Maharashtra Political News Today : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाकडे दिले आहे. त्यानंतर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार असे नाव देण्यात आले. या विषयावरून दोन दिवसांपूर्वी सुरू झालेला वाद अद्यापही सुरू आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. दुसरीकडे २७ फेब्रुवारी रोजी देशभरात होत असलेल्या राज्यसभा निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. महाराष्ट्रातून सहा जागांसाठी कोण-कोण उमेदवार दिले जाणार याची चर्चा सुरू आहे. नुकतीच पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे त्यांचे नाव चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. तर मराठा आरक्षणासाठी १० फेब्रुवारीपासून बेमूदत उपोषणाला बसण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. आज ते छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यात दौऱ्यासाठी आले आहेत. नाशिकमध्ये येऊन ते भुजबळ यांच्याबद्दल काय बोलतात, याकडेही आपले लक्ष असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील आज नाशिक दौऱ्यावर आहेत. दरम्यान भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून राठोड यांच्या उमेदवारीला विरोध केल्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Live News Today 08 February 2024
टिळक रस्ता येथील एमसीसीआयएच्या इमारतीत उभारलेल्या या केंद्रात महिला उद्योजकांना कामासाठी जागा उपलब्ध होणार असून, वीस प्रकारच्या सेवाही मिळणार आहेत.
जागतिक नामांकित विद्यापीठामध्ये संशोधन विषयक अभ्यास करत असताना हेगाणा यांना युनायटेड किंग्डम मधील शेतकरी व ग्रामीण भागातील अभ्यासातून विविध प्रकारची माहिती मिळाली.
जिल्ह्यातील २५ वर्षांपासून रखडलेल्या प्रकाशा बुऱ्हाई उपसा सिंचन योजनेसाठी राज्य शासनाकडून ८०० कोटींची सुधारित मान्यता प्राप्त होत नाही तोच, आता श्रेयवादावरुन राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये स्पर्धा रंगली आहे. सविस्तर वाचा…
राम, लक्ष्मण आणि सीता यांबद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्ती विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती चिंचवड पोलिसांनी दिली आहे. राहुल वाघमारे ( वय ५५ ) हा खासगी शाळेत लिपिक म्हणून काम करतो. धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी धनंजय गावडे यांनी तक्रार दिली आहे.
बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास आरोपी राहुल वाघमारे याने त्यांच्या व्हाट्सअप स्टेटसवर राम, लक्ष्मण आणि सीता यांच्याबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवलं होतं. ही बाब समोर येताच चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघमारे याची चौकशी सुरू असल्याची माहिती चिंचवड पोलिसांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर : शिक्षण विभाग जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे येत्या १० फेब्रुवारी रोजी पहिले शिक्षक साहित्य संमेलन प्रसिद्ध शिक्षक कवी, लेखक, गीतकार डॉ. हबीब भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी दिलीप सिरसाठ व रमेश ठाकूर यांनी दिली.
शनिवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळात हे संमेलन अग्रसेन विद्यामंदिर, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार असून या संमेलनाचे उदघाटन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते होईल, तर प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे उपस्थित राहणार आहेत.
शाळांमध्ये अनेक गुणी साहित्यिक, कवी, कलावंत शिक्षक आहेत. भाषा व कला विकासात आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व तसेच सर्वांगीण विकासात हे शिक्षक मोलाचे योगदान देत आहेत. या शिक्षकांच्या साहित्यप्रतिभेला आणि कलेला अधिकचा वाव मिळावा, लिहित्या हातांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हे शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. शिक्षण विभाग जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर आयोजित शिक्षकांनी शिक्षकांसाठी भव्य स्वरूपात भरवले जात असलेले हे जिल्ह्यातील पहिलेच शिक्षक साहित्य संमेलन ठरणार असून जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा; कनिष्ठ महाविद्यालये येथे कार्यरत असणारे शिक्षक यात सहभागी होणार आहेत.
गडचिरोली : छत्तीसगड सीमेवरील नक्षल्यांचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या परिसरात वांगेतुरी आणि गर्देवाडा येथे नवे पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले. त्यामुळे या परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने आलेल्या नक्षल्यांसोबत पोलिसांची ७ फेब्रुवारी रोजी रात्री चकमक उडाली. पोलिसांच्या प्रत्युत्तराने नक्षलवादी पसार झाले. यावेळी घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
शासन आपल्या दारी अशी योजना सरकारने सुरू केली असली तरी लोकांचे एकही काम वेळेवर होत नाही. म्हणून तर मंत्रालयामध्ये लोकांच्या रोजच रांगा लागलेल्या असतात, असे दानवे यांनी म्हटले आहे.
चंद्रपूर : सर्व मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती-जमातीमधील नागरिकांच्या आरक्षणाला धोकादायक ठरण्याची शक्यता असलेल्या दोन अधिसूचना राज्य सरकारने रद्द कराव्या तसेच जातनिहाय जनगणना करावी, या प्रमुख मागण्यांसाठी गांधी चौकातून निघालेला ओबीसी समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
नागपूर : गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर गडचिरोलीतून आलेल्या एका बसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक-नाशक पथकाने बॉम्बसदृष्य वस्तू ताब्यात घेतली. सुराबर्डी येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. मात्र, डेपो व्यवस्थापकाने चालकाला फोन करून माहिती घेतली असता ती वस्तू बॉम्ब नसून केवळ आग विझविण्याचे लहान आकाराचे अग्निशमन यंत्र (फायर इंस्टींग्युटर) असल्याचे सांगितले.
मिरा भाईंदर शहराच्या मुख्य मार्गांवरील मेट्रो निर्मितीच्या खालील जागेत एका हॉटेल चालकाने चक्क आपल्या ग्राहकांसाठी वाहनतळाची सोय केल्याची बाब समोर आली आहे.
अनेक वेळा विविध कारणांमुळे महिला तसेच लहान मुले तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येत असतात. मात्र पोलीस ठाण्यात असलेल्या गर्दीमुळे तसेच इतर लोकांच्या उपस्थितीमुळे त्यांना आपली मूळ तक्रार सांगण्यास अडचण भासते.
नागपूर : नागपुरातील लहानापासून ते मोठ्या अशा एकून ३१७ गुन्हेगारांची आयुक्तालयाच्या मैदानात परेड घेण्यात आली. सर्व गुन्हेगारांशी आयुक्तांनी स्वत: संवाद साधला. त्यांना सुधरण्याची शेवटची संधी दिली. यानंतर एकाही गुन्हेगारांचा एखाद्या अवैध कृत्य किंवा गुन्ह्यांशी संबंध आल्यास त्या गुन्हेगाराची खैर केली जाणार नाही, असा खणखणीत इशारा पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी दिला.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर परखड मत मांडलं. संजय राठोड यांच्या उमेदवारीला माझा कायम विरोध राहिल, असे त्या म्हणाल्या. यामुळे पुन्हा एकदा महायुतीत संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
जन आरोग्य अभियानाच्यावतीने राज्यभरातील दहा जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना आरोग्यविषयक मागण्यांचे पत्र पाठविण्याचे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.
नागपूर : शहरातून आठवडी बाजार किंवा पार्कींगमधून दुचाकी चोरी जाण्याचे प्रमाण अचानक वाढले होते. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने ‘हॉटस्पॉट’शोधून पाळत ठेवली. पोलिसांनी एका चोरट्याला दुचाकी चोरताना अटक केली आणि त्याच्याकडू एक-दोन नव्हे तर तब्बल १११ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते अजित पवार गटात जाणार, अशी चर्चा होती. माझा काँग्रेसमधील आतापर्यंतचा प्रवास चांगला राहिला. या आठवणी कायम स्मरणात राहतील, अशी प्रतिक्रिया बाबा सिद्दीकी यांनी दिली. मिलिंद देवरा यांच्यानंतर काँग्रेसचा मुंबईतील आणखी एक नेता बाहेर पडल आहे.
I joined the Indian National Congress party as a young teenager and it has been a significant journey lasting 48 years. Today I resign from the primary membership of the Indian National Congress Party @INCIndia with immediate effect. There’s a lot I would have liked to express…
— Baba Siddique (@BabaSiddique) February 8, 2024
बदलते निसर्गचक्र, जीवनशैलीतील बदल आणि ध्रूमपान यांमुळे श्वसनविकाराचा धोका वाढला आहे. पुण्यातील ३० ते ३५ वयोगटांतील तरुणांमध्ये श्वसनविकाराचे प्रमाण जास्त आहे.
प्रतापने त्याच्याकडील परवाना असलेले पिस्तूल तरुणांवर रोखले. शिवीगाळ करून त्याने दहशत माजविली.
आरोपींच्या मोबाइलमध्ये १९ हजार ८२७ ध्वनिमुद्रित फिती (रेकाॅर्डिंग) आढळून आल्या आहेत. त्यांपैकी १० हजार ध्वनिमुद्रित फितीचे विश्लेषण करण्यात आले आहे.
शहरात पिंपरी ते दापोडी या मार्गावर मेट्रो धावत असून या मार्गिकेखाली महापालिका सुशोभित खांब आणि खांबांवर एक हजार दिवे लावणार आहे.
महाराष्ट्रात काका-पुतण्याचा वाद महाराष्ट्राला नवीन नाही. अजित पवार – शरद पवार यांच्यातील वाद ताजा असतानाच आता विदर्भात देशमुख काका – पुतण्यांमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. काटोल विधानसभेचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी त्यांचे काका अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या पुतण्यांचे दिवस आहेत. त्यामुळे काका लोकांनी वडीलधारी भूमिका घेऊन थोडे मागे राहावे, असा इशारा आशिष देशमुख यांनी दिला.