Marathi News Live Updates, 07 October 2024 : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नसला तरीही जागावाटपाचं काम जोरात सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना किती आणि कुठे जागा मिळणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यंदा बारामतीमधून नाही तर शिरूरमधून संधी मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी बारामती विधानसभेची जागा न लढण्याचे संकेत गुरुवारच्या मेळाव्यात दिले होते. त्यानंतर दादा कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार, याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. आता शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. तर, कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्प्याचे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या टप्पा आजपासून प्रवाशांसाठी खुला झाला आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 07 October 2024 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा

13:28 (IST) 7 Oct 2024
हवामान खात्याकडून पावसाचा इशारा, पण आकाशात मात्र सूर्याचा…

नागपूर : राजस्थानातच अडखळलेल्या मान्सूनने उशिरा का होईना, पण महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू केला. तरीही ‘ऑक्टोबर हिट’चे चटके मात्र वाढतच चालले आहेत. राज्यातील आणि विशेषकरून विदर्भातील अनेक शहरांमधील तापमानाचा पारा वाढतच आहे.

वाचा सविस्तर…

13:28 (IST) 7 Oct 2024
कल्याणमधील आईच्या सहमतीने मित्राकडून मुलीवर उत्तराखंडमध्ये लैंगिक अत्याचार

कल्याण : कल्याणमधील आई आणि तिची अल्पवयीन मुलगी उत्तराखंड ऋषिकेश येथे पर्यटनासाठी गेले होते. तेथे महिलेचा (आई) मित्र आला होता. या तिघांनी ऋषिकेष भागात पर्यटन केले. नंतर एका हॉटेलमधील निवासात मित्राने आपल्या मैत्रिणीच्या सहमतीने अल्पवयीन मुलीला पाण्यात गुंगीचे औषध टाकून दिले. मुलीला गुंगी आल्यानंतर त्याचा गैरफायदा घेत मित्राने या मुलीचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

वाचा सविस्तर…

13:27 (IST) 7 Oct 2024
अजित पवार शिरूरमधून लढणार?

पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचे संकेत देणारे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असल्याने त्या दृष्टीने अजित पवार यांनी चाचपणी सुरू केली आहे.

वाचा सविस्तर…

12:42 (IST) 7 Oct 2024
“राजकारण्यांना खडेबोल सुनावण्याचं काम साहित्यिकांनी करावं”, राज ठाकरेंचं आवाहन

“देशाला दिशा देणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. पण आता भाषा इतक्या खालच्या थराला गेली आहे. ज्या महाराष्ट्रातील बुजूर्ग म्हणावं तेच त्यांच्या आहारी लागले आहेत. ही जबाबगदारी साहित्यिकांनी हातात घेणं गरजेचं आहे. पण ज्याला आपण अशा प्रकारची साहित्यिक चळवळ उभं करणं गरजेचं वाटतं. भविष्यातील लहान मुलांना वाटेल की हेच राजकारण. ही भाषा म्हणजे राजकारण. या राजकारण्यांना खडेबोल सुनावण्याचं काम साहित्यिकांनी करावं.”, असंही राज ठाकरे म्हणाले.

12:35 (IST) 7 Oct 2024
दागिने घडविणाऱ्या कारागिरांकडून पावणेदोन कोटींचे सोने चोरी, पश्चिम बंगालमधील कारागिरांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : सराफ व्यावसायिकांनी दागिने घडविण्यासाठी दिलेले पावणेदोन कोटींचे शुद्ध सोने चोरून कारागीर पसार झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांकडून पश्चिम बंगालमधील पाच कारागिरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर…

12:35 (IST) 7 Oct 2024
पुणे : नगर रस्त्यावर डंपरची दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक, सहप्रवासी महिलेचा मृत्यू

पुणे : भरधाव डंपरने दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक दिल्याची घटना नगर रस्त्यावर घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला असून, लोणीकंद पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

वाचा सविस्तर…

12:34 (IST) 7 Oct 2024
बोपदेव घाट सामुहिक बलात्कार प्रकरणातील तपासात एआयचा वापर

पुणे : बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांकडून कृत्रिम बुद्धीमत्तेचा (आर्टीफिशियल इंटलिजन्स) वापर करण्यात येणार आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास पुणे पोलिसांकडून दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

वाचा सविस्तर…

12:33 (IST) 7 Oct 2024
रायगडमध्ये महिला मतांसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी

अलिबाग : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी पक्षासह विरोधकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी महिला संवाद मेळाव्यांच्या आडून साडी वाटपाचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

वाचा सविस्तर…

12:13 (IST) 7 Oct 2024
गोंदियात विनोद अग्रवाल विरुद्ध गोपालदास अग्रवाल यांच्यात लढत

गोंदिया : अपक्ष आमदार तसेच चाबी संघटनेचे प्रमुख विनोद अग्रवाल यांना भाजप पक्षश्रेष्ठींनी मागील २०१९ मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी निलंबित केले होते. आता त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार अग्रवाल यांचे निलंबन मागे घेण्यात आल्याचे समाज माध्यमावर जाहीर केले. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गोंदिया मतदारसंघात अग्रवाल विरुद्ध अग्रवाल, अशी लढत होण्याची चिन्हे आहे.

वाचा सविस्तर…

12:11 (IST) 7 Oct 2024
निवडणुकीच्या निमित्ताने मराठीचा भाग्योदय, विकास मंडळांचा कधी?

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने का होईना, अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रस्ताव, विविध समाजासाठींचे महामंडळे आणि मागण्या राज्य शासनाने मार्गी लावल्या. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची अनेक वर्षांपासूनची मागणीही पूर्ण झाली. मात्र, या लोकप्रिय घोषणांच्या भाऊगर्दीत मागासभागांच्या विकास मंडळांना पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव अडीच वर्षांपासून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे.

वाचा सविस्तर…

11:10 (IST) 7 Oct 2024
घोडबंदर भागात विद्युत वाहिन्या जळाल्याने वीजपुरवठा खंडीत, नागरिक हैराण

ठाणे : घोडबंदर येथील कासारवडवली भागात सोमवारी सकाळी विद्युत वाहिन्या जळाल्याने या भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. येथील विद्युत पुरवठा सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरळीत होणार असल्याचा संदेश नागरिकांना प्राप्त झाला आहे.

वाचा सविस्तर…

10:53 (IST) 7 Oct 2024
LIVE : “…तर मी एक-एकाला गोळ्या घालेन”, नितीन गडकरींनी कोणाला दिली होती धमकी?

अलेक्झांडर महाराष्ट्राचे राज्यपाल होते. मी राजूदतमधून मेळघाटातील गावांत फिरलो. तेव्हा रस्त्यांची स्थिती खूप खराब होती. फॉरेस्टवाले येथे काहीच काम करू देत नव्हते. तेव्हा एक नांदडचे आयुक्त होते. दर मीटिंगला आम्ही बसायचो, फॉरेस्ट ऑफिसरला सांगायचे की किती गंभीर प्रश्न आहे. मग मनोहर जोशींनी आले. मनोहर जोशींनी सर्व अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली. पण तरीही काम होईना. त्यामुळे मी हा विषय माझ्यावर सोडून द्या असं म्हटलं. मी चुकून राजाकरणात आलो. माझ्या तारुण्यात मी नलक्षवादी चळवळीतच गेलो होतो.पण पुन्हा एकदा जाईन आणि तुम्हाला गोळ्यांनी फोकल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर फॉरेस्ट वाल्यांना काय काय केलं हे सांगता येणार नाही – नितीन गडकरी</p>

Maharashtra Breaking News Live Today, 07 October 2024 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा