राज्यात विधानसभेचे विशेष अधिवेशन चालू झाले आहे. आज या अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून जवळपास सर्व आमदारांनी शपथ घेतली. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल. त्यांनी कालच विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज केला होता. त्यांची या पदाकरता बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीने ईव्हीएमविरोधात एल्गार पुकारला आहे. तसंच, महाराष्ट्र एकीकरण समितीचं आज बेळगावात महाअधिवेशन आहे. कर्नाटक पोलिसांनी या अधिवेशनाला परवानगी नाकारली आहे. परंतु, महाराष्ट्र एकीकरण समिती अधिवेशनावर ठाम असल्याने कर्नाटक पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Political News Updates : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा
नाशिक : ८० हजार रुपयांचा नायलाॅन मांजा जप्त
नाशिक – बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून उपनगर पोलिसांनी ८० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रोळीत साडेपाच लाख रुपयांचा गुटखा जप्त
मुंबई: राज्यात गुटखा बंदी असताना अनधिकृतरित्या गुटखा विक्री करणाऱ्या तीन आरोपींना पार्कसाईट पोलिसांनी विक्रोळी परिसरातून अटक केली. या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी एक रिक्षा आणि साडेपाच लाख रुपयांचा गुटखा हस्तगत केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातील एका गाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत गुटख्याचा साठा असल्याची माहिती पार्कसाईट पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पार्कसाईट पोलिसांनी ६ डिसेंबर रोजी सायंकाळी तेथे छापा घातला. यावेळी पोलिसांना तेथे विविध कंपन्यांचा प्रतिबंधित ५ लाख ४२ हजार रुपये किमतीचा गुटखा सापडला. पोलिसांनी गुटख्याचा साठा करणाऱ्या अरविंद गुप्ता, रामकलप पाल आणि अन्वर शेख या तिघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून दीड लाख रुपये रोख आणि एक रिक्षा हस्तगत केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
“जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
जयंत पाटील यांच्या भाषणात झालेले उल्लेख काही वेगळे संकेत आहेत का? या प्रश्नावर बोलताना उदय सामंत म्हणाले, “ज्यावेळी विनोदाने काही चर्चा होते. सभागृहात अजित पवार जेव्हा म्हणाले की माझं पूर्ण लक्ष तुमच्यावर आहे. त्यानंतर जयंत पाटील असं बोलले आहेत की दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ब्रीद वाक्य आहे की योग्य वेळी योग्य निर्णय. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय जयंत पाटील यांचा कसा होतो? याकडे आमचं सर्वांचं लक्ष लागलं आहे”, असं सूचक विधान उदय सामंत यांनी म्हटलं आहे. आज झालेल्या भाषणात काही सूचक इशारा आहे असं वाटतं का? यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, “भाषणातील काही वाक्य अधोरेखित करण्यासारखी होती. त्यातील योग्य वेळी योग्य निर्णय हे वाक्य होतं. त्यामुळे हे सत्यात कधी उतरेल हे जयंत पाटील यांनी ठरवलं पाहिजे. जयंत पाटील यांच्यासारखे व्यक्तिमत्व, त्यांनी अनेकदा अर्थसंकल्प मांडलेला आहे. अनेक खात्याचं काम पाहिलेलं आहे. असा नेता योग्य वेळी योग्य निर्णय या टॅगलाईन खाली महायुतीमध्ये येणार असतील तर नक्कीच आम्हाला चांगलं वाटेल”, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
गृहखात्याचा तिढा सुटला का? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं भाष्य
महायुतीत गृहखात्यावरून तिढा असल्याची चर्चा आहे. गृहखात्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही असल्याचं बोललं जात आहे. मात्र, गृहखातं सोडण्यास भाजपा तयार नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे गृहखात्याचा तिढा सुटला आहे का? असा प्रश्न विचारला असता अमोल मिटकरी म्हणाले, “गृहखात्याचा तिढा सुटला आहे.” मग गृहखातं कोणाकडे असणार? असं विचारलं असता त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य तो निर्णय घेतील, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
बांगलादेश मधील हिंदूंचे रक्षण करा; आमदार सत्यजित तांबे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
बांगलादेश मधील हिंदू धर्मियांचे अध्यात्मिक गुरु चिन्मय कृष्णदास यांना बांगलादेश सरकारने अत्यंत अन्यायकारक पद्धतीने अटक केली आहे. त्याचबरोबर तेथील अल्पसंख्यांक असलेला हिंदू धर्मियांवर सातत्याने हल्ले होत आहेत. सविस्तर वाचा…
हल्ल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव आक्रमक, आमदार भास्कर जाधवांविरोधात विराट मोर्च्याचे आयोजन
वंचित बहुजन आघाडीतर्फे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्याच्या निषेधार्थ १२ डिसेंबरला सकाळी साडे दहा वाजता गुढे फाटा ते बहाद्दूर शेख नाका चिपळूण येथून डिवायएसपी कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा…
पिंपरी- चिंचवड: अनधिकृत भंगार गोदामात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे; आमदार महेश लांडगे
चिखली कुदळवाडीमध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग लागल्यानंतर यावरून राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी या भंगार गोदामांमध्ये काम करणारे हे बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे असल्याचा दावा केला आहे. सविस्तर वाचा…
गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान
गोरेगाव (प.) येथील जवाहर नगरमधील एका घरावर रविवारी सायंकाळी पिंपळाच्या झाडाची सुकलेली भलीमोठी फांदी पडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, घराच्या छताचे नुकसान झाले. विनंती केल्यानंतरही या झाडाची फांदी छाटण्यात पालिकेकडून दिरंगाई करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. सविस्तर वाचा…
रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा विस्कळीत; गोंदियातील प्रवाशांमध्ये नाराजी
गोंदिया : गेल्या आठवडाभरापासून हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस आणि मेल गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. या मार्गावरील महत्त्वपूर्ण अशा हावडा-पुणे (आझाद हिंद एक्स्प्रेस), समता एक्स्प्रेस आणि एल.टी. (लोकमान्य टिळक) एक्सप्रेस आठ ते दहा तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना त्रास होत आहे.
अविवाहित मुलीला वडिलांकडून पोटगी मिळू शकते? न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय….
नागपूर : एखादी अठरा वर्षावरील मुलगी अविवाहित असली तर तिला तिच्या वडीलांकडून पोटगी प्राप्त करण्याचा अधिकार आहे की नाही याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयाने मुलीला पोटगी देण्याचे वडीलांना आदेश दिले होते, मात्र वडीलांनी हा आदेश बेकायदेशीर असल्याचा दावा करत उच्च न्यायालयात या आदेशाला आव्हान दिले होते.
सोन्याच्या दरात चार तासात तीनदा बदल, हे आहेत आजचे दर…
नागपूर : नागपूरसह देशभऱ्यात सोने- चांदीच्या दरात चढ- उताराचा क्रम कायम आहे. सोमवारी (९ डिसेंबर) नागपुरात सकाळपासून चार तासात सोन्याच्या दरात तीनदा बदल होऊन ते आणखी उंचीवर गेले. त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.
“हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, लवकरच स्फोट होणार,” ईमेलवरील धमकीने उपराजधानीत खळबळ…
नागपूर : ‘तुमच्या हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला असून लवकरच स्फोट होणार आहे’ अशी धमकी गणेशपेठ स्थानकाजवळ असलेल्या हॉटेल द्वारकामाईच्या ‘ई मेल’वर आली. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापकाच्या पायाखालची माती सरकली. त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. बॉम्बस्फोटाची खबर पोहचताच पोलिसांचा मोठा ताफा हॉटेलसमोर आला.
न्यायाधीशांची संपत्ती सार्वजनिक करण्याबाबत कायदा? केंद्र शासन म्हणतेय…
नागपूर : आमदार-खासदार या लोकप्रतिनिधींप्रमाणे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संपत्ती सार्वजनिक करणे बंधनकारक करण्यासाठी कायदा तयार करण्याण्याबाबत मागील अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे. न्यायाधीशांनी निष्पक्षपणे कार्य करावे तसेच त्यांच्या कार्यात पारदर्शकता यावी या हेतूने त्यांनी संपत्ती सार्वजनिक करावी याबाबत चर्चा सुरू आहे.
“रामकृष्ण हरी, आपली देवगिरी बरी”, अजित पवारांच्या आमदाराचा जयंत पाटलांना टोला
"दादा, आपल्या पक्षाचा एक नियम आहे योग्य वेळी योग्य निर्णय!".. ….. (सभागृहात श्री जयंत पाटील साहेबांच्या भाषणातील सुचक विधान #रामकृष्णहरी आपली देवगिरी बरी ?
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 9, 2024
Mumbai Live News : मुंबईत बर्निंग कारचा थरार, जोगेश्वरी पुलावर कारने घेतला पेट
#WATCH | Maharashtra: A car caught fire and burnt to ashes on Jogeshwari Bridge in Mumbai
— ANI (@ANI) December 9, 2024
More details awaited. https://t.co/4iQGP3ageL pic.twitter.com/rat7DhNGeK
पिंपरी-चिंचवड: “अनधिकृत गोदामांवर नंतर बोलू आधी आग विझवू”, अतिरिक्त आयुक्तांची अनधिकृत गोदामांना बगल!
पिंपरी- चिंचवड शहरातील कुदळवाडी भागात भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्यानंतर चिखली आणि कुदळवाडीतील अनाधिकृत गोदामांचा आणि भंगार दुकानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सविस्तर वाचा…
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यामध्ये एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना घडली. अनेक वर्षांपासून एका गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी आपल्या एका नातेवाईकाकडे आला असल्याची टीप मिळाल्यानंतर पोलीस पथक त्याला पकडण्यासाठी गेले. सावध असलेल्या आरोपीला पोलीस आल्याचा सुगावा लागताच त्याने तिथून धूम ठोकली. सविस्तर वाचा…
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…
नागपूर : एखाद्या अनोळखी क्रमांकावरून ‘व्हॉट्सॲप’वर लग्नपत्रिका पाठवल्यानंतर उत्सुकतेपोटी किंवा कुण्यातरी नातेवाईकाचे लग्न असल्याचे वाटून ती पत्रिका उघडण्यात येते. लग्नपत्रिकेच्या नावाने ‘एपीके’ असलेली ‘फाईल’ ‘डाऊनलोड’ होते. मात्र, काही क्षणातच भ्रमणध्वनीचे नियंत्रण दुसऱ्याकडे गेल्याचे लक्षात येते. हा प्रकार सायबर गुन्हेगारांचा नवा ‘सायबर स्कॅम’ आहे.
Maharashtra live News : “सर्वांत तरुण सदस्य म्हणून…”, रोहित पाटलांचं विधानसभेत पहिलंच भाषण!
आज या देशाचं वेगळेपण टीकून आहे त्याचं कारण असं आहे की अनेक शाह्या या देशाने पाहिल्या.. पण लोकशाही या देशाच्या वाट्याला आली ज्यामुळे संबंध जगामध्ये आपलं देश वेगळेपण टिकवून ठेवू शकलं. त्याचं दुसरं कारण संसदीय पद्धत आपण कमावली, त्यामुळे लोकशाहीला वेगळं महत्त्व प्राप्त झालं. त्या एकमताच्या माध्यमातून जो अधिकार आपल्याला मिळाला त्यानुसार सदस्य येथे बसले आहेत. आपल्याला विनंती करेन की सर्वांत तरुण अध्यक्ष होण्याचा मान तुम्ही पटकावला आहे तसा मी सर्वांत तरुण सदस्य म्हणून मान पटकावला आहे. मंत्रिमंडळाच्या या तरुण सदस्याकडे बारीक लक्ष असेल, अशी विनंती करतो. माझ्याकडे लक्ष असावं याचं कारण मी सुद्धा वकिली पूर्ण करतोय. एक नंबरवरच्या बाकावर असलेल्या वकिलाला जशी तुम्ही मदत करता, तशीच मलाही कराल – रोहित पाटील
नैसर्गिक आपत्तीचा ससेमीरा कायमच! गडद धुक्यामुळे तूरपीक संकटात; शेतकरी हवालदिल
वर्धा : नैसर्गिक आपत्तीचा ससेमीरा संपता संपत नसल्याचे चित्र आहे. अतिवृष्टीने घायाळ शेतकरी आता नव्या संकटात सापडला आहे. सध्या रब्बी हंगामात तूर मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. हे आंतरपीक शेतकऱ्यास थोडे अधिकचे पैसे देणारे असते. पण आता या पिकावर संकटाचे मळभ दाटून आले आहे
Maharashtra Live News : जनतेच्या मताधिक्याची टिंगल उडवणं योग्य नाही – नाना पटोले
मला मिळालेल्या २०८ मताधिक्क्याची टिंगल उडवली गेली. इथे निवडून येणारा सदस्यच येऊ शकतो. मी २००४ मध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आलो होतो. इथे काय त्यावरून बक्षिस मिळत नाही. लोकांनी मतदान केलेलं आहे. त्याबद्दल टिंगल केली जाते, जनतेच्या मताधिक्यावर हास्यकल्लोळ करायचा असेल तर हे बरोबर नाही – नाना पटोले</p>
विधानसभा अध्यक्षाचं पद म्हणजे काटेरी मुकूट, उजवीकडे पाहिलं की डावीकडे टोचतं अन् डावीकडे पाहिलं की उजवीकडे टोचतं – नाना पटोले
वाघिणीच्या पिंजऱ्यात शिरला साप आणि आता मोराच्याही…
नागपूर : ब्रिटिशकालीन महाराजबाग प्राणिसंग्रहालय म्हणजे काही वर्षांपूर्वी पर्यटकांसाठी पर्यटनाचे उत्तम ठिकाण. याच महाराजबागेत काही दशकांपूर्वी सिंहाची एक जोडी होती आणि त्यांच्या डरकाळ्यांनी आजूबाजूच्या परिसरातील लोकांची झोप उडायची. मात्र, आता हेच प्राणिसंग्रहालय गाजतेय ते वेगळ्या कारणांनी. सातत्याने याठिकाणी प्राण्यांच्या पिंजऱ्यात साप, नाग शिरण्याच्या घटना वाढत चालल्या आहे.
छोट्याशा मतदारसंघात विधानभवनाचा विभाग येतो. त्यांनी दालनं सुरेख केली, आपल्याकडे आल्यावर गरम कॉफी देऊन त्यांनी शांत घालवून दिली. अडीच वर्षांत त्याचा अनुभव घेतला. मासे खाऊ घातले, जेवण दिलं. बिझनेस अडवायजरी कमिटीचा दर्जा इतका उंचावला की तुम्हीच अध्यक्ष व्हावं हे आम्ही मनोमन ठरवलं होतं – जयंत पाटील
सभागृहाच्या बाहेरही शांतता असली पाहिजे. अवांतर माणसं आत येऊ नयेत, अशी विनंती करतो. मधुकरराव चौधरी अध्यक्ष होते, १९९० साली मी पहिल्यांदा आमदार झालो. अध्यक्ष महोदय उभे राहिले की विधानसभेचे सदस्य तिथेच उभे राहायचे. आता आपण कडक व्हा. विधानसभा सदस्यांना पत्र पाठवा, प्रोटोकॉल द्या. खाली बसून बोलण्यापेक्षा बोलणाऱ्याला बोलण्याची संधी द्यावी – जयंत पाटील
मुंबईत प्रथमच किमान तापमान २० अंशाखाली, सांताक्रूझमध्ये १३.७ नीचांकी तापमानाची नोंद
मुंबई : फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपुष्टात येताच मुंबईत पुन्हा एकदा थंडीची चाहुल लागली असून मुंबईत रविवारीपासून किमान तापमानात घट झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी प्रथमच किमान तापमान २० अंशाखाली नोंदले गेले,तर सांताक्रूझ केंद्रात मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली.
Maharashtra Live News :
राहुल नार्वेकरांकडे नेतृत्त्वगुण, कार्यक्षम असल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड झाली – उपमुख्यमंत्री अजित पवार</p>
राहुल नार्वेकर सभागृहाचा कोहिनूर, एकनाथ शिंदेंकडून कौतुक
राहुल नार्वेकरांनी रामशास्त्री प्रभुणेप्रमाणे निकाल दिला – एकनाथ शिंदे</p>
नोंदणी विवाहाकडे नव्या पिढीचा कल, रशियन युवक म्हणतो हेच बरं.
वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणत विवाहावर खूप खर्च नको. विवाहसाठी कर्ज, उसनवारी करीत अनाठायी खर्च टाळण्याचा संदेश त्यांनी ग्रामगीतेतून दिला. हिंदू धर्मात लग्न संस्कार हा प्रमुख १६ संस्कारापैकी एक मानल्या जात असल्याने तो स्मरणीय ठरावा असा प्रयत्न असतो. त्यामुळे आजकाल करोडो खर्च करीत धडाक्यात लग्न सोहळे पार पडत असल्याचे चित्र आहे.
Maharashtra Live Blog : पिंपरी चिंचवड येथील गोदामाला भीषण आग
#WATCH | Maharashtra: A massive fire broke out at a scrap godown in Chikhali area of Pimpri Chinchwad, Pune. 6 fire engines are at the spot.
— ANI (@ANI) December 9, 2024
More details awaited pic.twitter.com/f8ADbEDhZ9
Maharashtra Live News :
कर नाही त्याला नाही डर, उसका नाम राहुल नार्वेकर- एकनाथ शिंदे</p>
Maharashtra Political News Live Updates : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा