Maharashtra Rain Updates, 19 July 2022 : महाराष्ट्रात रोज राजकीय सत्तानाट्याचे नवनवे अंक रंगू लागल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेनेच्या १२ खासदार शिंदे गटाकडे गेले असताना दुसरीकडे २० जुलैपासून सर्वोच्च न्यायालयात सरकराच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे राज्यातल्या या राजकीय सुंदोपसुंदीचा शेवट नेमका कोणत्या प्रकारे होणार आहे, यावरून विश्लेषकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.
Maharashtra News Today : राष्ट्रपती-उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग!
सिंहगड रस्ता, माणिकबाग, गोयलगंगा येथील खाऊ गल्लीमधील ‘प्रेमाचा चहा’ या अमृततुल्यमधे आग लागून सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले.
खड्डे, चिखलयुक्त आणि असमान रस्त्यामुळे कल्याण अहमदनगर महामार्गावरून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. शेकडो विद्यार्थी, हजारो प्रवासी दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करतात. संबंधित महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदाराला सातत्याने विनंती करूनही त्यांनी रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केले, असा आरोप करत या महामार्गावरील वरप येथील सेक्रेड हार्ट शाळेच्या प्रशासनाने पोलीस उपअधिक्षकांकडे उपोषण करण्यास परवानगी देण्याची विनंती केली आहे.
नदीपात्रातील रस्त्यावर गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढोल-पथकांचा सराव सुरू झाला असून पोलीस परवानगीशिवाय हा सराव सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या ढोल-ताशा पथकांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. नदीपात्रातील जागेसह हिंगणे, कोथरूड, हडपसर, कात्रज आदी भागांत सध्या विविध पथकांचा नियमबाह्य दणदणाट सुरू झाला आहे. त्यामुळे सरावाच्या परिसरातील नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
पावसाच्या तडाख्यात मुंबईतील ठिकठिकाणच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याच वेळी गोराई जेट्टी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या गुळगुळीत रस्त्यावर वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर केवळ दुचाकीच नव्हे तर चारचाकी वाहनेही घसरून अपघात होत आहेत.
एका अपघाताच्या गुन्ह्यातील दुचाकी सोडणे अन तपासात मदत करण्यासाठी २५ हजाराची लाच मागणारे दोन पोलीस लाचलुचपत’ प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात सापडले. जत पोलीस ठाण्यातील गणेश ईश्वरा बागडी व संभाजी मारुती करांडे अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संगणकशास्त्र या पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्ष परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करून २ ते ५ ऑगस्ट या कालावधीतील परीक्षा १३ ते १९ ऑगस्ट या कालावधीत घेण्याचा निर्णय घेतला. मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) आणि विद्यापीठाची परीक्षा एकाच वेळी आल्याने विद्यापीठाने वेळापत्रकात बदल केला असून, या बदलामुळे एमसीए सीईटी देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
पर्यावरण आणि तापमानवाढ यातील बदलासंदर्भात माहिती देत त्याबाबतच्या उपाययोजना करणे आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांमध्ये याविषयाची जनजागृती करण्यासाठी ‘पुणे क्लायमेट वॉरिअर्स’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहरातील ३० शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवीमध्ये शिकणारे सुमारे २० हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होऊ शकतील.
पोटातील तब्बल साडेपाच किलो वजनाच्या गाठीमुळे प्रकृतीच्या विविध तक्रारींचा सामना करणाऱ्या महिलेला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले आहे. संबंधित महिला ३८ वर्षांची असून मासिक पाळीच्या तक्रारी, ओटीपोटात दुखणे, अनियमित रक्तस्त्राव अशा समस्यांनी ग्रासली होती. तिच्या रक्तातील लोहाची पातळीही ३.४ पर्यंत कमी झाली होती. उपचारांचा भाग म्हणून तिच्यावर शस्त्रक्रिया केली असता तिच्या पोटात साडेपाच किलो वजनाचे फायब्रॉईड असल्याचे दिसून आले.
देशाच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक सोमवारी पार पडली. या निवडणुकीत ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला, तर देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान पार पडले. राष्ट्रपती पदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. येथे वाचा सविस्तर वृत्त…
#PresidentialElections2022: …म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि 'या' केंद्रीय मंत्र्याने PPE किट घालून केलं नव्या राष्ट्रपतींसाठी मतदानhttps://t.co/s9Xt6tP6Le
— LoksattaLive (@LoksattaLive) July 19, 2022
पंतप्रधान मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मतदान सुरु झाल्यानंतर पहिल्या तासाभरामध्येच मतदानाचा हक्क बजावला
शिवसेनेच्या १२ खासदारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाला पाठिंबा असल्याची माहिती समोर आल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये मुख्यमंत्री तातडीने दिल्लीला रवाना झाले. रात्री १२ च्या सुमारास मुख्यमंत्री दिल्ली विमानतळावर पोहोचले. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेले असतानाच एकनाथ शिंदेंनीच अचानक दिल्ली दौऱ्यामागील कारणाचा खुलासा केलाय. येथे वाचा सविस्तर वृत्त…
“…म्हणून मी दिल्लीला आलोय”; मध्यरात्री दिल्ली विमानतळावर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खुलासाhttps://t.co/NrlWfoszBM

मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली#EknathSinde #Shivsena #obcreservation #OBC #Eknath_Shinde #MaharashtraPolitics
सोमवारपासून केंद्र सरकारने वाढवलेल्या वस्तू आणि सेवाकराची भर पडली असून वेष्टनातील अत्यावश्यक अन्नपदार्थ ते खासगी रुग्णालयांतील उपचार अशा अनेक महत्त्वाच्या बाबी महाग वस्तूंच्या यादीत आहेत. याच वाढवण्यात आलेल्या जीएसटीवरुन शिवसेनेनं केंद्रातील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. एकीकडे कॉर्परेट टॅक्ससारख्या गोष्टींमध्ये सूट देऊन उद्योजकांना सवलत देता आणि दुसरीकडे गोरगरीब जनतेच्या अन्नधान्यावर व दह्यावर जीएसटी लादून ते महाग करता, हा कुठला कारभार म्हणायचा? असा प्रश्न शिवसेनेनं विचारलाय. येथे वाचा सविस्तर वृत्त…
'उद्योजकांना साडेचार लाख कोटींची करसवलत आणि दुसरीकडे गोरगरीब…', 'मरणाच्या दारातही मोदी सरकार…'; GST वाढीवरुन सेनेची टीकाhttps://t.co/BGTVAm3gHV

"या जीएसटीची तुलना मोगलशाहीतील ‘जिझिया’ कराशीच करावी लागेल," असं शिवसेनेनं म्हटलंय.#Shivsena #BJP #GST #GSThike
शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदारांचाही मोठा गट बाहेर पडणार असल्याचं सोमवारी स्पष्ट झालं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची खासदारांची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्य केल्यानंतरही पक्षाचे १२ खासदार सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर शिंदे यांनी पहिल्यांदाच यासंदर्भात भाष्य करत महत्वाची माहिती दिली आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त…
“१२ नाही आमच्यासोबत एकूण…”; शिवसेना खासदारांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्लीत पोहचल्यानंतर मोठा गौप्यस्फोटhttps://t.co/e0SVR1lwl6

मध्यरात्री दिल्लीत दाखल झाल्यानंतर शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या…#EknathSinde #Shivsena #Shivsenacrisis
शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरविण्यासाठी केलेल्या याचिकेवरही बुधवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. मात्र या सुनावणीच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणासंदर्भात भाष्य केलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दिल्लीमध्ये दाखल झालेल्या एकनाथ शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या गटाने दाखल केलेल्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेबद्दल मोजक्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली. येथे वाचा सविस्तर वृत्त…
Thackeray vs Shinde: सर्वोच्च न्यायालयातील अपात्रतेसंदर्भातील याचिकेच्या सुनावणीबद्दल CM शिंदे म्हणतात, “लोकशाहीमध्ये…”https://t.co/mLWeaaQIY2

उद्या या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे#ekanthshinde #UddhavThackarey #SupremeCourt
राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार ज्या वेगाने निर्णय घेत आहे ते पाहता नायक चित्रपटामधील प्रमुख व्यक्तीरेखेशी तुलना केली जात असल्याचं मत भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना गडचिरोली दौऱ्याचा संदर्भ देत मुनगंटीवार यांनी अभिनेता अनिल कपूरची मुख्य भूमिका असणाऱ्या नायक चित्रपटाचा उल्लेख केलाय. या चित्रपटामध्ये एका दिवसासाठी मुख्यमंत्री झालेला शिवाजीराव गायकवाड (अनिल कपूर) वेगाने निर्णय घेत लोकांच्या हिताची कामं करताना दाखवण्यात आलंय. येथे वाचा सविस्तर वृत्त…
‘नायक’ चित्रपटाप्रमाणे महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार वेगाने निर्णय घेत आहे; भाजपा नेत्याचं वक्तव्यhttps://t.co/YeYCoZeyXr

“काही लोकांचं समाधान आयुष्यभर होऊ शकत नाही,” असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.#BJP #Shivsena #DevendraFadnavis #EknathSinde #Eknath_Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असून शिवेसना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी यावरुन टोला लगावला आहे. याआधी शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना कधीच सरकार स्थापनेसाठी दिल्लीत आले नसल्याची आठवणही संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना करुन दिली. एकनाथ शिंदे शिवसेनेचे नाही, तर भाजपाचे मुख्यमंत्री आहेत असंही ते म्हणाले. तसंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सदिच्छा भेटीसाठी दिल्लीत आले होते असं सांगत त्यांनी टीकाकारांना उत्तर दिलं.
पश्चिम अफ्रिकेतील घाणा देशात मारबर्ग या जीवघेण्या विषाणाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. घाणातील दक्षिण अशांती भागात या विषाणूचा संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे या विषाणूचा संसर्ग वेग आणि मृत्यूदर अधिक असल्याने जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) सतर्कतेचा इशारा दिला आहे. मारबर्ग विषाणूच्या संसर्गामध्ये मृत्यूदर तब्बल ८८ टक्के आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्यास रुग्णाला तीव्र ताप हे लक्षण दिसते.
अफ्रिकेतील घाणा देशात नव्या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग, मृत्यूदर तब्बल ८८ टक्के, WHO चाही इशाराhttps://t.co/hx741AiUyl#WHO #MarburgVirus #Ghana #Africa

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मुंबईस्थित सहकारी बँक रायगड सहकारी बँकेवर निर्बंध आणले आहेत. बँकेची आर्थिक स्थिती बिघडत असल्याने आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. या निर्बंधांमुळे ठेवीदारांना खात्यातून फक्त १५ हजार रुपये काढता येणार आहेत. सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लागू असणार आहेत.
नशेची, सत्तेची, बेईमानीची भांग पिणारे उद्या मातोश्री आमचं आहे असाही दावा करु शकतात अशी टीका शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांवर केली आहे. उद्या कदाचित बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केलेलीच नाही असंही म्हणू शकतात. यांची वैचारिक पातळी इथपर्यंत गेली आहे की, शिवसेना आणि बाळासाहेबांचा संबंध नाही असंही विधान केलं जाऊ शकतं अशा शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सामाजिक, राजकीय घडामोडींचे अपडेट्स, एका क्लिकवर!