Maharashtra Politics Crisis Updates, 12 January 2023 : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर अंमलबजावणी संचलनालयाने ( ईडी ) छापेमारी केली. कोल्हापूरमधील कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीने धाड टाकली. या छापेमारीनंतर राज्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. तसेच, देश, विदेश आणि महाराष्ट्रातील विविध शहरांतील घडामोडी आपण जाणून घेणार आहोत…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Maharashtra News Live Updates : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर
उरण : जेएनपीए बंदरावर आधारित – एसईझेडमधील नोकर भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना सामावून घेण्यासाठी जेएनपीएने सेझमधील उद्योगावर आधारित प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी गुरुवारी जेएनपीए कामगार वसाहतीच्या सभागृहात आयोजित सेझ जागर मेळाव्यात केली. यामध्ये महत्वाच्या पदावर भूमिपूत्र रुजू होतील, अशा पद्धतीच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याचा आग्रह धरण्यात आला.
पुणे : मावळमधील चांदखेड येथे अविनाश गोठे या आरोपीने यात्रेत गोळीबार करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला होता. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या शिरगाव पोलीस ठाण्यात आरोपी अविनाश गोठेसह पाच जणांवर हत्येचा प्रयत्न आणि आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाबाबतील शिक्षक परिषदेचे उमेदवार व या मतदारसंघातील विद्यमान आमदार नागो गाणार यांनी गुरुवारी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने गाणार यांना पाठींबा जाहीर केला आहे, मात्र त्यांच्यासोबत अर्ज भरताना भाजपचा एकही बडा नेता उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला पेव फुटले आहे शिक्षक मतदारसंघात भाजपच लढणार अशी चर्चा होती, मात्र पक्षाने बुधवारी गाणार यांना पाठिंबा दिला.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरजितसिंग पुरी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या जाहीर सभा घेऊन लोकसभा प्रवास तथा मिशन १४४ अभियानाची सुरुवात केली आहे. एकप्रकारे भाजपने प्रचाराचा नारळ फोडला आहे.
पुणे : लोहमार्गावरून धावणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेवर गंमत म्हणून फेकलेल्या दगडाचा घाव एका तेरा वर्षे वयाच्या मुलाच्या जिव्हारी लागला. त्यात तो गंभीर जखमी झाला. पण, रेल्वे प्रशासनाच्या तात्काळ हालचालींमुळे उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. आरोपी पाच तासांत पकडण्यात आला. गाडीवर दगड फेकणाराही एक अल्पवयीन मुलगाच होता.
गेल्या तीन दिवसांत दोन अल्पवयीन मुलांसह चौघे जण नायलॉन मांजामुळे गंभीररित्या जखमी झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा झपाटा सुरू केला. पारडी आणि सदर पोलिसांनी लगेच कारवाई करीत नायलॉन मांजा जप्त केला. विक्रेत्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
पुणे : भारतात होणाऱ्या जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर वर्षभर सायबर सुरक्षिततेबाबत जागृती करण्यासाठी ‘ऑनलाइन सुरक्षित राहा’ (स्टे सेफ ऑनलाइन) मोहीम राबवण्यात येणार आहे. या अनुषंगाने उच्च शिक्षण संस्थांमध्येही सायबर सुरक्षेबाबत उपक्रम करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) दिले.
जुनी पेन्शन योजना शासन देणार नाही. कारण दिल्यास राज्य दिवाळखोरीत निघेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात जाहीर केले. जुनी पेन्शन योजना दिल्यास राज्यावर १ लाख १० हजार कोटींचा बोजा पडेल व राज्य दिवाळखोरीत निघेल. त्यामुळे शासन जुनी पेन्शन देणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपचा पराभव केला. आता नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेनेला जागा सोडली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी जिंकणार, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
पुणे : कारगिल युद्धात सतरा हजार फुटांवरील टायगर हिल या बर्फाच्छादित टेकडीवर अठरा गोळ्या शरीरावर झेलून रक्तबंबाळ झाल्यानंतरही विजयश्री खेचून आणणारे परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर योगेंद्रसिंह यादव यांच्या तोंडून कारगिल युद्धाची गोष्ट ऐकण्याचा रोमहर्षक अनुभव नागरिकांनी घेतला.
महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघात शिवसेना (ठाकरे गट)ला जागा सोडण्याची सहमती झाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश इटकीलवार यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरला. यामुळे महाविकास विकास आघाडीत उमेदवारीवरून एकवाक्यता नसल्याचे दिसून येते.
मध्य मुंबईतील वरळी, ना. म. जोशी आणि नायगाव येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासा विरोधात केलेली जनहित याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. त्यामुळे बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशिक – महाराष्ट्र शासनाच्या लोकसेवा हक्क कायद्याच्या प्रभावी अमलबजावणीसाठी आपले सरकार केंद्र, सेतू अथवा महा ई-सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रांची लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक येथील आयुक्त चित्रा कुलकर्णी पाहणी करत आहेत. या भेटीदरम्यान निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील एका केंद्रावर उत्पन्न आणि जात प्रमाणपत्रासाठी ५०० ते ७०० रुपये घेतले जात असल्याची नोंद आढळली.
कल्याण पूर्वेतील मलंगगड परिसरातील काकडवाल गावात बुधवारी दुपारी दुधकर कुटुंबीयांनी महावितरणच्या वीज चोरी शोध पथकावर प्राणघातक हल्ला करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत दोन अधिकाऱ्यांचे ओठ फुटले आहेत. दात पडले आहेत. महिला कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.
पुणे : बंदी घातलेल्या नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने अटक केली. लोहियानगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सोहेल आरीफ शेख (रा. इनामकेमळा, लोहीयानगर) याला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेवर राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली असून यात भाजप व संघ परिवाराशी संबंधित व्यक्तींना संधी देण्यात आली आहे. यातील दोन सदस्य विद्यापीठ क्षेत्राबाहेरील असल्याने शिक्षण क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.
पुणे : परवाना असणाऱ्या वितरकांनाच नियमाप्रमाणे मद्य विक्री करता येते. तसेच, परवाना असलेल्या ठिकाणीच ग्राहकांना मद्य सेवन करता येते. मात्र, अवैध मद्यविक्री आणि अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या २९ जणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे.
पोलिसांचा वचक संपल्यामुळे नागपुरात गुन्हेगारांनी तोंड वर काढले आहे. पोलिसांचा धाकच उरला नसल्यामुळे नागपुरात गुंडाराज सुरु झाले असून नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात दर दुसऱ्या दिवशी एक हत्याकांड घडत असल्याने उपराधानीतील नागरिक वेगळ्याच दशहतीत जगत आहे.
कोराडी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पासाठी कोळसा घेऊन जाणारी मालगाडी गुरुवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास नागपूरजवळील कळमना रेल्वे स्थानकाजवळ घरसली. यामुळे नागपूर ते हावडा मार्गावरील रेल्वेगाड्या सुरक्षिततेची उपायोजना म्हणून काही मिनिटांसाठी ठिकाठिकाणी थांबवून ठेवण्यात आल्या.
पुणे : कारागृहातील बंदीजनांमध्ये अनेक सुप्त कलागुण असतात. बंद्यांना त्यांचे कलागुण, छंद कारागृहात असताना जोपासण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिल्यास त्यांच्याकडून विविध कल्पक गोष्टींची निर्मिती होत असते. अशा कारागृह उत्पादित वस्तू लवकरच ई मार्केटप्लसवर नागरिकांना खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल, असे अपर पोलीस महासंचालक व कारागृह व सुधारसेवाचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
वनपरिक्षेत्र कोठारी अंतर्गत येत असलेल्या उपवनक्षेत्र करंजीमधील बोरगाव येथे एका शेतात वीजप्रवाह सोडून चार जणांनी चितळाची शिकार केली. पण मांसाची विल्हेवाट लावताना चौघेही वनविभागाच्या जाळ्यात अडकले. यांच्याकडून चितळाचे मांस व शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पुणे : कर्करोगावरील उपचार कमीत कमी वेदनादायी आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध व्हावा यासाठी भारतीय डॉक्टरने हाती घेतलेल्या एका संशोधनाची दखल जागतिक स्तरावरील वैद्यकीय नियतकालिकांकडून घेण्यात आली आहे. डॉ. विजय कनुरू यांनी नॅनो कर्क्युमीनच्या वापरातून तोंडाच्या कर्करोगावर औषध विकसित केले असून, वैद्यकीय संशोधनातून त्याबाबत हाती लागलेले निष्कर्षही समाधानकारक आहेत.
यवतमाळवरून ट्रक (क्र.एमएच २७-एक्स ७२००) अमरावतीकडे जात होता. नेरवरून यवतमाळकडे येणारी कार (क्र. एमएच ०६-एएन ५९८२) यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. ट्रक वेगात होता, वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. अपघातात कार संपूर्णपणे क्षतिग्रस्त झाली.
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) महत्त्वाकांक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हाळुंगे-माण नगररचना योजनेस (टाऊन प्लॅनिंग – टीपी स्किम) राज्य सरकारकडून नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. मुळा आणि मुठा नदीची पूररेषा निश्चित करून नव्याने फेररचना करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानी बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती गुलदस्त्यात असली, तरी या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी युतीबाबत जास्त न ताणता भूमिका जाहीर करावी, असे ते म्हणाले. सविस्तर वाचा

काही दिवसांपूर्वी उझबेकिस्तानमध्ये कफ सिरपचे सेवन केल्यामुळे तब्बल १९ लहान मुलांचा मृत्यू झाला होता. मारयॉन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या मूळच्या भारतीय कंपनीने तयार केलेल्या कफ सिरपच्या सेवनामुळे ही घटना घडली, असा दावा करण्यात येत होता. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने या कंपनीचे दोन कफ सिरप लहान मुलांना देऊ नये, असे आवाहन केले आहे. वाचा सविस्तर
नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी येथील खाडी किनारी एक मृतदेह आढळला होता. अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील हा मृतदेह कांदळवनात अडकलेल्या अवस्थेत होता. तो बाहेर काढण्यात आला असून त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
गिरीश महाजन यांच्या विधानावर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही क्रेडिट घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. आम्हाला कोणाचीही फूस नव्हती. आम्हाला कोणीही भूलवलेलं नाही. आम्ही आमच्या मनाने बंड केले, असे संजय गायकवाड म्हणाले आहेत. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते. वाचा सविस्तर
अजित पवार यांच्या विधानानंतर त्यांनी कणकवली येथे वाहनांवर ‘धर्मवीर संभाजी महाराज’ असे लिहिलेले स्टिकर्स लावण्याची मोहीम हाती घेतली होती. हाच मुद्दा घेऊन ते राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यावरही टीका करत आहेत. त्यांनी बुधवारी (११ जानेवारी) वर्धा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना अमोल कोल्हे यांचा एकेरी उल्लेख केला. तसेच आक्षेपार्ह शब्दांत टीका केली. वाचा सविस्तर