Maharashtra Rain Updates, 19 July 2022 : महाराष्ट्रात रोज राजकीय सत्तानाट्याचे नवनवे अंक रंगू लागल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेनेच्या १२ खासदार शिंदे गटाकडे गेले असताना दुसरीकडे २० जुलैपासून सर्वोच्च न्यायालयात सरकराच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे राज्यातल्या या राजकीय सुंदोपसुंदीचा शेवट नेमका कोणत्या प्रकारे होणार आहे, यावरून विश्लेषकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Today : राष्ट्रपती-उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या १२ बंडखोर खासदारांसोबत दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत खासदार राहुल शेवाळे यांनी गौप्यस्फोट केलेत. “भाजपा-शिवसेनेच्या युतीबाबत २०२१ मध्येच उद्धव ठाकरे व नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली. मात्र, जुलैमध्ये भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन झाल्यानंतर हा विषय फिस्ककटला,” असा दावा शेवाळेंनी केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर फडणवीसांनी बोलणं टाळलं आहे.
भाजपा-शिवसेना युतीसाठी उद्धव ठाकरे-मोदींमध्ये २०२१ मध्येच बैठक झाली का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…https://t.co/WigSXvDdol#DevendraFadnavis #UddhavThackeray #NarendraModi
— LoksattaLive (@LoksattaLive) July 19, 2022
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. महाविकास आघाडीमधील ५० आमदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजधानी दिल्लीत असून त्यांनी बंडखोर खासदारांसोबत बैठक घेतली आहे. यानंतर त्यांनी शिवसेनेचा स्वतंत्र गट म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलं आहे. सविस्तर बातमी
पुण्यात आईच्या उपचाराच्या नावाखाली एका आरोपीने आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह ४ महिला आमदारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक मदतीच्या नावाखाली फसवणूक प्रकरणात भाजपा आमदार श्वेता महाले यांनाही फोन कॉल आला होता. यावर स्वतः श्वेता महाले यांनी स्पष्टीकरण दिलं. “मलाही आईच्या उपचाराच्या नावाखाली आर्थिक मदतीसाठी एका तरुणाचा फोन आला होता. मात्र, मी शहानिशा केल्यानंतर कोणतीही मदत केली नाही,” अशी माहिती त्यांनी दिली.
सततच्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात त्यातही चिमूर तालुक्यात झालेले नुकसान खूप मोठे आहे. नागरिकांच्या शेतात तसेच घरातही पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा आणि स्पेशल स्कील इन कम्प्युटर टायपिंग इन्स्ट्रक्टर्स अँड स्टुडन्टस् या दोन्ही परीक्षा २५ जुलै ते २३ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने एकूण २८१ परीक्षा केंद्रांवर होणार आहेत.
भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबधित महिलेवर लैंगिक अत्याचाराची घटना सोलापूर येथे घडली होती. त्यामुळे तो गुन्हा डेक्कन पोलिसांनी तात्काळ सोलापूर पोलिसांकडे वर्ग केला.
डोंबिवली येथील आयसीआयसीआय बँकेच्या एका शाखेमधून १२ कोटी २० लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी ठाणे मालमत्ता गुन्हे शोध कक्षाने तीन जणांना अटक केली आहे. इसरार कुरेशी (३३), शमशाद खान (३३) आणि अनुज गिरी (३०) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.
भडकावू भाषणाची चित्रफित व विचार समाज माध्यमातून प्रसारित होऊ नये, यासाठी आक्षेपार्ह व जनप्रक्षोभक ‘पोस्ट’ प्रसारित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नुपूर शर्मा प्रकरणाची कोणतीही अशी ‘पोस्ट’ प्रसारित केल्यास भारतीय दंड संहितेचे १८६० चे कलम ५०५,१५३ अ, ११६ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे, तसे आदेश जिल्हा अपर दंडाधिकारी प्रा.संजय खडसे यांनी निर्गमित केले आहेत. जिल्ह्याचे वातावरण सलोख्याचे राहावे, यासाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
शिवसेनेत फूट बंडखोरांनी नव्हे तर भाजपाने पाडली असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना भवनात उत्तर भारतीय एकता मंचच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांसोबत भाजपावरही टीकास्त्र सोडलं. तुम्ही माझ्याकडचे कितीही बाण न्या, धनुष्य माझ्याकडेच असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले आहे.
टिटवाळा येथील एक महिला चप्पलला चिखल लागला म्हणून पुराचा ओघ असलेल्या भातसा नदी पात्रात चप्पल धुण्यासाठी उतरली. पुरामुळे नदी लगतची जमीन भुसभुशीत झाली असल्याने तिचा पाय घसरून ती नदीत पडली आणि पुराच्या पाण्यात वाहून जाऊ लागली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत असून थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
मुंबईत जुलैच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नुकतीच विश्रांती घेतली असली तरी आठ दिवसांतच लेप्टोच्या रुग्णांची संख्येत काही प्रमाणात वाढली आहे. जुलैमध्ये लेप्टोचे ११ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचा ही प्रादुर्भाव कायम असून ३३ रुग्णांचे निदान झाले आहे.
हडपसर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी लोकसभेत केली. लोकसभेत कलम ३७७ अन्वये मुद्दा उपस्थित करून या मागणीकडे बापट यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
भातसा धरण क्षेत्रात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या (बुधवार) सकाळी ११ वाजता धरणाचे पाच दरवाजे उघडून सुमारे ६ हजार २१५.४४ क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
रस्त्यालगत उभी केलेली वाहने चोरून त्यांची विक्री करणाऱ्या दोघांना टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपी सराईत चोर असून त्यांच्याकडून पोलिसांनी सहा रिक्षा आणि एक दुचाकी हस्तगत केली.काही दिवसांपूर्वी चेंबूरच्या टिळकनगर रेल्वे स्थानक परिसरातून अझर खान (३०) याची दुचाकी आज्ञात इसमाने चोरली होती.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने ठाणे महापालिकेने शहरातील ३२ केंद्रांवर वर्धक मात्रेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच शहराच्या विविध भागांमध्ये शिबीरांचे आयोजन करून त्यात नागरिकांना वर्धक मात्रा देण्यात येत असून त्याचबरोबर हर घर दस्तक योजनेंतर्गत घरोघरी जाऊनही वर्धक मात्रा दिली जात आहे.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील खड्ड्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी पालिकेने गेल्या आठवड्यात एक टोल फ्री क्रमांक जाहीर केला. या क्रमांकावर आठवडाभरात डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, २७ गाव भागातून २४७ तक्रारी नागरिकांनी केल्या. या तक्रारींमधील १५५ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे, असा दावा पालिकेतर्फे करण्यात आला.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात हरणा नदीत वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने एका तरूणाचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला. गावातून दुसरीकडे जाण्या-येण्यासाठी नदी पार करावी लागते. नदीवर पूल बांधण्याची वर्षानुवर्षांपासूनची मागणी दुर्लक्षित आहे.
मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील रेतीबंदर पूलावर मोठे भगदाड पडले आहे. गेल्यावर्षी याच मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गाच्या गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित झाला होता. दरम्यान, मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी रस्त्याची दुरूस्ती होईपर्यंत अवजड वाहतूक बंद करावी. अशी मागणी केली आहे.
राज्यातील वर्धा येथे असलेल्या ‘डिजिटल युनिव्हर्सिटी ऑफ स्कील रीसर्जन्स’मध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) विद्यार्थ्यांना केले. कायद्यानुसार स्थापना झालेली नसल्याने संबंधित विद्यापीठाला पदवी देण्याचा अधिकार नसून या विद्यापीठात प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, असे युजीसीने नोटिशीद्वारे मंगळवारी स्पष्ट केले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अनेक प्रकल्पांना स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दणका दिला आहे. नगरविकास विभागाकडून बारामती नगरपरिषदेसाठी मंजूर करण्यात आलेल्या २७० कोटींच्या निधीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ३४० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी एकट्या बारामती शहराला २७० कोटींचा निधी घेण्यात आला होता.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार, कार्यकर्ते आणि आजी-माजी पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील होत आहेत. यानंतर आता पुण्यात देखील उद्धव ठाकरेंना धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
महिलेने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह पलंगात लपवल्याची घटना साकीनाका परिसरात घडली. साकीनाका पोलिसांनी याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली. मृत व्यक्तीचे नाव नसीम खान असून चारित्र्याच्या संशयावरून तो पत्नीला शारिरीक व मानसिक त्रास देत होता. त्रासाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने खानची गळा दाबू हत्या केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे तसेच आसपासच्या परिसरात खड्डे भरणीची कामे सुरु झाली असली तरी या कामांच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने आनंदनगर परिसरात पेव्हर ब्लॉकचा वापर करून सुरु केलेली खड्डे भरणीची कामे समाधानकारक नसल्याचे निरिक्षण ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी मंगळवारच्या पाहणी दौऱ्यादरम्यान नोंदविले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास मंगळवारपासून सुरुवात केली. यासाठी विभागनिहाय कार्यकरी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली असून आवश्यक ती यंत्रणाही उभी करण्यात आली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) देशभरातील एक कोटी विद्यार्थ्यांना कौशल्य, कार्यानुभव आणि नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी डिजिटल स्किलिंग हा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्या द्वारे विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल.
माजी मंत्री व शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर शिवसेना फोडल्याचा गंभीर आरोप केला. तसेच आपण याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही फोटो दाखवत माहिती दिल्याचा दावा कदमांनी केला. यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिलंय. “बंडखोर नेत्यांनी शिवसेना फोडली आणि आता स्वतःची कृती योग्य आहे असे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसवर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे,” असं मत महेश तपासे यांनी व्यक्त केलं.
अफ्रिकेतील घाना देशात जीवघेण्या मारबर्ग विषाणूचे दोन रुग्ण आढळले आहेत. दोन्ही रुग्णांचा उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर लगेचच मृत्यू झाला. वटवाघळापासून माणसात संसर्ग झालेल्या या विषाणूचा संसर्ग झाल्यास ८८ टक्क्यांपर्यंत मृत्यूचा दर आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) इशारा दिला आहे.
भारतीय चलन रुपयाचं डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ऐतिहासिक अवमुल्यन झालंय. मंगळवारी (१९ जुलै) ८०.०५ रुपये प्रति डॉलरपर्यंत ही पडझड झाली. आजपर्यतच्या इतिहासातील हे रुपयाचं सर्वात निचांकी मूल्य आहे. मागील काही दिवसांपासून रुपयाच्या मुल्यात सातत्याने पडझड सुरू आहे. मागील सत्रात रुपया ७९.९७ रुपये प्रति डॉलर होता. मंगळवारी सकाळी रुपयाची सुरुवात ७९.९८ प्रति डॉलरने झाली आणि लगेचच रुपयाचं मूल्य आणखी कमी होऊन ८०.०५ प्रति डॉलर झालं.
शिवसेनेच्या खासदारांमधील एक गट बंडखोर एकनाथ शिंदे गटासोबत जाणार असल्याच्या बातम्यांमुळे राज्यातील राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता या खासदारफुटीवरुन पुन्हा एकदा शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदास संजय राऊत आणि भाजपा आमदार नितेश राणे आमने-सामने आल्याचं चित्र पहायला मिळत आहे. राऊत यांनी केलेल्या एका दाव्यावरुन नितेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना जुळी भावंड आहेत हा असा खोचक प्रश्न ट्वीटरवरुन विचारलाय. येथे वाचा सविस्तर वृत्त…
उद्धव ठाकरेंना जुळा भाऊ आहे का?; सोनिया गांधींसोबतचा ठाकरेंचा फोटो शेअर करत नितेश राणेंचा संजय राऊतांना सवालhttps://t.co/ZcHQZxGynH

२०२० मधील फोटो शेअर करत नितेश राणेंची खोचक शब्दांत पोस्ट#NiteshRane #SanjayRaut #SoniaGandhi #UddhavThackarey
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सामाजिक, राजकीय घडामोडींचे अपडेट्स, एका क्लिकवर!