Maharashtra Breaking News : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आणि अवघी पंढरी विठुनामाच्या गजरात दुमदुमली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपरिवार विठुरायाचं दर्शन घेतलं. एकीकडे विठुनामाचा गजर चालू असताना दुसरीकडे यानिमित्ताने राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे. राज ठाकरेंनी ‘हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा एकसंध सह्याद्री दिसू दे’, असं सूचक ट्वीट केलं. तर मुख्यमंत्र्यांनी यानिमित्ताने केलेल्या घोषणा व विधानांवर राजकीय वर्तुळातून पडसाद उमटू लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Updates

Marathi News Updates: राज्यभरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!

12:02 (IST) 17 Jul 2024
शहरबात: तोतया डाॅक्टरांना रोखणार कोण?

लोणी काळभोर भागात दहावी उत्तीर्ण कंपाउंडर पाच वर्षे दवाखाना थाटून रुग्णांवर उपचार करतो आणि त्याचा यंत्रणांना इतकी वर्षे सुगावाही लागत नाही, हे समोर येणे सुन्न करणारे आहे.

सविस्तर वाचा…

11:52 (IST) 17 Jul 2024
पुण्यात सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी मोठे पाऊल! मराठा चेंबरचा सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडियासोबत करार

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.

सविस्तर वाचा…

11:42 (IST) 17 Jul 2024
Ashadhi Ekadashi 2024 Live Update: राज ठाकरेंची सविस्तर पोस्ट

आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. गेली ८ शतकं विठ्ठलाच्या ओढीने पंढपुराला लाखो भक्त न चुकता प्रस्थान करतात. माझ्या मते जगातील अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल. म्हणजे आपल्या परंपरेत वारीसारखं काही नाही, असं नाही. ‘यात्रा’ ही आपल्या हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग. पण चारधाम यात्रा असो की काशीची यात्रा असू दे, त्या सगळ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरच्या. त्या देखील एकदाच घडतात. पण वारीचं असं नाही. विठ्ठलाच्या ओढीने दरवर्षी, नेमाने, पायी, शेकडो मैल प्रवास करावयाचा, उन्हात, पावसापाण्यात, पडतील त्या हालअपेष्टा सोसत. वारकरी आपल्या गावातील दिंडीसोबत निघतात. निघताना आपल्यासोबत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अनेक संतांचा सहवास आहे ही श्रद्धा मनात घेऊन निघायचं. समोर जे येईल ते स्वीकारत पुढे जायचं आणि विठ्ठलाकडे काहीही न मागता, जे वर्षभर घडणार आहे ती विठ्ठलाची इच्छा आहे असं मानण्याची आणि स्वीकारण्याची शक्ती घेऊन परत यायचं. देवालाच भक्त भेटीची ओढ असणारा हा देव असल्यामुळे गेली अनेक शतके महाराष्ट्रातील तळागाळातील आणि सर्व जातीतील लोकांना आपलासा वाटणारा हा देव. पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी आल्यावर जिथे माणसाचं मी पण गळून पडते तिथे जातीचं भान तरी काय आणि कसं टिकणार. त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे असं मी नेहमी मानतो. पण दुर्दैवाने गेलं एक ते दीड दशक महाराष्ट्रात जातीपातीचे विष इतकं खोलवर रुजत चालले आहे की हाच तो का महाराष्ट्र असा प्रश्न पडतो. जेंव्हा अगदी ७, ८ वर्षाच्या मुलामुलींच्या बोलण्यात जातीपातीचे संदर्भ येतात तेंव्हा मात्र भीती वाटते. मुघलांच्या आक्रमणात सुद्धा टिकलेला, सत्व न गमावलेला मराठी समाज, पुढे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीला पण पुरून उरलेला मराठी समाज आणि स्वातंत्र्यानंतर ‘महा’राष्ट्र उभं करण्याच्या जिद्दीने उभा राहिलेला समाज, अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बळगणाऱ्या मूठभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चालला आहे हेच कळत नाही. म्हणूनच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर. आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे – राज ठाकरे</p>

11:38 (IST) 17 Jul 2024
Ashadhi Ekadashi 2024 Live Update: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा ‘इतके’ हजार रुपये मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

https://twitter.com/LoksattaLive/status/1813449664848621895

11:37 (IST) 17 Jul 2024
Ashadhi Ekadashi 2024 Live Update: उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांचा व्हिडीओ…

उद्धव ठाकरे यांचे छायाचित्रण आणि सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांच्या सुरेल संगीताने लायबद्ध चित्रफीत ठाकरे गटानं शेअर केली आहे…पहावा विठ्ठल!

11:26 (IST) 17 Jul 2024
मोहरमनिमित्त पुण्याच्या मध्यभागातील वाहतुकीत आज बदल

मोहरमच्या काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीनिमित्त मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बुधवारी दुपारनंतर बदल करण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा…

11:25 (IST) 17 Jul 2024
ठाणे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरियासह स्वाईन फ्ल्यूची साथ; ठाणे शहरात स्वाईन फ्ल्यूचे १३१ रुग्ण

यंदाच्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजाराने डोकेवर काढले आहे. जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियासह स्वाईन फ्ल्यूचे रुग्णही आढळून येत आहेत.

सविस्तर वाचा…

11:25 (IST) 17 Jul 2024
पुणे: तब्बल ५६ वार करून सामाजिक कार्यकर्त्याचा खून; १२ जणांना जन्मठेप

हडपसर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यावर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याप्रकरणी १२ आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सविस्तर वाचा…

11:24 (IST) 17 Jul 2024
मध्य, पश्चिम रेल्वे फलक हटविणार; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कार्यवाही

मुंबईतील समुद्री वाऱ्यांचा वेग, हवामानाची स्थिती पाहता महापालिका प्रशासनाने फलकांबाबत नियमावली तयार केली आहे.

सविस्तर वाचा…

11:24 (IST) 17 Jul 2024
मुंबईतील विमान प्रवासी संख्येत ७ टक्क्यांची वाढ

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत ७ टक्क्यांनी प्रवासी वाढले.

सविस्तर वाचा…

11:23 (IST) 17 Jul 2024
विजेअभावी बदलापुरकरांवर आरोग्य, उद्योग आणि पाणी संकट; कार्यालये, बँका, शाळा, दुकानांसह सर्वसामान्य नागरिक जेरीस

एकीकडे विजेअभावी पिण्याचे पाणी मिळणेही दुरापास्त झाले असताना वीज नसल्याने ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयातही वाताहत झाल्याचे चित्र दोन दिवसांपूर्वी दिसले.

सविस्तर वाचा…

11:23 (IST) 17 Jul 2024
Marathi News Live Updates: “अशा भूमीत विद्वेषाचं निवडुंग रुजणार नाही”, शरदचंद्र पवार गटाची सूचक पोस्ट

प्रवास खडतर असला तरी महाराष्ट्राने माथी विवेकाची तुळस घेऊन युगानुयुगे अखंड समानतेची वारी केली आहे, करणार आहे…. अशा या भूमीत विद्वेषाचं निवडुंग रुजणार नाही ! – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं सूचक ट्वीट

11:21 (IST) 17 Jul 2024
Ashadhi Ekadashi 2024 Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आषाढीनिमित्त मराठीतून शुभेच्छा!

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असू देत आणि आपल्या सर्वांना आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे. या उत्सवामुळे आपल्यामध्ये भक्तीभाव, नम्रता आणि करुणा वाढीला लागू दे. अतिशय प्रामाणिकपणे गरिबातील गरिबाची सेवा करण्यासाठी देखील आपल्याला प्रेरणा मिळू दे.

11:20 (IST) 17 Jul 2024
Maharashtra News Live: पूजा खेडकर यांच्यावरील आरोपांवर दिलीप खेडकरांची भूमिका

दिव्यांग श्रेणीत किती टक्के दिव्यांग असल्यावर त्या व्यक्तीला दिव्यांग समजणार हे त्यांनी निश्चित केलं आहे. अशा व्यक्तींसाठी ४ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. योग्य प्रक्रिया पूर्ण करूनच त्यासंदर्भातलं प्रमाणपत्र मिळवलं आहे. पण त्या प्रमाणपत्रावर यूपीएससी विश्वास ठेवत नाही. ते स्वत:चं बोर्ड नियुक्त करतात. दोन रुग्णालयांमध्ये चाचणी होते. त्याचे जे निकाल येतात ते निकषांत बसणारे असतील तरच संबंधित व्यक्तीला दिव्यांग समजलं जातं. अन्यथा त्या व्यक्तीला दिव्यांग मानलं जात नाही. ही सर्व प्रक्रिया पूजाच्या बाबतीत झाली आहे. त्यामुळे तिच्याकडे बघून ती दिव्यांग वाटत नाही हे दावे निराधार आहेत. असे कितीतरी अधिकारी आहेत की त्यांचे फोटो बघितल्यास ते सर्वसाधारण व्यक्तीसारखेच दिसतात. त्या नियमांमधल्या ९० टक्के शारिरीक व्याधी दिसताना सर्वसामान्य व्यक्ती दिसतात, पण वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्या व्याधी दिसून येतात – पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी मांडली भूमिका

11:17 (IST) 17 Jul 2024
Ashadhi Ekadashi 2024 Live Update: श्रीकांत शिंदे यांचं पंढरपूरमध्ये सूचक विधान…

आमच्या चारही पिढ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने इथे उपस्थित आहेत.हे फार मोठं भाग्य आहे. पांडुरंगाच्या आशीर्वादानेच एकनाथ शिंदे काम करत आहेत. वारकरी सरकारच्या कामावर खूश आहेत. लोकांचा आशीर्वाद एखनाथ शिंदेंसोबत आहे. भविष्यात वारकऱ्यांचा आशीर्वाद असेल तर दरवर्षी पांडुरंगाची पूजा करण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे उपस्थित असतील- श्रीकांत शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता यांनी विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. (फोटो सौजन्य: ट्विटर )

Marathi News Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर!