Mumbai Pune Live News Updates, 24 September 2024 : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा देखील सुरु आहेत. विधानसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा प्रमुख सामना रंगण्याची चिन्ह आहेत. मात्र, असे असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये अक्षय शिंदे याने केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला, यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. दरम्यान, यासह राज्यातील आणि देशातील घडणाऱ्या घडामोडी जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra News Live Today, 24 September 2024

14:31 (IST) 24 Sep 2024
मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : मतदान सुरू; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील ३८ मतदान केंद्र आणि ६४ बुथवर निवडणूक

मुंबई : एका वर्षात निवडणुकीला दुसऱ्यांदा दिलेली स्थगिती आदी विविध कारणांमुळे रखडलेली मुंबई विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक तब्बल दोन वर्षांनंतर आज होत आहे.

सविस्तर वाचा…

14:17 (IST) 24 Sep 2024
काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना लोकसभा निवडणुकीपासून वंचित ठेवणारा निर्णय अवैध

नागपूर : काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांचे अनुसूचित जातीचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा पडताळणी समितीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अवैध ठरवला आणि बर्वे यांना तातडीने जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. न्यायालयाने समितीला त्यांच्या बेकायदेशीर कृती बद्दल एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला. न्या. अविनाश घरोटे आणि न्या. मुकुलिका जवळकर यांच्या खंडपीठाने मंगळवारी हा निर्णय दिला.

सविस्तर वाचा…

14:00 (IST) 24 Sep 2024
मुंबई : धावत्या रेल्वेत १७ वर्षीय मुलीचा विनयभंग

मुंबई : चेन्नईला जाणाऱ्या रेल्वे गाडीत १७ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी अटक केली.

सविस्तर वाचा…

13:57 (IST) 24 Sep 2024
न्यायालय म्हणाले, “पतीने पत्नीला सुनावणे चुकीचे नाही….”

नागपूर : ‘तू दिवसभर नुसती टीव्ही व मोबाईल पाहत राहते. त्यामुळे मुलालाही मोबाईल व टीव्ही पाहण्याची सवय लागली. तू अभ्यासाकडे मुळीच लक्ष देत नाही. परिणामी, त्याचे गुण कमी झाले’, असे पतीने पत्नीला सुनावणे चुकीचे नाही असे मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पतीवरील आत्महत्येचा गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले.

सविस्तर वाचा….

13:44 (IST) 24 Sep 2024
राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

राज्यातून पावसाच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे. मात्र, अनंत चतुर्दशीनंतर पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मध्यम स्वरुपाचा असणाऱ्या पावसाचे आता अनेक ठिकाणी मुसळधार पावसात रुपांतर झाले आहे. राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

13:40 (IST) 24 Sep 2024
कोल्हापूर : राधानगरी जंगलात निळ्याशार कारवीचा बहर, अवघे डोंगर निळ्या-जांभळ्या रंगात बुडाले

कोल्हापूर : राधानगरी जंगलात आकाशी निळ्याशार कारवी फुलांचा बहर आला आहे. ही फुले सात वर्षांतून एकदाच बहरतात. याचा बहर दीड-दोन महिने असतो. सध्या या कारवीमुळे येथील डोंगर निळ्या-जांभळ्या रंगात बुडून गेले आहेत.

सविस्तर वाचा…

13:38 (IST) 24 Sep 2024
चिरनेर जंगल सत्याग्रहातील स्मारकांची दुरवस्था बांधकाम विभाग, पंचायत समितीचे दुर्लक्ष

उरण : महात्मा गांधी यांनी १९३० मध्ये स्वातंत्र्यासाठी दिलेल्या कायदेभंग आंदोलनात ब्रिटिश सरकारच्या गोळीबारात येथील आठ स्वातंत्र्य सैनिकांनी हौतात्म्य पत्करले आहे. या हुतात्म्यांची स्मारके त्यांच्या मूळ गावी उभारण्यात आली आहेत. या स्मारकांची दुरवस्था झाली असून त्यांची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे.

सविस्तर वाचा…

13:33 (IST) 24 Sep 2024
आजपासून चार दिवस मूसळधार पावसाचे

नागपूर : राज्यातून पावसाच्या परतीचा प्रवास सुरु व्हायचा असला तरी अनंत चतुर्दशीनंतर मात्र पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मध्यम स्वरुपाचा असणाऱ्या पावसाचे आता अनेक ठिकाणी मुसळधार पावसात रुपांतर झाले आहे.

सविस्तर वाचा….

13:32 (IST) 24 Sep 2024
साडेतीन एकरांत शहरी जंगल! मरोळमध्ये वनीकरणातून साकारलेले उद्यान नागरिकांसाठी लवकरच खुले

मुंबई : मुंबई महापालिकेने मरोळ येथे मिठी नदी लगतच्या साडेतीन एकर जागेत शहरी वनीकरणातून उद्यान साकारले असून त्यात देशी प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत. १०० प्रजातींच्या १० हजार झाडांमधून फेरफटका करता येईल असा लाकडी साकवही तयार करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर…

13:17 (IST) 24 Sep 2024
राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा नव्याने पुतळा उभारण्याची प्रक्रिया सुरू, निविदा प्रसिद्ध

सावंतवाडी : मालवण राजकोट किल्ल्यावर नव्याने शिवपुतळा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून २० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांनी ही निविदा प्रक्रिया केली आहे.

सविस्तर वाचा….

