Maharashtra Politics Crisis Updates, 12 January 2023 : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर अंमलबजावणी संचलनालयाने ( ईडी ) छापेमारी केली. कोल्हापूरमधील कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीने धाड टाकली. या छापेमारीनंतर राज्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. तसेच, देश, विदेश आणि महाराष्ट्रातील विविध शहरांतील घडामोडी आपण जाणून घेणार आहोत…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Maharashtra News Live Updates : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर
तब्बल ५२ वर्षांनी ही सवंगडी मंडळी एकत्र जमली. कुणी मुंबईतच, कुणी मुंबई बाहेर, तर कुणी चक्क परदेशात वास्तव्यास आहेत. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर निरनिरळ्या व्यवसायात, नोकरीत रमलेल्या या मित्र-मैत्रिणीनींनी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र भेटण्याचा निर्णय घेतला आणि मानसी कीर्तिकर, मोहन बेडेकर, विश्वास पेंडसे आणि प्रकाश पिंपुटकर कामाला लागले.
प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांणा उधाण आले होते. दरम्यान, या भेटीबाबत खुद्द प्रकाश आंबेडकर यांनीच सविस्तर माहिती दिली आहे. प्रत्येक भेटीत राजकीय विषय नसतो, असे आंबेडकर म्हणाले आहेत. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे गटासोबतच्या युतीवरही भाष्य केले आहे. ते आज (१२ जानेवारी) मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. वाचा सविस्तर
पुणे : कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सत्कार करण्यात आला. प्रेक्षकांच्या गर्दीमुळे नाट्यगृहात बसण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे, मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना नाट्यगृहातील मोकळ्या जागेत भिंतीजवळ उभे रहावे लागले असल्याच्या घटनेची चर्चा झाली असताना वसंत मोरे यांनी ‘मला नीट मांडी घालून बसता येते’ अशा आशयाची पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टची चर्चाही समाजमाध्यमातून सुरू झाली आहे.
या महामार्गावर भारतीय वन्यजीव संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने उपशमन योजना आखण्यात आल्या. त्यासाठी वनखाते, स्वयंसेवी यांची समिती गठीत करण्यात आली, पण प्रत्यक्षात या सर्व प्रक्रियेत गांभीर्याचा अभाव असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. बुधवारी भरधाव वाहनाने हिंगणानजीकच्या समृद्धी महामार्गावर रानडुकरांचा कळप चिरडला गेला.
वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटात युतीच्या चर्चा सुरू असतानाच वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. बुधवारी रात्री जवळपास अडीच तास या दोघांमध्ये खलबतं सुरू होती, अशी माहिती आहे. या भेटीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सविस्तर वाचा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानी बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती गुलदस्त्यात असली, तरी या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, या भेटीबाबत वंचित बहुजन आघाडी प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी एबीपी माझाशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वाचा
वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटात युतीच्या चर्चा सुरू असतानाच वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. बुधवारी रात्री जवळपास अडीत तास या दोघांमध्ये खलबंत सुरू होती. या भेटीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, या भेटीबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझा या वृत्तावाहिनी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या शिक्षकेतर पदांच्या भरती प्रक्रियेत बनावट उमेदवार परीक्षेस बसणे, परीक्षेमध्ये गैरप्रकार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर होणे, याबाबतच्या तक्रारी ठोस पुराव्यांअभावी सिद्ध होत नसल्याचे निरीक्षण या संदर्भात चौकशी करणाऱ्या समितीने नोंदविले आहे.
उल्कापातामुळे निर्मित लोणार विवर हे जसे जागतिक आश्चर्य आहे, तसेच या विवराच्या तळाशी निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर हेही एक आश्चर्य आहे. या पाण्याचा पीएच हा १०.५ इतका जास्त असल्याने शेवाळवर्गीय वनस्पती वगळता यात कोणताही सजीव प्राणी जगण्याची शक्यता नव्हती.
मालेगाव : अजमेर येथून एका खासगी प्रवासी बसमधून मालेगावात आणण्यात येणारा प्राणघातक शस्त्रांचा साठा पोलिसांनी जप्त केला असून, या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे.
एका अज्ञात इसमाने सोमवारी दुपारी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत दूरध्वनी करून शाळेत टाइम बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. काही तासांनंतर अज्ञात इसमाने शाळेच्या प्रवेशद्वारावर दुसरा दूरध्वनी केला होता. अज्ञात इसमाने केलेल्या दूरध्वनीनंतर सुरक्षा यंत्रणा आणि शाळा प्रशासनाची तारांबळ उडाली.
महापालिकेच्या आयुक्तांच्या खुर्चीवर हक्क कुणाचा, याचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडला आहे. याबाबतचा निर्णय बुधवारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात (मॅट) होणार होता. मात्र, न्यायाधीशांना अपघात झाल्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली असून, आता १३ जानेवारीला दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे.
उत्तर मुंबई परिसरातील धोकादायक बनलेली तब्बल १०० वर्षे जुनी दुमजली इमारत रहिवासी, पादचारी आणि वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन जमीनदोस्त करण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेने सुरू केली आहे. या इमारतीमधील १७ रहिवासी आणि १४ व्यावसायिक गाळेधारकांना लवकरच इमारत रिकामी करावी लागणार आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक उद्योग गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी सरकारविरोधाता आवाज उचलला होता. महाराष्ट्रातून गेलेली गुंतवणूक हा चर्चेचा विषय बनला. त्यानंतर आता १६ जानेवारी पासून दावोस येथे आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषद होत आहे. या परिषदेला देशातील सर्वच राज्यांचे प्रमुख गुंतवणूक आणण्यासाठी जात आहेत. १९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दावोसचा दौरा अर्ध्यात सोडून येणार असल्याची माहिती मिळत आहे. यावरुन शिंदे – फडणवीस हे राज्यात गुंतवणूक आणण्याबाबत गंभीर नाहीत, अशी बोचरी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना केली.
संघटनात्मक पातळीवर फारशी फाटाफूट झाली नाही. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ही स्थिती राज्यातील सत्ताधारी शिंदे गटाला अस्वस्थ करणारी होती. या स्थितीत मनपातील माजी विरोधी पक्षनेते बोरस्ते आणि शिवसेनेशी कायमच एकनिष्ठ राहिलेले माजी नगरसेवक लवटे यांच्या नेतृत्वाखाली १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करीत ठाकरे गटाला धक्का दिला होता. त्यानंतर ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटाकडे ओघ सुरु झाला.
वाकोला येथे टेम्पो आणि दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार आणि त्याच्या सोबत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाकोला पोलीस अधिक तपास करीत आहेत. वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर चौक येथील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर गुरूवारी पहाटे हा अपघात झाला.
वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटात युतीच्या चर्चा सुरू असतानाच वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. बुधवारी रात्री जवळपास अडीच तास या दोघांमध्ये खलबतं सुरू होती, अशी माहिती आहे. या भेटीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.