Maharashtra Breaking News : राज्यभरातील सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. पक्षांकडून वेगवेगळ्या मतदारसंघात मोर्चेबांधणी आणि सर्वेक्षणं चालू आहेत. भाजपाला लोकसभा निवडणुकीत मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर आता भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केलं आहे. अशातच, भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (२१ जुलै) पुण्यात भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. या टीकेनंतर आता शिवसेनेचा ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आक्रमक झाला आहे. या पक्षातील नेत्यांच्या अमित शाहांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर आज मोदी सरकार ३.० चा पहिला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या सर्व राजकीय घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे. पावसाच्या बातम्यांवरही आपलं लक्ष असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Live Updates : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या.
सांंगली : पंढरीच्या विठ्ठलाची भेट घेऊन लाखो वारकरी घरी पोहोचताच सांगलीतील निर्धार फाउंडेशनच्या तरुणांनी पंढरीत रविवारी स्वच्छता वारी करत चंद्रभागा तीरी साचलेला २ टन कचरा संकलित केला. यामध्ये प्लास्टिकसह कपडे, फोटो, निर्माल्य यांचा समावेश होता.
निर्धार फाउंडेशन ही युवकांची टीम गेली ६ वर्षे सांगली शहरासह राज्यातील विविध ठिकाणी स्वच्छतेसाठी काम करीत आहे. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय युवकांनी पदरमोड करीत ही मोहीम अविरतपणे सुरू ठेवली आहे. समाजातील काही दानशूर व्यक्तींकडून केवळ साहित्य स्वरुपात मदत स्वीकारली जाते. यंदाच्या वारीसाठीही भारत जाधव, अमोल घोडके, अनिल भगरे आदींनी बस सेवा, जेवण व साहित्यासाठी मदत केली.
कोल्हापूर : संततधार पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली असल्याने पुराचा फटका बसणाऱ्या कोल्हापूर शहर तसेच ग्रामीण भागात स्थलांतर मोहीम राबवली जात आहे. कोल्हापुरात ७८ कुटुंबांचे स्थलांतर केले असून ग्रामीण भागातही गती आली आहे.
ठाणे : शरद पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या अमित शहा यांनी आरशात बघावे. आपल्या मागे पूर्ण मंत्रिमंडळातील सदस्य उभे करावेत. मग, समजेल भ्रष्टाचाराचा सरदार कोण आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
नाशिक – जिल्हा पुरवठा विभागाकडूून नव्या शिधापत्रिका मिळण्यास सहा ते १२ महिन्यांचा कालावधी लागतो. या विभागाचे कार्यालय तिसऱ्या मजल्यावर असल्याने तिथे पोहचणे अवघड होत असल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अपंग बांधवांनी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
नागपूर : नागपूरकर माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ! आपण या नागपूर नगरीचे भूषण. महापौर झालात तेव्हाही आणि मुख्यमंत्र्यांचे मुकूट आपल्या शिरावर विराजमान झाले तेव्हाही. खुप सारी स्वप्न त्यावेळी नागपूरकरांनी पाहिलेली. एक नागपूरकर म्हणून नागपूरकरांची अडचण तुम्ही जाणाल, हा विश्वासच नव्हे तर आत्मविश्वास आम्हा नागपूकरांना होता.
पिंपरी : गर्भपात करताना विवाहित प्रेयसीचा मृत्यू झाल्याने तिचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकला. आईचा मृतदेह पाहून रडू लागलेल्या दोन्ही मुलांनाही आरोपी प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी नदीत फेकून दिल्याचा प्रकार सोमवारी (दि. २२ जुलै) सकाळी उघडकीस आला.
नागपूर: ग्राहकांकडून एकीकडे अवास्तव वीज देयकावर संताप व्यक्त होतो, दुसरीकडे मात्र शासन वीज दरवाढ झाली नसल्याचे सांगते. जय विदर्भ पार्टीतर्फे सोमवारी (२२ जुलै) ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातील व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी पुतळ्यापुढे वीज दरवाढीविरोधात निदर्शने करण्यात आली.

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या कचोरे येथील न्यू गोविंदवाडी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या इमारतीत दुकान का चालवितो. असे प्रश्न करून दोन जणांनी एका अपंगासह त्याच्या दोन बहिणींना याच इमारतीमधील दोन जणांनी बेदम मारहाण केली. याठिकाणाहून निघून गेला नाहीतर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा आरोपींनी दिला आहे.
नागपूर: देशभरात सातत्याने सोने- चांदीच्या दरात चढ- उतार बघायला मिळत असून दर स्थिर होण्याचे नाव घेत नाही. सोमवारी (२२ जुलै) नागपुरातील सराफा बाजारात गेल्या पाच दिवसांमध्ये सोने- चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना सोने- चांदीचे दागीने खरेदीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
अमित शाह विसरले आहेत की त्यांच्याच सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे. दुसऱ्या बाजूला त्यांनी ज्या-ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या लोकांना भाजपाने आपल्याबरोबर घेतलं, असं म्हणत जयंत पाटील यांनी नाव न घेता अजित पवारांना टोला लगावला आहे.
