उद्धव ठाकरे यांनी काल रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी करत भाजपा-शिंदे गटावर निशाणा साधला आहे. त्यांच्या या सभेनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय आज होळी आहे. यासंदर्भातील बातम्यांवरही आज दिवसभर नजर असणार आहे.
Marathi News Live Updates : “उद्धव ठाकरेंची खेडमधली सभा म्हणजे मला पाहा आणि फुलं…” भाजपाची टीका
नागपूर : विवाहित प्रेयसीला घरी भेटायला आलेल्या प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्या सासूवर बलात्कार केला. ही धक्कादायक घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी सुनेच्या प्रियकराला अटक केली. विनू (२८) असे नराधम आरोपीचे नाव आहे.
डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील कोपर खाडी भागात खासगी मालकीची जमीन उकरून वाळू उपसा करणारी एक बोट शनिवारी रात्री चिखलात अडकली होती. ही माहिती कोपर ग्रामस्थांना समजताच त्यांनी बोटीच्या दिशेने धाव घेतली. वाळू माफिया बोटीचा ताबा सोडून पळून गेले. रात्रभर या बोटीवर ग्रामस्थांनी पाळत ठेऊन रविवारी दुपारी महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बोट पेटून देण्यात आली. १२ लाख रुपये किमतीची सामग्री नष्ट केली.
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत येणाऱ्या मामलाच्या जंगलात एका पूर्ण वाढ झालेल्या वाघाचा मृतदेह मिळाल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे. साधारणतः आठ ते दहा दिवसांपूर्वी या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.
होळी व धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागातील बाजारपेठा रंग-पिचकारीने सजल्या आहेत. धूलिवंदनानिमित्त बाजारात चिनी पिचकारी आणि नैसर्गिक रंगांना मोठी मागणी आहे. सविस्तर वाचा…
रेल्वे रुळाच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे मार्च महिन्यातील शनिवार आणि रविवारी काही वेगवेगळ्या मार्गावरील मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सविस्तर वाचा…
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या मुलीचा आईने तिच्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आईसह प्रियकराला खडकी पोलिसांनी अटक केली. सविस्तर वाचा…
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची शिवाजीनगर येथील मोदी बाग येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी रवींद्र धंगेकरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला होता. आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या ‘बरं झालं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं’ या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. आम्हाला देशद्रोही म्हटला, तर जीभ हासडून टाकू, असे ते म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सविस्तर वाचा
केंद्रीय निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. तसेच भाजपा गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं, असं म्हणत खोचक टोलाही लगावला. दरम्यान, ठाकरेंच्या या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वाचा-
उद्धव ठाकरेंची खेडमधली सभा म्हणजे मला पाहा आणि फुलं वाहा अशीच होती. त्या सभेत निवडणूक आयोगाला वाईट ठरवलं गेलं कारण त्यांनी योग्य निकाल दिला. आमदारकीसाठी भाजपाने मदत केली भाजपा वाईट. माझं बरोबर आणि मीच चांगला हे उद्धव ठाकरेंचं धोरण आहे असं म्हणत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे.