Mumbai Maharashtra News Updates : लोकसभा निवडणूक संपून आता महाराष्ट्रातील जनतेला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळे राजकीय पक्ष या निवडणुकांच्या कामाला लागले आहेत. यासंदर्भातील बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकांमध्ये केलेल्या बदलांमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. याविषयीच्या बातम्यादेखील आपण वाचणार आहोत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ‘टेस्ला’, ‘स्पेसएक्स’ आणि ‘एक्स’ या कंपन्यांचे मालक एलॉन मस्क यांनी ईव्हीएम हॅक होऊ शकतं असा दावा केल्यामुळे त्याचे भारतात पडसाद उमटू लागले आहेत, यावरही आपलं लक्ष असेल.

Live Updates

Mumbai Maharashtra News : राज्यासह देशभरातील बातम्यांचा आढावा

19:02 (IST) 17 Jun 2024
विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न – सतेज पाटील

माजी गृह राज्य मंत्री सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूर मधील कायदा - सुव्यवस्था पूर्णत: ढासळली आहे.

सविस्तर वाचा...

18:51 (IST) 17 Jun 2024
पंचगंगेच्या प्रदुषणाचा प्रश्‍न सुटणार; ‘सीईटीपी’च्या ५३१ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता – प्रकाश आवाडे

इचलकरंजीतील आणि लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत सामुहिक सांडपाणी प्रक्रियेच्या (सीईटीपी) ५३१ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

सविस्तर वाचा...

18:42 (IST) 17 Jun 2024
नाशिक: रिक्षाचालक हत्येप्रकरणी चार संशयित ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखा विभाग दोनने मिळालेल्या माहितीनुसार पथक तयार करुन संशयितांच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड येथे रवाना केले.

सविस्तर वाचा...

18:35 (IST) 17 Jun 2024
नागपूरकरांसाठी खुशखबर, जिल्हा रुग्णालयाचे काम सप्टेंबर महिन्यात…

जिल्हा रुग्णालयाच्या कामाला होणाऱ्या विलंबामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली होती.

सविस्तर वाचा...

18:26 (IST) 17 Jun 2024
नाना पटोले म्हणतात, “अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही”; राज्य सरकारवर टीका

एकत्रित बसून मेरीटनुसार जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यात येईल, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

सविस्तर वाचा...

18:18 (IST) 17 Jun 2024
उपराजधानी विजांच्या कडकडाटाने हादरली, मुसळधार पाऊस आणि…

वीज आणि ढगांमध्ये जणू आवाजाचे तुंबळ युद्ध सुरू असल्याचा भास होत होता.

सविस्तर वाचा...

17:59 (IST) 17 Jun 2024
पुणे जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांत उपाययोजनांसाठी बैठक घ्या, शरद पवारांचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र

पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामतीसह पुरंदर, इंदापूर आणि दौंड या तालुक्यांमध्ये कायम दुष्काळी परिस्थिती असल्याने त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी बैठक घेण्याबाबतचे पत्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.

सविस्तर वाचा...

17:55 (IST) 17 Jun 2024
शिक्षण सचिव हाजिर हो! प्राध्यापकाला पेन्शन न दिल्यामुळे…

उच्च न्यायालयाने शिक्षण सचिव यांना २० जून रोजी न्यायालयात प्रत्यक्षपणे हजर राहण्याचे आदेश दिलेत.

सविस्तर वाचा...

17:48 (IST) 17 Jun 2024
महाविकास आघाडीत पुन्हा बिनसलं? पृथ्वीराज चव्हाणांनी सांगलीच्या जागेवरून सुनावलं

"साताऱ्यामध्ये आमचा धक्कादायक पराभव झाला हे मान्य करावं लागेल. तेथे आम्ही सगळे कमी पडलो. आता पराभवाची काय कारणं आहेत त्यांचे आम्ही विश्लेषण करत आहोत. मात्र, सांगलीतील परिस्थिती वेगळी आहे. त्या मतदारसंघात अपक्ष उमेदवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे जनसामान्य कार्यकर्त्यांच्या इच्छेविरुद्ध तिकीट देता कामा नये, हा धडा घेणं गरजेचं आहे", असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

17:43 (IST) 17 Jun 2024
कोल्हापुरात इंडिया आघाडीचे उपोषण ; शाहू जयंती सोहळा देशभर साजरा करण्याची मागणी

राजर्षी शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती देश पातळीवर वर्षभर साजरी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सविस्तर वाचा...

17:27 (IST) 17 Jun 2024
पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे मंत्री पदासाठी आशावादी, तातडीने गेले मुंबईला

मंत्री पदासाठी स्वतः आशावादी असल्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी म्हटलं आहे.

सविस्तर वाचा...

17:16 (IST) 17 Jun 2024
शिवरायांची ‘ती’ वाघनखे लवकरच भारतात येणार, सातारच्या शिवाजी वस्तू संग्रहालयात विशेष दालन सज्ज

जनतेच्या भावना जोडलेल्या हा ऐतिहासिक अनमोल ठेवा सलग १० महिने पहाण्यास उपलब्ध राहणार असून, त्याचे इतिहास संशोधक व शिवप्रेमींमध्ये अप्रूप राहणार आहे.

सविस्तर वाचा...

17:02 (IST) 17 Jun 2024
सांगली: उद्यापासून तीन दिवस पोलीस भरती प्रक्रिया

सांगली पोलीस दलातील ४० जागांसाठी १९ ते २१ जून दरम्यान भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

16:54 (IST) 17 Jun 2024
सांगली: ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी

मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी शाही ईदगाह मैदानावर गर्दी केली होती.

सविस्तर वाचा...

16:50 (IST) 17 Jun 2024
“देशात जातीनिहाय जनगणना करण्यात यावी”, छगन भुजबळांची मोठी मागणी; म्हणाले, “ही जनगणना झाली तर ओबीसींना...”

देशात जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. तसेच ही जनगणना झाली तर याचा देशातील ओबीसींना मोठा फायदा होईल आणि त्यांना केंद्रातून मोठ्या प्रमाणात निधी मिळेल, असेही ते म्हणाले. आज झालेल्या समता परिषदेच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वाचा

16:44 (IST) 17 Jun 2024
बाबा रामदेवच्या ‘कोरोनील’ विरुद्ध याचिका, उच्च न्यायालयाने विचारले, “कोणत्या अधिकाराचे हनन झाले ?”

नागपूर : करोना विषाणूने जगभरात हाहाकार पसरला होता. यामुळे जागतिक स्तरावर टाळेबंदी लागू करण्यात आली आणि सर्व जगातील व्यवहार ठप्प झाले होते. करोना विषाणूवर निदान करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांनी औषध निर्मितीचे प्रयत्न केले. दरम्यान, भारतात पतंजली उद्योग समूहाचे प्रमुख बाबा रामदेव यांनी करोनावर ‘कोरोनील’ नावाचे औषध बनवल्याचा दावा केला होता. रामदेवबाबाच्या या दाव्यावर नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

सविस्तर वाचा...

16:31 (IST) 17 Jun 2024
माजी मंत्री सुनील केदार विधानसभा लढवू शकतील काय? उच्च न्यायालयात सुनावणीची तारीख ठरली

नागपूर : देशात लोकसभा निवडणुका संपताच राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे.

सविस्तर वाचा...

16:11 (IST) 17 Jun 2024
VIDEO : पाण्यात उतरण्यासाठी वाघिणीला करावी लागली कसरत, शेवटी…

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य आता व्याघ्रदर्शनाबाबत ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाला टक्कर देऊ लागले आहे. आतापर्यंत पर्यटकांचा ओघ हा ताडोबाकडेच होता, पण आता मात्र पर्यटक नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य, टिपेश्वर अभयारण्याकडे वळू लागले आहेत. वाघांचे साम्राज्य फक्त ताडोबातच नाही, तर ते इतरत्र देखील आहे, हे समोर येणाऱ्या चित्रफितींनी दाखवून दिले आहे.

सविस्तर वाचा....

16:11 (IST) 17 Jun 2024
मुख्य सचिवांच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका फेटाळली, उच्च न्यायालय म्हणाले…

नागपूर : राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांना मुदतवाढ देण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ दिली गेली. या मुदतवाढीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली.

सविस्तर वाचा...

16:09 (IST) 17 Jun 2024
राज्यभरात उद्यापासून पोलीस भरती

एकट्या छत्रपती संभाजीनगरमधील आयुक्तालय व कारागृहातील मिळून ५२७ पदांसाठी एकत्रित ८६ हजारांवर अर्ज दाखल झाले आहेत.

सविस्तर वाचा...

16:02 (IST) 17 Jun 2024
ओबीसींसाठी छगन भुजबळ पुन्हा मैदानात, पंतप्रधान मोदींकडे करणार मोठी मागणी

समता परिषदेतील काही लोक आज छगन भुजबळ यांना भेटले. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी भुजबळ म्हणाले, आमचे पदाधिकारी आणि समता परिषदेतील काही लोकांबरोबर काही वेळापूर्वी चर्चा केली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीबाबत आम्ही विचारविनिमय केला. तसेच ओबीसींबाबतही आम्ही चर्चा केली. या चर्चेअंती आम्ही ठरवलं आहे की नरेंद्र मोदींकडे एक मागणी करणार आहोत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत. आता आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहोत की त्यांनी जातीनिहाय जनगणना करावी. ती केली तर ओबीसींच्या विविध मुद्द्यांवर प्रकाश पडेल. नुसतीच लोकसंख्या समजणार नाही तर ओबीसींची परिस्थिती देखील आपल्याला समजेल. त्यामुळे केंद्र सरकारकडून मिळणारा निधी, जो आता केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना मिळतोय तो ओबीसींना देखील मिळू शकतो. परतु, त्यासाठी जनगणना व्हायला हवी. आपण केवळ राज्यापूर्ती जनगणना करून फायदा होणार नाही. त्याने केवळ आपल्याला माहिती मिळते. परंतु, केंद्राचा निधी मिळत नाही. केंद्राकडून निधी कशाप्रकारे मिळवता येईल याबाबत आम्ही चर्चा केली

15:59 (IST) 17 Jun 2024
ऐन पावसाळ्यात रायगड जिल्ह्यात ४२२ जागांसाठी पोलीस भरती, ३१ हजार जणांची पावसात शारीरिक चाचणी घेण्याचे आव्हान

पावसाचे दिवस असल्याने यंदा ही भरती प्रक्रीया अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात घेतली जाणार नाही.

