Mumbai Maharashtra Breaking News : मुंबई आणि महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आज सकाळपासून मुंबईसह आसपासच्या परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून पुढील तीन दिवस कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज दिवसभरात पावसाच्या अपडेट जाणून घेऊ. त्याशिवाय राज्याच्या राजकारणातही मोठ्या हालचाली सुरू आहेत. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष आपापल्या परिने तयारीला लागले आहेत. भाजपाकडून आज पुण्यात पक्ष संघटनेची बैठक होणार आहे. तर शरद पवारदेखील राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेऊन विधानसभेचा आढावा घेणार आहेत. तसेच पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी शरद पवार गटात प्रवेश घेतल्यामुळे अजित पवार पिंपरी चिंचवडचा दौरा करून संघटनेची बैठक घेणार आहेत.
दरम्यान आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणाचीही चर्चा आहे. शेतकऱ्याला पिस्तुल दाखवल्याप्रकरणी त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांना रायगडमधून अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांचे वडील दिलीप खेडकर यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात आज दिवसभरात आणखी काही घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
Marathi News Live Updates | राज्यभरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सोलापुरात झालेल्या पक्षाच्या संवाद मेळाव्यात आगामी विधानसभा जागा लढविण्यासाठी इच्छुकांसह प्रमुख नेत्यांनी जोरदार आग्रह धरला. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी सलग तीनवेळा प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहर मध्य जागेवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने दावा करायला सुरूवात केली असून त्यासाठी तौफिक शेख यांनी जोरदार आग्रह धरला आहे. उमेदवारी न मिळाल्यास वेगळा विचार करण्याची त्यांनी भूमिका अधिकृतपणे घेतली नाही. मात्र दुसरीकडे शेख यांची एमआयएम पक्षाच्या नेत्यांशीही सलगी वाढली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी कोल्हापूर शहरात गुरुवारी पावसाची उघडीप राहिली. पाणलोट क्षेत्रात पावसाचा मुक्काम कायम राहिला आहे. पाण्याखाली असणाऱ्या बंधाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तथापि काल आणि आज पावसाचे प्रमाण कमी राहिले. पहाटेच्या दरम्यान पावसाने जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर उघडीप राहिली. पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाच्या सरी येत राहिल्या. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे. रविवारी पाणी पातळी ३० फूट होती. काल ती २८ फूट १० इंच तर आज २४ फूट ८ इंच आहे. रविवारी पाण्याखालील बंधाऱ्यांची संख्या ३५ होती. काल ती २९ होती. ती ४४ झाली आहे.
चिपळूण : आषाढी एकादशी निमीत्त विठुरायाच्या दर्शनासाठी जाणारा तालुक्यातील पेढे मोरेवाडी येथील रविंद्र बाळू मोरे याचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. आटपाडी दिघंजी येथे मंगळवारी दुपारी झालेल्या या अपघातात सुधीर शांताराम निवाते (वय ३०, रा.पेठमाप, गणेशवाडी चिपळूण) गंभीर जखमी झाला.
बारामती लोकसभेत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर आता दोन्ही गटाकडून बारामती विधानसभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे बारामतीमध्ये सक्रिय झाले असून त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. बारामतीमधील अनेक कार्यक्रमांना युगेंद्र पवार हजेरी लावत आहेत. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार, भावी आमदार असे बॅनर बारामतीमध्ये ठिकठिकाणी लावले आहेत.
शीव येथे गृहप्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली सुमारे ७५ ग्राहकांकडून ६६ कोटी ८० लाख रुपये घेऊन सदनिका न देता त्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दोन विकसकांविरोधात अॅन्टॉपहिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर : वारंवार दंगल घडवून कोल्हापूर, शासन व संभाजीराजे छत्रपती यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न खासदार धैर्यशील माने यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. विशाळगडावर १५८ अतिक्रमणे आहेत. त्यापैकी सहा जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र प्रशासनाने सारेच प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यासारखी दिशाभूल चालवली होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच गडावरील अतिक्रमणे काढावे अशी मागणी आहे. संभाजीराजे छत्रपती अतिक्रमण काढण्यासाठी पाठपुरावा करीत होते. त्याकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले. त्यांची यापूर्वीची आंदोलने संयमी होती. परंतु प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याने वाद वाढला, असेही ते म्हणाले.
कोल्हापूर : विशाळगड दंगलीला उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कारणीभूत आहेत. त्यांना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी. जिल्हा पोलीस प्रमुख यांनी साथ दिली आहे, असा आरोप गुरुवारी येथे शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. विशाळगड दंगल प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी ठाकरे सेनेच्या वतीने येथील पितळी गणपती मंदिरापासून विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या कार्यालयात निवेदन देण्यात आले. राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी वरील आरोप केला.
सांगली : लोकसभा निवडणुकीतील निकालाने निद्रिस्त सरकारला जाग आली असून याचा फायदा सामान्य लोकांना विविध योजनांच्या माध्यमातून होत आहे. मात्र, योजनेच्या नावावर सामान्यांची फसवणूक होऊ नये अशी आमची अपेक्षा असल्याचे मत माजी राज्यमंंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी गुरुवारी व्यक्त केली.
विशाळगडावर झालेल्या दंगलीनंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याठिकाणी पाहणी केली. ज्यांच्या घरांचे आणि दुकानाचे नुकसान झाले त्यांच्याशी संवाद साधून सरकारतर्फे मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. एकूण २ कोटी ८५ लाखांचे नुकसान झाले असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच ज्यावेळी आंदोलक याठिकाणी आले होते, त्यावेळी पोलिसांनी दंगलखोरांना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी कुणीही न ऐकता तोडफोड केली, असे अजित पवार यांनी सांगितले.
हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन मागील तीनशे वर्षांपासून धाराशिव तालुक्यातील भिकारसारोळा येथे पहायला मिळत आहे. गावातील जगदे कुटुंबाकडून मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तीनशे वर्षांपासून सुरू असलेली ही अनोखी परंपरा जगदे कुटुंबातील पुढच्या पिढीने मोठ्या श्रद्धेने जोपासली आहे. एकात्मतेचे दर्शन म्हणून सुरू असलेली सवारी आणि मिरवणूक अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सांंगली : छत्रपती शाहू महाराजांच्या वारसांकडून विशाळगड प्रकरणीजी भूमिका घेतली जात आहे ती निषेधार्ह असून या प्रकरणी नैतिक जबाबदारी समजून खासदार शाहू महाराज यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महापालिका क्षेत्राचे कार्याध्यक्ष जमील बागवान यांनी पत्रकार बैठकीत केली.
गडचिरोली : १७ जुलै रोजी गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरील जारावंडी पोलीस हद्दीतील वांडोली गावानजिक उडालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली असून यात ७ पुरुष व ५ महिलांचा समावेश आहे. सर्वांवर छत्तीसगड आणि महाराष्ट्र शासनाचे २ कोटींहून अधिक बक्षीस होते. मृत्तांमध्ये कसनसूर-चातगाव आणि टिपागड-कोरची दलमच्या ५ वरिष्ठ नेत्यांचादेखील समावेश आहे.
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना त्यांना डीडी म्हणजे ‘देवेंद्र द्वेष’ नावाचा रोग झाल्याचे सांगितले होते. या टीकेनंतर जरांगे पाटील चांगलेच उखडले, त्यांनी प्रसाद लाड यांचा अश्लाघ्य भाषेत समाचार घेतला. तसेच त्यांना शिवीगाळ केली. अतिशय आक्षेपार्ह अशी भाषा वापरल्यानंतर आता प्रसाद लाड यांनीही या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. माझी लढाई विचारांची असून ती शाब्दिक लढाई नाही, त्यामुळे मी त्यांना काही बोलणार नाही, असे ते म्हणाले. मात्र आज भर दुपारीच जरांगेंनी शिव्या कशा काय दिल्या, यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं.
एपीएमसीत परराज्यांतून आणि राज्यातून होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोचे भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारात सध्या ३३ गाड्या एवढीच आवक होत असून दरात प्रतिकिलो २० रुपयांनी दरवाढ झाली आहे. सविस्तर वाचा…
नवी मुंबई</strong> : मुंबई शहरात पुनर्विकास सुरू झाला आणि हळूहळू मुंबईतला माणूस शहराबाहेर पडून नवी मुंबईत आला. आता नवी मुंबईच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली असून बांधकाम व्यावसायिकाकंडून पुनर्विकास करून घेतला तर नवी मुंबईतील माणूसही हद्दपार होईल. त्यामुळे सर्व गृहनिर्माण संस्थांनी स्वयंपुनर्विकासाचा मार्ग अवलंबला पाहिजे, असे मत सुप्रसिद्ध वास्तुविशारद चंद्रशेखर प्रभू यांनी बुधवारी व्यक्त केले.
धर्मवीर संभाजीराजे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्वयंपुनर्विकास या विषयावर सीवूड्स येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात चंद्रशेखर प्रभू यांनी मार्गदर्शन केले. नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. आगामी काळात अनेक सोसायट्यांचे पुनर्विकास करण्याचे प्रयत्न असून सीवूड्स विभागातील सिडकोकालीन ३२ सोसायट्यांमध्येही पुनर्विकासाचे वारे वाहू लागले आहे. नवी मुंबईत वाशी उपनगरात पुनर्विकास प्रकल्पांना सुरुवातही झाली असून नवी मुंबईतील नामांकित कंपन्याही पुनर्विकासात उतरल्या आहेत. परंतु बांधकाम व्यावसायिक देऊ करत असेल त्याहीपेक्षा अधिक जास्त क्षेत्रफळाचे घर आपल्याला स्वयंपुनर्विकासाच्या मार्गे मिळवता येऊ शकते, असे प्रभू म्हणाले. स्वयं पुनर्विकासातून निर्माण झालेल्या मुंबईतील टिळकनगर शेल कॉलनी येथील चित्रा सोसायटी तसेच मुलुंड येथील पूर्वरंग सोसायटीचे त्यांनी दाखले दिले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष दत्ता घंगाळे, सामाजिक कार्यकर्ते विजय घाटे, सुधीर जाधव आदी उपस्थित होते.
स्वयंपुनर्विकासाचे फायदे
शासनाने १३ सप्टेंबर २०१९ मध्ये स्वयंपुनर्विकासाबाबत अध्यादेश काढला त्याचा फायदा नागरिकांनी घेतला पाहिजे, असे प्रभू म्हणाले. शासनाने त्यासाठी एक खिडकी योजना राबवली आहे. मुद्रांक शुल्क फक्त १ हजार रुपये असते तसेच जीएसटीमध्येही सवलत मिळते. पुनर्विकासासाठी घेतलेल्या कर्जात ४ टक्के सवलत मिळते, अशी माहिती त्यांनी दिली.
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना त्यांना डीडी नावाचा रोग झाल्याचे सांगितले होते. डीडी म्हणजे ‘देवेंद्र द्वेष’ हा रोग झाल्याचे प्रसाद लाड म्हणाले होते. त्यानंतर या टीकेला प्रत्युतर देताना मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे.
बुलढाणा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे आयोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. आता ही परीक्षा २५ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. आयोगातर्फे या बदलाचे कारण स्पष्ट करण्यात आले नाही. महसूल कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन आणि राजकीय सामाजिक स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उगारणार आहेत. यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची घोषणा केली. यावेळी त्यांना प्रसाद लाड यांनी केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला असता मनोज जरांगे चांगलेच उखडले आहेत. प्रसाद लाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे यांनी त्यांना आक्षेपार्ह भाषेत उत्तर दिले. तसेच लाड यांनी फडणवीसांबरोबर लग्न करावे, त्यांचे पाय चाटावेत, पण आमच्यावर बोलू नये, असे प्रत्युत्तर दिले.
मुंबई: राज्यात पडलेल्या जोरदार पावसाबरोबर पावसाळी आजारांनीही चांगलेच डोके वर काढले आहे. मुंबईसह राज्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि स्वाईनफ्लूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना आता २० जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पिस्तुल दाखवून शेतकऱ्याला धमकवल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयाकडे सात दिवसांची कोठडी मागितली होती. सदर व्हिडीओतील पिस्तुल शोधायचे आहे, तसेच मनोरमा खेडकर यांच्यासह व्हिडीओत उपस्थित असलेल्या अंगरक्षकांना ताब्यात घ्यायचे असल्यामुळे ही कोठडी मागण्यात आली होती. मात्र न्यायालयाने सध्या तीन दिवसांची कोठडी सुनावणी आहे.
कल्याण पूर्व भागात घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसापूर्वी एका रात्रीत चोरट्यांंनी चार ते पाच दुकाने फोडल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी रात्री चोरट्यांनी कोळसेवाडी, मानपाडा, रामनगर पोलीस ठाणे हद्दीत तीन घरफोड्या केल्या. सविस्तर वाचा…
दिवा-पनवेल रेल्वे मार्गावरील निळजे गावाजवळील रेल्वे फाटक रेल्वे प्रशासनाने ग्रामस्थांना येण्याची-जाण्याची कोणतीही सुविधा न देता गुरूवारी अचानक बंद केले. तसेच, या रेल्वे फाटकातील सुरक्षा चौकी समर्पित जलदगती रेल्वे मार्गाच्या कामासाठी तोडण्याची कार्यवाही सुरू केली. सविस्तर वाचा…
नवी मुंबई : तुर्भे येथे वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या दोन जणांवर कारवाई करण्यात आली असून कारवाई दरम्यान ८ पीडित युवतींची सुटका करण्यात आली आहे. हि कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केली आहे. विष्णू उर्फ विकास कुमार जानकी यादव आणि इंद्रदेव उर्फ इंद्रजित प्रसाद असे यातील आरोपींची नावे आहेत. हि दोघे काही महिलांच्या कडून वेश्या व्यवसाय करून घेतात. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र त्यांचा ठावठिकाणा आढळून येत नव्हता. सदर आरोपी तुर्भेत हा व्यवसाय करतात हे समजताच पोलिसांनी खबरी करवी त्यांचा मोबाईल क्रमांक मिळवला. सदर मोबाईल क्रमांकावर बनावट ग्राहक द्वारे संपर्क करून मुलींची मागणी करण्यात आली. त्यानुसार आरोपीने तुर्भे येथे शिरवणे एमआयडीसी येथील रिव्हर पार्क या लॉज मध्ये बोलावून घेतले व तेथेच पाच हजार घेत वेश्यागमन साठी मुली पोलिसांनी पाठवलेल्या बनावट ग्राहकाला दाखवण्यात आल्या. याबाबत त्या बनावट ग्राहकाने पोलिसांना गुपचूप माहिती देताच पोलिसांनी धाड टाकून दोन आरोपींना ताब्यात घेत आठ पीडित महिलांची सुटका केली.
नंदुरबार : जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेच्या अनास्थेमुळे गुरुवारी पुन्हा रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली आहे. प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका १५ दिवसांपासून नादुरुस्त असल्याने कलसाडी आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून गरोदर महिलेला नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आणले जात होते. मात्र या सर्व प्रक्रियेत बराच वेळ गेल्याने रस्त्यात रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली.
“लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सरकार बनत असताना आंध्रप्रदेश, बिहार या राज्यातील नेत्यांनी अनेक धोरणात्मक गोष्टींची त्यांच्या राज्याच्या हितासाठी मागणी केली होती. परंतु महाराष्ट्रातील शिंदे आणि अजितदादा गटाने राज्याच्या हितासाठी कोणतीच मागणी केली नव्हती तर हे दोन्ही गट केवळ मंत्रीपदाच्या वाटाघाटीत व्यस्त राहिले.. शेवटी शिंदे गटाच्या हाती एक मंत्रिपद तर दादा गटाला तेही मिळाले नाही. मागणी केलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकार अनेक प्रकल्प गुंतवणूक देत आहे मात्र आपले राज्यकर्ते दिल्लीसमोर केवळ मुजरा करण्यातच व्यस्त असल्याने आपल्या राज्यात ना गुंतवणूक येतेय ना नवीन प्रकल्प”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली.
लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सरकार बनत असताना आंध्रप्रदेश, बिहार या राज्यातील नेत्यांनी अनेक धोरणात्मक गोष्टींची त्यांच्या राज्याच्या हितासाठी मागणी केली होती. परंतु महाराष्ट्रातील #शिंदे_अजितदादा गटाने राज्याच्या हितासाठी कोणतीच मागणी केली नव्हती तर हे दोन्ही गट केवळ… https://t.co/0A4olqc8Bk
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 18, 2024
कल्याण : आपली सैन्य दलात ओळख आहे. आपण तुम्हाला त्या ठिकाणी नोकरीला लावून देतो. या बदल्यात रायगड, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील नऊ बेरोजगार तरूणांकडून एकूण ४६ लाख ५० हजार रूपये उकळून त्यांना नोकरी न देता ते पैसे स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी वापरणाऱ्या डोंबिवली, कल्याणमधील तीन भामट्यांच्या विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद येथील इम्प्रेस मॉलसमोरील डॉन बॉस्को शाळे पाठीमागील राधाई ही सात माळ्याची बेकायदा इमारत तोडून देण्यास कल्याण डोंबिवली पालिकेच्या ई प्रभागातील तोडकाम पथकाला बेकायदा जमाव जमवून विरोध करणाऱ्या राधाई या बेकायदा गृहसंकुलातील १३ रहिवाशांसह १५० हून अधिकच्या जमावावर पालिकेच्या ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी मंगळवारी गुन्हे दाखल केले.
ठाणे : देशभरात शेअर बाजार गुंतवणूक तसेच विविध बतावण्या करून नागरिकांची आर्थिक फसवणुक करणाऱ्यांना मोबाईल सीमकार्डचा पुरवठा करणाऱ्या तीनजणांना ठाणे आर्थिक व सायबर गुन्हे विरोधी पथकाने छत्तीसगड येथून अटक केली आहे.
पनवेल : पनवेल महापालिका प्रशासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी’ ही योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवून त्या योजनेत पात्र महिलांची नोंदणी करण्यासाठी यापूर्वी २० मदतकक्ष पालिकेच्या विविध कार्यालयांत प्रभागस्तरावर सुरु केले आहेत. परंतु बुधवारपासून पालिकेने मोबाईल व्हॅनमधून तीन फिरते मदत कक्ष सुरु केले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या घराजवळ योजनेत नाव नोंदणी करता येईल. आत्तापर्यंत पालिका क्षेत्रात पाच हजारांहून अधिक महिलांनी योजनेसाठी अर्ज भरले आहेत.
नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी, सुरगाणा, पेठ व त्र्यंबकेश्वर या घाटमाथा क्षेत्रात पुरेसा पाऊस नसल्याने भाताची पेरणी अतिशय संथपणे पुढे सरकत आहे. आतापर्यंत केवळ २७.३१ टक्के पेरणी झाली आहे.