13:04 (IST) 24 Sep 2024
मुंबई : एसटीच्या जमिनीच्या विकासासाठी ६० वर्षांपर्यंत भाडेकरार, भरत गोगावले एसटीचे २४ वे अध्यक्ष

मुंबई : राज्यातील १३ एसटी बस स्थानकांच्या बसपोर्टसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या धोरणानुसार एसटी स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे

सविस्तर वाचा…

12:42 (IST) 24 Sep 2024
सागरी किनारा रस्त्यासाठी हजारो झाडांचा बळी? बेलापूरमध्ये मानवी साखळी आंदोलन करत नागरिकांचा तीव्र विरोध

नवी मुंबई : परिसरात स्वत: लावलेल्या व निर्माण केलेल्या निसर्ग संपदेवर घाला घातला जाणार असल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी मानवी साखळी करत सिडकोचा तीव्र निषेध केला.

सविस्तर वाचा…

12:23 (IST) 24 Sep 2024
“आरोपीने हातात बेड्या असताना बंदूक कशी काढली”, सुषमा अंधारे यांचा सवाल

लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या घटनेवर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, आरोपीने हातात बेड्या असताना बंदूक कशी काढली? अक्षय शिंदे मतिमंद होता हे पोलिसांनीच सांगितलं होतं तर मग अक्षय शिंदे एवढा हिंस्त्र कसा झाला? अशा अनेक प्रश्नांची उत्तर पोलिसांनी द्यायला हवी”, असं सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

12:06 (IST) 24 Sep 2024
सोलापूर : अजित पवारांनी इशारा देऊनही मोहोळमध्ये दोन पाटलांचा संघर्ष सुरूच

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना आणि सध्या अजित पवार यांचा दुसरा गट अस्तित्वात असताना या पक्षात मोहोळ तालुक्यातील वजनदार नेते राजन पाटील-अनगरकर आणि पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता टोकाला गेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रा घेऊन मोहोळमध्ये आले असताना, त्याच मुहूर्तावर राजन पाटील यांच्या विरोधात मोहोळ बंद पुकारण्यात आला. त्यामुळे अखेर अजित पवार यांना उमेश पाटील यांच्या उपद्रवाची दखल घ्यावी लागली.

सविस्तर वाचा….

12:00 (IST) 24 Sep 2024
महाविकास आघाडीला ‘निर्भय बनो’ चा पाठिंबा, जाहीरनाम्यात मुद्द्यांचा समावेश करण्याची मागणी

पुणे : महायुतीच्या विरोधात लढा देणाऱ्या ‘निर्भय बनो’ या जनआंदोलनाने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहीरनाम्यात ‘निर्भय बनो’ च्या मुद्द्यांचा समावेश करावा, अशी मागणी महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या तीनही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे करण्यात आली आहे.

वाचा सविस्तर…

11:59 (IST) 24 Sep 2024
“काही लपवायचं आहे म्हणून एन्काऊंटर…”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या घटनेवर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत सरकारला अनेक सवाल विचारले आहेत. राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. त्या आरोपीला जलदगती न्यायालय खटला चालून आरोपीला शिक्षा द्यायला पाहिजे होती. मात्र, हे सर्व प्रकरण संशयास्पद आहे. यामधून कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न आहे. काही लपवायचं आहे म्हणून एन्काऊंटर आहे का?”, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

11:35 (IST) 24 Sep 2024
सोसायटीतील गणेशोत्सवात महिलांचा विनयभंग, लोणीकंद पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

पुणे : सोसायटीतील गणेशोत्सव रहिवासी महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी हर्ष कपूर (रा. कोणार्क एक्झोटिका, वाघोली-केसनंद रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाचा सविस्तर…

11:28 (IST) 24 Sep 2024
नव्यांचे लाड करताना जुन्या कार्यकर्त्यांनाही संधी द्या! भाजप नेत्यांची नेतृत्वाकडे मागणी

नांदेड : भारतीय जनता पार्टीत अन्य पक्षांतून आलेल्या नेत्यांचे किंवा त्यांचे वारसदारांचे राजकीय लाड करताना पक्षातील जुन्या-निष्ठावान कार्यकर्त्यांबाबत सापत्न भाव नको, अशी भूमिका मांडत एका शिष्टमंडळाने मराठवाड्यात विधानसभेच्या चार जागांवर पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

वाचा सविस्तर…

11:02 (IST) 24 Sep 2024
ठाकरे गटातील दुफळीचा दादा भुसेंना आधार

मालेगाव : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची आशा मावळल्यानंतर बारा बलुतेदार मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघातून अपक्ष लढण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ठाकरे गटातील या घडामोडी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता आहे.

वाचा सविस्तर…

10:47 (IST) 24 Sep 2024
दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाच्या माजी संचालकांसह तिघांना सक्तमजुरी

पुणे : इंडियन ओव्हरसीज बँकेच्या इंदापूर तालुका शाखेत आठ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाचे माजी संचालक अविनाश घोलप यांच्यासह बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह तिघांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय-एसीबी) न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

वाचा सविस्तर…

10:46 (IST) 24 Sep 2024
ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरण : ईडीकडून दिल्ली, जळगाव व अहमदाबादमध्ये छापे

मुंबई : ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीतील १६८ कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात सुरेश कुटे व इतरांविरोधात सुरू असलेल्या तपासाअंतर्गत सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) दिल्ली, जळगाव व अहमदाबाद येथे विविध ठिकाणी नुकतेच छापे टाकले.

वाचा सविस्तर…

10:21 (IST) 24 Sep 2024
“अक्षय शिंदेचा एन्काऊंटर हा मुख्य आरोपीला…”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये अक्षय शिंदे याने केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला, यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या घटनेवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हे सर्व प्रकरण संशयास्पद आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगाराचा एन्काऊंटर हा मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी हे झालेलं आहे. ज्या शाळेत हे प्रकरण घडलं त्या ठिकाणी साफसफाईचं हा आरोपी काम करत होता. मग साफसफाईचं काम करणारा मुलगा पोलिसांची बंदुक घेऊन फायर करेल हे कोणाला पटेल का?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला, यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे