Maharashtra Political Crisis News in Marathi, 25 August 2022: शिवसेनेतील फूट आणि सत्तासंघर्षांचे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठापुढे सोपविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी घेतला. घटनापीठाची स्थापना तातडीने करण्यात येणार असून, या याचिकांवर गुरुवारी (२५ ऑगस्ट) सुनावणी होईल, असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यसूचीत आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण लिस्ट नाही. त्यामुळे आज यावर सुनावणी होणार की नाही? याबाबत अनिश्चितता आहे.
त्याचबरोबर, गेल्या काही दिवसांपासून विधानसभेत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. बुधवारी विधानसभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजीवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज विधीमंडळात याचे पडसाद उमठण्याची शक्यता आहे.
तसेच जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा जवानांनी उधळून लावला आहे. भूसुरुंग स्फोटामध्ये दोन दहशतवादी ठार झाले असून एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्याला याआधीही नियंत्रण रेषा पार केल्यामुळे अटक करण्यात आली होती. भारतीय चौकीवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराच्या कर्नलने त्याला ३० हजार रुपये (पाकिस्तानी चलन) दिले होते, अशीही माहिती मिळाली आहे.
Maharashtra Political Crisis Live Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले असून बुधवारी आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने वाद विकोपाला पोहोचला होता. विरोधकांकडून होणाऱ्या आंदोलनांमध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे सहभाग घेत असल्याने सत्ताधारी आमदारांकडून त्यांना लक्ष्य केलं जात आहे. त्यातच आज आमदारांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवणारं बॅनर हातात घेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवरुन त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. या पोस्टरमध्ये ‘महाराष्ट्राचे परम पूज्य (प पू) युवराज’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. राजकारणात असतानाही नितीन गडकरी अनेकदा निर्भीडपणे आपलं मत मांडत असतात. याची प्रचिती याआधीही अनेकदा आली असून, नुकतंच पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी कुपोषणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी एक जुना किस्सा सांगताना आपण कशा प्रकारे अधिकाऱ्यांना ‘मंत्रीपद गेलं तरी काही फरक पडत नाही’ सांगितलं होतं याची आठवण सांगितली.
प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने ४० हजार रुपयांत सुपारी दिली. कटानुसार केलेल्या चाकूहल्ल्यात पती बचावल्यामुळे पत्नीचे खरे रूप उघड झाले. या प्रकरणी पत्नीसह चौघांना पोलिसांनी अटक केली. वाचा सविस्तर बातमी…
रत्नागिरीमधील दापोलीमध्ये दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले आहेत. बसचा चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमींमध्ये महिला आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दापोली उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बसचं स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Russia missile strike on ukraine railway station: २४ ऑगस्ट रोजी युक्रेनचा ३१ वा स्वातंत्र्यदिन होता. रशियाच्या नेतृत्वाखालील सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनियन नागरिकांनी २४ ऑगस्ट रोजी अनेक ठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा केला. स्वातंत्र्यदिनी रशिया युक्रेनवर मोठा हल्ला करू शकतो, अशी शक्यता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी मंगळवारी व्यक्त केली होती. सविस्तर बातमी
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन जवळपास दोन महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले नाहीत. त्यामुळे जिल्हास्तरावर अनेक प्रश्नांचा खोळंबा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. या नवीन सरकारचा हनिमून आणखी किती दिवस टिकणार आहे, हेच मला कळत नाही, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. सविस्तर बातमी
अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.