Maharashtra New CM Swearing Ceremony : महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे पुन्हा प्रयत्नशील होते. २०२२पासून दिल्लीतील भाजप नेतृत्वाशी वाढलेली जवळीक शिंदेंसाठी आशादायक होती. गेला आठवडाभर शिंदे यांनी त्यादृष्टीने पुरेपूर प्रयत्न केले. मात्र, भाजपचे १३२ आमदार निवडून आल्यानंतर भाजपा श्रेष्ठींनाही फडणवीस यांच्या निवडीशिवाय पर्याय उरला नाही. दिल्लीत झालेल्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत भाजपच्या नेतृत्वाने शिंदे यांना स्पष्टपणे तसे कळवले होते. त्यावर बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, आज शपथविधीचा दिवस. राज्याला आज नवं सरकार मिळणार आहे. तर एकनाथ शिंदेही आता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास राजी झाले आहेत. त्यामुळे राज्याला पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असं समीकरण पाहायला मिळणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून अजित पवारांनी सहाव्यांदा आणि एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यात आता देवेंद्रपर्वाला सुरुवात झाली आहे.
शपथविधीचा सोहळा पाहा
Maharashtra Chief Minister Oath Ceremony : राज्याला मिळणार नवं सरकार, शपथविधी सोहळ्याचे अपडेट्स जाणून घ्या!
विधानसभा अध्यक्षांची निवड अधिवेशनात करू. शपथ झाल्यानंतर अध्यक्षांची निवड करावी लागते. अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यपालांचं अभिभाषण करावं लागतं. त्यानुसार ७, ८, ९ या तीन दिवसांत शपथ घ्यावी, ९ तारखेला अध्यक्षांची निवड करून राज्यपालांचं अभिभाषण करावं, असं नियोजन आहे - देवेंद्र फडणवीस</p>
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जवळपास प्रक्रिया झाली आहे. नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू - देवेंद्र फडणवीस
ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत. २१०० रुपयेही देणार आहोत. आर्थिक स्त्रोत निश्चित झाल्यानंतर जी आश्वासने दिली ती पूर्ण करू. त्यासाठी ज्या व्यवस्था करायच्या आहेत, त्या आधी करू- देवेंद्र फडणवीस
निकषाच्या बाहेर कोणी योजना घेतली असेल तर पुनर्विचार केला जाईल. पण सरसकट विचार होणार नाही - देवेंद्र फडणवीस
बदलाचं राजकारण करायचं नाही, बदल दाखवेल असं राजकारण करायचं. विरोधकांच्या संख्येनुसार त्यांचं मुल्यमापन करणार नाही. त्यांनी योग्य विषय मांडले तर त्यांना सन्मान देऊ. पूर्णपणे स्थिर सरकारचे पाच वर्षे आपल्याला पाहायला मिळेल. जनतेने आम्हाला बहुमत दिलं आहे, त्यामुळे त्यांची अपेक्षा आहे की स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळालं पाहिजे. २०२२ पर्यंत जे धक्के बसले ते आता लागू नयेत - देवेंद्र फडणवीस</p>
Maharashtra Live News : "भूमिका बदलली तरी दिशा तीच राहणार", शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन!
अतिशय गतिशील सरकार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात चालवलं. शपथविधीच्या निमित्ताने आमच्या बैठका सुरू होत्या तेव्हा मला विचारलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही असं का म्हणताय. अडीच वर्षांत महाराष्ट्राने विकासाची गती घेतली आहे. आता महाराष्ट्र थांबणार नाही. त्या गतीने महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने जाईल. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रमी राहिल असा विश्वास व्यक्त करतो. आमचे रोल बदलले असले दिशा तीच राहणार आहे, गती तीच राहणार आहे, समन्वयही तोच राहणार आहे. वेगळेपण पाहायला मिळणार नाही. आताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही तिघांनीही अधिकाऱ्यांना सांगितलं की मागच्या काळात पहिल्यांदा शिंदे आणि आम्ही आलो, तेव्हा ५० ओव्हरची मॅच झाली. मग अजित दादा आले तर २०-२० मॅच आहे. आता टेस्ट मॅच आहे. आता राज्याला पुढे न्यायचं आहे. वेगवेगळ्या योजना पुढे नेल्या आहेत - देवेंद्र फडणवीस</p>
मंत्रालयात पहिली बैठक संपन्न, पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर
मुंबई - मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली.
पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत.
चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.
Maharashtra Live News : नव्या सरकारला बच्चू कडूंकडून शुभेच्छा
Maharashtra Live News : विरोधकांचं मन मोठं नाही- राधाकृष्ण विखे पाटील
आजच्या शपथविधी कार्यक्रमात विरोधी पक्षातील एकही नेता आला नाही. त्यांचं मन मोठं असतं तर ते आज आले असते - राधाकृष्ण विखे पाटील
Maharashtra Live News :
राज्यात पहिली मंत्रिमंडळ बैठक थोड्याच वेळात
Raj Thackeray Post : राज्यात नव्या सरकारचा शपथविधी होताच राज ठाकरेंची पोस्ट
उपमुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदे यांच्या दालनाबाहेरील पाटी बदलली!
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे मंत्रालयात आता त्यांच्या दालनाबाहेर उपमुख्यमंत्रीपदाचा फलक लागला आहे.
Narendra Modi Oath Ceremony Live Updates : शपथविधी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळाहून रवाना
अजित पवारांनी घेतली सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शपथ घेण्याआधी त्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केले.
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. राज्याला मिळाले २१ वे मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत तीनवेळा घेतली आहे मुख्यमंत्रीपदाची शपथ
Maharashtra Live News : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार व्यासपीठावर दाखल
Maharashtra CM Oath Ceremony Live Updates : भारतरत्न सचिन तेंडूलक सपत्नीक शपथविधीला हजर
Maharashtra CM Oath Ceremony Live Updates : अमित शाह, जे. पी. नड्डी, योगी आदित्यनाथांसह भाजपाशासित राज्यातील मुख्यमंत्री शपथविधीला हजर
Maharashtra CM Oath Ceremony Live Updates : शपथविधीसाठी कलाकारांचीही हजेरी
Maharashtra CM Oath Ceremony Live Updates
रणबीर सिंग, शाहरुख खानसह अनेक बॉलीवूडचे कलाकार शपथविधीसाठी आझाद मैदानात हजर
Maharashtra CM Swearing Ceremony : छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा मुंबईत दाखल, शपथविधीला लावणार हजेरी
Maharashtra CM Swearing Ceremony : आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा शपथविधीसाठी मुंबईत हजर
Maharashtra CM Swearing Ceremony : शपथविधीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत दाखल
Maharashtra Live Blog : राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा शपथविधीसाठी मुंबईत दाखल
शपथविधी झाल्यानंतर एकनाथ शिंदेंची अमित शाहांबरोबर बैठक, या विषयावर होणार चर्चा; संजय शिरसाटांची माहिती
शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले, "शपथविधीनंतर एकनाथ शिंदे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक होईल आणि गृहविभाग तसेच इतर पदांबाबत निर्णय घेतला जाईल."
Maharashtra Live Blog : अमित शाह आणि जे. पी. नड्डा मुंबईत दाखल, थोड्याचवेळात होणार शपथविधी
Live Update : "उपमुख्यमंत्री होण्याची एकनाथ शिंदेंची मानसिकता नव्हती, त्यांना...", गुलाबराव पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
एकनाथ शिंदे शपथ घेतील की नाही कालपर्यंत याबबात निश्चित नव्हतं. पण आम्ही त्यांची भेट घेतली. तुमची राज्याला गरज आहे, असं आम्ही त्यांना सांगितलं. तिघेही एकत्र राहिले तर राज्याचा विकास होईल. उपमुख्यमंत्री बनायची एकनाथ शिंदेंची मानसिकता नव्हती. त्यांना आमच्यातून कोणीतरी उपमुख्यमंत्री व्हावं असं वाटत होतं - गुलाबराव पाटील</p>
Live Blog : ठरलं! एकनाथ शिंदे राज्याचे नवे उपमुख्यमंत्री; शिफारस पत्र राजभवनात सुपूर्द
शिवसेनेचे आमदार, शिवसैनिक आणि देवेंद्र फडणवीसांच्या विनंतीला मान देऊन एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचं मान्य केलं आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. तिथे आम्हालाएकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचं शिफारस पत्र देण्यात आलं. आम्ही राजभवनात येऊन प्रधान सचिवांना शिफारस पत्र सुपूर्द केलं आहे.
Maharashtra Live News : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास राजी? शिंदेसेनेचे आमदार म्हणाले, "मोदी आणि शाहांच्या..."
आम्ही सर्व आमदार त्यांना रात्री एकत्र भेटलो. आम्ही स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही कॅबिनेटमध्ये आलं पाहिजे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं पाहिजे. त्यांनी सकारात्मक विचार करण्यास संमती दिली. ते मोदी आणि शाहांचं खूप ऐकतात. तिथून संदेश आला तर एकनाथ शिंदे कधीच त्यांचा संदेश धुडकावणार नाहीत - दीपक केसरकर
देवेंद्र फडणवीस बाप्पाचरणी लीन
देवेंद्र फडणवीस यांनी घेतले सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे आशीर्वाद
मुरबाडमध्ये माजी उपसरपंचाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
कल्याण : मुरबाड तालुक्यातील एका पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर पीडित मुलगी राहत असलेल्या गावातील एका रहिवाशाने लैंगिक अत्याचार केला आहे. हा रहिवासी यापूर्वी गावचा उपसरपंच होता. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार केली.
Maharashtra Chief Minister Oath Ceremony Live Updates : राज्याला मिळणार नवं सरकार, शपथविधी सोहळ्याचे अपडेट्स जाणून घ्या!