Maharashtra Political News Updates : महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात आज पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करतील. एका बाजूला मोठमोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी गेल्या तीन चार दिवसात अतिवृष्टीदेखील झाली आहे. पुढील ७२ तासात राज्यात मान्सून अतिसक्रिय असेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे आपण राज्यातल्या राजकीय घडामोडी, पावसाच्या बातम्या आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. याचबरोबर, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची एक मुलाखत प्रसारित करण्यात आली आहे. या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. त्यावर आज दिवसभरात राजकीय प्रतिक्रिया येऊ शकतात. या प्रतिक्रियादेखील आपण पाहणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Maharashtra Weather Live News Update : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी १५ ऑगस्टपासून राज्यात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होईल असे सभागृहात सांगितले. सविस्तर वाचा…
अमरावती: पिकांच्या उत्पादन वाढीसोबतच प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे यांना अचानक मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागल्याने त्यांचं मानसिक खच्चीकरण झालंय, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. पडळकर त्यांचे जवळचे सगळे सहकारी त्यांना सोडून गेले आहेत. दर दोन-चार दिवसाला कोणता ना कोणता सहकारी त्यांची साथ सोडतोय. त्यामुळे त्यांची मानसिकता आपण समजू शकतो. त्यामुळे आता त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व राहिलंय, असं मला वाटत नाही.”
अमरावती: टपाल कार्यालयाने टाटा एआयजी आणि बजाज अलायन्स या दोन विमा कंपन्यांसोबत एकत्रित येऊन अपघात विमा योजना आणली आहे.
येथील एमआयडीसीतील लोकमान्य गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांनी मंगळवारी डोंबिवली जवळील दावडी गावातील शेतावर जाऊन भात लागवडीचा अनुभव घेतला. क्षेत्रिय भेटीच्या माध्यमातून शाळेने हा उपक्रम आयोजित केला होता. सविस्तर वाचा
मुख्यमंत्रीपदावरून राष्ट्रवादीकडून गेले दोन आठवडे सातत्याने संभ्रम निर्माण केला जात असतानाच मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच कायम राहतील, असा निर्वाळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने शिंदे गटातील अस्वस्थता दूर झाली आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे २०१९-२० मधील एमबीबीएसच्या मागास व आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शिष्यवृत्तीसाठीच्या अंतिम तारखेच्या चार दिवस अगोदर महाविद्यालयाने शुल्क भरण्यासंदर्भातील नोटीस जाहीर केली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शुल्क भरून महाडीबीटीवर शिष्यवृत्तीचा अर्ज भरणे शक्य झाले नाही. परिणामी, जवळपास ७० ते ८० विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत.
महापालिकेवर ४५० कोटींचा बोजा असेल तर जनतेला सुविधा मिळणार कशा, महानगर पालिका जनतेला सुविधा देत नसेल तर जनतेनेही मालमत्ता कर का भरावा, असे प्रश्न उपस्थित करीत जनतेने मालमत्ता करच भरु नये, असे आवाहन सत्ताधारी भाजप नगरसेवक नागसेन बोरसे यांनी महासभेत करीत घरचा आहेर दिला. सविस्तर वाचा…
मनसे नेते अमित ठाकरे यांच्याशी वाद घातला, त्यांची कार अडवली म्हणून मनसेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी सिन्नरमधील टोलनाक्याची तोडफोड केली होती. टोलनाक्याची तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यकर्त्यांना आता जामीन मिळाला आहे. कार्यकर्त्यांना जामीन मिळाल्यावर अमित ठाकरे स्वतः त्या कार्यकर्त्यांची भेट घ्यायला नाशिकला गेले होते. यावेळी अमित ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं.
अमित ठाकरे म्हणाले, या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी अंगावर केसेस (खटले) घेतल्या आहेत. ही सोपी गोष्ट नाही. मी त्यांचं अभिनंदन करायला इथे आलो आहे. प्रत्येकाने टोल फोडावा असं माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की, हे सगळं प्रेमापोटी घडलंय
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २०२३ वर्षाचा राज्यपातळीवरील कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार चोपडा तालुक्यातील पंचक येथील प्रगतिशील शेतकरी हेमचंद्र पाटील यांना जाहीर झाला आहे. सविस्तर वाचा
सरदार कंपनीच्या सुपर फॉस्फेट खतामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या कंपनीचा राज्य परवाना निलंबित केला असला, तरी नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कृषी अधिकार्यांकडे करण्यात आली. सविस्तर वाचा
पिंपरी : लोकांची फसवणूक झाली असेल तर, कोणीही फिर्याद देऊ शकतो. त्यासाठी लेखापरीक्षकांची आवश्यकता नाही, असा निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने पिंपरीतील दि सेवा विकास को. ऑपरेटिव्ह बँकेच्या तत्कालीन संचालकांवरील उच्च न्यायालयाने रद्द केलेला गुन्हा कायम ठेवला. तसेच पोलिसांना पुन्हा चौकशीचे आदेश दिले.
नागपूर : भाजपने अलीकडेच विदर्भातील शहर आणि जिल्हाध्यक्षांच्या नवीन नियुक्त्या केल्या. यात इतर मागासवर्गीय समाजाला (ओबीसी) अधिक प्राधान्य देऊन पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी मतांवरील पक्षाची पकड अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला.
सांगली : इस्लामपूर मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा पर्यायाने आमदार जयंत पाटील यांचा पारंपारिक गड. याच मतदारसंघामध्ये महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून जिल्हा बँकेचे संचालक राहूल महाडिक यांचेही वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामागे भाजपची ताकद असल्याचे स्पष्टच दिसते.
पुणे : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी भागात एका उपाहारगृहात तोडफोड करून दहशत माजविणाऱ्या गुंडांची हवेली पोलिसांनी धिंड काढली.
पुणे: रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करण्यासाठी असलेले इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनचे (आयआरसीटीसी) संकेतस्थळ मंगळवारी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले.
कल्याण: गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी डोंबिवली, कल्याण परिसरातील मंदिरांमध्ये रात्रीच्या वेळेत दानपेटीमधील रक्कम चोरुन नेण्यास सुरुवात केली आहे.
मलेशियन एअरलाईन्समध्ये नोकरीची संधी आहे असे आमिष दाखवून मुंबईतील कांदिवली भागातील एका नागरिकाने डोंबिवलीतील एका तरुणाकडून पाच लाखाहून अधिकची रक्कम उकळली. सविस्तर वाचा
भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मध्यंतरी आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्याची घटना घडली होती. याबाबत राज्यातील विरोधकांनी आक्रमक होत किरीट सोमय्या यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. सविस्तर वाचा
चंद्रपूर: शहरातील सर्व रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात देखील झाले आहे. मात्र याकडे बांधकाम विभाग तथा महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
नागपूर: एका १९ वर्षीय तरुणीने प्रियकराच्या छळाला कंटाळून किटकनाशक प्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
मराठवाड्याचं भूषण ठरेल असं बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण होणार. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक – उदय सामंत
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांची आज मुलाखत प्रसिद्ध झाली. त्यांनी त्यांच्या मुलाखतीत अनेक मुद्द्यावंर सविस्तर चर्चा केली आहे. तसंच, ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही आता सरकारवर टीकास्र डागलं आहे. राज्यात सध्या शिंदे-पवार-भाजपा असं ट्रिपल इंजिन सरकार आहे. या ट्रिपल इंजिन सरकारवरूनच संजय राऊतांनी घणाघात केला आहे. संजय राऊतांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना मणिपूरध्ये सुरू असलेल्या हिंसाचारप्रकरणीही केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.
वर्धा: राज्य ग्रंथालय संघातर्फे पवनार ते वर्धा वारी काढून विविध समस्यांवर लक्ष वेधण्यात आले. पवनार येथील विनोबा आश्रम ते वर्धेतील गांधी पूतळा दरम्यान निघालेल्या या पदयात्रेत कोकणवगळता राज्यभरातील ग्रंथालय संघाचे पदाधिकारी सहभागी झाले हाेते.
नागपूरः जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात ‘डेंग्यू’चे रुग्ण वाढले असतानाच आता चिकनगुनियाही डोके वर काढत आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारे विहार आणि तानसा धरण ओसंडून वाहू लागले आहेत.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. केसरकर म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे भरभक्कम धरणासारखे होते. अशी धरणं कधीही फुटू शकत नाहीत. बाळासाहेबांनी नेहमीच संपूर्ण देशाला मार्गदर्शन केलं आहे. परंतु त्यांच्या मार्गापासून तुम्ही (उद्धव ठाकरे) वेगळे झालात. त्यांच्या मार्गावरून वेगळे होऊन ते मुख्यमंत्री झाले, त्याचप्रमाणे आता त्यांची पंतप्रधान व्हायची इच्छा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्याबद्दल मला काही बोलायचं नाही.
आज पहाटे ४.३० च्या सुमारास तानसा धरण भरून वाहणे (ओव्हर फ्लो) सुरू झाले आहे. त्यामुळे धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून १,१०० क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
आज पहाटे 4.30 वा च्या दरम्यान तानसा धरण भरून वाहणे (ओव्हर फ्लो) सुरू झाले आहे. धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून
— LoksattaLive (@LoksattaLive) July 26, 2023
1100 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.https://t.co/ZfyIjgKlXt pic.twitter.com/IrT5s8qwwv
राज्यात पुढील ७२ तासात मान्सून अतिसक्रिय असेल. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात तसेच पुणे-सातारामधील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जाहीर केला आहे. हवामानशास्त्रज्ञ शिल्पा आपटे यांनी या भागात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
पुढील ७२ तासात राज्यात मान्सून अतिसक्रिय