Mumbai News Updates, 03 November 2022: एकीकडे राज्यात बच्चू कडू विरुद्ध रवी राणा या सत्ताधारी पक्षांसोबत असणाऱ्या आमदारांमध्ये तुफान कलगीतुरा सुरू असतानाच दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांनी राजकीय मुद्दा केलेल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून सर्वच पक्षांकडून त्यावर आक्रमक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Mumbai  News Today, 03 November 2022: सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

12:16 (IST) 3 Nov 2022
अंधेरी पूर्व मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदान

महाराष्ट्र विधानसभेच्या '१६६ – अंधेरी पूर्व' या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघातील सर्व २५६ मतदान केंद्रांवर मतदानाला सकाळी ७ वाजतापासून प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली आहे. यात सकाळी ११ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.

11:54 (IST) 3 Nov 2022
मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही? अंबादास दानवेंनी सांगितलं कारण; म्हणाले, “प्रत्येकाला दिलेला शब्द…”

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. यावर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे. “मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सत्ताधाऱ्यांच्या मनात भीती दडलेली आहे. मंत्रिमंडळ विस्तार केल्यास लोक सोडून जातील का? हीदेखील त्यांच्या मनात भीती आहे”, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

सविस्तर बातमी वाचा…

11:48 (IST) 3 Nov 2022
“मला वाद वाढवायचा नाही”, फडणवीसांच्या भेटीपूर्वी बच्चू कडूंचं विधान, कडू-राणा संघर्षावर आज पडदा पडणार?

आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यात मध्यस्थी केली. या आमदारांमधील वाद मिटला असल्याचं वाटत असतानाच दोन्ही आमदारांनी पुन्हा एकदा एकमेकांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. त्यातच आज बच्चू कडू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

सविस्तर बातमी वाचा…

10:54 (IST) 3 Nov 2022
संभाजी भिडेंना राज्य महिला आयोगाची नोटीस

maharashtra state women commission notice to sambhaji bhide: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराशी केवळ टिकली लावली नाही म्हणून बोलण्यास नकार दिल्याचा प्रकार बुधवारी मंत्रालयामध्ये घडला. या प्रकरणाची दखल थेट राज्य महिला आयोगाने घेतली आहे. टिकली लावली नाही तर प्रतिक्रिया देणार नाही या भुमिकेसंदर्भात स्पष्टीकरण भिडे यांनी तात्काळ द्यावं अशी नोटीसच पाठवली आहे.

वाचा सविस्तर

10:53 (IST) 3 Nov 2022
Andheri By-election: अंधेरी पोटनिवडणुकीसाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय वादाचा मुद्दा ठरलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे.