Mumbai Maharashtra Breaking News : गेल्या काही दिवसांपासून राज्यावर लहरी हवामानाचं घोंगडं आहे. कधी पाऊस तर कधी कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. तर, दुसरीकडे राज्यातील राजकारणातही सातत्याने अनेक घडामोडी घडत आहे. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षण मुद्द्यावरून राज्यात वाद पेटला असून यामुळे समाजात दुफळी निर्माण झाली आहे. दोन समाजातील हा वाद मिटावा म्हणून आता शरद पवारांनी लक्ष घालावं, अशी मागणी छगन भुजबळांनी केली. या करता त्यांनी काल शरद पवारांची भेट घेतली होती. तर, आज सकाळीच वारीला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघतात ५ वाकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अनेकजकणी जखमी झाले आहेत. यासह राज्यातील इतर घडामोडी पाहुयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा

19:33 (IST) 16 Jul 2024
कडेगावमध्ये उद्या गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा

जुलै रोजी गगनचुंबी ताबूत भेटींचा सोहळा पार पडणार आहे. यासाठी ताबूत निर्मितीवर आज अंतिम हात फिरवण्यात आला. उद्या होणारा ताबूत भेटीचा सोहळा शांततेत पार पडावा यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंगळवारी पोलीस दलाच्या वतीने कडेगाव शहरातून पथ संचलन करण्यात आले.

18:23 (IST) 16 Jul 2024
मुद्रांक अभय योजनेतून ३९३ कोटींचा महसूल, ५६ हजार प्रकरणे निकाली

पुणे : मुद्रांक अभय योजनेला राज्यातील नागरिकांची उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. परिणामी या योजनेला ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत ७२ हजार ९५५ अर्ज प्राप्त झाले आहेत.

सविस्तर वाचा…

17:45 (IST) 16 Jul 2024
“मग एकनाथ शिंदे दोष कशाला देता?” जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना थेट सवाल

17:20 (IST) 16 Jul 2024
बेकायदेशीर विक्री, तरुणींच्या जीवाला धोका; वसई विरार शहरात गर्भपात गोळ्यांचा काळाबाजार

मुलींना गर्भपातासाठी बेकायदेशीररिच्या गर्भपाताच्या गोळ्या (एमटीपी किट) काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचे प्रकऱण समोर आले आहे. वालीव पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीवर गुन्हा दाखल केला असून गर्भपाताच्या गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला आहे.

सविस्तर वाचा

17:08 (IST) 16 Jul 2024
जुहू, डी एन नगरमधील इमारत उंचीवरील बंदी उठणार? रखडलेल्या ४०० हून अधिक इमारतींचा दिलासा

जुहू (विलेपार्ले पश्चिम) आणि डी एन नगर (अंधेरी पश्चिम) या परिसरातील विमानतळ प्राधिकरणाचा ट्रान्समीटर अन्यत्र हलविण्यासाठी भूखंडाच्या अदलाबदलीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिल्यामुळे या परिसरात इमारतीच्या उंचीवर असलेली बंदी उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सविस्तर वाचा…

17:03 (IST) 16 Jul 2024
काँग्रेसच्या फुटीरांमध्ये अशोक चव्हाण यांच्या समर्थकांचा समावेश ?

विधान परिषद निवडणुकीमध्ये कॉग्रेस पक्षातील फटीर आमदारांमध्ये भाजपचे राज्यसभा सदस्य खासदार अशोक चव्हाण यांच्या निकटवर्तीय आमदारांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सविस्तर वाचा

17:03 (IST) 16 Jul 2024
हातकणंगल्यात शिंदे गटाला मदत करणारी अदृश्य शक्ती कोणती ?

शिमगा झाला तरी त्यांचे कवित्व प्रदीर्घ काळ, प्रसंगी पुढचा शिमगा येईपर्यंत कायम राहाते या प्रमाणे हातकणंगले मतदार संघात झालेल्या महायुती आणि महाविकास आघाडीतील खासदार धैर्यशील माने आणि बाबासाहेब पाटील सरूडकर यांच्या लढतीबाबत मानले जात आहे.

सविस्तर वाचा

16:54 (IST) 16 Jul 2024
ठाण्यात उंची मार्गरोधक कोसळला, मार्गरोधक अंगावर पडून दुचाकीस्वार जखमी

मार्गरोधक एका दुचाकीस्वाराच्या अंगावर पडून तो किरकोळ जखमी झाला आहे. ट्रक चालकाला नागरिकांनी पक़डून पोलिसांच्या ताब्यात दिले.

सविस्तर वाचा…

16:28 (IST) 16 Jul 2024
” हिरवे झेंडे लावून मिरवणाऱ्यांच्या…”; देवेंद्र फडणवीसांची महाविकास आघाडीवर बोचरी टीका

मला आश्चर्य वाटतं की छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर काही लोकांनी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला. ते अतिक्रमण निघत असेल तर महाविकास घाडीच्या पोटात का दुखतंय. महाविकास आघाडीने स्पष्ट केलं पाहिजे की ते छत्रपती शिवरायांच्या बाजूने आहेत की त्यांच्या गडावर अतिक्रमण करणाऱ्या आणि हिरवे झेंडे लावून मिरवणाऱ्यांच्या पाठीशी आहेत – देवेंद्र फडणवीस</p>

16:11 (IST) 16 Jul 2024
डोंबिवलीतील सागाव येथील बेकायदा इमारत तोडण्यास भाजप पदाधिकाऱ्यांचा अडथळा, उच्च न्यायालयाच्या इमारत तोडण्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष

दोन भावांच्या वडिलोपार्जित जमिनीवर स्वस्तिक होम्सचे देवेश रवींद्र भगत, उमेश रामदास पाटील या भूमाफियांनी दहशतीचा अवलंब करून तीन वर्षाच्या कालावधीत सात माळ्याची राधाई नावाने बेकायदा इमारत उभारली.

सविस्तर वाचा…

15:30 (IST) 16 Jul 2024
IAS पूजा खेडकर प्रकरण: पिंपरीच्या वायसीएममधील डॉक्टरांची चौकशी करावी- आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी

IAS अधिकारी पूजा खेडकर यांना वाय.सी.एम रुग्णालयाने दिव्यांग सर्टिफिकेट दिल्याने वायसीएम रुग्णालयावर आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. याप्रकरणी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. सविस्तर वाचा…

15:29 (IST) 16 Jul 2024
‘जय हरी विठ्ठल’चा गजर अन् विशेष गाडी रवाना; भुसावळ रेल्वे विभागातून प्रथमच…..

भुसावळ रेल्वे विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसह अतिरिक्त प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेने आषाढ एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरसाठी विशेष गाडी सोडली. सविस्तर वाचा…

15:28 (IST) 16 Jul 2024
डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई; फेरीवाल्यांचे ठेले, मंचकाची तोडफोड

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर फ आणि ग प्रभागाने सोमवारपासून संयुक्त कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत वर्दळीच्या रस्त्यावर फेरीवाल्यांनी केलेली पक्की आसनव्यवस्था घणांच्या घावांनी तोडून टाकण्यात आली. सविस्तर वाचा…

15:26 (IST) 16 Jul 2024
अनंत अंबानींच्या वरातीमधील विदेशी वाहनांवर कारवाई होणार ?

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. या विवाह सोहळ्याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अनंत आणि राधिका यांची वरातही लक्षवेधी ठरली. मात्र, अनंत अंबानी यांच्या वरातीतील सहभागी आलिशान विदेशी वाहनांवर कारवाई होण्याची चिन्हे आहेत. सविस्तर वाचा…

15:24 (IST) 16 Jul 2024
डायघरसारख्या घटनेची पुनरावृत्ती नको, निर्जनस्थळी गस्त सुरू करण्याची ठाकरे गटाची मागणी

डायघर पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या एका मंदिर परिसरात नवी मुंबईतील विवाहित महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

सविस्तर वाचा…

15:11 (IST) 16 Jul 2024
पनवेल: अपघातग्रस्तांसाठी पोलीस व एमजीएम रुग्णालयाचे आपत्ती ३५ डॉक्टर आणि ४० आरोग्यसेवक

यशवंतराव चव्हाण मुंबई पूणे द्रुतगती महामार्गावर मध्यरात्री अपघात झाल्यानंतर ४० मिनिटांनी पहिला रुग्ण कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सविस्तर वाचा…

15:02 (IST) 16 Jul 2024
कोल्हापूर: नृसिंहवाडीत यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न

उसंत घेतलेल्या पावसाने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ झाली आहे.

सविस्तर वाचा…

14:42 (IST) 16 Jul 2024
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील सीसीटिव्ही कॅमेरा बंदच

सरकारने २२ वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग बांधला परंतू अजूनही या महामार्गातील दोष सरकार दूर करु शकली नाही.

सविस्तर वाचा…

14:41 (IST) 16 Jul 2024
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात कसा झाला? चुक कोणाची? नेमकं काय झालं?

सोमवारी मध्यरात्री झालेल्या अपघातामधील पाच मृतांपैकी ट्रॅक्टर चालक व त्याच्या सहका-याची ओळख तब्बल १० तासांनी झाली.

सविस्तर वाचा…

14:14 (IST) 16 Jul 2024
उरण: आगमनालाच बोंबिलाचा भाव कडाडून दोनशे रुपयांवर! पावसाळी मासेमारी बंदीमुळे मासळीचे दर वधारून खिशावर भार

पापलेट, सुरमईवर ताव मारायला सर्वच मासेप्रेमींना आवडत असले तरी हे मासे परवडत नसल्याने सर्वसामान्यांची पावले वळतात ती ‘बॉम्बे डक’ अर्थात बोंबील माशांकडे.

सविस्तर वाचा…

14:13 (IST) 16 Jul 2024
चंद्रपुरकरांची दहा वर्षांत ५५० कोटींनी फसवणूक; चिटफंड कंपन्यांनी…

मागील दहा वर्षात राज्यातील विविध चिटफंड कंपन्यांनी चंद्रपुरात कार्यालय सुरू करून जनतेला आर्थिक लाभाची विविध आमिष दाखवून ५५० कोटी रुपयांनी गंडा घातला आहे.

सविस्तर वाचा…

13:45 (IST) 16 Jul 2024
बावनकुळे म्हणाले “मुले कोणाची…बारसे कोण करतय…”

नागपूर : शिंदे- फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य सरकार विकासाची भूमिका मांडत असताना विरोधी पक्षातील नेते मात्र बॅनरबाजी करत आम्हीच योजना आणल्याचा आव आणत आहे.मुले कोणाची, बारसे कोण करतय आणि लाडू कोण खात आहे.

सविस्तर वाचा…

13:44 (IST) 16 Jul 2024
आरक्षण वादावर शरद पवार यांचा मोजक्या नेत्यांशी चर्चेचा पर्याय, छगन भुजबळांची माहिती

सर्वपक्षीय बैठकीत ५० ते ६० नेते उपस्थित असतात. नाजूक प्रश्नावर चर्चा कशी करणार, असा प्रश्न पवार यांनी केला.

सविस्तर वाचा…

13:43 (IST) 16 Jul 2024
शिवसेना उबाठाची पश्चिम विदर्भात मोर्चेबांधणी; खासदर अरविंद सावंत म्हणाले…

अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर उबाठा शिवसेनेचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता आगामी निवडणुकीसाठी पश्चिम विदर्भात शिवसेनेकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडा आणि शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळवून देण्यासाठी मतभेद विसरून कामाला लागा, असे निर्देश शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठ्या प्रमाणात जनाधार मिळाला असून जनमत अधिक भक्कम झाले. आगामी विधानसभेत शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळवण्यासाठी पदाधिकाऱ्याने एकजुटीने कामाला लागण्याची आवश्यकता असून मनभेद व मतभेद विसरावे लागतील. लोकशाही मूल्यांची जोपासना करण्यासाठी व प्रखर हिंदुत्वाचा विचार ज्वलंत ठेकण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने सज्ज व्हावे, असे खा. सावंत म्हणाले.

13:38 (IST) 16 Jul 2024
“अजित पवार महायुतीत शोभत नाहीत, कारण…”, जितेंद्र आव्हाडांचं विधान चर्चेत!

मुख्यमंत्र्यांबद्दल अजित पवारांच्या मनात राग आहे मला माहितेय. हे काही लपलेलं नाही. आज त्यांनी बोलूनच दाखवलं. दादा महायुतीत शोभणारेच नाहीत. कारण त्यांना स्वतःच्या स्वभावाला मुरडच घालता येत नाही – जितेंद्र आव्हाड</p>

13:36 (IST) 16 Jul 2024
नाशिक: मुक्त विद्यापीठाकडून ३० दिवसांच्या आत निकाल जाहीर

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल यंदा ३० दिवसांच्या आत जाहीर झाले आहेत.

सविस्तर वाचा…

13:19 (IST) 16 Jul 2024
पोलीस कल्याणाच्या दृष्टीने जाहिरात फलकाला परवानग्या माजी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांचा जबाबात दावा

मुंबई : घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटनाप्रकरणात गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) रेल्वेचे माजी पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्यासह दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा जबाब नोंदविले आहेत. यात माजी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी व्यावसायिक अर्षद खान याला ओळखत असल्याचे सांगताना पोलीस कल्याण निधीच्या दृष्टीने जाहिरात फलकाला परवानग्या देण्यात आल्याचा दावा केला आहे.

सविस्तर वाचा…

13:04 (IST) 16 Jul 2024
महानगरपालिकेचे धोरण रेल्वे प्रशासनाला बंधनकारक, महाकाय जाहिरात फलक हटवावेच लागणार

मुंबई : मुंबई महानगरात जाहिरात फलकांबाबत (होर्डिंग्ज) मुंबई महानगरपालिकेने आखलेल्या धोरणांचे तसेच आकारांबाबतच्या आदेशाचे रेल्वे प्रशासनाला पालन करावेच लागेल, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

सविस्तर वाचा…

12:56 (IST) 16 Jul 2024
‘मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजने’वरून ओवैसींची महाराष्ट्र सरकारवर टीका; म्हणाले, “हिंदू तीर्थक्षेत्रे…”

महाराष्ट्र सरकारने ६० वर्षांवरील लोकांना मोफत तीर्थयात्रा देणारी “मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना” आणली आहे. २ मुस्लिम स्थळे, काही गुरुद्वारा आणि चर्च वगळता उर्वरित हिंदू तीर्थक्षेत्रे आहेत. हे तुष्टीकरण नाही का? ही “रेवडी” नाही का? जे श्रद्धावान आहेत ते ही तीर्थयात्रा स्वतः करू शकतात – असदुद्दीन ओवैसी

12:47 (IST) 16 Jul 2024
कल्याणमधील गोविंदवाडी रस्त्यावरील लोखंडी सळ्या निघाल्याने भीषण अपघाताची भीती

कल्याण : कल्याण शहराबाहेरील सर्वाधिक वर्दळीच्या गोविंदवाडी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरील काँक्रिट रस्त्याखालील लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. या सळ्यांमध्ये दुचाकी स्वाराचे चाक अडकून किंवा अवजड वाहनाच्या चाकात या सळ्या जाऊन मोठा अपघात या रस्त्यावर होण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.