Mumbai News Updates, 03 November 2022: एकीकडे राज्यात बच्चू कडू विरुद्ध रवी राणा या सत्ताधारी पक्षांसोबत असणाऱ्या आमदारांमध्ये तुफान कलगीतुरा सुरू असतानाच दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांनी राजकीय मुद्दा केलेल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून सर्वच पक्षांकडून त्यावर आक्रमक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
Mumbai News Today, 03 November 2022: सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
मंडई परिसरात एका महिलेला किरकोळ कारणावरुन मारहाण केल्या प्रकरणी पोलीस शिपायाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी पोलीस शिपाई राहुल शिंगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील खोपट भागात असलेल्या ब्रम्हाळा तलावाच्या आवारात गेल्याकाही दिवसांपासून गर्दुल्ल्यांचा वावर वाढू लागला आहे. हे गर्दुल्ले सुरक्षा भिंती ओलांडून थेट ब्रम्हाळा तलावाच्या बागेत प्रवेश करत आहेत. सुरक्षा रक्षक आणि जेष्ठ नागरिक या गर्दुल्ल्यांना हटकत असतात. परंतु त्यांनाही जुमानत नाही. त्यामुळे जेष्ठ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत कलहामुळे राजीनामा सत्र सुरू झाले असून ग्रामीण जिल्हाध्यक्षांपाठोपाठ ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईक यांनीही जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
महाराष्ट्रात लाखो हेक्टर जमीन सिंचनाद्वारे ओलिताखाली आणून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना चांगले दिवस दाखविण्याचे काम अजित पवार यांनी जलसंपदामंत्री या नात्याने केले. सिंचन विभागातील ७० हजार कोटींच्या कथित घोटाळ्यात अजित पवार यांना नाहक बदनाम करण्यात आले. आरोप झाले यापेक्षाही काम किती झाले हे महत्त्वाचे आहे. सिंचन क्षेत्रात अजित पवार यांनी केलेले काम मोलाचे आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी काढले.
कार्तिकी यात्रेसाठी अवघे पंढरपूर लाखो वारकरी आणि भाविकांच्या गर्दीने गजबले आहे. यंदा यात्रेत गुरूवारी अडीच लाख भाविक दाखल झाले असून उद्या कार्तिकी एकादशीला चार लाखांपेक्षा अधिक भाविकांची मांदियाळी होण्याची अपेक्षा आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून पंढरपूर भाविक आणि वारक-यांनी फुलून गेले असून सर्व मठ, धर्मशाळा, हाॕटेल, लाॕजमध्ये भाविकांची गर्दी वाढली आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘माया’ वाघिण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माया व तिच्या तीन बछड्यांचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मुक्तसंचार पर्यटकांना भूरळ घालणारा ठरतो आहे. पाण्यात पडलेल्या बछड्याला अलगद आपल्या जबड्यात उचलून सुरक्षित स्थली हलविणा-या मायाची ममता वन्यप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
वाहतूक पोलीस आणि रस्ते, वाहतूक जनजागृती करणाऱ्या संस्था दुचाकी चालवताना हेल्मेट वापरण्याबाबत वारंवार जनजागृती करतात. कायद्याने दुचाकी चालकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकजण या नियमाचे पालन करताना दिसत नाहीत. गेल्या दहा महिन्यात विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ३८१ जणांचा अपघात झाला असून १५७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
पुणे रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांवर होणारी कारवाई वाढली असून, यंदाच्या आर्थिक वर्षातील दंडाच्या वसुलीचे उद्दिष्ट सात महिन्यांच्या आतच पूर्ण करण्यात आले आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून तब्बल १४.६८ कोटी रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे.
गोड रसाळ नागपूर संत्र्यांचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात संत्र्यांची आवक सुरू झाली असून हंगामाच्या पहिल्या टप्यात नागपूर संत्र्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे.
गोड रसाळ नागपूर संत्र्यांचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात संत्र्यांची आवक सुरू झाली असून हंगामाच्या पहिल्या टप्यात नागपूर संत्र्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे.नागपूर, अमरावती भागात संत्र्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
महापालिकेची पंचवार्षिक मुदत संपून आठ महिने झाले, तरी आगामी निवडणुकांचे चित्र स्पष्ट होत नाही, यावरून राजकीय वर्तुळात संभ्रमावस्था कायम आहे. सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांमध्येही कमालीची अस्वस्थता आहे.पिंपरी-चिंचवड पालिकेची मुदत मार्च २०२२ ला संपली.
इन्टाग्रामवर मैत्री झालेल्या कल्याण मधील एका तरुणाने डोंबिवलीतील आपल्या मित्राला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली. डोंबिवलीच्या मित्राने कल्याणच्या मित्राला ठाकुर्ली रेल्वे स्थानक भागात मंगळवारी संध्याकाळी भेटण्यासाठी बोलविले.
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांतील अस्वच्छता आणि त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत असल्याने शहरात स्वच्छ, टापटीप आणि यांत्रिकी पद्धतीवर आधारित स्वच्छतागृहे (ई-टाॅयलेट्स) उभारण्यात आली असली तरी प्रशासकीय अनास्थेमुळे बहुतांश ई-टाॅयलेट्स बंद असल्याची वस्तुस्थिती आहे.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत किती अधिकृत आणि बेकायदा इमारती आहेत. यामधील किती बांधकामधारकांनी पालिकेच्या परवानग्या न घेता, बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन बेकायदा इमारतींची उभारणी केली आहे. अशी परिपूर्ण माहिती सादर करण्याचे आदेश ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांना दिले आहेत.
राज्यात शासकीय स्तरावर ७५ हजार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबत उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आणि छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
नेरळ रेल्वे स्थानकात कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या एका मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने गुरुवारी सकाळी मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.कर्जतहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली.
मनुष्यप्राण्याच्या मूत्राशयातून खडे काढण्याची शस्त्रक्रिया अर्थात मुतखडा शस्त्रक्रिया आपण ऐकतोच. मात्र, श्वानाच्या मुत्राशयातून तब्बल १०८ खडे काढण्याची अवघड शस्त्रक्रिया विक्रमी ठरावी. ही किमया वर्धेतील पशुवैद्यक डॉक्टर आणि सहका-यांनी केली.
‘वेदान्त फॉक्सकॉन’ आणि ‘टाटा एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. एकीकडे विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत असताना दुसरीकडे हे प्रकल्प महाविकास आघाडीच्या कार्यकाळातच गेल्याचा दावा सरकार करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आयोजित रोजगार मेळाव्यात बोलताना यावर भाष्य केलं आहे. तसंच राज्यात अनेक नवे उद्योग आणत असल्याची माहिती दिली आहे.
चांदणी चौकातील एकात्मिक उड्डाणपूल प्रकल्पाची कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधितांना दिले.जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बुधवारी या प्रकल्पाची पाहणी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तोंडावर आली असताना चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद उफाळून आला आहे. एका नियुक्तीत विश्वासात घेतले नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) राजेंद्र वैद्य यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
ठाणे शहरात पहिल्या टप्प्यात आनंदनगर ते माजिवडा पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा सौंदर्यीकरणाचे काम करण्यात यावे आणि त्याचे प्रतिबिंब सगळीकडे उमटलेले हवे, असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बुधवारी या कामाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान दिले.
सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर कक्षाने(एआययू) केलेल्या कारवाईत चार कोटींच्या परदेशी चलनासह एका कुटुंबातील तीन सदस्यांना अटक केली. आरोपी दुबईला जाण्याच्या प्रयत्नात होते, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
अंबरनाथमध्ये महिला दुकानदाराच्या तोंडावर बेशुद्ध होण्याचे औषध फवारून दुकानात चोरी केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका महिलेनेच ही चोरी केली असून ही महिला सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
शहरातील विविध भागात पाळीव श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना ज्यांच्याकडे दोनपेक्षा अधिक पाळीव श्वान आहेत, अशा श्वान मालकांवर कारवाई करण्याचे धोरण जाहीर करण्यात आले होते मात्र हे धोरण गेल्या काही दिवसांपासून थंडबस्त्यात असून त्यावर कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही.
वाशीम येथील पोलीस ठाण्यासमोरील डाकघरात चोरी करून चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे. बुधवारी रात्री चोरट्यांनी डाकघरात चोरी केली. ही घटना आज, बुधवारी सकाळी कर्मचारी कार्यालयात दाखल झाले तेव्हा उघडकीस आली.
गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याच्या आमिषाने संगणक अभियंत्याची ११ लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांच्या विरोधात विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पीएच.डी. पात्रता परीक्षेसाठी (पेट) २४ सप्टेंबरपर्यंत झालेल्या नोंदणीत यंदा सर्वाधिक ४ हजार ८८४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. यामध्ये सर्वाधिक २ हजार ३४ अर्ज विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी केले आहे.
विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी अर्धवट गाडलेली शिवकालीन तोफ आढळली आहे. ही तोफ विसापूर किल्ल्यावर घेऊन जाण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पुरातत्व विभाग, स्थानिक आमदार, तहसीलदार यांना देण्यात आली आहे.
उके बंधूंप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध पोलिसांनी दाखल केलेली याचिका बुधवारी सत्र न्यायालयाने फेटाळली. तसेच या प्रकरणाच्या कागदपत्राची पाने बदलवल्यामुळे ॲड. सतीश उके यांनी कलम १९५, ३४०, ९१ अंतर्गत न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर गुरुवारी, ३ नोव्हेंबर रोजी सत्र न्यायाधीश श्रीमती नागोर यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे.
डोंबिवलीतून ठाकुर्ली उड्डाण पूलावरुन थेट ९० फुटी रस्त्यावर उतरण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या ठाकुर्ली उड्डाण पुलाचे काम पालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे रखडले असल्याची माहिती विश्वसनीय सुत्राने दिली.