यांना आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचा धक्कादायक आरोप केले जात आहेत. आयकर विभागाचे छापे पडल्यानंतर सूर्यकांत यांनीच हे आरोप केले आहेत. राज्यामध्ये सत्तांतर घडवून आणण्याचा कट रचला जात असून छापेमारीच्या माध्यमातून हे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप सूर्यकांत यांनी केला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त
राज्यात सुरु असणाऱ्या सततच्या पावासामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पुढे ढकलण्यात आलाय. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच पत्र लिहून यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. सध्याची पावसाची स्थिती पाहता मी उद्या जो कार्यक्रम तुम्हाला सांगणार होतो तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणं फार अवघड आहे, असं राज यांनी पत्रात म्हटलंय. येथे वाचा राज यांचं संपूर्ण पत्र...
कुलाबा-वांद्रे-सीप्झदरम्यानच्या ‘मेट्रो ३’ प्रकल्पासाठी आरे परिसरातच कारशेड उभारण्याचा निर्णय नव्याने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला असून, त्याला विरोध करण्यासाठी पुकारलेल्या ‘आरे वाचवा’ आंदोलनात लहान मुलांचा वापर करून बाल न्याय कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. या प्रकरणी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तात्काळ कारवाई करण्याचे आदेश राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिले आहेत. मात्र आदित्य ठाकरेंविरोधात कारवाई करण्याच्या या आदेशांवरुन भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केलीय. येथे वाचा सविस्तर वृत्त
नागपूर पोलिसांनी अनेक राज्यांमध्ये घरफोडी करणाऱ्या एका हायटेक टोळीला अटक केली आहे. ही टोळी महागड्या कार आणि वॉकी-टॉकी वापरून घरफोड्या करीत होती. या टोळीने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्येही घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. या टोळीने २६ जून रोजी नागपुरात चार-पाच ठिकाणी घरफोड्या केल्या. त्याचा तपास करताना नागपूर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या.
महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पूरग्रस्त भागाचा आढावा घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत.