Maharashtra New CM Swearing Ceremony : महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे पुन्हा प्रयत्नशील होते. २०२२पासून दिल्लीतील भाजप नेतृत्वाशी वाढलेली जवळीक शिंदेंसाठी आशादायक होती. गेला आठवडाभर शिंदे यांनी त्यादृष्टीने पुरेपूर प्रयत्न केले. मात्र, भाजपचे १३२ आमदार निवडून आल्यानंतर भाजपा श्रेष्ठींनाही फडणवीस यांच्या निवडीशिवाय पर्याय उरला नाही. दिल्लीत झालेल्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत भाजपच्या नेतृत्वाने शिंदे यांना स्पष्टपणे तसे कळवले होते. त्यावर बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, आज शपथविधीचा दिवस. राज्याला आज नवं सरकार मिळणार आहे. तर एकनाथ शिंदेही आता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास राजी झाले आहेत. त्यामुळे राज्याला पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असं समीकरण पाहायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून अजित पवारांनी सहाव्यांदा आणि एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यात आता देवेंद्रपर्वाला सुरुवात झाली आहे.

शपथविधीचा सोहळा पाहा

Live Updates

Maharashtra Chief Minister Oath Ceremony : राज्याला मिळणार नवं सरकार, शपथविधी सोहळ्याचे अपडेट्स जाणून घ्या!

11:34 (IST) 5 Dec 2024
यवतमाळ : पोलीस गणवेशात, रुबाबात वावरणारी ‘ती’ प्रत्यक्षात…

यवतमाळ :’ती’ स्वतःला पोलीस समजायची. यातूनच ती अकोला शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस वर्दीत वावरायची. इतकेच नव्हे तर आसपासच्या गावांमध्ये जाऊन गावकऱ्यांना रुबाब दाखवायची.पतीच्या निधनाने २१ व्या वर्षी तिला पहिला मानसिक झटका आला आणि त्यातूनच तिची पोलीस म्हणून भटकंती सुरू झाली. पण ती खरीखुरी पोलीस नव्हती.

सविस्तर वाचा…

11:20 (IST) 5 Dec 2024

प्रवासी नसलेल्या बस थांब्यासाठी वळसा, एनएमएमटीच्या नाहक मार्गबदलाने वेळेचा अपव्यय

नवी मुंबई</strong> : नवी मुंबईत प्रचंड वाहतूक असलेल्या वाशी कोपरखैरणे मार्गावर एनएमएमटीने गेल्या काही दिवसापासून जुहू गाव येथून एक मार्ग बदल केला आहे. मात्र काहीही गरज नसलेल्या या मार्गबदलाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप होत असून प्रवासवेळेत किमान १० ते गर्दी प्रसंगी २० मिनिटे वाढ होत आहे

सविस्तर वाचा…

11:07 (IST) 5 Dec 2024

कडोंमपा शाळेत नियमित वेळेत न येणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करा,आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांचे आदेश

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या शाळांमधील नियमित वेळेत न येणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. समज देऊनही शिक्षक वेळेत शाळेत येत नसेल तर अशा शिक्षकांना निलंबित करा, असे आदेश कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी सोमवारी पालिका शिक्षण विभागाच्या उपायुक्तांना दिले.

सविस्तर वाचा…

10:55 (IST) 5 Dec 2024

Maharashtra CM Swearing Ceremony Live : मुख्यमंत्री ठरले, पण मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? राष्ट्रवादीचे नेते म्हणाले…

आज तिघांचा शपथविधी हईल. पुढच्या दोन दिवसांत सात आणि आठ डिसेंबरला आमदारांचा शपथविधी होईल. त्यानंतर अधिवेशनाआधी इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल. कोणते मंत्री शपथ घेणार हेच ठरलं नसल्याने खातेवाटप हा फार पुढचा विषय – अनिल पाटील

10:19 (IST) 5 Dec 2024

ठाणेकरांची अवघ्या ११ महिन्यांत सात कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक

ठाणे : सायबर गुन्हेगारांकडून तयार केलेले डिजीटल अटकेच्या सापळ्यात नागरिकांची फसवणूक होऊ लागली आहे. मागील ११ महिन्यांत ठाणे जिल्ह्यातील डिजीटल अटक प्रकरणात १३ गुन्हे दाखल असून यामध्ये नागरिकांची तब्बल सात कोटी ८० लाख ४९ हजार ८२४ इतक्या रकमेची फसवणूक झाली आहे.

सविस्तर वाचा…

09:08 (IST) 5 Dec 2024

शपथविधीसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल

मुंबई : राज्यात स्थापन होणाऱ्या नवनिर्वाचित मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा आझाद मैदानात गुरूवारी होत असून त्यानिमित्त आझाद मैदान आणि आसपसच्या परिसरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. हे बदल गुरूवारी दुपारी १२ वाजल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत लागू राहणार आहे. यावेळी आझाद मैदान परिसरात वाहने उभी करण्याची व्यवस्था नसल्यामुळे नागरिक व कार्यकर्त्यांनी रेल्वेने यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त वाचा

09:08 (IST) 5 Dec 2024

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमन मार्गात अडथळा ठरणाऱ्या रस्ता दुभाजकावर हातोडा

शपथविधी सोहळ्याला येणाऱ्या अतिमहत्वाच्या व्यक्ती फॅशन स्ट्रीटसमोरच्या मार्गाने आझाद मैदानात प्रवेश करणार आहेत. मान्यवरांच्या वाहनांच्या मार्गात अडथळा बनणारा महात्मा गांधी मार्गावर दोन ठिकाणी रस्ते दुभाजक जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले आहेत. मात्र, दुभाजकांच्या तोडकामामुळे सामान्य नागरिकांकडून टीका होऊ लागली आहे.

सविस्तर वृत्त वाचा

09:07 (IST) 5 Dec 2024

Maharashtra Government Formation : ५०० हून अधिक पोलीस तर साडेतीन हजार कॉन्स्टेबल, शपथविधीसाठी पोलिसांचा ‘असा’ असेल बंदोबस्त!

पथविधी सोहळ्याला अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने आझाद मैदान व आसपासच्या परिसरात जोरदार तयारी सुरू आहे. शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांनी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानाच्या परिसराभोवती व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे. पोलिसांनी सांगितले की, मोठ्या संख्येने नागरिक, मान्यवर आणि अति महत्त्वाचे व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना शहरात कडक सुरक्षा आणि कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.

सविस्तर वृत्त वाचा

09:06 (IST) 5 Dec 2024

Maharashtra Oath Ceremony : देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, एकनाथ शिंदेंबाबत सस्पेन्स कायम!

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं निश्चित झाल्यानंतरही एकनाथ शिंदेंची सरकारमध्ये काय भूमिका असणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. राजभवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर त्यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळावर चर्चा झाल्याची माहिती आहे. परंतु, त्यानंतर काहीच अधिकृत माहिती समर आलेली नाही.

सविस्तर वृत्त वाचा

Maharashtra Chief Minister Oath Ceremony Live Updates : राज्याला मिळणार नवं सरकार, शपथविधी सोहळ्याचे अपडेट्स जाणून घ्या!