राज्यात विधानसभेचे विशेष अधिवेशन चालू झाले आहे. आज या अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून जवळपास सर्व आमदारांनी शपथ घेतली. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल. त्यांनी कालच विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज केला होता. त्यांची या पदाकरता बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीने ईव्हीएमविरोधात एल्गार पुकारला आहे. तसंच, महाराष्ट्र एकीकरण समितीचं आज बेळगावात महाअधिवेशन आहे. कर्नाटक पोलिसांनी या अधिवेशनाला परवानगी नाकारली आहे. परंतु, महाराष्ट्र एकीकरण समिती अधिवेशनावर ठाम असल्याने कर्नाटक पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Political News Updates : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा
मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणः मुख्य सूत्रधाराची ओळख पटली, दुबईतील पाच कंपन्यांच्या खात्यावरही ४ कोटी रुपये जमा
मुंबई : मालेगाव येथील १०० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार मेहमूद भागड ऊर्फ चॅलेंजर किंग ऊर्फ एमडी असल्याचे सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) तपासात निष्पन्न झाले आहे. ३५ वर्षीय भागडने मालेगाव आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी आरोपी सिराज मोहम्मदच्या अटकेनंतर परदेशात पलायन केल्याचा संशय आहे.
सविस्तर वाचा…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांंचं अभिनंदन
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मी पुन्हा येईन, आणि ते पुन्हा आले, त्यांचं अभिनंदन – एकनाथ शिंदे</p>
Maharashtra Live News : लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांची पुन्हा छाननी होणार का? आदिती तटकरेंची महत्त्वाची माहिती!
दोन कोटी ४० लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. छाननी कोणत्याही योजनेची एवढ्या मोठ्या संख्येने करण्यासाठी तक्रार यावी लागते. मी आता त्या विभागाची मंत्री नाही. तेव्हा अशा पद्धतीने तक्रार आली असेल तर माझ्याकडे माहिती नाही. छाननी किंवा चाचणी करायची झाल्यास तक्रारीच्या आधारे करावी लागते. मी मंत्री असताना तक्रारी आल्या नव्हत्या. कोणीही अशा पद्धतीने तक्रार केली असेल तर विभागाचे आधिकारी निर्णय घेतात. आता तक्रारी आल्यात की यासंदर्भातील माहिती नाही. अतिशय प्राथमिक छाननी करून आधार सिडिंग करून लाभार्थी निवडले आहेत – आदिती तटकरे
डॉ. श्रीकर परदेशी मुख्यमंत्र्यांचे सचिव होताच यवतमाळात आनंद
यवतमाळ : महाराष्ट्राचे नवनिर्माण करताना प्रशासन अधिक पारदर्शी व गतिमान राहील असा संदेश नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी दिला. आपले सचिव म्हणून डॉ. श्रीकर परदेशी यांची नियुक्ती करून त्यांनी येत्या काळात महाराष्ट्राचे प्रशासन कसे राहील, याचा सूचक इशारा दिल्याचे मानले जात आहे.
Maharashtra Live News : नाना पटोले माझे मित्र, आम्ही राजकीय विरोधक – देवेंद्र फडणवीस
विधानसभेच्या आतापर्यंत अध्यक्षांची नावे वाचून दाखवताना देवेंद्र फडणवीसांना नाना पटोलेंचं नाव घेताना “आपले नाना पटोले...”, त्यांच्या या विधानावर विधानसभेत हास्यकल्लोळ झाला. तेवढ्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नाना माझे मित्र. आम्ही राजकीय विरोधक आहेत.”
Maharashtra Live News : लाडकी बहीण योजनेचे दिलेले पैसे परत घेऊ नका- संजय राऊत
सरसकट १५०० रुपयांचा व्यवहार केला त्यावर आमचा आक्षेप होता. राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं की निकष बदलावे लागतील. निकष न बदलता यासाठी देण्यात पैसे देण्यात आले की १५०० रुपयांला मते विकत घेण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा त्यांना निकष, नियम, कागदपत्रे यासंदर्भातल भान राहिलं नाही. त्यांना फक्त मते विकत घ्यायची होती. राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या असं धान्यात आलंय की, कमावत्या महिला, चांगलं उत्पन्न असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जात आहेत. ही गरीब महिलांसाठी योजना होती. सामान्य महिलांसाठी योजना होती. ज्यांचं उत्पन्नाचं साधन नाही, अशा ग्रामीण भागातील, शहरातील लोकांसाठी योजना असावी अशी आमची भूमिका होती. तुम्ही हे पैसे चुकीच्या मार्गाने दिलेत. बोजा सरकारच्या तिजोरीवर पडतोय हे समोर आलंय. ज्या महिलांना पैसे दिलेत त्यांच्याकडून परत घेऊ नका. त्यांना नोटिसा पाठवू नका, अशी आमची विनंती आहे – संजय राऊत</p>
जिवे मारण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीशी अश्लील कृत्यू, अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : शाळकरी मुलगी, तसेच तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीनांनी तिच्याशी अश्लील कृत्य केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोन अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
Maharashtra Live Blog : खातेवाटप ठरले? कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदे?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मध्यरात्री खातेवाटपावर चर्चा झाल्याची चर्चा आहे. या बैठकीत काय ठरलं? कोणाला किती मंत्रिपदे मिळणार यावर चर्चा झाल्याचं म्हटलं जातंय. मात्र, या बैठकीतील चर्चा अद्यापही गुलदस्त्यात आहे.
Maharashtra Political News Live Updates : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा