Mumbai Pune News Updates, 24 September 2024 : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा देखील सुरु आहेत. विधानसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा प्रमुख सामना रंगण्याची चिन्ह आहेत. मात्र, असे असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये अक्षय शिंदे याने केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला, यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. दरम्यान, यासह राज्यातील आणि देशातील घडणाऱ्या घडामोडी जाणून घेऊयात.
Maharashtra News Today, 24 September 2024
बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला.
अमित शाह हे राज्याच्या दौऱ्यावर येत असून बुधवारी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांतील तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांकडून विधानसभेच्या वाढीव जागांची मागणी केली जाणार आहे.
कास पठारावर गेल्या काही दिवसांपासून रानफुले दिसू लागली आहेत. सुटीमुळे इथे पर्यटकांच्या गर्दीत मोठी वाढ झाली. यामुळे पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली तर प्रत्यक्ष पठारावर जत्रा भरल्याचे चित्र दिसत होते.
नाशिक : त्र्यंबक रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावात तीन महिन्यांपासून चाललेल्या तरणतलावाच्या नुतनीकरणाने महिला जलतरणपटुंची अडचण झाली आहे.
मुंबई : चेन्नईला जाणाऱ्या रेल्वे गाडीत १७ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी अटक केली.
नागपूर : ‘तू दिवसभर नुसती टीव्ही व मोबाईल पाहत राहते. त्यामुळे मुलालाही मोबाईल व टीव्ही पाहण्याची सवय लागली. तू अभ्यासाकडे मुळीच लक्ष देत नाही. परिणामी, त्याचे गुण कमी झाले’, असे पतीने पत्नीला सुनावणे चुकीचे नाही असे मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पतीवरील आत्महत्येचा गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले.
राज्यातून पावसाच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे. मात्र, अनंत चतुर्दशीनंतर पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मध्यम स्वरुपाचा असणाऱ्या पावसाचे आता अनेक ठिकाणी मुसळधार पावसात रुपांतर झाले आहे. राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोल्हापूर : राधानगरी जंगलात आकाशी निळ्याशार कारवी फुलांचा बहर आला आहे. ही फुले सात वर्षांतून एकदाच बहरतात. याचा बहर दीड-दोन महिने असतो. सध्या या कारवीमुळे येथील डोंगर निळ्या-जांभळ्या रंगात बुडून गेले आहेत.
उरण : महात्मा गांधी यांनी १९३० मध्ये स्वातंत्र्यासाठी दिलेल्या कायदेभंग आंदोलनात ब्रिटिश सरकारच्या गोळीबारात येथील आठ स्वातंत्र्य सैनिकांनी हौतात्म्य पत्करले आहे. या हुतात्म्यांची स्मारके त्यांच्या मूळ गावी उभारण्यात आली आहेत. या स्मारकांची दुरवस्था झाली असून त्यांची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे.
नागपूर : राज्यातून पावसाच्या परतीचा प्रवास सुरु व्हायचा असला तरी अनंत चतुर्दशीनंतर मात्र पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मध्यम स्वरुपाचा असणाऱ्या पावसाचे आता अनेक ठिकाणी मुसळधार पावसात रुपांतर झाले आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेने मरोळ येथे मिठी नदी लगतच्या साडेतीन एकर जागेत शहरी वनीकरणातून उद्यान साकारले असून त्यात देशी प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत. १०० प्रजातींच्या १० हजार झाडांमधून फेरफटका करता येईल असा लाकडी साकवही तयार करण्यात आला आहे.
सावंतवाडी : मालवण राजकोट किल्ल्यावर नव्याने शिवपुतळा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून २० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांनी ही निविदा प्रक्रिया केली आहे.
मुंबई : राज्यातील १३ एसटी बस स्थानकांच्या बसपोर्टसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या धोरणानुसार एसटी स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे
नवी मुंबई : परिसरात स्वत: लावलेल्या व निर्माण केलेल्या निसर्ग संपदेवर घाला घातला जाणार असल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी मानवी साखळी करत सिडकोचा तीव्र निषेध केला.
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या घटनेवर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, आरोपीने हातात बेड्या असताना बंदूक कशी काढली? अक्षय शिंदे मतिमंद होता हे पोलिसांनीच सांगितलं होतं तर मग अक्षय शिंदे एवढा हिंस्त्र कसा झाला? अशा अनेक प्रश्नांची उत्तर पोलिसांनी द्यायला हवी”, असं सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना आणि सध्या अजित पवार यांचा दुसरा गट अस्तित्वात असताना या पक्षात मोहोळ तालुक्यातील वजनदार नेते राजन पाटील-अनगरकर आणि पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता टोकाला गेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रा घेऊन मोहोळमध्ये आले असताना, त्याच मुहूर्तावर राजन पाटील यांच्या विरोधात मोहोळ बंद पुकारण्यात आला. त्यामुळे अखेर अजित पवार यांना उमेश पाटील यांच्या उपद्रवाची दखल घ्यावी लागली.
पुणे : महायुतीच्या विरोधात लढा देणाऱ्या ‘निर्भय बनो’ या जनआंदोलनाने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहीरनाम्यात ‘निर्भय बनो’ च्या मुद्द्यांचा समावेश करावा, अशी मागणी महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या तीनही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे करण्यात आली आहे.
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या घटनेवर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत सरकारला अनेक सवाल विचारले आहेत. राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. त्या आरोपीला जलदगती न्यायालय खटला चालून आरोपीला शिक्षा द्यायला पाहिजे होती. मात्र, हे सर्व प्रकरण संशयास्पद आहे. यामधून कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न आहे. काही लपवायचं आहे म्हणून एन्काऊंटर आहे का?”, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पुणे : सोसायटीतील गणेशोत्सव रहिवासी महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी हर्ष कपूर (रा. कोणार्क एक्झोटिका, वाघोली-केसनंद रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नांदेड : भारतीय जनता पार्टीत अन्य पक्षांतून आलेल्या नेत्यांचे किंवा त्यांचे वारसदारांचे राजकीय लाड करताना पक्षातील जुन्या-निष्ठावान कार्यकर्त्यांबाबत सापत्न भाव नको, अशी भूमिका मांडत एका शिष्टमंडळाने मराठवाड्यात विधानसभेच्या चार जागांवर पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.
मालेगाव : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची आशा मावळल्यानंतर बारा बलुतेदार मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघातून अपक्ष लढण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ठाकरे गटातील या घडामोडी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता आहे.
पुणे : इंडियन ओव्हरसीज बँकेच्या इंदापूर तालुका शाखेत आठ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाचे माजी संचालक अविनाश घोलप यांच्यासह बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह तिघांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय-एसीबी) न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
मुंबई : ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीतील १६८ कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात सुरेश कुटे व इतरांविरोधात सुरू असलेल्या तपासाअंतर्गत सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) दिल्ली, जळगाव व अहमदाबाद येथे विविध ठिकाणी नुकतेच छापे टाकले.
बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये अक्षय शिंदे याने केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला, यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या घटनेवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हे सर्व प्रकरण संशयास्पद आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगाराचा एन्काऊंटर हा मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी हे झालेलं आहे. ज्या शाळेत हे प्रकरण घडलं त्या ठिकाणी साफसफाईचं हा आरोपी काम करत होता. मग साफसफाईचं काम करणारा मुलगा पोलिसांची बंदुक घेऊन फायर करेल हे कोणाला पटेल का?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला, यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.