Maharashtra Breaking News Live: राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू झालं असून आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांत किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओ क्लिपप्रकरणी सभागृहात विरोधकांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली. तसेच, नीलम गोऱ्हेंनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांच्यावरील अपात्रतेच्या मागणीचा मुद्दाही अधिवेशनात गाजला. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना अधिवेशनात पाहायला मिळत आहेत.

Live Updates

Mumbai Maharashtra Latest News Live: किरीट सोमय्या कथित व्हिडीओ प्रकरणावरून अधिवेशनात विरोधक आक्रमक!

17:16 (IST) 19 Jul 2023
खताच्या किमती आणि बोगस बियाणाच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक, अजित पवार म्हणाले, "केंद्र सरकारकडून..."

महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोगस बियाणे आणि खतांच्या वाढत्या किमतीचा मुद्दा उपस्थित करत विरोधक आक्रमक झाले. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारला जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. "केंद्र सरकारने यावर्षी खताच्या किमती मर्यादित रहाव्यात यासाठी १ लाख ३० हजार कोटी रुपयांची सबसिडी दिली आहे," अशी माहिती अजित पवारांनी दिली. त्यांनी बुधवारी (१९ जुलै) अधिवेशनात बोलताना ही माहिती दिली.

सविस्तर वाचा...

17:16 (IST) 19 Jul 2023
आदित्य ठाकरेंकडून भ्रष्टाचाराचे आरोपानंतर 'या' प्रकरणात शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय

शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेतील स्ट्रीट फर्निचर कंत्राटात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप करत हे कंत्राट रद्द करण्याची मागणी केली. यानंतर आता राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मोठा निर्णय घेतला. यानुसार, स्ट्रीट फर्निचर कंत्राट रद्द केलं आहे.

सविस्तर वाचा...

17:15 (IST) 19 Jul 2023
"माझ्याकडे अनेकांनी पेनड्राईव्ह मागितला, मात्र मी...", सोमय्यांच्या VIDEO प्रकरणी दानवेंचा हल्लाबोल

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओवरून पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. साधनसुचितेचा पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजपाने अद्यापही किरीट सोमय्यांवर कारवाई केलेली नाही असा मुद्दा उपस्थित केला. तसेच सोमय्यांच्या जागेवर इतर सामान्य कार्यकर्ता असता तर काय झालं असतं हेही नमूद केलं. ते बुधवारी (१९ जुलै) विधिमंडळाच्या बाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

सविस्तर वाचा...

17:14 (IST) 19 Jul 2023
सोमय्यांच्या VIDEO वर आव्हाडांचं ट्वीट, त्यावर मुलगी म्हणाली, "बाबा, जेव्हा तुम्ही..."

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. यानंतर याचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. विरोधकांनी या व्हिडीओवरून जोरदार शाब्दिक हल्ले चढवले. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली. तसेच व्यक्तिगत हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे, या प्रकाराचा निषेध करतो, असं आव्हाडांनी म्हटलं. त्यांच्या याच ट्वीटवर त्यांची मुलगी नताशा आव्हाडने प्रतिक्रिया देत सोमय्यांबाबतचा एक अनुभवाला सांगितला.

सविस्तर वाचा...

15:49 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: मी वंदे मातरम म्हणू शकत नाही कारण... - अबू आझमी

'वंदे मातरम'बद्दल मला आदर आहे, पण मी वंदे मातरम म्हणू शकत नाही, कारण... - अबू आझमी

https://twitter.com/ANI/status/1681605780011888641

15:30 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: उद्धव ठाकरेंनी अजित पवारांची भेट घेतली

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

https://twitter.com/ANI/status/1681599264856866816

15:28 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: खताच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्राचं अनुदान...!

"देशात खताच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं १ लाख ३० हजार कोटी अनुदान दिलेलं आहे. राज्यात बोगस बियाणे आणि खतांची विक्री करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी राज्य सरकार कडक कायदा तयार करणार आहे", अजित पवार

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1681589026669854722

15:26 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: "अजित पवार संबंध जपण्यात हुशार दिसतात!"

" उद्धव ठाकरे विधान भवनात जाऊन फक्त अजित पवारांना भेटले, अजित पवार संबंध जपण्यात हुशार दिसतात", निलेश राणेंचं खोचक ट्वीट!

https://twitter.com/meNeeleshNRane/status/1681592574891692032

13:56 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: नाना पटोलेंची राज्य सरकावर आगपाखड

राज्यातलं सरकार शेतकरी विरोधी आहे. ही बाब आज सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध करत आम्ही सभात्याग केला. हे सरकार बेशरम असून गेंड्याच्या कातडीपेक्षाही जाड कातडं पांघरून बसलंय - नाना पटोले

13:50 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: तुम्ही शेतकऱ्यांना मदत करणार का - दानवे

दुबार आणि तिबार पेरणीसाठी शासन शेतकऱ्यांना मदत करणार आहे का? तसेच शिक्षक अभियोग्यता चाचणी झालेल्या सर्व शिक्षकांना न्याय सरकार देणार आहे का? - अंबादास दानवेंची विधान परिषदेत विचारणा

https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1681576846717243393

13:48 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: रोहित पवारांनी विद्यार्थ्यांचा मुद्दा केला उपस्थित...

वेबसाईट हँग होत असल्याने काल अखेरच्या दिवशी असंख्य युवांना तलाठी भरतीचे फॉर्म भरता आले नाहीत. त्यासाठी फॉर्म भरण्यास १५-२० दिवस मुदतवाढ देण्याचा मुद्दा कालच्याप्रमाणेच आजही विधानसभेत मांडत सरकारचं याकडं लक्ष वेधलं. यासंदर्भात मा. महसूलमंत्र्यांना विनंती केल्याचं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलं..

https://twitter.com/RRPSpeaks/status/1681570466291503105

13:31 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: विधानसभेचं कामकाज पुन्हा सुरू

विधानसभेचं कामकाज पुन्हा सुरू

13:16 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: आफताब पूनावालाच्या मुद्द्यावरून विधानसभा १० मिनिटांसाठी तहकूब

सपाचे आमदार अबू आझमी यांनी 'आफताब पूनावालाच्या नावाने समस्त मुस्लीम समाजाला बदनाम केलं जात आहे', असा मुद्दा मांडताच सभागृहात गोंधळ झाला. त्यामुळे अध्यक्षांनी १० मिनिटांसाठी कामकाज स्थगित केलं.

13:05 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: बालभारतीचे डोमेन विकणे आहे?

शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बालभारतीचे डोमेन दोन हजार यूएस डॉलर्समध्ये विकणे आहे, अशी जाहिरात गूगलवर झळकली आहे. या जाहिरातीमुळे शालेय शिक्षण विभागात सध्या सुरू असलेला सावळागोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या डोमेनच्या नूतनीकरणाची पुढील पाच वर्षांची प्रक्रिया फेब्रुवारी २०२३ मध्ये केली असताना असा गंभीर प्रकार कसा काय घडू शकतो? हा फसवणुकीचा किंवा हॅकिंगचा प्रकार आहे का? याबाबत शासनाने तातडीने चौकशी करावी अशी मागणी आज विधानसभेत केली. - वर्षा गायकवाड

https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1681567161612107777

12:55 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: आंबा उत्पादकांना मदतीचा मुद्दा...

कोकण विभागात बदलणारे हवामान, अवकाळी पाऊस, तुडतुडा रोग यामुळे आंबा बागायतदार अडचणीत सापडला होता, यावर्षी दहा टक्के पेक्षा जास्त पीक हाती आले नाही. त्यामुळे आंबा उत्पादकांना सरकारने मदत करावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी दिले होते, याकडे लक्ष वेधून सरकारने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना विशेष पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी करणारा तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित केला.

https://twitter.com/ShelarAshish/status/1681564407955075073

12:44 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: “…आता त्यांना केक खायला घाला”, देवेंद्र फडणवीस व भास्कर जाधवांमध्ये प्रश्न विचारण्यावरून कलगीतुरा!

भास्कर जाधव म्हणतात, “मला वाटतं तुम्ही खासगीत अध्यक्षांना काही सांगून ठेवलंय का? मला माहिती नाही. ते जर सांगून ठेवलं असेल तर…!”

वाचा नेमकं काय घडलं!

12:39 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल

ठाकरे गटाचे प्रमुख व विधानपरिषद सदस्य उद्धव ठाकरे पावसाळी अधिवेशनासाठी सहभागी होण्यासाठी विधानभवनात दाखल झाले आहेत.

12:03 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: विधानसभेत फडणवीस-जाधव कलगीतुरा!

अशा प्रकारे अध्यक्षांवर हेत्वारोप करू नये, तुम्ही वरीष्ठ सदस्य आहात - देवेंद्र फडणवीसांचा भास्कर जाधवांवर आक्षेप!

11:48 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: केंद्र सरकारने १ लाख ३० कोटींची सबसिडी दिली - अजित पवार

केंद्र सरकारने यंदा खताच्या किंमती मर्यादित राहाव्यात यासाठी १ लाख ३० कोटींची सबसिडी दिली आहे - अजित पवार

11:41 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: मुसळधार पावसाबाबत राज्य सरकारनं दिल्या सतर्कतेच्या सूचना...

कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून नदीनं धोक्याची पातळी गाठली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे, या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडून चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. हवामान खात्यानं येत्या चार दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, या दृष्टिकोनातून जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना तातडीनं कराव्यात, मदतकार्य तसंच आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम तैनात ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत - अजित पवार

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1681542914487246848

11:35 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: आधी विरोधी पक्षनेतेपदाचा प्रश्न मिटवा - आशिष शेलार

विरोधी पक्षनेतेपदासाठी यांचा सगळा गोंधळ चालू आहे. मीच विरोधी पक्षनेता असल्याचं यांचं म्हणणं आहे. विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा आधी मिटवा - आशिष शेलार यांनी मुद्दा उपस्थित करताच सभागृहात गोंधळ

11:33 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: बोगस बियाण्यांबाबत धनंजय मुंडेंची मोठी घोषणा

बोगस बियाण्यांना आवर घालण्यासाठी याच अधिवेशनात कठोर कायदा आणला जाईल - कृषीमंत्री धनंजय मुंडे

11:31 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: केंद्रानं नफेखोरी केली - थोरात

सबसिडी कमी करून केंद्र सरकारने बियाण्यांच्या व्यवहारात नफेखोरी केली - थोरात

11:26 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: खतांच्या किमतींवरून विधानसभेत खडाजंगी

काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती कमी झालेल्या असताना राज्यातही २० टक्के किमती कमी करणार का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी गेल्या वर्षीच्या किमतींशी तुलना करताच विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला.

11:14 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: निधी वाटपात भेदभाव?

कृषी निधीसंदर्भात भेदभाव का केला जातो या यशोमती ठाकूर यांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांकडून असा कोणताही भेदभाव केला जात नाही, असा दावा करण्यात आला आहे.

11:10 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: "..तोपर्यंत आदित्य ठाकरे जेलबाहेर राहतील का?"

आज मुंबईत उद्धव ठाकरेंची काय ताकद राहिलीये ती येणाऱ्या पालिका निवडणुकीत दिसेल. तुकडे-तुकडे गँगची बैठक मुंबईत होईपर्यंत उद्धव ठाकरेंचा मुलगा जेलच्या बाहेर राहील की नाही? हा प्रश्न आहे - नितेश राणे

10:58 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: उद्धव ठाकरे आज विधानपरिषदेत हजर राहणार?

बंगळुरूत विरोधी पक्षांची बैठक मंगळवारी पार पडली आहे. त्यामुळे आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे विधानपरिषद सदस्य म्हणून आज अधिवेशनात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच, आदित्य ठाकरेही विधानसभेत उपस्थित राहतील, असं सांगितलं जात आहे.

10:51 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: ... तर भाजपाच्या १०५ आमदारांसाठी विधानसभेच्या बाहेर खुर्च्या लावाव्या लागतील - सचिन अहिर

मी आमदार असताना १५ वर्षांत सुधीर मुनगंटीवारांचे शापही ऐकले, आशीर्वादही ऐकले. प्रश्नाकडे आकर्षित करण्याची त्यांची एक पद्धत आहे. पण इकडचेही आमदार जर तिकडे गेले, तर त्यांच्या १०५ आमदारांसाठी विधानसभेच्या बाहेर खुर्च्या लावाव्या लागतील त्यांना. त्यामुळे त्यांनी आधी त्यांचा विचार करावा - सचिन अहिर

10:46 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली आहे.

10:46 (IST) 19 Jul 2023
Monsoon Session 2023: सचिन अहिर यांची नीलम गोऱ्हे प्रकरणी आक्रमक प्रतिक्रिया

ही बाब तालिका अध्यक्ष व विधानपरिषदेच्या सचिवालयाच्या हातात असेल. आज ते कदाचित निर्णय जाहीर करतील असं दिसतंय. योग्य निर्णय झाला नाही, तर आम्ही राज्यपालांकडे जाऊ. घटनात्मक पदावरील व्यक्तीने असं काही केलं, तर संपूर्ण देशाचा राज्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो, हे आम्हाला सगळ्यांसमोर आणायचं होतं. त्यात आम्ही यशस्वी झालो आहोत - सचिन अहिर

 

Mumbai Maharashtra Latest News Live: नीलम गोऱ्हेंवरील अपात्रतेच्या कारवाईसाठी विरोधक अधिवेशनात आक्रमक!

Story img Loader