Mumbai Maharashtra Live News Today : महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने उलथापालथ होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर आता काँग्रेसला गळती लागली आहे. गेल्या महिन्याभरात काँग्रेसच्या तीन मोठ्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटात प्रवेश केले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसला रामराम केला. आता ते भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. अशातच आणखी काही काँग्रेस नेते भाजपासह महायुतीतल्या पक्षांमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. राजधानी दिल्लीतलं वातावरणही तापलं आहे. कारण शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या वेशीवर दाखल झाला आहे. त्यामुळे आज दिवसभर राज्यात देश पातळीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडतील. या सर्व घडामोडींची माहिती तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
Maharashtra Live News Today 13 February 2024 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या, एकाच क्लिकवर
अशोक चव्हाण यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेशाचा कार्यक्रम चालू असताना काँग्रेस नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबरोबर दक्षिण मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे खलबतं चालू होती.
आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे श्री.शरदचंद्रजी पवार व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी श्री.रमेश चेन्नीथला जी यांची पूर्वनियोजित भेट झाली. यावेळी समवेत महाराष्ट्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. pic.twitter.com/ZB3jc6BugH
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 13, 2024
अमरावती : आईला मारहाण केल्याचा राग अनावर झाल्याने मुलाने वडिलांवर लोखंडी बत्त्याने हल्ला चढवून त्यांची हत्या केली. ही धक्कादायक घटना भातकुली ठाण्याच्या हद्दीतील सायत येथे घडली. या प्रकरणी आरोपी मुलास अटक करण्यात आली आहे.
अमरावती : नागपूर : शहरातील मोठमोठ्या ‘ओयो’ हॉटेल्समध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याचे उघडकीस आले असून बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णकुंज हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात १५ वर्षांच्या मुलीला देहव्यापार करताना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी हॉटेल मालक राकेश बलवीरसिंह चावला (५५) आणि मुलगा आशिष राकेश चावला (रा. छत्रपती चौक) यांच्यासह पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
मराठवाड्यात लोकसभेच्या ८ तर विधानसभेच्या ४० च्यावर जागा आहेत. लोकसभेच्या २ वगळता सध्या ६ जागा महायुतीकडे ताब्यात आहेत. अगदी अशोक चव्हाण यांनाही गेल्या लोकसभा निवडणुकीत फटका बसला. तरीही भाजपने त्यांच्यासाठी पायघड्या का घातल्या, यात जुन्या कार्यकर्त्यांचे काय, असे मुद्दे आहेत.
नागपूर: काँगेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. २०१७ मध्ये ते महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी नागपूरमध्ये आले असता त्यांच्यावर शाईफेकण्यात आली होती. ही घटना पक्षातील अंतर्गत गटबाजीतून घडली घडली असली तरी तेव्हा चव्हाण यांनी मात्र याबाबत राष्ट्रीय स्वंयसेवक संघ व भारतीय जनता पार्टीला जबाबदार धरले होते.
मुंबई-आग्रा महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवासी वाहनांवर कोयत्याने हल्ला करुन लूटमार करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
पिंपरी : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य शासनाने जारी केलेल्या मसुद्याचे सगेसोयऱ्यांच्या व्याखेसह कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या १४ फेब्रुवारी पिंपरी-चिंचवड बंदची हाक देण्यात आली आहे.
अपंग बांधवांसाठीच्या या भवनसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी पाठपुरावा केला होता.

आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे श्री.शरदचंद्रजी पवार व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी श्री.रमेश चेन्नीथला जी यांची पूर्वनियोजित भेट झाली. यावेळी समवेत महाराष्ट्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. pic.twitter.com/xoLNwZz3NY

पुणे : वातानुकूलित टॅक्सीच्या भाडेदरात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने वाढ करून महिना उलटला आहे. तरीही याची अंमलबजावणी ओला आणि उबर या कंपन्यांनी केलेली नाही. या कंपन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला केराची टोपली दाखविल्याचे यामुळे समोर आले आहे. याप्रकरणी कॅबचालकांनी आता बेमुदत बंदचा इशारा दिला आहे.
सद्यस्थितीत नाशिक-पुणे महामार्गावर इलेक्ट्रिक बससेवा सुरू आहे. तिचा हळूहळू इतर मार्गावर विस्तार होत आहे.
मागील दोन वर्षांपासून पनवेल व उरणचे शेतकरी नैना प्राधिकरणाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
पुणे : केंद्र सरकारकडून अनुदान मिळवण्यासाठी नॅक, नॅब मूल्यांकनात सहभागी होणे, एनआयआरएफ क्रमवारी, प्राध्यापकांची किमान ७५ टक्के पदे भरलेली असणे असे निकष महत्त्वाचे ठरणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र या मार्गदर्शक सूचनांतील प्रस्तावित तरतुदींबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
नवी मुंबई : नवी मुंबईत पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षामुळे सीवूड्स विभागात चक्क गटाराच्या पाण्याच्या शेजारीच बेकायदा धोबीघाट थाटल्याचे चित्र असून त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक चव्हाण यांचा आज भाजपात अधिकृत प्रवेश झाला आहे. लवकरच हजारो कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भाजपा प्रवेशाचा कार्यक्रम आम्ही निश्चितपणे आयोजित करू. राज्यात येत्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यात महायुतीला बळ मिळेल. निश्चितच आम्हाला त्यांचा फायदा होईल. अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश करताना केवळ एवढंच सांगितलं की, विकासाच्या मुख्य धारेत योगदान देण्याची संधी मला द्या. बाकी मला पदाची कुठलीही अपेक्षा आणि लालसा नाही.
