Mumbai Maharashtra Breaking News : मुंबई आणि महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आज सकाळपासून मुंबईसह आसपासच्या परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून पुढील तीन दिवस कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज दिवसभरात पावसाच्या अपडेट जाणून घेऊ. त्याशिवाय राज्याच्या राजकारणातही मोठ्या हालचाली सुरू आहेत. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष आपापल्या परिने तयारीला लागले आहेत. भाजपाकडून आज पुण्यात पक्ष संघटनेची बैठक होणार आहे. तर शरद पवारदेखील राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेऊन विधानसभेचा आढावा घेणार आहेत. तसेच पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी शरद पवार गटात प्रवेश घेतल्यामुळे अजित पवार पिंपरी चिंचवडचा दौरा करून संघटनेची बैठक घेणार आहेत.
दरम्यान आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणाचीही चर्चा आहे. शेतकऱ्याला पिस्तुल दाखवल्याप्रकरणी त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांना रायगडमधून अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांचे वडील दिलीप खेडकर यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात आज दिवसभरात आणखी काही घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
Marathi News Live Updates | राज्यभरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!
मुंबई : विरोध करणाऱ्या अल्पसंख्यांक सदस्यांमुळे अंधेरी येथील गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासच धोक्यात आला आहे, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने केली. तसेच, अशा रहिवाशांच्या वर्तणुकीबाबत नाराजी व्यक्त करून सोसायटीच्या संबंधित सदस्यांनी दोन आठवड्यांत घरे रिकामी केली नाहीत, तर त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड आकारण्याचे आदेशही दिले.
मुंबई : राज्यात साथीच्या आजारांमध्ये वाढ होत असताना झिकाच्या रुग्णांमध्येही हळूहळू वाढ होत आहे. जुलैच्या १५ दिवसांत राज्यात झिकाचे २० रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या २८ झाली आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात सापडले आहेत.
गोंदिया : गोंदिया शहर पोलीस स्टेशनअंतर्गत भीमनगर सिंगलटोली संकुलमध्ये बुधवार १७ जुलै संध्याकाळी ८:३० वाजताच्या सुमारास तिघा मित्रांत वादातून दोघांनी मिळून तिसऱ्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. गंगाधर विजय चंद्रिकापुरे (४२) रा. लक्ष्मीनगर असे या घटनेतील जखमीचे नाव आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात उघड भूमिका घेणाऱ्या अजय बारस्कर महाराज यांच्या चारचाकी वाहनाला पंढरपूरमध्ये आग लावण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त ते पंढरपूर येथे आले होते. यावेळी अज्ञातांनी त्यांच्या गाडीला आग लावली. यात त्यांची टोयाटो कंपनीची आग जळून खाक झाली. बारस्कर यांनी पोलिसांत तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पुणे : आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रानभाजी वाघाटीचा भाव यंदा वधारला आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने वाघाटीला उच्चांकी भाव मिळाला आहे. आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी दुसऱ्या दिवशी वाघाटीची भाजी केली जाते. जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातून, तसेच धाराशिव परिसरातील शेतकऱ्यांनी वाघाटी बाजारात विक्रीस पाठविली जाते.
नागपूर : बदलत्या काळात विशेषत: महानगरामध्ये आर्थिक आणि कौटुंबिक ताणतणावावरून होणारे वाद थेट न्यायालयापर्यंत पोहोचू लागले असून अशा खटल्यांची संख्या वाढू लागली आहे.
नाशिक : महापालिकेच्या मालकीच्या जागा आणि इमारतींवर भ्रमणध्वनी मनोरे भाडेतत्वावर उभारण्यासाठी महापालिकेने इच्छुक भ्रमणध्वनी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत. यासाठी महानगरपालिकेने स्वमालकीच्या १० जागांची निश्चिती केली आहे.
यवतमाळ : जिल्ह्यातील सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात आंतरराज्य जुगार चालत असतानाही येथे तुलनेने अत्यल्प कारवाया होतात. त्यामुळे जुगार अड्डे चालविणाऱ्या अण्णा, रेड्डींसह ग्राहकांचीही हिंमत वाढली आहे. पोलिसांच्या कठोर कारवाईची भीती नसल्याने पाटणबोरी, झरी जामणी, सुर्दापूर, पिंपळखुटी चेकपोस्ट, मुकूटबन या तेलंगणा राज्याच्या सीमेवरील गावांमध्ये २४ तास परप्रांतीय जुगाऱ्यांची रेलचेल असते.
सविस्तर वाचा…
महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या २८८ जागांसाठी आढावा सुरू असून तीनही पक्ष समसमान जागा लढविणार असल्याचे सूत्रांच्या माहितीद्वारे कळत आहे. शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन पक्ष विधानसभेच्या २८८ पैकी प्रत्येकी ९० ते ९५ जागांवर निवडणूक लढवू शकतात.
नागपूर : एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवासी विनातिकीट सापडल्यास वाहकांची तीन वर्षे वेतनवाढ रोखली जाणार आहे. या निर्णयाला वाहकांनी कडाडून विरोध केला असून तसे पत्र व्यवस्थापकीय संचालकांना पाठवले आहे.
चंद्रपूर: तीन महिन्यांच्या मुलीने तब्बल ११ मिनीटांमध्ये ५४ पशु व पक्ष्यांना ओळण्याच्या या अफाट बुध्दीमत्तेची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. अवघ्या तीन महिन्यात ५४ पशु-पक्षी ओळखण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड चंद्रपूरच्या मायशा जैन च्या नावाने नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राज्य सरकारने लाडका भाऊ योजना आणली आहे. बारावी पास बेरोजगार भावाला महिन्याला सहा हजार आणि पदवीधर बेरोजगाराला दहा हजार भत्ता मिळणार आहे. मग लाडक्या बहिणीला फक्त १५०० रुपये का? लाडक्या बहिणीलाही दहा हजार रुपये मिळायला हवेत. तेव्हाच घर चालू शकेल आणि शेतकरी, बेरोजगारांच्या आत्महत्या थांबतील, अशी मागमी शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.