Mumbai Maharashtra Live News Today : महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने उलथापालथ होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर आता काँग्रेसला गळती लागली आहे. गेल्या महिन्याभरात काँग्रेसच्या तीन मोठ्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटात प्रवेश केले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसला रामराम केला. आता ते भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. अशातच आणखी काही काँग्रेस नेते भाजपासह महायुतीतल्या पक्षांमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. राजधानी दिल्लीतलं वातावरणही तापलं आहे. कारण शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या वेशीवर दाखल झाला आहे. त्यामुळे आज दिवसभर राज्यात देश पातळीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडतील. या सर्व घडामोडींची माहिती तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
VIDEO : चव्हाणांच्या भाजपा प्रवेशावेळी काँग्रेस नेत्यांची शरद पवारांबरोबर खलबतं, मविआच्या गोटात चाललंय काय? नाना पटोले म्हणाले…
Maharashtra Politics Live Today, 13 February 2024 : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-02-2024 at 11:08 IST
TOPICSअशोक चव्हाणAshok Chavanदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisभारतीय राष्ट्रीय काँग्रेसIndian National Congressमहाराष्ट्र पॉलिटिक्सMaharashtra Politicsसंजय राऊतSanjay Raut
+ 1 More
Web Title: Maharashtra news live ashok chavan will join bjp maharashtra politics latest updates eknath shinde devendra fadnvis marathi batmya asc