पुणे : महापालिकेकडे वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध नसतानाही मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेंतर्गत नव्याने वृक्ष लागवड करण्याचा घाट महापालिकेने घातला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त संजय नारगुडे यांनी नाशिक जिल्ह्यात ११ पदे रिक्त असल्याचे सांगितले.
नवी मुंबई : नद्या प्रदूषण मुक्त करा, शाळा पोषण आहारात अंड्यांचा समावेश बंद करा.. अशा मागण्या वारकरी संप्रदाय तर्फे करण्यात आल्या आहेत. खारघर येथे संत शिरोमणी श्री निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्त शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह तसेच वारकरी राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते .
खारफुटीचे घनदाट जंगल असलेला भाग मातीचे भराव टाकून बुजविण्यात येत असल्याने पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी छायाचित्रकार तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
वर्धा : देशाचे गृहमंत्री तसेच भाजपचे चाणक्य म्हणून ओळख असणारे अमित शहा अकोला भेटीवर येणार आहे.१५ फेब्रुवारीस होणाऱ्या अकोला भेटीत ते लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार असल्याचे वृत्त आहे. भाजपच्या पक्षीय रचनेत पश्चिम विदर्भातील चार लोकसभा मतदारसंघासोबत वर्धा जोडला आहे.
पुणे : पुणे रेल्वे स्थानकातील यार्डात रेल्वे डब्याला आग लागल्याची घटना मध्यरात्री घडली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.
मुंबई : दीड लाख गिरणी कामगारांची पात्रता निश्चिती करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळ राबवित असलेल्या विशेष अभियानाची मुदत गुरुवारी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे उर्वरित गिरणी कामगारांना आपली कागदपत्रे जमा करण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. दरम्यान, या विशेष मोहिमेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
पुणे : राज्यात बेदाणा निर्मितीला वेग आला आहे. साधारण फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून सुरू होणारा हंगाम, यंदा जानेवारीपासूनच सुरू झाला आहे. अवकाळीमुळे द्राक्ष मण्यांना तडे गेल्यामुळे घडात बुरशी वाढू लागली, द्राक्ष ग्राहकांच्या हातात जाईपर्यंत खाण्यायोग्य राहत नसल्यामुळे नाइलाजाने शेतकऱ्यांना बेदाणा तयार करावा लागत आहे.
पनवेल : इंडीयन इंस्टीट्युशन ऑफ इंडस्ट्रियल इंजिनियरींग संस्थेचे माजी चेअरमेन आणि संचालक डॉ. भास्कर भांडारकर यांच्याविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात दिड कोटी रुपयांच्या फसवणूकीसह संस्थेचा लॅपटॉप, मोबाईल आणि महत्वाच्या फाईस चोरी केल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संस्थेच्यावतीने विमलेश विचारे यांनी याविषयीचा अर्ज नवी मुंबई पोलीसांकडे दिला होता. चौकशी अंती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी रितसर गुन्हा नोंदविण्याचे आदेश सीबीडी पोलीसांना दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
डॉ. भांडारकर हे २००८ ते २०१८ या कालावधीत इंडीयन इंस्ट्ट्युशन ऑफ इंजिनीयरींग संस्थेचे काम पाहत होते. माजी चेअरमेन डॉ. भांडारकर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करुन स्वताच्या फायद्याकरीता संस्थेच्या सदनिकेचे नुतणीकरणाचे काम केल्याचे दाखवून संस्थेकडे या कामाची बनावट देयके सादर करुन एक कोटी ५४ लाख ७६ हजार ६०३ रकमेचा अपहार केल्याचे संस्थेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलीसांनी संस्थेने दिलेल्या अर्जाची चौकशी करुन १० फेब्रुवारीला सीबीडी पोलीस ठाण्यात डॉ. भांडारकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला.
अलिबाग शहरातील संशयास्पद घडामोडींवर पोलीसांची करडी नजर असणार आहे. शहरात तीन कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमरा कार्यप्रणाली बसविण्यात आली आहे. या सीसीटीव्ही यंत्रणेचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी रोहा, महाड, माणगाव, पेण आणि श्रीवर्धन शहरातही अशाच पध्दतीची यंत्रणा बसविण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी योगेश म्हसे, पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक संजय पाटील, मुख्याधिकारी अंगाई साळुखे, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा नियोजन विकास निधीतून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अलिबाग शहरात सिसीटीव्ही कॅमेरा बसवण्यास मंजूरी देण्यात आली होती. या नुसार अलिबाग शहर आणि आसपासच्या ग्रामपंचायतीमध्ये ३२ ठिकाणी १२७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. अलिबाग पोलीस ठाण्यात सुसज्ज कंट्रोल रूम उभारण्यात आली आहे. ज्यात एकाच वेळी ६४ कॅमेऱ्यांचे चित्रिकरण पोलीसांना पाहणे शक्य होणार आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या सर्व वाहनांची माहिती गाडी नंबरसहीत सॉफ्टवेअरमध्ये संकलित केली जाणार आहे. ज्याचा फायदा वाहतूक पोलीस आणि अलिबाग पोलीसांसाठी होऊ शकणार आहे. समुद्र किनाऱ्यांवरील हालचालींवर पोलीसांची नजर राहणार आहे. एक किलोमीटर परिसरातील हालचाली सीसीटीव्हीच्या माध्यमातून टिपता येणार आहे. या यंत्रणेमुळे शहरातील गुन्हेगारी कारवायांवर नजर ठेवणे, आरोपींचा शोध घेणे सुलभ होणार आहे.
मागील तेरा दिवसांपासून अत्यवस्थ असलेले महेश गायकवाड यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याने डाॅक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढून सामान्य कक्षात उपचारासाठी ठेवले आहे.
ठाकरे गटाकडून प्राप्तिकर विभाग, टीडीएस लॉग इन आयडी आणि पासवर्डचा गैरवापर सुरू असल्याची तक्रार शिंदे गटाने मुंबई पोलिसांकडे केली होती.
नागपूर : कला, नाट्य, संगीत आणि साहित्य क्षेत्रात काम करीत असताना नागपुरातील तरुणी कोलकाताच्या तरुणाच्या प्रेमात पडली. त्याने प्रेमासाठी आई-वडील, घर सोडून प्रेमविवाह केला आणि पत्नीचे शिक्षण पूर्ण केले. ती नोकरीवर लागताच तिने घटस्फोट देण्याची तयारी केली. मात्र, भरोसा सेलने दोघांचेही समुपदेशन करीत तुटण्याच्या काठावर असलेला संसार वाचविला.
ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाबाबत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये दानवे यांनी म्हटलं आहे की, आज अशोक चव्हाण औपचारीकपणे भाजपवासी होणार, अश्या बातम्या आहेत. खरं तर ते एका उंचीचे लोकनेते आहेत. त्यांचा प्रवेश देश पातळीवरील एखाद्या नेत्याने करून घेणे अपेक्षित होते ज्याला चव्हाणांच्या बरोबरीचा जनाधार आहे. पण ज्यांना ‘डिमोशन’चे बक्षिस मिळाले, तेच चव्हाणांना प्रवेश देणार आहेत म्हणे. सोबत आमदारकीसाठी हातपाय आपटणारे एक बारावे खेळाडू असणार आहेत म्हणे..
आज अशोक चव्हाण औपचारीकपणे भाजपवासी होणार, अश्या बातम्या आहेत. खरं तर ते एका उंचीचे लोकनेते आहेत. त्यांचा प्रवेश देश पातळीवरील एखाद्या नेत्याने करून घेणे अपेक्षित होते ज्याला चव्हाणांच्या बरोबरीचा जनाधार आहे.
— Ambadas Danve (@iambadasdanve) February 13, 2024
पण ज्यांना 'डिमोशन'चे बक्षिस मिळाले, तेच चव्हाणांना प्रवेश देणार आहेत…
नागपूर : बेरोजगार असलेल्या प्रियकर आणि प्रेयसीने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह करण्याचे ठरविले. मात्र, लग्न करून संसार सुरु करण्यासाठी पैसा नव्हता. त्यामुळे लग्नापूर्वी त्यांनी पैसा जमा करण्यासाठी त्यांनी थेट एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून पैसे कमविण्याचा गोरखधंदा सुरु केला.
अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यामुळे मविआच्या जागावाटपाचं गणित बिघडणार? संजय राऊत म्हणाले…
शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार आणि महाविकास आघाडीतले महत्त्वाचे नेते संजय राऊत म्हणाले, अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यामुळे महाविकास आघाडीवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. जागावाटपावर तर अजिबात परिणाम होणार नाही. अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस नाही, एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना नाही आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस नाही. व्यक्ती येतात आणि जातात, पक्ष-युती-आघाडी तिथेच असते. अशोक चव्हाण कालपर्यंत आमच्याबरोबर जागावाटपाची चर्चा करत होते. काही जागा काँग्रेसला मिळाव्या यासाठी अग्रही भूमिका मांडत होते. परवा जागावाटपासंदर्भात माझ्याशी बोलले. तीच व्यक्ती काल उठली आणि भाजपात गेली. महाविकास आघाडीतलं कोणी त्यांच्याबरोबर जात असेल तर त्याचा मविआवर काहीच परिणाम होणार नाही. एका अर्थाने ही शुद्धीकरण मोहीम आहे असं आम्ही मानतो.