सविस्तर वाचा...

15:46 (IST) 17 Jun 2024
खारघरच्या फेरीवाल्यांकडून हप्ते वसूली

पनवेल : खारघर वसाहतीमध्ये रस्त्यांवर बेकायदा फेरीवाले आणि फेरीवाल्यांविरोधात तक्रारी करणारे यांच्यातील संघर्ष खारघर पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला आहे. खारघर पोलीस ठाण्यात याबाबत शनिवारी तीन खंडणी व विनयभंगाच्या तक्रारी नोंदविल्या गेल्या.

सविस्तर वाचा...

15:46 (IST) 17 Jun 2024
पेणधर गावात पावणेचार लाखांची चोरी

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील पेणधर या गावातील एका घरात रविवारी पहाटे चोरट्यांनी टेरेसचा दरवाजातून घरात शिरुन ३ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. पेणधर गावातील जितेंद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पाटील यांच्या घरात रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी छतावरील दरवाजामधून घरात प्रवेश केला. पाटील यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.

15:26 (IST) 17 Jun 2024
कल्याणमधील ठाकरे गटाच्या नव्या नेमणुका, सामान्य शिवसैनिकांमध्ये नाराजी

या नेमणुका निष्ठावंत, ज्येष्ठांना डावलून करण्यात आल्याचा आरोप करत सामान्य, निष्ठावंत शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा...

15:07 (IST) 17 Jun 2024
नागपूर : भरधाव कारने पदपथावर झोपलेल्या ९ जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू, ७ जण गंभीर

नागपूर : एका भरधाव कारने पदपथावर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघाताचा थरार रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिघोरी टोल नाक्याजवळ झाला.

सविस्तर वाचा...

15:06 (IST) 17 Jun 2024
फळभाज्या कडाडल्या : ‘या’ भाज्यांचे किलोचे दर शंभरी पार

पुणे : कडक ऊन, तसेच पूर्वमोसमी पावसामुळे फळभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला असून, बाजारात आवक कमी होत आहे. सर्व प्रकारच्या भाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. फळभाज्यांसह पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत.

सविस्तर वाचा...

15:05 (IST) 17 Jun 2024
वर्धा : इराणी टोळीच्या सदस्याला अटक; वयोवृद्ध व्यक्तींनाच हेरायचे अन्…

वर्धा : नित्य नवे गुन्हे व ते करणारे गुन्हेगार हे पोलिसांसाठी नेहमी आव्हानात्मक काम ठरते. त्यातच समाजाची टोळी तयार करीत गुन्हा करणारे आहेतच. असा एक प्रकार वर्ध्यात उघडकीस आला असून आरोपीस कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा....

15:05 (IST) 17 Jun 2024
पिंपरी : कल्याणीनगर अपघात प्रकरणाची आळंदीत पुनरावृत्ती; अल्पवयीन मुलाने भरधाव मोटार अंगावर घातल्याने महिला जखमी

पिंपरी : गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार प्रकरणाची पुनरावृत्ती आळंदीजवळील वडगाव घेनंद येथे घडल्याची समोर आले आहे. मोटार वेगात चालवू नकोस असे सांगितल्याने झालेल्या वादातून १७ वर्षीय मुलाने भरधाव मोटार महिलेच्या अंगावर घातली. यात महिला जखमी झाली आहे.

सविस्तर वाचा...

15:04 (IST) 17 Jun 2024
आमदार रवी राणाच्या दबावाखाली अधिकाऱ्याची बदली, उच्च न्यायालयाने नगररचना विभागावर ठोठावला दंड

नागपूर : आमदार रवी राणा यांच्या दबावाखाली नगररचना विभागाने एका प्रशासकीय अधिकाऱ्याची बदली केली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात संंबंधित अधिकाऱ्याने याचिका केल्यावर नगर रचनाकार विभागाने उत्तर न सादर न केल्यामुळे न्यायालयाने नगर विकास विभागावर दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सविस्तर वाचा...

devendra fadnavis jitendra awhad

“…म्हणून देवेंद्र फडणवीस २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाले”, आव्हाडांकडून राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला श्रेय

“देवेंद्र फडणवीस हे केवळ दिलीप वळसे पाटलांमुळे मुख्यमंत्री झाले.” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. आव्हाड म्हणाले, “सभागृहात (विधानसभा) दिलीप वळसे पाटील देवेंद्र फडणवीस यांना बोलण्यासाठी एक-एक तास द्यायचे. वळसे पाटील सभागृहात ज्या पद्धतीने कामकाज करायचे ते पाहून समजतं की विधानसभेचा अध्यक्ष कसा असायला हवा. स्पीकर असावेत तर असे.”

Story img Loader