Maharashtra Rain Updates, 19 July 2022 : महाराष्ट्रात रोज राजकीय सत्तानाट्याचे नवनवे अंक रंगू लागल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेनेच्या १२ खासदार शिंदे गटाकडे गेले असताना दुसरीकडे २० जुलैपासून सर्वोच्च न्यायालयात सरकराच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे राज्यातल्या या राजकीय सुंदोपसुंदीचा शेवट नेमका कोणत्या प्रकारे होणार आहे, यावरून विश्लेषकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.
Maharashtra News Today : राष्ट्रपती-उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग!
‘तुमच्या घराचा वीज पुरवठा रात्री खंडित होणार आहे. तुम्ही चालू महिन्याचे वीज देयक भरणा केले नाही. त्यामुळे मी सांगेल त्या जुळणीवर संपर्क करा आणि मी सांगेल त्याप्रमाणे कृती करा,’ असे एका भामट्याने डोंबिवलीत ठाकुर्लीत राहणाऱ्या एका महिलेला फोन करून सांगितले. आपण वीज देयक भरणा केला आहे तरी महावितरणमधून फोन का आला म्हणून महिलेने पतीला घडला प्रकार कळविला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेच्या १२ खासदारांची भेट घेतली आहे.
वेळेत न मिळणारे वेतन, खात्यावर जमा होत नसलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम आदी विविध कारणांमुळे वडाळा आगारातील कंत्राटी चालक व अन्य कर्मचाऱ्यांचे रविवारपासून पुकारलेले ‘काम बंद’ आंदोलन मंगळवारीही सुरूच आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी बसअभावी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. बेस्टला बसगाड्यांचा पुरवठा करणारी कंपनी आणि तिच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांमधील वाद अद्यापही मिटलेला नाही. बेस्ट उपक्रम मात्र केवळ कारवाईचे आश्वासन देत आहे.
किराणा माल विक्रेत्याला शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडून खंडणी उकळणाऱ्या गुंडांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली.कुंदन शिंदे, अक्षय भालके (दोघे रा. अप्पर इंदिरानगर ओटा वसाहत, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत महादेव मांगीलाल जाट (वय ३३, रा. अप्पर इंदिरानगर ओटा वसाहत, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याचा राज्य शासनाचा संकल्प आजतागायत पूर्ण झाला नाही. कदाचित त्यासाठी माझी ताकद कमी पडत आहे. मात्र, माझ्याकडे शब्दसंपत्ती भरपूर आहे आणि त्याच संपत्तीतून महाराजांचे ‘शब्दस्मारक’ उभारण्याचा संकल्प मी येत्या तीन-चार वर्षात नक्की पूर्ण करणार आहे, अशा शब्दात ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी राज्य शासनाला शाब्दिक चिमटे काढले.
दगडांचं अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर ट्रक घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी दगडाने भरलेला ट्रक संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर घातला. या दुर्दैवी घटनेत पोलीस अधिकाऱ्याच्या जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर खाण माफियांनी घटनास्थळावरून पळ काढला असून परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आरोपींना जेरबंद करण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सविस्तर बातमी
लोणावळ्यात दोन वर्षाच्या मुलाचा स्विमिंग पुलाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शिवबा अखिल पवार असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना सहा दिवसांपूर्वी लोणावळ्यात घडली. या घटनेमुळं पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत शिवबा आणि त्याच्या जुळ्या बहिणीचा दुसऱ्या दिवशी वाढदिवस होता.
ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर रामदास कदम यांनी टीव्ही ९ शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता रामदास कदमांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया उमठत आहे. आयपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच अजित पवारांविषयी तोंड सांभाळून बोला असा धमकीवजा इशाराही त्यांनी दिला आहे. सविस्तर बातमी
मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी पुणे – मुंबई – पुणे मार्गावर पुन्हा एकदा प्रगती एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाकाळात प्रगती एक्स्प्रेस बंद होती. प्रगती एक्स्प्रेस पुन्हा सुरू करताना तिला विस्टाडोम डबा (पारदर्शक काचेचा डबा) जोडण्यात येणार आहे.
मुंब्रा बाह्यवळण मार्ग, साकेत पूल आणि खारेगाव टोलनाका या भागात पडलेल्या खड्ड्यांमुळे मंगळवारी मुंब्रा बाह्यळण ठप्प झाला आहे. त्यामुळे खारेगाव टोलनाका, मुंब्रा बाह्यवळण मार्ग ते शिळफाटा पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावर अवजड वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अवघ्या पाच ते १० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी चालकांना दोन तास लागत आहेत. अवजड वाहनांमुळे दुपारी वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
शिवसेनेतील नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर मोठे आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला रामदास कदम यांनी दिला असून शिवसेनेपेक्षा शरद पवार मोठे आहेत का? अशी विचारणा केली आहे. यानंतर शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनीच आत्मपरीक्षण करावं असा सल्ला दिला आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी रामदास कदम यांच्यावर चांगलीच टीका केली.
वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हिंगणघाट जिल्ह्यातील कान्होली गावास पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला.
आईला रुग्णालयात दाखल केले असून उपचारासाठी मदतीची गरज असल्याचे सांगून एकाने आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह ४ महिला आमदारांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार लक्षात आला आहे.या प्रकरणी आमदार माधुरी मिसाळ यांच्या कन्या पूजा मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उसाचा गळीत हंगाम यंदा साखर कारखान्यांप्रमाणे शेतकऱ्यांसाठीही गोड ठरला आहे. गाळप झालेल्या उसाची देय रास्त आणि किफायतशीर दराने (एफआरपी) होणाऱ्या एकूण रकमेपैकी सुमारे ९५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका वाहनधारकांनाही बसतो आहे. जलयुक्त पेट्रोल भरले गेल्याने चार चाकी वाहने बंद पडताहेत. यामुळे काही पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात मुसळधार पावसाची झळ सर्वांनाच बसत आहे. मात्र टणक सुरक्षा कवच असलेल्या पेट्रोलच्या टाकीलाही मुसळधार छेदून जाईल, अशी अपेक्षाही कुणी केली नसेल.
शिवसेना खासदारांमध्ये फूट पडत असताना ‘मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही’ असा दावा करणारे शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. पक्ष सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी पर्यावरण मंत्री असणाऱ्या रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांचे पुत्र आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यावरण मंत्री असणाऱ्या आदित्य ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केलीय. प्लास्टिकबंदी आपण केली मात्र त्याचं श्रेय आदित्य ठाकरेंना मिळाल्याची खंतही रामदास कदम यांनी व्यक्त केली. येथे वाचा सविस्तर वृत्त
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी- पाचपखाडी मतदार संघात ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे मंगळवारी सकाळी पाहणी दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते मतदार संघात सुरू असलेल्या विविध विकासकामांबरोबरच वाढीव पाण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीवर करण्यात आलेल्या जोडणीची पाहणी करून कामाचा आढावा घेणार आहेत.
केंद्र सरकारकडून वेष्टनरहित, लेबल नसलेल्या शेतीमालावर म्हणजेच डाळी आणि अन्नधान्यांवर १८ जुलैपासून पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हा निर्णय ग्राहक आणि शेतकरी हिताचा नाही. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनने (आयपीजीए) केंद्र सरकारकडे केली आहे. या निर्णयामुळे भाववाढ होण्याची शक्यताही आयपीजीएने व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर रामदास कदम यांनी टीव्ही ९ शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी रामदास कदम यांनी थेट शरद पवार आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी बोलताना रामदास कदम यांना अश्रू अनावर झाले.
पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांना तीन हजार चारशे रुपये ‘गुगल पे’ वरून ट्रान्सफर करण्यास सांगून आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. अशीच आर्थिक फसवणूक भाजपाच्या अन्य तीन महिला आमदारांची झाल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मित्राला वारंवार समज देऊनही तो सुधरत नसल्यामुळे पतीने त्याचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना सोमवारी सकाळी पाचपावली हद्दीत बाबा बुद्धनगर येथे घडली. आसिफ अमजद खान (३२, बुद्धनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. दीक्षित भगवान जनबंधू (३८) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली.
समाजात चांगली व्यक्ती घडवणे म्हणजे हिटलर किंवा रावणाला जन्म देणे नव्हे, तर सप्तर्षी, महर्षींना जन्म देणे होय. धर्माचे हेच तत्त्व आपल्या ऋषी-मुनींना अनेक वर्षांच्या तपानंतर सापडले होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. वैदर्भीय हरिकीर्तन संस्था आणि दुर्गादेवी सार्वजनिक देवस्थान, राणाप्रतापनगर यांच्या संयुक्त विद्यमाने हभप बाबासाहेब साल्पेकर जन्मशताब्दी व हरिकीर्तन संस्थेच्या ३९ वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित सप्तदिनात्मक कीर्तन सत्राचे भागवत यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले.
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने दोघांचा बळी घेतला. चांदूर बाजार तालुक्यातील फुगाव येथील अरुण वैराळे यांचे घर मंगळवारी सकाळी अचानक कोसळल्याने माय-लेकीचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले.
माझी हकापट्टी करण्याआधी मी राजीनामा दिला आहे. त्यामुळे हकालपट्टी करण्याचा प्रश्नच उभा राहत नाही असं सांगत रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मातोश्रीवर बसून हकालपट्टी करणं एवढंच काम शिल्लक राहिलं आहे का? असा प्रश्नही रामदास कदम यांनी विचारला आहे. यावेळी आपल्या मनातील खदखद मांडताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. आपला मुलगा योगेश कदमवरही अन्याय झाल्याचा आरोप यावेळी त्यांनी केली.
प्रदेश काँग्रेस समिती अद्याप जाहीर झाली नसली तरी त्या बाबतची माहिती बाहेर आली असून त्यात नितीन राऊत आणि सतीश चतुर्वेदी यांच्या समर्थकांना स्थान नसल्याने शहर काँग्रेस असंतोष निर्माण झाला आहे. नाराज नेत्यांनी सोमवारी माजी आमदार एस. क्यू. जमा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. यात पटोले यांची तक्रार पक्षश्रेष्ठी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मे अखेरपर्यंत जी खड्डे भरण्याची कामे पालिका शहर अभियंता विभागाने पूर्ण करणे आवश्यक होते ती कामे दोन महिने उशिरा म्हणजे जुलै महिन्यात सुरू केल्याने डोंबिवली, कल्याणमधील शहरांची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. रिक्षा चालक, नागरिक खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाने रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत. प्रशासनावर होणारा टिकेचा भडीमार रोखण्यासाठी बांधकाम विभागाने रात्रपाळीत सिमेंट काँक्रीटच्या गिलाव्याने (रेडिमिक्स) खड्डे भरणीच्या कामास सुरुवात केली आहे.
भिवंडी येथील पांजरा पोळ भागात निशाण हॉटेलच्या पाठीमागे खाली करण्यात आलेला तळ अधिक एक मजल्याच्या कारखान्याचे बांधकाम मंगळवारी सकाळी कोसळले. यात चारजण जखमी झाले असून त्यातील एक जण गंभीर जखमी असल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
‘नीट’च्या परीक्षेदरम्यान मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब व बुरखा घातल्याने त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारल्याचा प्रकार वाशीममध्ये समोर आला आहे. या प्रकरणी पालकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वाशीम येथील मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय केंद्रावर मुस्लिम विद्यार्थिनींना चेहरा व ‘हॉल टिकिट’ दाखविल्यानंतर ही हिजाब व बुरखा काढण्यास लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुणे-सासवड रस्त्यावर मुलीला शाळेत सोडायला जात असताना ट्रकच्या धडकेत वडिलांचा मृत्यू झाला. मुलीला उपचारासाठी घेऊन जात असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ग्लायडिंग सेंटर समोर अपघात झाला. या प्रकरणी ट्रकचालकास अटक करण्यात आली आहे.
भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नातवासोबत वेळ घालवण्याचा संदर्भ देत केलेल्या टीकेवर भाष्य करताना मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे अडीच वर्षे मंत्रालयामध्ये गेले नव्हते, याबद्दल खडसे काही बोलले नाहीत अशा अर्थाचा टोला लगावला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी नातवाला वेळ देऊन कौटुंबिक जबाबदारी पार पडली. खासगी आयुष्याशी निगडीत टीका ही परंपरेला धरुन नाही असा टोलाही मुनगंटीवार यांनी खडसेंना लगावला. येथे वाचा सविस्तर वृत्त…
"जसं काही त्यांचं मंत्रालयाशी शत्रुत्व असावं अशा…"; नातवाचा उल्लेख करत CM शिंदेंवर केलेल्या टीकेवरुन उद्धव ठाकरेंना टोलाhttps://t.co/yWGMfmn5zk
— LoksattaLive (@LoksattaLive) July 19, 2022
राष्ट्रवादीच्या आमदाराने केलेल्या टीकेवरुन बोलताना शिवसेना पक्षप्रमुखांना टोला#NCP #BJP #UddhavThackeray #EknathSinde
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सामाजिक, राजकीय घडामोडींचे अपडेट्स, एका क्लिकवर!