मुंबई: मुलुंड कचराभूमी रोड परिसरात सोमवारी सकाळी एका भरधाव ऑडी गाडीने दोन रिक्षांना धडक दिली. त्या अपघातात एकूण चारजण जखमी झाले असून त्यातील एका रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
उरण : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून उरणला जोडणाऱ्या मोरा- मुंबई, करंजा -रेवस,जेएनपीटी – भाऊचा धक्का आदी जलमार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पनवेल : नवीन पनवेल येथील कोंबडी विक्रेत्याला पनवेल पालिकेच्या धूर फवारणी करणाऱ्या कंत्राटी कामगाराने मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात कोंबडी विक्रेत्याच्या तक्रारीनंतर पनवेल महापालिकेच्या स्वच्छता विभागातील कंत्राटी कामगाराविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११५( २), ३५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रमोद बनकर असे या कंत्राटी कामगाराचे नाव आहे.
उरण : जेएनपीए बंदरात दररोज सतरा हजार वाहनांची हाताळणी होत असून काही कारणास्तव तीन चार तासांचा विलंब झाला असेल मात्र बंदरातील कामकाज सुरळीत असून जून महिन्यात बंदरात सर्वाधिक कंटेनर हाताळणी करण्यात आली आहे. तर बंदरात कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी नसल्याचा दावा सोमवारी जेएनपीए प्रशासन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी केली आहे.
नागपूर: राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने आजही राज्यातील काही जिल्ह्यांना अतिमूसळधार तर काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा म्हणजेच काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. या इशाऱ्यामुळे राज्यात काही जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली.
पनवेल : जून महिन्याच्या अखेरीस सिडको महामंडळाने हेटवणे धरण क्षेत्रातील जलसाठा कमी असल्याने २० टक्क्यांची पाणी कपात सिडको वसाहतींमध्ये अंमलात आणली. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी रहिवाशांना विकतचा बाटला खरेदी करावा लागला.
पनवेल : शहर स्वच्छतेकडे सिडको महामंडळाचे दुर्लक्ष झाल्यामुळे उलवे वसाहतीमध्ये कोणीही या आणि फलक लावून जा अशी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या उलवे वसाहतीमधील मुख्य चौकात अवैध फलक लावणाऱ्यांची स्पर्धा लागल्याने फलकांचे बेट चौकात तयार झाले आहे.

नागपूर : उत्तर अंबाझरी मार्गावरील अलंकार चौकाजवळील हडस शाळेसमोर होणारी वाहतूक कोंडी विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू लागली आहे. यावर अद्याप पोलिसांना तोडगा काढता आला नाही. त्यामुळे पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून मोटारसायकल चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या. यासाठी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचं पथक तयार करण्यात आलं होतं. चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी दोन मोटारसायकल चोरट्यांना अटक केली आहे. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून सहा मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पुणे : नवले पूल परिसरातील वंडरसिटी परिसरात रविवारी रात्री पोलिसांकडून चोरट्यांवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. चोरट्यांनी पोलिसांच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न केला.
पिंपरी : पिंपरी- चिंचवडमध्ये ‘हिट अँड रन’ च प्रकरण थांबायचं नाव घेत नाही. पिंपरी गावात कार ने पादचारी महिलेला धडक देऊन पसार झाल्याच सीसीटीव्ही फुटेज समोर आल आहे. रविवारी दुपारी दीड च्या सुमारास ही घटना घडली आहे.
अकोला : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजनेंतर्गत शहरातील शिवणी विमानतळावरून हवाईसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
मुंबई : मुंबई शहर तसेच उपनगरांत रविवारी मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला असून आज पहाटे देखील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान, पुढील तीन चार तासांत मुंबईतील तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुणे : महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील ठेका मिळविण्याच्या वादातून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर रोखून त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना गंज पेठेत घडली.
नागपूर : एका विद्यार्थ्याचे अपहरण करून दोन लाख रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या चार अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. अपहृत मुलाची सुटका केली. ही घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. दीप गुरव (१७) असे अपहृत मुलाचे नाव आहे.
नागपूर : राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने आजही राज्यातील काही जिल्ह्यांना अतिमुसळधार तर काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
पुण्यात भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हजेरी लावली. यावेळी केलेल्या भाषणादरम्यान शाह यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. शाह म्हणाले, “भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचं काम हे शरद पवारांनीच केलं आहे.”
दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अमित शाह यांच्या शरद पवारांवरील टीकेबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारल्यावर अजित पवारांनी केवळ ‘नो कमेंट्स’ म्हणत प्रतिक्रिया दिली.
“आम्ही तुमच्यासारखे ‘जिना फॅन्स क्लब’चे सदस्य…”, अमित शाह यांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर!
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी म्हणजे ‘औरंगजेब फॅन क्लब‘ आहे आणि या औरंगजेब फॅन क्लबचे नेते हे उद्धव ठाकरे आहेत, अशी बोचरी टीका अमित शाह यांनी पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आता अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत? औरंगजेब फॅन्स क्लबचे सदस्य असं म्हणत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की आम्ही त्यांच्यासारखे जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही. आम्ही पाकिस्तानात जिनांच्या कबरीवर जाऊन कधी फुलं उधळली नाहीत किंवा पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केकही खाल्ला नाही. मुळात देशातील राष्ट्रवादी मुस्लीमांची बाजू मांडणं यात काहीही चुकीचं नाही. या देशाच्या संघर्षाच्या काळात मुस्लिमांनीही योगदान दिलं आहे, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं.