Maharashtra Breaking News : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आणि अवघी पंढरी विठुनामाच्या गजरात दुमदुमली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपरिवार विठुरायाचं दर्शन घेतलं. एकीकडे विठुनामाचा गजर चालू असताना दुसरीकडे यानिमित्ताने राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे. राज ठाकरेंनी ‘हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा एकसंध सह्याद्री दिसू दे’, असं सूचक ट्वीट केलं. तर मुख्यमंत्र्यांनी यानिमित्ताने केलेल्या घोषणा व विधानांवर राजकीय वर्तुळातून पडसाद उमटू लागले आहेत.
Marathi News Updates: राज्यभरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!
कोल्हापूर : भक्तिमय वातावरण आणि विठू नामाच्या गजरात बुधवारी प्रति पंढरपूर नंदवाळ येथे आषाढी एकादशीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात झाला. पावसाची भुरभुर असतानाही भाविक उत्साहाने दिंडी, रिंगण सोहळ्यात सहभागी झाले होते. जिल्हातील सर्वच विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी होती.
करवीर तालुक्यातील नंदवाळ गावातील विठ्ठल मंदिर प्राचीन काळातील आहे. प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या गावात आषाढी एकादशीला कोल्हापूर पासून दिंडी काढली जाते. आज सकाळी मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरापासून नंदवाळकडे दिंडी रवाना झाली. माऊली रथाची फुलांची आकर्षक सजावट जोतिबा रोड येथील फुल व्यापाऱ्यांनी केली होती.
डोकं ठिकाणावर आहे का ह्या सरकारचं? ७,८२,९९१ कोटींचे कर्ज झाले आहे महाराष्ट्रावर. कर्जबाजारी करुन ठेवले आहे राज्य आणि आता मतांसाठी हा फालतूपणा? उद्योग आणा राज्यात, लोकांना नोकऱ्या द्या, भीक नाही - अंजली दमानिया
https://twitter.com/anjali_damania/status/1813520905479565749
लंडनच्या म्युझियममधली वाघनखं अखेर साताऱ्यात दाखल झाली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही वाघनखं साताऱ्यात आली असून येत्या १९ तारखेपासून ती शिवप्रेमींना पाहायला मिळणार आहेत.
नवी मुंबई : सिडकोच्या जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या जागी टॉवरचे इमले उभारणाऱ्या बिल्डरांनी या प्रकल्पास लागूनच असलेले वाशी परिसरातील उद्यानांच्या जागा गिळंकृत केल्याची प्रकरणे उघडकीस आली असताना या प्रकरणी इतका काळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या महापालिका प्रशासनाने उशिरा का होईना उद्यानांच्या या मोकळ्या जागा पुन्हा मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे.
पनवेल : खारघर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणात नवी मुंबई पोलीसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने तीन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पावणेचार लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ संबंधित मोठी कारवाई केली असून सदर कारवाईत १ किलो ४ ग्रॅम वजनाचे तब्बल २ कोटी रुपयांचे एमडी विक्री प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
शासकीय यंत्रणेकडून राबविण्यात आलेल्या उत्कृष्ठ उपक्रमांची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर नामांकन देत सर्वोत्कृष्ठ उपक्रमांना स्कॉच ग्रुप या संस्थेच्या वतीने पुरस्काराने गौरविण्यात येते.
एका खासगी आस्थापनेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या महिलेचा इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून पडून मंगळवारी मृत्यू झाला.
नरिमन पॉइंट येथील एनसीपीएमधील दिलीप पिरामल आर्ट गॅलरीत शिवडी - न्हावाशेवा अटल सेतूच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी वांद्रे येथे स्वतंत्र रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेने पावले उचलली आहेत.
अंबरनाथ शिवसेनेचे माजी शहप्रमुख अरविंद वाळेकर यांनी नाव न घेता १५ वर्षांच्या कुंभकर्णाला आम्ही जागा केला अशी आमदार किणीकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
लंडनच्या म्युझियममधील वाघनखं मुंबईत दाखल झाली असून येत्या १९ जुलै रोजी साताऱ्यातील संग्रहालयात ठेवली जाणार आहेत. तीन वर्षं ही वाघनखं महाराष्ट्रात राहणार आहेत.
घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटनाप्रकरणात २२ संशयित व्यवहारांच्या नोंदींबाबत गुन्हे शाखा तपास करीत आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रचलेल्या सापळ्यात रेल्वे सुरक्षा दलाच्या(आरपीएफ) उपनिरीक्षकाला ७० हजारांची लाच घेताना अटक केली.
मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकातील गृह फलाटाचे काम (होम प्लॅटफाॅर्म) गेल्या वर्षभरापासून रखडले आहे.
पुणे : येरवडा भागात पूर्ववैमनस्यातून सराइत गुन्हेगारावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. पसार झालेल्या आराेपींना येरवडा पोलिसांनी अटक केली.
पुणे : येरवडा भागात पूर्ववैमनस्यातून सराइत गुन्हेगारावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. पसार झालेल्या आराेपींना येरवडा पोलिसांनी अटक केली.
पुणे : येरवडा भागात पूर्ववैमनस्यातून सराइत गुन्हेगारावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. पसार झालेल्या आराेपींना येरवडा पोलिसांनी अटक केली.
वर्धा : हिंगणघाट येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या उन्हाळी अधिवेशनात केली. पण त्यानंतरही वाद संपलेला नाहीच. आता जागेवरून आंदोलन सुरू झाले आहे.
पुणे : राज्यात ६४२ अभ्यासक्रमांसाठी मुलींना शंभर टक्के शुल्कमाफी मिळणार आहे. शिक्षण संस्थांना सरकारकडून सप्टेंबरमध्ये प्रवेशाची रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे संस्थाचालकांनीही थोडे थांबावे. शुल्क भरल्याशिवाय मुलींना प्रवेश न देणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात दिला. मुलींना पैसे न घेताच प्रवेश द्यायचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयार केलेल्या अभ्यासक्रम आराखड्यावर सुमारे ३ हजार ९०० हरकती, सूचना दाखल झाल्या आहेत. या हरकती-सूचना विचारात घेऊन अभ्यासक्रम आराखडा अंतिम करण्यात येत असून, आराखड्यातील मनुस्मृतीचा संदर्भ काढून टाकला जाणार आहे.
एका इसमाने पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे मोबाईलच्या मदतीने बनावट अश्लील छायाचित्र तयार करून त्यांना विविध माध्यमांमार्फत पाठवण्यास सुरुवात केली आहे.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २६३ कोटी रुपयांच्या प्राप्तिकर गैरव्यवहाराप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांच्यासह तिघांविरोधात मंगळवारी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसई सातीवली खिंडीत केबल वाहतूक करणारा ट्रेलर उलटून अपघात घडला आहे.
उत्तनच्या येडू कंपाउंड परिसरात सहा वर्षीय मुलाचा पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
६०० रिक्त पदांसाठी तब्बल २५ हजारांहून अधिक इच्छुकांनी अर्ज केले होते.
हे सगळे आज इथे उद्या तिथे ... ह्या लोकांना फक्त सत्ता हवी.... येणारी विधान सभा मविअ जिंकण्याची शक्यता जास्त म्हणून तिकडे... ना त्यांना तत्व आहेत, ना निष्ठा - अंजली दमानिया
https://twitter.com/anjali_damania/status/1813471076707455263
ही एकी तोडण्याचा प्रयत्न अनेक वेळा झाला पण कोणा ला ही शक्य झाले नाही. काही मनुवादी विशालगडावर तोडमोड करण्यात मग्न होते तेव्हा हे दोघे समता आणि बंधुत्व वारी मध्ये दाखवत होते …. ही परंपरा १००० वर्ष जुनी आहे.. निवडणुकी आधी दंगा घडीवणे हे २००९ साली सुद्धा झाले होते - जितेंद्र आव्हाड</p>
आता आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.
Marathi News Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर!